वृद्धापकालीन नैराश्यावर उपाय काय?

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 11 November, 2014 - 05:44

रोजच्या आयुष्यात टीव्ही, वर्तमानपत्रांतल्या धक्कादायक बातम्या पाहिल्या की आपण अस्वस्थ होतो. जग सुरक्षित नसल्याची पुन्हा एकवार जाणीव होत राहाते. दंगली, खून, मारामार्‍या, दरोडे, हल्ले, चकमकी, बलात्कार, आपत्ती, दुष्काळ वगैरे बातम्या वाचल्या की ते वर्तमानपत्र पुन्हा उघडावेसेही वाटत नाही. निकटवर्तीयांमध्ये कोणाकडे आकस्मिक निधन, वाईट अपघात, दीर्घ आजार, दु:खद घटना घडल्या की कितीही म्हटले तरी मनावर एक मळभ येतेच!

वृद्ध व्यक्तींच्या बाबतीत शरीर जसजसे थकत जाते तसतसे मनही खूप कातर होत जाताना दिसते हे पाहिले आहे, अनुभवले आहे. लहानसहान घटना मनाला लावून घेणे, शारीरिक असमर्थतेमुळे मन खट्टू होणे, शरीराची दुर्बलता ही आयुष्याच्या आनंदात बाधा आणणारी मानणे, आप्तस्वकीयांचा वियोग - विरह सहन न होणे, बदलत्या काळासोबत स्वतःला बदलण्याची तयारी नसणे व त्यातून आलेले वैफल्य, रिकाम्या वेळाचा वापर कसा करायचा हे न कळल्यामुळे व शारीरिक असमर्थतेमुळे आलेल्या मर्यादा, मनाचा हट्टीपणा.... या आणि अशा अनेक गोष्टी ज्येष्ठांच्या बाबतीत त्यांच्या मनातली नैराश्याची भावना घट्ट करत जाऊ शकतात. त्यात कोणा जवळच्या व्यक्तीचे निधन झाले, कोणाचा अपमृत्यू झाला, टीव्हीवर कोणतीतरी भयानक बातमी पाहिली किंवा काहीतरी अस्वस्थ करणारे वाचनात आले की झाले!

काही वेळा एखादे आजारपण झाले की आजारपणानंतर आलेल्या शारीरिक दुर्बलतेतून मानसिक स्वास्थ्यही बिघडते. स्वतःच्या शक्तीवरचा, क्षमतेवरचा विश्वास उडतो. भीती वाटते. वेदनांची, मृत्यूची भीती आणि आपल्यानंतर काय याची चिंता झोप उडविते.

मनातल्या मनात कुढणे, जगाशी संपर्क नकोसा वाटणे, कोणाशी संवाद साधणे नकोसे होणे, औषधोपचारांस व वैद्यकीय तपासणीस खळखळ व टाळाटाळ, कुपथ्य, व्यायामाबाबत व योग्य आहाराबाबत उदासीनता, स्वतःच्या परावलंबी असण्याबद्दलची खंत, त्रास, चिंता आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्याबद्दल अनुत्साह... हे सारे कसे हाताळायचे?

या सार्‍याचा परिणाम त्यांच्या शरीरस्वास्थ्यावर तर होतच असतो, शिवाय इतर कुटुंबावरही त्याचा परिणाम होत असतो. त्यांचे खिन्न असणे हे जवळच्यांना सहन न होणारे असते. ज्येष्ठ व्यक्ती जर वेगळी राहात असेल व स्वतःचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याबद्दल आग्रही असेल तर अनेकदा हे नैराश्य लवकर कळूनही येत नाही.

ज्येष्ठांमधील नैराश्याला दूर करण्यासाठी वैद्यकीय उपचारांव्यतिरिक्त कोणते उपाय करता येतात व येऊ शकतात?

ज्या ज्येष्ठांना पाळीव प्राणी, लहान मुले, माणसांची फारशी आवड नाही, अध्यात्मात रुची नाही, घराबाहेर पडायला व लोकांमध्ये मिसळायला फारसे आवडत नाही अशांच्या बाबतीत त्यांचे औदासिन्य, निराशा कोणत्या प्रकारे दूर करणे शक्य आहे?

यासंदर्भातील काही उपयुक्त माहिती, सल्ले, अनुभव, टिप्स जरूर शेअर कराव्यात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्या ज्येष्ठांना पाळीव प्राणी, लहान मुले, माणसांची फारशी आवड नाही, अध्यात्मात रुची नाही, घराबाहेर पडायला व लोकांमध्ये मिसळायला फारसे आवडत नाही अशांना कदाचित या धाग्यावरील प्रतिसादकांच्या घरातील सकारात्मक विचाराच्या वृद्धांच्या काही कृती / जोपासलेले छंद मनाला भावू शकतात व तेही तो मार्ग अवलंबू शकतात, ही शक्यताही नाकारता येणार नाही. त्यामुळे धागा भरकटला आहे असे नाही.

मागे लोकसत्ता - चतुरंगमध्ये वाचल्याचे आठवते. एक बाई व त्यांचे पती आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदात घालवत असतांना अचानक पतीचे निधन झाले व त्या बाई नैराश्यग्रस्त झाल्या. (हेडरमध्ये अकुने हा मुद्दाही लिहिला आहे - जोडीदाराच्या मृत्यूनंतर आलेल्या नैराश्यावरील उपाय). त्यावेळी त्या बाईंनी कुणाच्या सांगण्यावरून ६५व्या वर्षी गाणे शिकायला सुरुवात केली व या सरस्वतीच्या उपासनेने त्या नैराश्यातून बाहेर आल्या. आता त्या स्वतः गाण्याचे क्लासेस घेतात. असेही होवू शकते काही ज्येष्ठांच्या बाबतीत.

आपली कोणालातरी खूप गरज आहे ही भावना आणि संबंधित कृतीही ज्येनांना निराश मनस्थितीतून बाहेर येण्याचे बळ देऊ शकते याचे प्रत्यंतर नुकतेच एका ओळखीच्या बाईंबद्दल पाहावयास मिळाले.

गेली अनेक वर्षे या बाई स्वत:च्या मर्जीने एकट्या राहातात. खूप छंद वगैरे लावून घेतलेत. मैत्रिणींबरोबर सहलींना जातात. मुलीने आपल्याकडे खूपदा राहायला नेले, पण तिथे त्यांना करमत नाही. तर झाले काय, बघता बघता अचानक एक दिवस या बाईंची तब्येत खूप बिघडली व आयसीयूत दाखल करावे लागले. मोठी सर्जरी झाली. त्यानंतरचा अशक्तपणा. इतरांवर अवलंबून राहावे लागते याचे दु:ख. बाई उदास राहू लागल्या. कशात मन रमेना. सारखी निरवानिरवीचीच भाषा. जवळचे नातलगही वैतागले. या काळात बाईंना त्यांची थोरली बहीण व मेव्हण्यांनी खूप समजून घेतले. मायेचा आधार दिला. प्रेमळ दटावणी करून आपल्याकडे काही दिवस घेऊन गेले. त्यांना घेऊन एखाद्या कार्यक्रमाला जाणे, नाटक सिनेमा पाहाणे, गप्पा मारणे वगैरे तर होतेच! पथ्याबाबतही काटेकोर होते दोघे. हळूहळू या बाई सावरल्या. पण तरी खिन्न असायच्या. पूर्वीसारख्या लोकांमध्ये मिसळायच्या नाहीत. एकटीलाच बरे वाटते म्हणायच्या.

अचानकपणे त्यांचे थोरले मेव्हणे काही ध्यानीमनी नसताना वारले. त्यांची मुले परदेशात. बहिणीची अवस्था बिकट. ते पाहून यांना आपण आता आपल्या बहिणीसाठी स्ट्राँग झालेच पाहिजे याची जाणीव झाली. निराश मनस्थितीतून बाहेर पडून त्या कधी बहिणीसाठी चार गोष्टी करू लागल्या हेच त्यांना कळले नाही. बहिणीबरोबर वेगवेगळ्या बँक्सना भेट देणे, व्यवहारासंबंधी कामे, बहिणीची सोबत करणे, तिचे मेडिकल चेकअप वगैरे. बिझी आहेत. आपल्याला ज्या बहिणीने खूप मदत केली तिच्या काही अंशी तरी उपयोगी पडू शकतोय ही भावना आहे. आता दोघी मिळून सहली प्लॅन करत आहेत. निरवानिरवीची भाषा संपलेली आहे. त्याची जागा 'आहेत ते दिवस मजेत घालवायचे' या विचाराने घेतली आहे.

कसे असते ना माणसाचे मन. आपल्या प्रेमाच्या व्यक्तीला सावरण्यासाठी स्वतः ला सावरणारे!

अकु, छान पोस्ट! जगायला उद्देश्य हवा नाही का? तो नसेल तर नैराश्य येत असेल. वासंतिका पुणतांबेकर ( भाषांतकार) मावशी स्वेच्छेने वृध्दाश्रमात राहायला गेल्या आहेत. समवयस्काबरोबर मजेत आहेत. तिथेही खूप सामाजिक कार्य करत असतात. तसेच त्या मीरा बडवेंच 'निवांत' हिंदीत भाषांतरीत करताहेत. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात छान पुस्तक भाषांतरीत करण्याचा आनंद त्यांच्या देहबोलीतून, शब्दातून ओसंडून वहात होता. आर्थिक नियोजन करतो त्याप्रमाणे नैराश्य टाळण्यासाठीचेही नियोजन करायला हवे त्याची सुरुवात ५०-६० मध्येच करायला हवी.

आर्थिक नियोजन करतो त्याप्रमाणे नैराश्य टाळण्यासाठीचेही नियोजन करायला हवे त्याची सुरुवात ५०-६० मध्येच करायला हवी. >> पते की बात!
पुणतांबेकर मावशींबद्दल वाचून छान वाटले. उतारवयातही खूप चांगल्या प्रकारे आयुष्य जगणारे व इतरांना प्रेरणा देणारे लोक पाहिले की त्यांच्या समवयस्कांनाही धीर येत असेल.

स्वाती२, हो, मन खरेच गमतीशीर आहे! आणि त्याला सावरायला प्रेमाची ताकद खूप उपयोगी पडणारी आहे.

आधीपासून न जमले तरी किमान वयाच्या पन्नाशीत असल्यापासूनच आवडिचे छंद जोपासावेत हे अगदीच बरोबर.

चालण्याने स्वसंवाद वाढतो व कटू भावनांचा निचरा होण्यास वेळही मिळतो. चालणे हा चांगला व्यायाम आहे.

माहीतीतल्या एका बाईंनी स्वतःच वृद्द्धाश्रम चालू केला होता.

>>>माहीतीतल्या एका बाईंनी स्वतःच वृद्द्धाश्रम चालू केला होता.<<<

हे तर मस्तच!

समजा अगदी वृद्धाश्रम नाही शक्य झाला तरी ज्येष्ठांसाठी काहीतरी उपक्रम सुरू करणेही मस्त!

तुम बेसहारा हो तो किसीका सहारा बनो - ची आठवण झाली. Happy

कसे असते ना माणसाचे मन. आपल्या प्रेमाच्या व्यक्तीला सावरण्यासाठी स्वतः ला सावरणारे! >>>> अगदी! Happy

वृद्धाप काल आनंदाने जाण्याची मानपासून ईछा आसेल तर ब्रम्हविद्या शिका . अधिक माहितीसाठी २५३४७७८८/ २५३३९९७७ स म्प र्क करा

<<< एकटीलाच बरे वाटते म्हणायच्या.>>>
मग त्यात काय वाईट? मला ३० वर्षांपासून नैराश्य आहे. कुणि मदत करतील ही आशा वारंवार फोल ठरली.
आता माझे नैराश्य कमी होण्यासाठी मला इतरांची मदत लागत नाही. मला जे करावेसे वाटते, बोलावेसे वाटते त्यात माझ्या "जवळच्या" घरातल्या लोकांना, नातेवाईकांना, "मित्रांना" रस नाही. तेंव्हा त्यांची काही मदत होणार नाही हे मला कळल्यावर मी त्यांच्याकडून प्रेम, सहकार वगैरे मिळवण्याची आशा सोडली. आणि अर्थातच एकदम मा़झे नैराश्य माझ्यापुरते दूर झाले. जेंव्हा मी या "जवळच्या" लोकांबरोबर नसतो तेंव्हा मी इतर लोकांबरोबर असलो तर अतिशय आनंदी, उत्साही असतो. जेंव्हा एकटा असतो तेंव्हा माझी कामे, माझे उद्योग यात माझ्या नैराश्याची मला आठवणहि होत नाही. "जवळच्या" घरातल्या लोकांना, नातेवाईकांना, "मित्रांना" कल्पनाहि नाही आणि असली तरी त्यांना त्याचे काही देणे घेणे नाही. म्हणून वर वर एकटे रहाणार्‍या लोकांना नैराश्य आले आहे असे नाही.

नैराश्य ही अत्यंत वैयक्तिक गोष्ट आहे. दुसर्‍या कुणालाहि समजू शकणार नाही. ते घालवायचे का नाही, कसे वगैरे सर्व फक्त त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. मला जेंव्हा वाटले की नैराश्य घालवावे तेंव्हा मी स्वतः जे काय वाचन विचार केले त्याचा मला फायदा झाला.
इतरांनी काय करावे हे मी सांगू शकत नाही.

स्वार्थी लोकांना ही नैराश्याची भावना ग्रासत असावी. कारण आयुष्यात कुणासाठी काही केलेले नसते, तुसडेपणाने वागलेले असते, कोणाशी फुकटचे गोड देखील बोललेले नसते. कुणाला सत्तेचा कैफ, पैशांचा माज असतो.अशांच्या जवळ नन्तर कोणी जात नाही. त्यांचा ' पीळ ' ही गेलेला नसतो. एवढे असूनही मनाचा कोतेपणा सोडायचा नसतो....

हे वाट्स अप वर आलेले आहे... पण यातून काही उपाय सापडेल का?
*टाइमबँक*

स्वित्झर्लंडमधे अभ्यास करीत असतांना मी एका भाड्याच्या घरात राहत होतो. त्या घराची मालकीण श्रीमती क्रित्सीना ही ६७ वर्षांची बाई शिक्षिका म्हणून ररिटायर्ड झाली. खरं म्हणजे तेथले पेन्शन इतकं मोठं असतं की तिला तिच्या उत्तरायुष्यात खायची, प्यायची काही ददात नव्हती. तरीसुध्दा आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने एका ८७ वर्षांच्या महिलेची सेवा करण्याचे काम पत्करले काळजीवाहक म्हणून. मी तिला विचारले अधिक पैशाच्या मोहाने तू हे स्वीकारले आहेस कां? तर तिने दिलेले उत्तर मला संभ्रमीत करणारे होते. ती म्हणाली, नाही, मी पैशांसाठी नाही हे करीत. मी माझा हा कामाचा वेळ *टाइमबँक* मध्ये टाकते. आणि मी जेंव्हा म्हातारी होईन तेंव्हा मी ह्या टाईमबँकमधून मला सेवेचा वेळ काढून घेईन.

मला टाईमबँक असं काही असतं, हे ऐकूनच आश्चर्याचा धक्काच बसला. मी तिला विस्ताराने या संकल्पनेची माहिती विचारली. ती म्हणाली, स्वीसच्या शासनाने एक कल्याणकारी कार्यक्रम म्हणून याची सुरुवात केली. त्याचं असं आहे की जेंव्हा व्यक्ती सुद्रुढपणे तारुण्यात असते तेंव्हा ती आपल्यापेक्षा व्रुध्दाची सेवा करतात आणि ती जेंव्हा व्रुध्द होते तेंव्हा अशा सेवेची तिला आवश्यकता भासते. तेंव्हा अशा पूर्वी सेवा केलेल्या वेळेची परतफेड म्हणून तिला सेवा मिळते. अशी सेवेकरी व्यक्ती सुद्रुढ, संवेदनशील आणि प्रेमळ स्वभावाची असावी. ज्या व्रुध्दांनासेवेची अपेक्षा असते अशा अनेक संधी त्या तरुण व्यक्तीला मिळू शकतात. अशी त्यांची सेवेची वेळ त्यांच्या सेवा खात्यात जमा होते. सामाजिक कल्याण विभागाच्या. त्याच्यि घराची मालकीण आठवड्यातून दोन वेळा दोन दोन तास व्रुध्दांना त्यांच्या काही गोष्टी खरेदीसाठी किंवा त्यांच्या घरकामासाठी किंवा त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी, वाचनासाठी अथवा बाहेर फिरण्यासाठी व्यतीत करीत होती. अशाप्रकारे एक वर्षापर्यंत सेवा दिल्यावर तिच्या सेवेची गणना करुन तिला *टाइमबँक कार्ड* दिलं जाईल. त्यात त्या सेवेची वेळ नमूद केलेली असेल. जेंव्हा सेवेकरी व्रुध्द होईल, तेंव्हा तिला तिच्यासाठी त्या टाइमबँक कार्डाव्दारे सेवा मिळू शकेल. तिच्या टाइमकार्डाची तपासणी होऊन *टाइमबँक* तिच्यासाठी सेवेकरी तिच्या घरी अथवा हाँस्पिटलमधे पाठवून देईल.

एके दिवशी मला माझ्या घरमालकीणीचा फोन आला. ती म्हणाली, काही गोष्टी काढण्यासाठी ती स्टुलावर उभी होती. तोल जाऊन ती पडली आणि तिच्या मांडीचे हाड मोडले आहे. मी आँफिसमधून रजा घेतली आणि तिला हाँस्पिटलमधे पोहोचवली. मी तिच्या सेवेसाठी रजा टाकत होतो. पण ती म्हणाली, तशी काही जरुरी नाही. मी माझ्या टाइमबँकेतून सेवेसाठी टाइम विड्राव्हल फाँर्म भरला आहे. आणि टाइमबँक आता माझी काळजी घेईल. आणि खरेच दोन तासात टाइमबँकेतून सेवेकरी हजर झाले. त्यानंतर महिनाभर त्या सेवा स्वयंसेविकेने माझ्या घर मालकिणीचे घर सांभाळले. तिच्यासाठी स्वयंपाक करुन जेवू घातले. तिच्याशी गप्पा मारुन आनंदी ठेवले. सेवेकरीच्या सहाय्याने घरमाकीण लवकरघ पूर्ण बरी झाली. बरी झाल्यावर लगेच ती आपल्या सेवाभावी कार्याला लागली. तिचे म्हणणे असे की, ती जोपर्यंत कार्यक्षम आहे तोपर्यंत ती जास्तीत जास्त वेळ टाइमबँक मध्ये टाकू इच्छिते.

सध्या स्वित्झर्लंडमध्ये *टाइमबँक*हा विषय अगदी सर्वमान्य झाला आहे. यामुळे शासनाला केवळ आर्थिक फायदाच नव्हे तर अनेक सामाजिक समस्या त्यामुळे मिटल्या आहेत. समाजामध्ये अधिक सामंजस्य व सहिष्णुततेची वाढ होण्यास मदत झाली आहे. बहुसंख्य स्वीस नागरिकांनी हा विषय उचलून धरला आहे. शासनाने केलेल्या पाहणीत लोकसंख्येच्या मोठ्या प्रमाणात नागरिक या संकल्पनेत सहभागी होऊ इच्छीतात, हे दिसून आले आहे. त्यामुळे स्वित्झर्लंडमध्ये शासनाने अशाप्रकारचे कायदे करण्यात तत्परता दाखविली आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या भारतातील सर्वात मोठ्या संघटनेचा दोन टर्म असण्याच्या पूर्वीपासून सक्षम ज्येष्ठांची अति ज्येष्ठांच्या सेवेसाठी काही वेळ देऊन हा विषय आपलासा करावा हा प्रयत्न अनेक श्रेष्ठींनी नागरिकांत प्रस्रुत करण्याचा प्रयत्न केला पण सर्व काही फक्त *शासनानेच*करावे ही मनिषा असल्याने त्या विषयावर बहुसंख्यांनी पाठ फिरवली. आपणही पुढे व्रुध्द होणार आहोत आणि सध्या न्यूक्लीअर कुटुंबाची प्रथा मूळ धरु पहात असल्याने आपल्या व्रुध्दत्वी काळजीवाहक म्हणून आपल्याला कोणी साथी उपलब्ध होऊ वकेल ह्या भावनेने आजच्या तरुणाईने व्रुध्दांशी सेवाभाव ठेवावा हा विचार केल्यास भारतीय व्रुध्दांचे भवितव्य उज्वल असेल.

*बघा विचार करुन*

हा लेख मी वाचला, मला संकल्पना आवडली म्हणून लेख स्वतः टाईप केला आहे. काही शाब्दिक चुका असतील त्या माझ्या आहेत....(वॉटसप साभार)

हे अस काही नाविन्यपूर्ण आणि उपयोगाचे आपल्या देशात का होत नाही आपला रिकामा वेळ फक्त फेसबुक वॉटसप टिकटोक अश्या सेवेसाठी च उपलब्ध आहे का ??

मूळ लेख..
https://www.speakingtree.in/blog/time-bank-711025

<<<स्वार्थी लोकांना ही नैराश्याची भावना ग्रासत असावी. कारण आयुष्यात कुणासाठी काही केलेले नसते, तुसडेपणाने वागलेले असते, कोणाशी फुकटचे गोड देखील बोललेले नसते. >>>
हेहि खरे आहे. स्वार्थीपणामुळेच अपेक्षा वाढतात. आपण दुसर्‍यासाठी थोडेसे जरी काही केले तरी उगाच भावना असते की आपले किती उपकार झाले लोकांवर, त्यांनी आता माझ्यासाठी बरेच काही करावे, पण तसे होत नाही, मग तुसडेपणा होतो - एकूण नैराश्याच्या वाटेवर जोरात वाटचाल.

कलचाचणी घेउन मग त्यानुसार उपाययोजना केली तर ती अधिक फायदेशीर ठरेल असे वाटते. कारण ज्येष्ठ्त्व हे फक्त वयाची अट पूर्ण झाल्यावर दिली जाणारी गोश्ट आहे. सर्व ज्येष्ठांची मानसिक प्रकृती सारखी असणार नसल्याने तज्ञाने सुचवणे चांगले. पण काही सर्वसामान्य गोष्टींची चर्चा होउ शकते.

आपले संपुर्ण आयुष्य श्वास व विचार या वरच आधारलेले आहे. शरिर शास्त्रा प्रमाणे आपल्या शरिराच्या पेशी दर वर्षी बदलत असतात म्हणजेच आपण नविन पेशीने तरुणच असतो. म्हणजेच आपल्या वयाच्या कोणत्याहि साली 70, 80, 90, किवा 100 साली आपण नविन पेशीने तरुणच असतो. पर्ंतु समाजमनाने भरलेल्या म्हातारपणाच्या जाणीवेने आपण ते मान्य करत नाही व म्हातारपणाच्या जाणीवेने आपल्या पेशीना म्हातारे करुन निसर्गाने देऊ केलेले चिरतरुणपण दूर सारतो. फुफूसे पूर्ण भरुन घेतलेल्या श्वासानाने आपले शरिर शुद्ध होते व शुद्ध विचाराने मन शुद्ध होते. कारण सर्व साधारण माणसे श्वास घेताना फुफूसांचा 10% च उपयोग करतात. श्वास आधिक घेण्याचे प्रमाण कसे अचुकपणे वाढवावे व Negative विचारना बाजुला करून Positive विचार कसे रुजवावे , त्याना ध्यानाच्या सरावाने कसे शुद्ध करावे हे ब्रम्हविद्येच्या सरावने सहज साध्य होते. ब्रम्हविद्येच्या नेहमिच्या सरावाने चिरतारुण्य अपणास नक्कीच प्राप्त होईल. ब्रम्हविध्येचा प्रार्थमिक वर्ग 22 आठवड्याचा आहे. दर आठवड्याला 1 तास 30 मिनिटे असा वर्ग चालतो . 18 वर्षावरील सर्व साधक हा वर्ग करू शकतात. आधिक माहितीसाठी 022 25347788/25339977 या फोन नंबर वर संपर्क करावा

शरिर शास्त्रा प्रमाणे आपल्या शरिराच्या पेशी दर वर्षी बदलत असतात म्हणजेच आपण नविन पेशीने तरुणच असतो. म्हणजेच आपल्या वयाच्या कोणत्याहि साली 70, 80, 90, किवा 100 साली आपण नविन पेशीने तरुणच असतो.
<<
हे असे शरीरशास्त्रात लिहिलेले आहे? कोणत्या?? कुठे?? नक्की कोणत्या पेशी दर वर्षी बदलता तुम्ही/तुमचे "शरीरशास्त्र"? या भंपक थापांना "शरीरशास्त्र" म्हणतात?

भंकस जाहिरातींसाठी मायबोलीचा वापर करू नका.

बघा बुवा अ‍ॅडमिन महोदय.

हे असले प्रकरण आपण कुठे वाचले/शिकले?

आपले संपुर्ण आयुष्य श्वास व विचार या वरच आधारलेले आहे. शरिर शास्त्रा प्रमाणे आपल्या शरिराच्या पेशी बदलत असतात म्हणजेच आपण नविन पेशीने तरुणच असतो. म्हणजेच आपल्या वयाच्या कोणत्याहि साली 70, 80, 90, किवा 100 साली आपण नविन पेशीने तरुणच असतो. पर्ंतु समाजमनाने भरलेल्या म्हातारपणाच्या जाणीवेने आपण ते मान्य करत नाही व म्हातारपणाच्या जाणीवेने आपल्या पेशीना म्हातारे करुन निसर्गाने देऊ केलेले चिरतरुणपण दूर सारतो. फुफूसे पूर्ण भरुन घेतलेल्या श्वासानाने आपले शरिर शुद्ध होते व शुद्ध विचाराने मन शुद्ध होते. कारण सर्व साधारण माणसे श्वास घेताना फुफूसांचा 10% च उपयोग करतात. श्वास आधिक घेण्याचे प्रमाण कसे अचुकपणे वाढवावे व Negative विचारना बाजुला करून Positive विचार कसे रुजवावे , त्याना ध्यानाच्या सरावाने कसे शुद्ध करावे हे ब्रम्हविद्येच्या सरावने सहज साध्य होते. ब्रम्हविद्येच्या नेहमिच्या सरावाने चिरतारुण्य अपणास नक्कीच प्राप्त होईल. ब्रम्हविध्येचा प्रार्थमिक वर्ग 22 आठवड्याचा आहे. दर आठवड्याला 1 तास 30 मिनिटे असा वर्ग चालतो . 18 वर्षावरील सर्व साधक हा वर्ग करू शकतात.
गुरुकिल्ली तुमची, आरोग्य आणि यशाची, ब्रह्मविध्या शिका
आध्यात्मिक श्वसनप्रकार व ध्यानाचे दुर्मीळ योगशास्त्र
वारिल योगशास्त्र आपले शरिर आणी मन शुद्ध करण्याचा मार्ग दाखविते. हे अनुभव घेण्याचे शास्त्र आहे. जेव्हडा याचा सराव कराल तेव्हडी त्याची प्रचीती येइल.
ब्रम्हविध्या साधक संघ हा चॅरीटेबल ट्रस्ट आहे. आधिक माहितीसाठी 022 25347788/25339977 या फोन नंबर वर संपर्क करावा.
शरिर शास्त्रा प्रमाणे आपल्या शरिराच्या पेशी कशा बदलत असतात त्यासाठी Goole Surch मधील उतारा खाली दिला आहे
The Short Answer: Recent research has confirmed that different tissues in the body replace cells at different rates, and some tissues never replace cells. Using a revolutionary new technique (described below), researchers have shown that:
1. Neurons in the cerebral cortex are never replaced. There are no neurons added to your cerebral cortex after birth. Any cerebral cortex neurons that die are not replaced.
2. Fat cells are replaced at the rate of about 10% per year in adults. So you could say that on average, human beings replace all their fat cells about every ten years.
3. Cardiomyocyte heart cells are replaced at a reducing rate as we age. At age 25, about 1% of cells are replaced every year. Replacement slows gradually to about 0.5% at age 70. Even in people who have lived a very long life, less than half of the cardiomyocyte cells have been replaced. Those that aren’t replaced have been there since birth.

गजाधर बाबू , संकल्पना सगळ्यांनाच आवडते. पण करीत कोणीच नाही. खरे म्हणजे आपण भारतीय अतिशय स्वार्थी ,आप्पल पोटे आहोत हे कबूल केले पाहिजे. उगीचच महान संस्कृतीचे नगारे वाजवायचे. त्यामानाने पाश्चिमात्य देशातील लोक बरेचसे प्रामाणिक आणि मानवी मूल्यांची कदर करणारे असतात. आणि समाज कार्यही निरलस पाने करतात. मोठ मोठे उद्योजक अब्जावधीची मिळकत समाज कार्यासाठी फटकन दान देऊन टाकतात...उगीच चार समाज सेवक चांगली कामे करतात आपल्याकडे आणि बाकीचे त्यांचे अनुकरण न करता फक्त कौतुक करतात. त्यामुळे आपल्याकडे दुसरे शिवाजी, दुसरे गाडगेबाबा , दुसरे बाबा आमटे ,होत नाहीत. ही मानवी मूल्ये समाजात भिनत नाहीत . वृद्धाश्रम चालवणारांचे अनुभव ऐकले तर बहुतांश वृद्ध हे जोड्याने फोडून काढण्याच्या लायकीचे असतात.

अवांतर. @ विक्या म्हात्रे, सुधर रे. जाहिरात विभागात रीतसर जाहिरात कर. नैतर हात धुवून मागे लागावे लागेल.

कुणाच्याही हात धुवून मागे लागणे फार सोपे पण आपल्या आत पहाणे फारच कठिण आहे. फक्त ५ मिनिटे एकहि विचार
येणार नाही आसा प्रयत्न करुन पहा. आपल्या नकारार्थी विचाराना दूर करण्याचे सामर्थ्य यात आहे याची प्रचिती येइल व
होकारार्थी विचाराना आपल्या मनात जागा मिळेल. आसे होकारार्थी विचार त्या ठिकाणी रुजवा . आशा ध्यानाच्या सोप्या पद्धती
आपणास ब्र्म्हविद्येच्या आभ्यासक्रमात प्राप्त होतील. आपले जिवन होकारार्थी विचारानी भरुन जाइल.
आ.रा.रा. जे आपण देतो तेच आपल्याकडे परत येते.

Pages