|| शुभ दिपावली ||
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
80
सगळ्या मायबोलीकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
माझी यावर्षीच्या दिवाळीची तयारी १ महिन्याआधीच चाकावर पणत्या करण्यापासून झाली. मग त्या पणत्या वाळवुन, भट्टीतुन भाजून आणल्या आणि घरी रंगवल्या. चाकावर मातीकाम करायला लागुन फार दिवस झाले नाहीत आणि पणत्या पहिल्यांदाच करत होते त्यामुळे विश्वास नव्हता की खरच बनवता येतील की नाही ते, आता पुढच्यावर्षी अजून जास्त बनवेन.
पुढच्यावेळी कोणाला हव्या असतील तर सांगा, पुढच्यावर्षी दिवाळीसाठी फराळाच्या बदल्यात पणत्या योजना अमलात आणायचा विचार चालू आहे. 
त्यानंतर आला आकाशकंदील. मायकेल्स मधुन बांबुच्या काड्या, कागद, डिंक असे सगळे सामान आणले आणि बनवला.

बाकी मी केलेला फराळ मात्र फोटो काढण्यालायक झालेला नाही त्यामुळे आईने पाठवलेले फराळाचे पार्सल आले की मग त्याचा फोटो टाकेन. 
|| शुभ दिपावली ||
प्रकार:
शेअर करा
खूपच सुरेख केल्या आहेत तुम्ही
खूपच सुरेख केल्या आहेत तुम्ही पणत्या आणि आकाश कन्दिल!!
पणत्या खूप्पच सुंदर दिस्ताय!
पणत्या खूप्पच सुंदर दिस्ताय! रंग सुरेख आलेत.
व्वा.. मस्तच वाटले !! सुंदर !
व्वा.. मस्तच वाटले !! सुंदर !
रुनी, अप्रतिम कला. तुम्ही
रुनी, अप्रतिम कला.
तुम्ही केलेल्या सर्व पणत्या सुंदर आणि सुबक आहेत. त्यातून तुमची कल्पकता झळकतेय. शिवाय कंदिल ही सुरेख झालाय. सर्व फोटोग्राफ्स खूप आवडले..
वाह......केवळ अप्रतिम ! क्लास
वाह......केवळ अप्रतिम ! क्लास रंगसंगती आहे. फ़ोटोग्राफ़ीही सुरेख केलेली आहे.
रुनि, खुप सुंदर आहेत सगळ्या
रुनि, खुप सुंदर आहेत सगळ्या पणत्या.
जबरी !
जबरी !
पणत्या अप्रतिम झाल्यात...
पणत्या अप्रतिम झाल्यात... कुठे ग शिकलीस पॉटरी?? मला पण गणपती घरी केल्यापासुन इच्छा झाल्ये शिकायची.
आणि हो कंदिल पण खूप देखणा
आणि हो कंदिल पण खूप देखणा झालाय...
ग्रेट ! मस्तच झाल्या आहेत
ग्रेट !
मस्तच झाल्या आहेत पणत्या आणि आकाशकंदीलही सुरेखच!
हरहुन्नरी आहात !
रुनी एकदम मस्त, सह्हेच
रुनी एकदम मस्त, सह्हेच
अप्रतिम!
अप्रतिम!
पणत्या आणि त्यांची प्र.चि.
पणत्या आणि त्यांची प्र.चि. मस्तच.
ते पहिल्या फॉटोत दिसणारे glazing कसे आणले? भाजून का रंगानेच? रंगाने असेल तर कुठल्रे रंग?
अबब किती हे प्रश्ण?
झकास !!
झकास !!
कसली भारी आहेस
कसली भारी आहेस तु..........
मला पण उत्साह आलाय काहीतरी करायला..
खुप सुंदर..
रुनी, मला नं रोज दिवाळी
रुनी,
मला नं रोज दिवाळी असंल्यासारखं वाटतं, कारण मी रोज एकदातरी बघतेच तुझ्या ह्या पणत्या आणि आकाशकंदिल. काहीही नविन केलेसं कि लगेच फोटो टाक हं.
आकाशकंदील शोधत होते. सापडला
आकाशकंदील शोधत होते. सापडला
मस्त पणत्या.... खुपच
मस्त पणत्या.... खुपच आवडल्या...
रुनी पॉटर, तुम्हाला सुद्धा
रुनी पॉटर, तुम्हाला सुद्धा दीपावलीच्या शुभेच्छा !!! पुढच्या वर्षीचा बेत नक्की बरं का. मी घरी बनवलेला फराळ पाठवणार तुम्ही केलेल्या पणत्या आणि कंदीलाच्या बदल्यात.
दिवाळी जवळ आली की मला
दिवाळी जवळ आली की मला रुनीच्या पणत्या आठवतात.
म्हणुन धागा वर काढला.
Pages