भक्त आणि चाहते !

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अपलोड on 16 July, 2018 - 02:20

२०१४ लोकसभा निवडणूकांपासून भक्त हा शब्द फार प्रचलित झाला आहे. प्रत्येक राजकीय नेत्याच्या समर्थकांना भक्त असे संबोधले जाते. अर्थात, त्यांचे वागणेही तसेच असते. का ही ही झाले तरी आपल्याच नेत्याची तळी उचलायची. स्वत:च्या मनाला पटो न पटो प्रत्येक राजकीय खेळीचे समर्थन एके समर्थनच करत राहायचे.

पण त्यामुळे एक गोची झाली आहे. ईतर कलाकार खेळाडू यांचे जे चाहते असतात, नव्हे कट्टर चाहते असतात, त्यांच्यावरही भक्ताचा शिक्का मारला जातो.

पण मला वाटते आपण एखाद्याचे चाहते बनतो ते त्याच्यातील काही ठराविक कलागुणांमुळे. त्याच्यातील ईतर दोषदुर्गुणांची जबाबदारी आपल्या शिरावर घेत त्याचेही समर्थन करावे ही जबाबदारी चाहत्यांवर नसते. त्यांनी तसे करूही नये. त्यांच्यातील वाईटाला वाईट बोलावे. अगदी आवर्जून कोणाला तरी दाखवायला वा सिद्ध करायला म्हटलेच पाहिजे असे गरजेचे नाही. पण स्वत:साठी तरी हे सत्य स्विकारावे. तसेच ईतर कोणी त्यांच्यातील वाईट गुण दाखवला तर त्या विरोधात हकनाक भांडायला जाऊ नये. हा मूलभूत फरक आहे चाहते आणि भक्तांमधील तो कायम ठेवावा.

उदाहरण द्यायचे झाल्यास जर कोणी सचिन तेंडुलकरचा चाहता असेल तर तो सचिनने शेन वॉर्नची कशी धुलाई केली याचे गुणगाण गातानाच मॅक्ग्राथने सचिनला त्रास दिला हे देखील कबूल करेन. त्याच्या शंभर शतकांच्या विक्रमाचे कौतुक करताना त्याचे शतकाच्या जवळ आल्यावर संथ हो्णे हे देखील कबूल करेन. त्याने अगदी वयाच्या सोळाव्या वर्षी दाखवलेल्या बाललीला आणि लहान वयात इंग्लंड ऑस्ट्रेलियामध्ये मारलेल्या शतकांना डोक्यावर घेतानाच त्याची उत्तरार्धात रखडत लांबलेली कारकिर्द देखील कबूल करेन. पण तेच कोणी सचिनला देव मानून त्याची भक्ती करत असेल तर तो माझी ही पोस्ट वाचून उसळून माझ्याशी भांडायला येईन Happy

अर्थात कोणाचे भक्त असण्यात काही गैर नाही. पण दुर्दैवाने ती भक्ती आपल्यापुरतीच राहत नाही. आपलाच देव सर्वगुणसंपन्न हे सिद्ध करायची चढाओढ लागते.
त्यामुळे आपण कोणाचे भक्त आहोत की चाहते याचा सेल्फ चेक अधूनमधून घेत राहावा.
मी तरी असे करतो.

उदाहरणार्थ, मी किंग खान म्हणून ओळखल्या जाणार्‍या शाहरूख खान नामक बॉलीवूड सुपर्रस्टार नटाचा कट्टर चाहता आहे. पण मी त्याचा भक्त नाही.
त्याच्यातील खटकणार्‍या बाबी मी एक चाहत्याच्या नजरेतून नेहमीच बोलून दाखवतो. त्या संबंधित विषय निघाल्यास त्याचा निषेधच करतो.
जसे की,
१) सिगारेट - तो चेन स्मोकर आहे. मला सिगारेट या व्यसनाचा तिटकारा आहे. त्या व्यक्तीचा नाही, पण त्या वासाचा. त्या धूराचा त्रास होतो. सिगारेट पिणार्‍या व्यक्तीने आपल्या धूराचा ईतरांना त्रास होऊ नये याची तरी किमान काळजी घ्यावी असे वाटते. तसेच या व्यसनामुळे ती व्यक्ती आपल्या शरीरस्वास्थाची वाट लावते याचे वाईटही वाटते. आपली आवडती व्यक्ती या व्यसनाच्या आहारी गेली आहे याचे जास्तच वाईट वाटते.

२) दारू - सेम अ‍ॅज अबोव

३) व्यसनांची जाहीरात - प्रसिद्ध व्यक्तींनी दारू, सिगारेट अश्या गोष्टींची जाहीरात करणे मला रुचत नाही. तुम्ही प्या, मला तुमच्याबद्दल सहानुभुती आहे. पण लोकांना प्रवृत्त करू नका. अर्थात आपल्या मायबाप सरकारला तर काही पडले नाही. सिगारेटच्या पाकिटावर एखादी वॉर्निंग टाकली, दारूच्या थेट जाहीरातींवर बंदी आणली की यांचे काम झाले. पण तुम्ही युथ आयकॉन आहात तर तुम्ही ती नैतिक जबाबदारी स्विकारावी असे मला वाटते. शाहरूख ती स्विकारत नाही याचा खेद वाटतो.
तसेच खेळाडू, क्रिकेटर्स ज्यांच्याकडे फिटनेससाठी आदर्श म्हणून पाहिले जाते ते पेप्सी कोक सारख्या वाह्यात पेयांची जाहीरात करतात हे देखील खटकते. भले मग तो माझ्या आवडीचा दादा असो वा धोनी.

४) फिल्म फेअर अ‍ॅवार्डस तो सेट करतो असे वाटते. त्याची बॉलीवूडमध्ये चालते. फिल्म अ‍ॅवार्डचे अ‍ॅंकरींग तोच करतो. अर्थात याबाबतीत त्याला जगात तोड नाही. तो भारतातील सर्वात मोठा एंटरटेनर आहे. त्याची उपस्थिती पुरस्कार सोहळ्याला वेगळा दर्जा देते. पण आपले हे वजन वापरून त्याने बरेच बॉलीवूड अ‍ॅवार्डस मिळवले आहेत. जसे सचिनला निरोप द्यायला विंडीज दौरा आणि शेवटचा सामना २०० वी कसोटी वानखेडेला ठेवण्यात आली तसे शाहरूखसाठीही खास अ‍ॅवार्ड कॅटेगरी बनवून पुरस्कार दिले जातात. मला हे असे ठरवून दिलेले सन्मान रुचत नाहीत. त्याची महानता त्याच्या करोडो चाहत्यांना माहीत आहेच. पण ते पुरस्काररुपाने रेकॉर्डबूकला यावे यासाठी केलेला खटाटोप रुचत नाही.

५) त्याच्या खान असण्याला टारगेट करत बरेचदा काही राजकीय पक्ष आणि संघटना राजकारण करत असतात. २०१४ लोकसभा निवडणूकांच्या वेळी त्याच्या नावे ट्विट फिरत होते. जर मोदी पंतप्रधान झाले तर मी देश सोडून जाईन. शाहरूखची इमेज यू कॅन लव्ह मी ऑर यू कॅन हेट मी अशी असल्याने त्याचे टिकाकार सुद्धा बरेच आहेत. अश्यांची मते साहजिकच मोदींना वळली असणार. आता यात गंमत म्हणजे निवडणूकांनंतर त्याने स्पष्ट केले की हे ट्विट त्याचे नसून कमाल खानचे होते. एवढेच नव्हे तर मोदी, अंबानी, शाहरूख हे तिघे एका फंक्शनला एकत्र दिसले. त्यानंतर जिओच्या जाहीरातीनिमित्तही हे त्रिकूट एकत्र आले होते. जर ते ट्विट शाहरूखचे नसून कमालखानचे होते तर शाहरूखने हे आधी क्लीअर का नाही केले. त्याचा राजकीय फायदा मोदींना का मिळू दिला. याचाच अर्थ हि सर्व मिलीभगत होती. हे एकूणच प्रकरण एक शाहरूख चाहता म्हणून मला फार खटकले होते.

६) माझे फॅन या चित्रपटाचे परीक्षण एका भक्ताच्या नाही तर चाहत्याच्याच नजरेतून लिहिलेले आहे. नक्की वाचा. त्याच्या चित्रपटसंबंधित बाबींमध्येही काय खटकते वा आवडत नाही हे प्रामाणिकपणे नमूद केले आहे. त्यामुळे ईथे पुन्हा तेच लिहित नाही

FAN - एका फॅनच्या नजरेतून .. - https://www.maayboli.com/node/59016

तळटीप - यात मी दाखवलेले शाहरूखचे दुर्गुण वा वाईट सवयी त्याच्या ईतर एखाद्या चाहत्याला सारेच पटणार नाही. पण ते त्याचे वैयक्तिक मत असेल, हे माझे आहे. सांगायचा मुद्दा हा की भक्त आणि चाहते यामध्ये हा मूलभूत फरक आहे. एक शाहरूखचा चाहता असण्याचा मला नेहमीच अभिमान आहे आणि राहील Happy

- भन्नाट भास्कर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशूचॅम्प, आपण खालील धाग्यात शाहरूखसंदर्भात माझ्यावर केलेल्या आरोपांना मी या लेखाच्या उदाहरणात उत्तर दिले आहे.

https://www.maayboli.com/node/66781?page=1

जर आपण तिथे अवांतर चर्चा टाळून आणि अजून शंका निरसन झाले नसल्यास ईथे प्रश्न उपस्थित केल्यास आवडेल Happy

पण मी शाहरूखबाबत पक्षपातीपणा करतो हे तरी किमान यापुढे कधी म्हणू नका.
नावडतीचे मीठ अळणी आणि आवडत्याचे कारले गोड असे मी कधीच करत नाही ..

'लोकांना शाहरूख का आवडत नाही' म्हणून एक धागा बघितला.
शाहरूख न आवडणार्‍या लोकांना त्याची चांगली गुणाची बाजूही कळाली पाहिजे.. ती चांगली बाजू दाखवण्याचे काम हा लेख नक्कीच चोखपणे करत आहे.
वाईटातही चांगले शोधण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे.

सुशांतच्या धाग्यावरून
...

एकीकडे राजकारण्यांना शिव्या घालायच्या आणि दुसरीकडे कलावंतांच्या भानगडींकडे कानाडोळा करायचा, हा दुटप्पीपणा झाला.
Submitted by वीरु on 3 August, 2020 - 02:54

>>>>>

या ईथे
बघू कोण कोणाच्या भानगडीकडॅ कानाडोळा करतेय.

मी सलमानवर वेळोवेळी टिका केली आहे, संजय दत्तचा देशदोह कधी पोटात घातला नाही, त्या सुशांतच्या धाग्यात नेपोटीजमवरही ताशेरे ओढले आहेत.

बाकी सारे सोडा खुद्द शाहरूखचेही दुर्गुणांना दुर्गुण वा न आवडणार्‍या बाबींना त्या आवडत नाहीत हे म्हणायला कचरलो नाहीये.

एकदा या धाग्यावर या

तुम्हालाच नाही तर प्रत्येक राजकीय भक्ताला हे खुले आव्हान देतोय की जसे मी ईथे शाहरूखचा प्रचंड मोठा चाहता असलो तरी त्याच्या न पटलेल्या गोष्टींनाही मांडायचे आणी स्विकारायचे धाडस आणि प्रामाणिकपणा दाखवला आहे तसे ईथे एखाद्या राजकीय पक्षाचा झेंडा हाती घेणार्‍यांनी आपल्या नेत्यांबाबत ती धमक दाखवावी.

दोन वर्षे झालेत त्या धाग्याला.
मी दरवेळी आव्हान देतो
एकाचीही हिंमत होत नाही
ईतर धाग्यात माझ्याशी शेकडो पोस्ट वाद घालतील. पण ईथे दुखरी नस पकडले जाण्याच्या भितीने कोणी येत नाही Happy

दोन वर्षे झालेत त्या धाग्याला.
मी दरवेळी आव्हान देतो
एकाचीही हिंमत होत नाही
ईतर धाग्यात माझ्याशी शेकडो पोस्ट वाद घालतील. पण ईथे दुखरी नस पकडले जाण्याच्या भितीने कोणी येत नाही >>>>>>>> बरोबर आहे ऋन्मेऽऽष दादा

you are right

Submitted by वीरु on 3 August, 2020 - 02:54

>>>>>
या ईथे
बघू कोण कोणाच्या भानगडीकडॅ कानाडोळा करतेय.>>
माफ करा ऋन्मेषजी, पहिली गोष्ट म्हणजे भन्नाट भास्कर हे तुमचेच अवतार आहेत हे मला माहित नव्हते, असो. तुम्ही या धाग्यात जी भुमिका मांडली आहे, त्याबद्दल तुमचे मनापासुन अभिनंदन.
दुसरी गोष्ट म्हणजे मी कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही. त्यामुळे विविध धाग्यांवरील राजकीय धुळवडीपासुन शक्यतो लांबच असतो. पण कसे आहे ना आजकाल सरसकट राजकीय व्यक्तींविरुध्द मग तो कोणत्याही पक्षाचा असो जी टीका केली जाते ती योग्य नाही असं वाटतं.

आणखी वीस वर्षे सुपर्रस्टार म्हणून या बॉलीवूडवर राज्य करेल हॅप्पी >>>> हे विधान अभक्ताने केले असते तर ठीक आहे. पण निस्सीम चाहता / अनुयायी / भक्ताने शाखा २० वर्षांनंतर सुपरस्टार राहणार नाही असे म्हणणे अत्यंत निराशाजनक आणि धक्कादायक आहे. ५० वर्षांपेक्षा कमीचा दावा करणे हे बोगस भक्त असल्याचे अस्सल लक्षण आहे.
Submitted by शांत माणूस on 20 December, 2021 - 12:24

>>>>

शांत माणूस, ह्या धाग्यावर या.
इथे मी भक्त आणि चाहता यातील मूलभूत फरक सांगितला आहे तसेच मी शाहरूखचा चाहता आहे, भक्त नाही हे देखील सिद्ध केले आहे.
त्यामुळे तो आरोप माझ्यावर नको Happy