वॉटर प्युरीफायर्स

Submitted by झकासराव on 7 January, 2013 - 07:07

सध्या नवीन ठिकाणी शिफ्ट झालोय.
तेथे पाण्याचा एक प्रॉब्लेम आहे.
सध्या टाकीमध्येच कॉर्पोरेशनच व बोअरच पाणी मिक्स होतं.
त्यामुळे वॉटर प्युरीफायर घ्यायचा आहे.
हा धागा सध्या मार्केट मध्ये अस्तित्वात असलेल्या वॉटर प्युरीफिकेशन सिस्टीम्स बद्दल, त्यांच्या मेन्टेनन्स कॉस्ट, त्यांची उपयुक्तता, त्यांची सर्व्हीस, त्यांचे फायदे ह्याची चर्चा व्हावी ह्या उद्देशाने काढलाय.
सोबतच पाण्यातील टिडीएस लेव्हलस त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम अशी माहितीही मिळाली तर अजुन छान.
Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Hindustan Lever चे PureIT मस्त आहे. त्याला power लागत नाही, कुठलेही electronic circuit नाही. १५०० लिटर capacity चे ५००रु ला मीळते. महत्वाचे म्हणजे running water लागत नाही.
मी गेली ४ वर्ष वापरतो आहे, फार चांगला अनुभव आहे. service पण चांगली आणि तत्पर आहे.

अरे वाह!!
मला ही लिन्क माहितीच नव्हती.
धन्यवाद कविन. Happy

साती असं नाय हा चालणार त्या लिन्क वर डॉ चे मत येवु देत की.

माझ्या वडिलांकडे Hindustan Lever चे PureIT आहे. त्यांनी सुरुवातीला बॅटरी का काय असते ते ६ महिने चालेल असे सांगितले पण ते ४ महिन्यातच संपले. Hindustan Lever च्या लोकांनी सांगितले की तुम्ही ४०० लिटर पाणि वापरले. प्रत्यक्षात आई बाबा बरेच दिवस घराबाहेरच होते. नवीन बसवायचे तर ८५० किंमत सांगितली. न लावून सांगतो कोणाला अशी परिस्थिती आहे.

मला ते अजिबात कॉस्ट इफेक्टीव वाटले नाही. त्याऐवजी मला आमचे अ‍ॅक्वा गार्ड जास्त चांगले आहे असे वाटते.

निवांत प्यायला हवय.

मी पाहिलेले काही.
युरेका फोर्ब्सच्या साइट वर जाउन फ्री डेमोसाठी रिक्वेस्ट टाकली.
जो माणुस आला त्याने काहि मोडेल्सची माहिती सांगितली.
नंतर घरच्या पाण्यातील टिडीएस लेव्हल चेक केली.
ती ११७ होती. (त्यादिवशीची. रोजचा वेगळा येत असणार कारण बोअरच किती पाणी मिक्स होत हे प्रमाण बदलतं.)
त्याच्या म्हणण्यानुसार आर ओ ची गरज नाहिये. (हे मलाही माहितीये) तो कॉम्पॅक्ट मॉडेल सुचवतोय.
ज्यात फक्त कार्बन फिल्टर, युव्ही फिल्टर आणि अजुन एक फिल्टर आहे. त्या मॉडेलची किमंत ८४९० आहे.
त्याची एएमसी १३०० वार्षिक आहे. अ‍ॅक्वागार्ड ह्या ब्रॅण्डवर सर्व खेळ सुरुय अस फिलिन्ग आलं मला.
ह्याची अ‍ॅड जोरदार सुरु असते टिव्हीवर.

केन्ट आर ओ अजुन पाहिला नाहिये पण मला आर ओ ची गरज नाहिये. अ‍ॅड हेमामालिनी करते.

आयन एक्शचेन्ज वाल्याला घरी बोलवल होतं. झिरो बी मशीन.
त्याच्याकडे टिडीएस लेव्हल चेक करण्यासाठी काहि मशीन नव्हती पण एलेक्ट्रोलेसीस करुन दाखवलं.
पाण्याच्या वर ५ मिनिटात थरच जमा झाला.
त्याच्याकडे मात्र फक्त आर ओच आहे. मिक्स पाण्यासाठी आर ओच घ्या असं त्याचं मत.
त्याच्याकडे १५५०० आणि १६५०० अशा किमतीच्या दोन मशीन आहेत. मेन्टेनन्स साधारण सगळे फिल्टर व मेम्ब्रेन बदलणे ह्यासाठी वार्षिक खर्च अंदाजे ४०००. ह्यांची अ‍ॅड जुही चावला करते.

तिसरा एका एग्जिबीशन मध्ये पाहिला होता.
भारतात ही एकमेव कंपनी आहे जी आर ओ टेक्नॉलॉजीसाठी मेम्ब्रेन बनवतेय.
permionics india
ह्यांची अ‍ॅड नसतेच. पण माहिती देणारा माणुस प्रॉपर काय टेक्नॉलोजी आहे ह्यापासुन सुरु करुन सर्व माहिती देत होता. फ्रॅन्चायसी पॉलिसीनुसार कंपनी चालते.
ह्यांच्याकडेही यु व्ही फिल्टर पासुन आरओ पर्यंत सर्व आहेत. मेम्ब्रेन स्वतः बनवत अस्ल्याने आणि जाहिरात खर्च नसल्याने किमंत कमी होती.
मिक्स पाण्यासाठी त्यानी एक नॅनो फिल्टर बाजारात आणलाय. ज्याच्या मेम्ब्रेनचा पॉरोसिटी साइज ०.०००८ मायक्रॉन आहे. (इतका छोटा साइज बनवतात कसा?? :अओ:)
ह्यामध्ये टिडीएस लेव्हल ३०-४० टक्के कमी होते असा त्यांचा दावा आहे. त्यानी पाणी चेक केले त्यादिवशी टिडीएस लेव्हल १६७ होता. ही जास्त प्रॉमिसिन्ग वाटलेली कंपनी आहे. कुणी वापरलाय का ह्यांचा फिल्टर?
सर्व्हीस कशी आहे? वारज्यात ह्यांच ऑफिस आहे. मला पिंची मध्ये नीट सर्व्हीस मिळाली पाहिजे ही अपेक्षा आहे.
त्यानी स्पेशल ऑफर म्हणुन १२५०० किमंत लावतो अस सांगितलय. लो मेन्टेनन्स ही त्यांची खासियत आहे.

हुश्श.

डॉ लोक्स कुठे गायबलेत?

झकासराव - ती तिसरी कंपनी जे सर्व चांगलं, लो मेंटेनन्स वगैरे दावा करीत आहे तो फिल्टर कोणी वापरत आहे का हे चौकशी करा - जो प्रत्यक्ष वापरणारा आहे तोच खरे प्रॉब्लेम्स, मेंटेनन्स कॉस्ट वगैरे सांगू शकेल. कुठलेही प्रॉडक्ट मार्केटिंग करताना -सर्व चांगले, चांगले म्हणूनच म्हणत असतात -आपण नीट बघून, जो काही काळ वापरतोय अशाला भेटून मगच तो प्रॉडक्ट घेणे श्रेयस्कर असते.

मी गेले सहा-एक वर्षं प्युरीट वापरत आहे. कधीही काहीही तक्रार नाही. नियमित घरच्याघरी साफ केले की स्वच्छ पाणी.

http://www.maayboli.com/node/25597 हा बाफ काढला त्यावेळी प्युरीफायर बदलावा की काय? अशी शंका मनात निर्माण झाली होती. पण इतर कंपन्यांची पत्रके वाचून, आमच्या गरजा, रनिंग वॉटर करता लागणारी वेगळी पाईपलाईन टाकून घेणे, स्वैपाकघरात जागा असणे इ सगळ्या बाबींचा विचार करता प्युरीटच सुरु ठेवण्याचे ठरले.

त्यांची सर्व्हिसही अतिशय चांगली आहे. एकदा त्यांचा माणूस तुमच्याकडे आला, की त्याचा नंबर घेऊन ठेवा. तो तुमच्या एरीयाकरता काम करत असतो. त्यामुळे काही समस्या उदभवल्यास डायरेक्ट त्याला फोन करून बोलावून घेणे सोपे पडते.

मी गेले सहा-एक वर्षं प्युरीट वापरत आहे. कधीही काहीही तक्रार नाही. नियमित घरच्याघरी साफ केले की स्वच्छ पाणी. >>>> मला वाटतं हा साधा फिल्टर असावा - आर ओ सिस्टिम नसावी. कारण तुम्ही मुंबईत रहाता त्यामुळे क्षार कमी करावे असा उद्देशही नसावा.
झकासरावांना बोअरिंगच्या पाण्यामुळे - कोणता फिल्टर वापरला असता क्षार कसे कमी होतील ही माहिती हवी आहे (माझ्या मते).
आर ओ सिस्टिम म्हटली की मेंटेनन्स आलाच - तो फिल्टरही बहुधा बदलत असतील, नुसता साफ करुन चालत नाही.

मी जेव्हा प्युरीफायर बद्दल माहीती जमवत होते तेव्हा मलासुध्दा permionics india चे रीव्ह्यु चांगले वाटले होते. पण त्यांची मला हव्या असलेल्या जिल्ह्यात service च नव्हती.

कोणता फिल्टर वापरला असता क्षार कसे कमी होतील ही माहिती हवी आहे (माझ्या मते).>> अगदि बरोबर आहे.
फक्त कॉर्पोरेशनच पाणी असतं तर मी देखील फक्त यु व्ही फिल्टरच वापरला असता.

जो काही काळ वापरतोय अशाला भेटून मगच तो प्रॉडक्ट घेणे श्रेयस्कर असते>> अगदि बरोबर शशांकजी.
म्हणुनच इथे कोणाकडे तो फिल्टर आहे का ह्याची माहिती मिळतेय का तो ही उद्देश आहेच. शिवाय कोणाला अजुन चांगला ऑप्शन माहिती असेल तर मिळेल असा ही हेतु होता.
मी नेट वर सर्च केल तर एखादाच अपवाद वगळता ह्या सिस्टीमचे चांगले रिव्ह्यु मिळालेत वाचायला.

आर ओ सिस्टिम म्हटली की मेंटेनन्स आलाच - तो फिल्टरही बहुधा बदलत असतील, नुसता साफ करुन चालत नाही>>> हो ह्यामध्ये चार फिल्टर्स बदलावे लागतात. ते ही आपल्या पाण्याच्या वापरावर आहे.
मोठ्या फॅमिलीसाठी लवकर ब्लॉक होतील फिल्टर्स. त्यांचा खर्च साधारण १५०० आहे.
मेम्ब्रेन लाइफ देखील किती पाणी वापरतो त्यावर आहे. आमच्या छोट्या फॅमिलीला २-३ वर्षे मेम्ब्रेन चालेल असा त्यांचा दावा आहे. शिवाय जर आम्हाला काही कारणास्तव फक्त बोअरच पाणी वापराव लागणार असेल तर ते आर ओ चा मेम्ब्रेन बसवुन देतील. परत नवीन सिस्टीम घेण्याची गरज नाही.

मला ह्या सिस्टीम्स मध्ये सर्वात जास्त इश्यु फक्त एकच वाटतो तो म्हणजे आफ्टर सर्व्हीससाठी तुम्ही एकाच कंपनीशी बांधले जाता. आज ते वार्षिक खर्च १५०० घेतील. नंतर २००० केला तरी तो द्यावाच लागेल. अ‍ॅक्वागार्ड वाला नॅनोसाठी सर्व्हीस नाही देणार.

. पण त्यांची मला हव्या असलेल्या जिल्ह्यात service च नव्हती>> हो त्यांची पॅन इन्डिया अव्हेलेबिलिटी नाहिये.
पण नेटवर काही (नोकरीसाठी गेलेले) चैन्नेकर असे पाहिलेत की ज्यानी पुण्यातुन ही सिस्टीम नेली होती.

झकास.. 'प्युअर फ्लो'चा फिल्टरपण चांगला आहे (मेंब्रेन टेक्नॉलोजी). माझ्याकडं पुण्यात मी वापरतोय. मेंटेनन्स काहीच नाही. पण स्टोरेज नाही. वाहतं पाणी पाहिजे. त्यांचंच आता नवीन मॉडेल आलंय ज्याला वीज लागते. आमच्या सांगलीतल्या घरी नुकतंच बसवलंय. तिथं आधी प्युअर इट होतं पण त्याचा फारसा फरक पडत नव्हता सांगलीच्या पाण्याला. 'प्युअर फ्लो'चा मात्र चांगलाच फरक दिसतोय. पाण्याची चवपण पुण्यातल्या पाण्यासारखी लागते आता. यांची कुठं फारशी जाहिरात मात्र कधी दिसत नाही. विक्रीपश्चात सेवाही बरी आहे.

विक्रीपश्चात सेवाही बरी आहे.>> मला हाच मुद्दा जास्त महत्वाचा वाटतोय.
धन्यवाद रे.

मी जो पाहिलाय नॅनो तो मिक्स पाण्यासाठीच डिजाइन केला आहे.
तो वीजेवर चालतो.

मझ्याकडे फिलिप्स चा यूवि वाटर पुरिफिएर आहे ज्याचि Servicing आपन स्वाताहा घरी करु शकतो. model:-WP3889/01 . पुण्यामधे त्याचा फिल्टर कुठे मिलेल ? कोनाला कहि महिति ?
Servicing एक्दम सोपि आहे. फिल्टर अणि यूवि लाइट बदलने अगदि ५ मिनिटात होते.

झकास, अतिशय उपयुक्त धागा. आमच्याकडेही सेम प्रॉब्लेम झालाय. कॉर्पोरेशनचे पाणी पुरत नाही त्यामुळे सोसायटीवाले लागेल तसे टँकर आणुन ओततात. बिल्डरने दिलेल्या प्युरिफायर आता कुचकामी वाटतोय कारण स्वच्छ केलेले पाणी उकळले तर भांड्याच्या कडेला व तळाला पांढरा साका जमा होतो. Sad

कोणीतरी डॉक्टरांनी इथे लिहा प्लीज.

झकासरावांनी हितं लिवायची आडर विपूने दिलिये. आन वर चिंगीतै बी म्हन्ल्यात म्हून लिव्तोय.

(न पटण्यासारखा व निरुपयोगी प्रतिसाद)

कॉर्पोरेशनकडून पिण्यायोग्य (पोटेबल वॉटर) पाणी पुरवठा झाला पाहिजे. तो बहुतेकदा तसा असतो.

कॉर्पोरेशनकडून पाणी येते, त्याचे शुद्धीकरण आधीच करून आलेले असते. आपण फक्त डिस्ट्रीब्युशन सिस्टीममधील काँटॅमिनेशनबद्दल काळजी केली तरी पुरेसे व्हावे.
***
म्युन्सिपाल्टीचे पाणी पुरत नाही, हा प्रकार जरा कठीण आहे समजायला. जर पुरत नसेल तर पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी दबाव तयार करणे इ. इलाज आहेत. पण आपण बोअर खणून जमीनीच्या पोटतले १००० वर्षे जुने पाणी वर काढून आधी गाड्या/फरशा इ. धुण्यासाठी अन मग नंतर पिण्यासाठी वापरण्याचा उद्योग करीत असतो. याऐवजी, मुन्शीपाल्टिने (पाणीपट्टी घेते म्हणून) उत्तम पाणी दिलेच पाहिजे असा प्रयत्न केला तर जास्त चांगले. (आमच्या खानदेशात शिरपूर नामक तालुक्याच्या गावी नळाला बिस्लरीचे पाणी येते. म्हणजे त्या क्वालिटीच्या प्युरिफिकेशन प्लांटचे पाणी डायरेक्ट मुन्शिपाल्टीच्या नळाला. लोक संडासातही तेच वापरतात.) असो. तो इथला विषय नाही.
***
उपाय सुचवतो.

बिल्डिंगवर/घरावर २ टाक्या बसवा. म्युन्सिपाल्टीचे पाणी एक्स्क्लुजिवली एका टाकीत, व त्याचा वापर फक्त आणि फक्त पिण्यासाठी, भाज्या इ. धुण्यासाठीच फक्त करा. या पाण्याने दुसरे कोणतेही काम करू नका. यासाठी ४ लेयरची व स्क्रूकॅप झाकण असलेली टाकी वापरा. इतक्या कामासाठी ते पाणी पुरुन उरावे. इतर धुणीभांडी करायला बोअरचे/विहिरीचे पाणी वापरावे.

या उपर ते (मुन्शिपाल्टीचे सेप्रेट टाकीतील पाणी) गाळून घेण्यासाठी विना आर.ओ. चा फिल्टर पुरेसा व्हावा. साध्या अ‍ॅक्वागार्डमधे एक कापसाचा अन एक कार्बनचा फिल्टर प्लस फार झालं तर एक यूव्ही ट्यूब असते. पाहूनच हसू आलं होतं मला. याच फडकं अन कोळशातून गाळायला आपण लाईटबिल अन 'कँडल'चे पैसे त्या गाढवांना देत असतो. लहानपणी आई घट्टशा विणीचे सुती कापड चौघडी करून गाळण्यासाठी वापरत असे. अन त्यात पाणी गाळून आम्ही पीत असू. (ऑफकोर्स, 'त्या' काळी कॉलर्‍याच्या साथी देखिल येत, पण मी तरी गेल्या २० एक वर्षांत अशी साथ पाहिलेली नाही. रिसेंटली एक काविळीची साथ ऐकली आहे मात्र.)

फिल्टर का हवा?
तर
१. 'जंतू मारण्या साठी'
२. क्षार नियंत्रित करण्यासाठी.

अगदी संपूर्ण निर्जंतूक व विना मिनरल्सचे म्हणजे डिस्ट्ल्ड वॉटर वापरायचे ठरले, तरी तुम्ही स्ट्रिक्ट असेप्टिक प्रिकॉशन घेऊन मग ऑटोक्लेव्हड ग्लासेस वापरून त्यातून पाणी पिणार आहात का? अन मग तुमच्या तोंडात असलेल्या जंतूंचे काय?

ब्याक्टेरिया, व्हायरसेस इ. युबिक्विटस असतात. म्हणजे सर्वत्र आढळतात. घराबाहेर पडून कोपर्‍यापर्यंत जाऊन थोडी भाजी घेऊन आलात, तरी एक ५-५० टीबीचे जंतू तरी तुमच्या श्वासातुन शरीरात घुसलेलेच असतात.

सगळीच मिनरल्स काढून टाकणे धोकादायक आहे, हे त्या दुसर्‍या बीबीवरील पहिलीच डब्लू.एच.ओ. ची पीडीएफ पाहिलीत तर समजेल.

तात्पर्यः
या सगळ्यांचा फार बाऊ करू नका. आपल्या शरीरात इम्यूनिटी नावाचा प्रकार आहे. थोड्याफार एक्स्पोजरने तो अधिकाधिक स्ट्राँग होईल अशीही व्यवस्था आहे.

रीझनेबल स्वच्छता पाळा. अन बिन्धास्त पाणी प्या.

तुमच्या भागात खूप जड पाण्यामुळे किडनी/युरीनरी स्टोन इ. चे प्रमाण जास्त असेल, फ्लुरोसिस सारखे आजार 'एन्डेमिक' असतील तरच त्या दृष्टीने वॉटरसॉफ्टनर इ. वापरा. अन्यथा, आपापल्या ऐपतीप्रमाणी केन्ट, युरेका फोर्ब्स इ. लोकांचे खिसे भरा. जाड फडक्याने पाणी गाळून अन पाण्यात क्लोरिवॅट किंवा जीवन ड्रॉपचे २ थेंब टाकून प्यालात तरी हरकत नाही. जुलाबच होत असतील तर पाणी उकळून / गाळून प्या Wink

पाण्यातले जंतू संपवलेत तर हवेतले आहेतच. बाकी इतर मार्गांनी येणारे देखिल आहेतच.

टीपः
'पाणी बदलल्याने' पोट बिघडते, कारण तुमच्या इम्युनिटीला माहीती नसलेले तिथले लोकल जंतू पोटात येतात.
जितका जास्त दूरचा प्रवास, तितका त्रास जास्त होऊ शकतो. दिल्ली बेली (दिल्लीला येणार्‍या युरोपियनांचे पोट पाण्यामुळे बिघडणे), हा त्यातीलच एक आजार.

बिल्डिंगवर/घरावर २ टाक्या बसवा. >> हा सर्वोत्तम उपाय आहे पण आता तो शक्य नाहिये.
सर्व फ्लॅटसना कन्सील्ड प्लम्बीन्ग आहे आणि एकच टॅप. मग कॉर्पोरेशनच पाणी एक्सक्लुजिव्ह टाकीतुन देणार कसं. नवीन पाइपलाइन टाकने वै लयीच उपद्व्याप आहेत. जे ५० जणाची तोंड ५० दिशेला असल्याने प्रॅक्टिकल नाहिये,
म्हणुन फिल्टरेशन. युव्ही फिल्टर्स वर माझा फार विश्वास नाहिये.
तसही ते पाणी सॉफ्ट करत नाहियेतच.

सगळीच मिनरल्स काढून टाकणे धोकादायक आहे, हे त्या दुसर्‍या बीबीवरील पहिलीच डब्लू.एच.ओ. ची पीडीएफ पाहिलीत तर समजेल>> म्हणुनच ९५ टक्के टिडीएस लेव्हल काढुन टाकणारा आर ओ नकोय.

झकासरावांनी हितं लिवायची आडर विपूने दिलिये>> कोल्लापुरी विनंती हुती हो ती. Wink
धन्यवाद लिहिल्याबद्दल.
आता टिडीएस मुळे काय काय बिघडु शकतं हे जरा डिटेल लिहिणार का?

छान चर्चा. माझ्याकडे गेली ३ वर्षे टाटा स्वच्छ आहे. फक्त १००० रुपयांत घेतले होते. वीज लागत नाही. कपॅसिटी १८ लीटर्स. २ वेळा त्यातला बल्ब (कँडलसारखा प्रकार असतो) बदलला. त्याची किंमत आता ३५० रुपये. हा सगळ्यात स्वस्त आणि कार्यक्षम प्युरिफायर असावा. पण जड पाणी सुधारते का ते मात्र माहित नाही. अजूनपर्यंत पोटाच्या आजाराने घरातले कोणी कधी आजारी पडले नाही.

ज्यो ताई+१
मलाही लग्नात टाटा स्वछ मिळाला आहे प्रेझेंट म्हणून तोच आहे वापरायला रोज.. फक्त आम्ही त्यात रात्र्भर तांब्याच्या कळशीत ठेवलेले पाणी ओततो. पण खुप पाहुणे वगैरे आले तर ते पुरत नाही म्हणून कार्पोरेशन चेच पाणी डायरेक्ट. आजपर्यत काही ही आजार झालेले नाहीय्ते पाण्यामुळे..

इथेच वर डॉक्टरांनी (इब्लिस) सगळे व्यवस्थित समजाउन सांगितले आहेच.

तरीही "पिण्याचे पाणी" या धाग्यावरील मी दिलेली माहिती इथे परत देत आहे.

"जी मोठी शहरे आहेत (पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, इ.) तिथे म्युन्सिपाल्टीची वॉटर प्युरिफिकेशन्सची मोठ मोठी केंद्रे असतात. या ठिकाणी पाण्याच्या क्षारांचे प्रमाण ठरवणे इथपासून क्लोरिनेशन (जे बॅक्टेरिया, व्हायरस यांचे नियंत्रण करते) वगैरे सर्व गोष्टींची व्यवस्थित दखल घेत असतात. यामुळेच अशा सुसज्ज यंत्रणेतून येणारे पाणी जसेच्या तसे पिण्यायोग्यच असते (कुठलाही वॉटर प्युरिफायर वापरायची गरजच नसते).

क्षार संपूर्णपणे काढलेले पाणी आपण पिऊ शकणार नाही, त्याची गरजही नसते. अतिक्षार असलेले पाणी पिण्यायोग्य नसते. क्षाराचे प्रमाण टेस्ट करणार्‍या अनेक लॅब्ज आहेत - त्यांच्याकडे जाऊन कोणीही हे करु शकेल. (शहरात याची गरज नाही) ज्या ठिकाणी बोअरचे/ विहीरीचे वगैरे पाणी पिण्यासाठी वापरत असतील त्यांनी हे क्षार टेस्ट करुन तज्ज्ञांच्या सल्ल्याने आयन एक्स्चेंज रेझिन्स वापरुन ते क्षार नियंत्रण करणे गरजेचे आहे. तीच गोष्ट - फिल्ट्रेशन युनिट्सची - तज्ज्ञांचा सल्ला.

शहरात जे पाणी येते त्यात प्रचंड क्लोरिन वापरलेला असतो -त्यामुळे हे पाणी, परत निर्जंतुक करणे (फिल्टर व उकळणे) याला काहीही अर्थ नाही. जेव्हा हे पाणी साठवण्यात येते (घरात, अंडर ग्राऊंड/ ओव्हरहेड टाक्यांमधे) तेव्हा खरा प्रश्न येतो. पण वारंवार टाक्यांची निगराणी राखणे, त्या स्वच्छ ठेवणे हा यावरचा साधा उपाय आहे.

पुणे शहरातील - वॉटर फिल्टर वापरणार्‍या लोकांचे आरोग्य व साधे नळाचे पाणी वापरणारे लोकांचे आरोग्य असा सर्व्हे मला वाटतं डॉ मिलिंद वाटवे (पुणे) यांनी त्यांच्या काही विद्यार्थ्यांकरवी केलेला होता -त्याचा निष्कर्ष -साधे नळाचे पाणी वापरणारे लोकांचे आरोग्य जास्त चांगले असा होता.

अर्थात आपण घरात पाणी ज्या भांड्यात, माठात, पिंपात साठवतो ते सर्व व्यवस्थित स्वच्छ ठेवणे याला खूपच महत्व आहे."

कोणत्याही कंपनीचा फिल्टर घेतला तरी तो कोणत्या कारणाकरता हे सगळ्यात महत्वाचे आहे -
मुख्यतः दोन कारणे -१] पाण्यातील क्षार कमी करणे - यात आर ओ सिस्टिमचा वापर केला जातो. - बोअरचे पाणी ज्यात क्षार खूप आहेत ते क्षार कमी करण्यासाठी यात यंत्रणा असते.
२] पाण्यातील बॅक्टेरिया, व्हायरस, प्रोटोझोन्स नियंत्रित करणे. - ही साधी गाळणी असते. मात्र कुठलाही फिल्टर व्हायरस काढू / गाळू शकत नाही. त्याकरता क्लोरिनसारखे काही रसायनच लागते.

वर डॉ. नी सांगितलेच आहे की पाणी निर्जंतुक करुन पिण्याचा उपद्व्याप करण्यात काहीही अर्थ नसतो - तरीही बरीच मंडळी तो का करतात हे कळत नाही.
क्षार कमी करणे हे समजण्यासारखे आहे कारण जास्त क्षार शरीराला अपायकारक असतात (उदा. मुतखडा होणे)
शेवटी काय - "पसंद अपनी अपनी, खयाल अपने अपने"

कोणतापण वॉटर फिल्टर घ्या पण सोबत येक संकल्प पण करा
" मी माझ्यापरीने पाण्याच प्रदुषण कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न करणार "त्यासाठी
१. ईतत्र केर कचरा टाकणार नाही कारण त्या कचर्यातला बराच भाग पावसाबरोबर पाण्यात जातो
२. नदीत / तळ्यात / समुद्रात निर्माल्य टाकणार नाही. ताबुत / मुर्त्या पाण्यात टाकणार नाही.
३. सांडपाणी नियोजनासाठी कमीतकमी आपापल्या सोसायटीत प्रयत्न करणार

विचार करा.....

इब्लिसनी बरंच काही लिहलचं आहे. फक्त रेझिन वापरणं आणि थॉय्रॉइड होणं (अ‍ॅटो इम्युनो) असं काहितरी वाच्ल गेलय तसच डॉ. सांगितले आहे (झिरो बी संदर्भात).

पण बरेच लोक पैसे वाया घालवतात (गरज नसताना) हे मात्र बघितलं आहे. आम्ही जे नळाला पाणी येतं तेच पितो. फक्त पावसाळ्यात काहि दिवस मात्र उकळुन घेतो. (२-३ आठवडे).

खुपच टेंन्शन येत असेल तर ते क्लोरीन ड्रॉप्स वापरावेत.

जड पाण्यामुळे मुतखडा होतो असं कुठे चांगल्या रेफर्न्सने आलं असेल तर प्लिज शेअर करा.

मी जिथे काम करतो तेथे पाण्याचा टीडीएस ८०० पि पि एम आहे. हॉस्टेल (६०० मुलेमुली) वरचे सगळे लोक तेच पाणी पितात. त्यातल्या खुप कमी लोकांना त्याचा त्रास होतो.

हां पण अंघोळीला आणि कपडे धुवायला खुप त्रास होतो त्याचा. त्यासाठी वॉटर सॉफ्टनर वापरला तर चालतो. मी एक युनिट बनवले आहे स्वतःसाठी. त्याला ३००० रु खर्च आलाय. अजुन ़ओडले नाहिय. मला माझ्या वापरानुसार ते दर १५ दिवसांनंतर रीजनरेट करावे लागेल.

धन्यवाद इब्लिस.
दोन टाक्या करणं प्रॅक्टिकल नाहीये हे वर झकासरावांनी लिहीलं आहेच म्हणुन परत लिहीत नाही.

इम्युनिटीचा मुद्दा मला महत्वाचा वाटतो. पाण्यातले सगळेच जीव जंतु मारा, दिवसभर वेळोवेळी हात अँन्टीसेप्टिकने २ मि. धुवा, तसलाच साबण वापरा, A.C पण हवेतले जंतु मारुनच थंड हवा पुरवणार, फ्रिजचंही तेच असं सगळं करायंच आणि मग या अतिप्रोटेक्टेड वातावरणातुन जरा बाहेर पडलं की आजारी पडायचं. अर्थात बेसिक स्वच्छता महत्वाची आहेच पण थोड्या एक्स्पोजरमुळे इम्युनिटी टिकणं/वाढणंही महत्वाचं.

बाकी चर्चा वाचतेय आणि इंटरनेटवरही शोधाशोध सुरु आहे. झकास तुम्ही जो कोणता प्युरिफायर घ्याल तो इथे नक्की लिहा बरे.

आता टिडीएस मुळे काय काय बिघडु शकतं हे जरा डिटेल लिहिणार का?<<
पुरंदरे यांनी छान माहिती दिलेली आहे क्षार नियंत्रणाबद्दल.

निवांतराव
थायरॉईड चे काही सापडले नाही बुवा.

Pages