|| शुभ दिपावली ||

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

सगळ्या मायबोलीकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
माझी यावर्षीच्या दिवाळीची तयारी १ महिन्याआधीच चाकावर पणत्या करण्यापासून झाली. मग त्या पणत्या वाळवुन, भट्टीतुन भाजून आणल्या आणि घरी रंगवल्या. चाकावर मातीकाम करायला लागुन फार दिवस झाले नाहीत आणि पणत्या पहिल्यांदाच करत होते त्यामुळे विश्वास नव्हता की खरच बनवता येतील की नाही ते, आता पुढच्यावर्षी अजून जास्त बनवेन.

panati2.JPGPanati1.JPGpanati3.JPGpanati4.JPG

पुढच्यावेळी कोणाला हव्या असतील तर सांगा, पुढच्यावर्षी दिवाळीसाठी फराळाच्या बदल्यात पणत्या योजना अमलात आणायचा विचार चालू आहे. Happy

त्यानंतर आला आकाशकंदील. मायकेल्स मधुन बांबुच्या काड्या, कागद, डिंक असे सगळे सामान आणले आणि बनवला.

Akashkandil.jpg

बाकी मी केलेला फराळ मात्र फोटो काढण्यालायक झालेला नाही त्यामुळे आईने पाठवलेले फराळाचे पार्सल आले की मग त्याचा फोटो टाकेन. Happy
|| शुभ दिपावली ||

रुनी, अप्रतिम कला.
तुम्ही केलेल्या सर्व पणत्या सुंदर आणि सुबक आहेत. त्यातून तुमची कल्पकता झळकतेय. शिवाय कंदिल ही सुरेख झालाय. सर्व फोटोग्राफ्स खूप आवडले.. Happy

पणत्या अप्रतिम झाल्यात... कुठे ग शिकलीस पॉटरी?? मला पण गणपती घरी केल्यापासुन इच्छा झाल्ये शिकायची. Happy

पणत्या आणि त्यांची प्र.चि. मस्तच.
ते पहिल्या फॉटोत दिसणारे glazing कसे आणले? भाजून का रंगानेच? रंगाने असेल तर कुठल्रे रंग?

अबब किती हे प्रश्ण?

कसली भारी आहेस तु..........
मला पण उत्साह आलाय काहीतरी करायला..
खुप सुंदर..

रुनी,
मला नं रोज दिवाळी असंल्यासारखं वाटतं, कारण मी रोज एकदातरी बघतेच तुझ्या ह्या पणत्या आणि आकाशकंदिल. काहीही नविन केलेसं कि लगेच फोटो टाक हं. Happy

रुनी पॉटर, तुम्हाला सुद्धा दीपावलीच्या शुभेच्छा !!! पुढच्या वर्षीचा बेत नक्की बरं का. मी घरी बनवलेला फराळ पाठवणार तुम्ही केलेल्या पणत्या आणि कंदीलाच्या बदल्यात. Happy

Pages