वॉटर प्युरीफायर्स

Submitted by झकासराव on 7 January, 2013 - 07:07

सध्या नवीन ठिकाणी शिफ्ट झालोय.
तेथे पाण्याचा एक प्रॉब्लेम आहे.
सध्या टाकीमध्येच कॉर्पोरेशनच व बोअरच पाणी मिक्स होतं.
त्यामुळे वॉटर प्युरीफायर घ्यायचा आहे.
हा धागा सध्या मार्केट मध्ये अस्तित्वात असलेल्या वॉटर प्युरीफिकेशन सिस्टीम्स बद्दल, त्यांच्या मेन्टेनन्स कॉस्ट, त्यांची उपयुक्तता, त्यांची सर्व्हीस, त्यांचे फायदे ह्याची चर्चा व्हावी ह्या उद्देशाने काढलाय.
सोबतच पाण्यातील टिडीएस लेव्हलस त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम अशी माहितीही मिळाली तर अजुन छान.
Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्युरीट आहे माझ्याकडे बरेच वर्ष. मला तरी ते आजवर बरे वाटले होते. पण आता या नवीन ठिकाणी पाणी बदललंय त्यामुळे प्रश्न.

नवीन प्युरीफायर घ्यायचा विचार सुरु आहे. कोणता घ्यावा याबाबत चाचपणी करत असताना माबोवर याबाबत धागे वाचल्याचे आठवले. इथली चर्चा तसेच नेटवर अन्य ठिकाणच्या चर्चा यातून बरीच माहिती मिळाली. याच धाग्यावर वरती:

>> Submitted by एम. on 10 January, 2013 - 15:10

या प्रतिसादात थोडक्यात सर्व माहिती खूप छान दिली आहेच. त्यामुळे ती परत रिपीट करत नाही. यात लिहिल्यानुसार...

>> हाय टीडीएस (१०० च्या वर असल्यास) आरओ इस बेस्ट. कार्पोरेशनच्या पाण्याचा टिडीएस ८० च्या आतच असतो म्हणून आरओची गरज नाही.

हे इतरही अनेक ठिकाणी लिहिले आहे. त्यामुळे UV फिल्टर घ्यायचे जवळपास निश्चित केले होते.

तरीही काल एका एमडी डॉक्टरांशी बोलता बोलता हा विषय निघाला आणि ते म्हणाले, "RO फिल्टर सध्या सगळ्यात सुरक्षित पाणी देतो पण त्याबाबत बरेच गैरसमज पसरवले गेलेत. पाण्यातले आवश्यक मिनरल्स कमी करतो वगैरे वगैरे. ते सगळे Myth पसरवले आहे. तुम्ही फार विचार करू नका सरळ UV+RO फिल्टर घ्या"

त्यामुळे आता पुन्हा गोंधळ झालाय Lol

RO सध्या खूप दुकानात प्रामुख्याने विकतात,इतर यूव्ही वगैरे मागे कोपऱ्यात ठेवलेले असतात त्यामुळे RO घ्यावा लागतो.इतर ऑप्शन्स कमी ठेवतात.
R O घेणार असाल तर त्यातले डिसकार्ड आणि वाया जाणारे पाणी बादलीत साठवून इतर वापराला, झाडांना किंवा भांडी घासायला वापरता येईल असं बघा.
आम्ही प्युरीट मार्व्हेला यूव्ही वापरतो आहे.तो चांगला चालू आहे.तोही आता क्रोमा मध्ये पटकन मिळत नाही.आम्हाला दुसरा दुसऱ्या ठिकाण साठी घ्यायचा होता तो एका भांडीवाल्याकडून मागवून घेतला.

पुण्यात RO ची गरज नसल्याने प्युरीट चा साधा जर्म कील करणारा वापरतो त्याचे कीट मात्र आजकाल दुर्मिळ होत चाललयं जे ३००० लीटर झाल्यावर किंवा ६ महिण्यांनी बदलावे लागते.

इकडे हैदराबादेत मात्र लोकल RO+UV घेतले आहे ते चांगले चालते आणि सुटे भाग इथे सहज उपलब्ध होतात ते घरच्याघरीच बदलतो.

होय मी सुद्धा मागचे अनेकानेक वर्षे (दीड दशक?) प्युअर-इटचा ग्राव्हीटी फिल्टर वापरतोय. अनुभव चांगलाच आहे. वरतीही प्रतिक्रियांमधून त्याबद्दल लिहिले गेले आहे.

पण आता रोज रोज पाणी टॉप-अप करणे, आठवड्या-दोन आठवड्याने फिल्टर डीसअसेंबल करून साफ करणे, दर सहा महिन्याला जर्म किट बदलणे (बाय द वे, जर्म किट Amazon वर सुद्धा उपलब्ध आहे) इत्यादी गोष्टी नको वाटत आहेत. शिवाय त्यांनी जो एवढीशी पाण्याची धार येणारा outlet tap दिला आहे त्याचा सगळ्यात जास्त वैताग येऊ लागला आहे. बाटलीभर पाण्यासाठी बराच वेळ तिष्ठत उभे राहावे लागते.

या सर्व गोष्टींमुळे नवीन प्युरीफायर घ्यायचा विचार सुरु आहे, ज्यामध्ये विशेषतः पाण्याचे इनपुट प्युरीफायरला पाईपने जोडून देता येते (रोज पाणी भरत बसा हा प्रकार नाही) शिवाय आऊटफ्लो सुद्धा मोठा असेल. mi_anu PureIt Marvella मध्ये सुद्धा पाण्याचा इनपुट पाईपने देता येत नाही ना? बायदवे वरच्या एकूण चर्चेवरून युव्ही च घेईन असे वाटते.

मार्व्हेला ला पाईप इनपुट आहे.
एकदा बटन चालू करून 5 मिनिट पाणी चढवलं की 4 लिटर पाणी त्यात साचतं आणि भरता येतं.नंतर ते संपलं की परत बटन चालू.

लेटेस्ट update.
बोअरवेल पाणी आणि कॉर्पोरेशन पाणी मिक्स परिस्थिती जैसे थे.
सकाळी मुलाची शाळा, माझे ऑफिस ह्या धांदलीत रोज खाली जाउन कॉर्पोरेशन पाणी घेउन येणे त्रासदायक होत होते. म्हणून शेवटी RO सिस्टीम लावली.
लावून काही वर्षें झालीत. मध्यंतरी माबोवर active नव्हतो.
हल्ली लोकल प्लेयर्स उतरले आहेत त्यामुळे RO सिस्टिम किंमत आणि मेंटेनन्स दोन्हीसाठी किफायतशीर आहे.
AMC देत नाही. काही बिघाड झाल्यास रिपेअर करायला बोलवून घेतो. सध्याचा माणूस आमच्याच बिल्डिंग मध्ये राहतो त्यामुळे वेळेचा वांदा नाहीच.
पण कॉर्पोरेशन पाणी मुबलक असेल तर RO ची गरज नाही हे मात्र सत्य.
आमचा नाईलाज होता.

Pages