What does a woman want?

Submitted by अननस on 2 November, 2018 - 15:01

What does a woman want? या प्रश्नाचे उत्तर माझ्या कडे नाही, किंबहुना असते तर लग्नानंतर वेगळे नवरा बायकोने वेगळे राहण्याची वेळ आली नसती. या प्रश्नाचे नक्की उत्तर कोणाकडे आहे की नाही माहीत नाही पण चार शिकल्या सावरलेल्या व्यक्तींमध्ये चर्चा व्हावी या उद्देशाने हे लिहिण्याचे प्रयोजन.

दिल्ली सारख्या राजधानीच्या शहरात निर्भयावरील अत्याचारासारखी अतिशय दुःखद, आणि संतापजनक घटना घडते. त्यानंतर वार्तापत्र, न्यूज चॅनेल्स, कॉलेज, कंपनी इत्यादी ठिकाणी स्त्रियांच्या सुरक्षितते विषयी चर्चा रंगायला लागते. या बहुसंख्य चर्चांचा निष्कर्ष 'आजची स्त्री सुरक्षित नाही' असाच असतो. वस्तुतः या चर्चांमध्ये भाग घेणाऱ्या बहुसंख्य स्त्रिया आय टी कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या करत असतात. अनेकांना संध्याकाळी विशिष्ट वेळेनंतर ऑफिस मध्ये काम करण्यास नियमानुसार बंदी असते, अनेकांसाठी स्वतःची कार असते, इतरांना ऑफिस मध्ये जाण्यासाठी कंपनीची बस असते, अशा बसची जागा मोबाइल वर पाहता येते, चालक-वाहक यांची सगळी माहिती कंपनी कडे असते, या सधन घरातील स्त्रियांच्या सोसायटीमध्ये सेक्युरिटी गार्डस असतात, सोसायटी मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या गाडी नंबर, मोबाईल नंबर येण्या-जाण्याची वेळ याची नोंद ठेवली जाते, अनेकांच्या ऑफिस मध्ये सी सी टीव्ही कॅमेरे बसवलेले असतात, ऑफिस मध्ये ओळखपत्र असणाऱ्यानाच परवानगी असते, कंपनीमध्ये लैंगिक दुजाभाव अथवा अनैतिक आचरण केल्यास तक्रार करण्याची व्यवस्था असते, सर्वांकडे मोबाईल फोन असतात, अनेकांच्या मोबाइल फोन वर एक बटण दाबताच क्षणी जवळच्या पोलिस कार्यालयाला संपर्क करण्याची व्यवस्था असते..... हे सगळे असूनही ही स्त्री 'असुरक्षितच असते'. मग अशा असुरक्षित स्त्रियांसाठी स्वसंरक्षणासाठी कराटे, ज्युडो अशाप्रकारे स्वसंरक्षण आणि आक्रमकाला जेरबंद करण्यासाठी शारीरिक आक्रमणाचे खास धडे देण्याचे वर्ग घेतले जातात. बस मध्ये वगैरे येणाऱ्या प्रत्येक पुरुषाकडे पाहून, हा नराधम माझ्या जवळ आला तर मी काय काय करीन या 'युद्धाचा आराखाडा' पाहताक्षणी मनात तयार होत असतो कि काय असे वाटते.

दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने म्हणा रात्री ९ वाजे पर्यंत फळं, फुलं, भाज्या विकणाऱ्या ताई, मावशी सहसा असुरक्षित स्त्रियांच्या वर्गाला जाताना मला दिसत नाहीत. थंडीत सकाळी ६:३० वाजता पोळ्या करायला येणारी किंवा रात्री ८:३० वाजता पावसाळ्याच्या दिवसात घरी स्वयंपाक करून एकटी घरी चालत जाणारी विशी-तिशीतली ताई किंवा मावशी कधी स्त्री सुरक्षिततेच्या चर्चेत पडलेली मला दिसत नाही.

आजची स्त्री सुरक्षित कशी करता येईल यासाठी थोडा विचार करत होतो आणि थोडा इंटरनेट वर माहिती पाहिली.. त्यातली काही माहिती लक्षात घेण्या सारखी आहे. दिल्ली सारख्या शहरात वर्षाला कमीत कमी ६५-७० लाख स्त्रिया बस ने प्रवास करत असतील, निर्भयासारखी घटना कितीही तिरस्करणीय असली तरीही ६५-७० लाख स्त्रियांमधली एक दुर्दैवी स्त्री अशी असते सुदैवाने ३-४ वर्षात अशी घटना घडली नाही तर साधारणपणे १.९५-२.६ कोटी स्त्रियांपैकी एखादीच स्त्री अशी दुर्दैवी असते हा एक विचार मनाला थोडा निववून गेला.

अशीच अजून एक घटना नमूद करावीशी वाटते. काही वर्षांपूर्वी एका संगणक क्षेत्रात काम करणाऱ्या मुलीवर गाडी चालकाने बलात्कार करून तिचा खून केला. कितीही दुःखद आणि संतापजनक घटना असली तरीही पुण्यात रोज १०,००० मुली कॅब ने प्रवास करतात असे धरले (५० लाख लोकसंख्या असेल तर त्याच्या ०.२%) आणि सुदैवाने ४ वर्षातून एकदाच अशी घटना घडत असेल तर साधारणपणे १ कोटी मुलींपैकी एखादीच अशी दुर्दैवी असते. हा ही विचार मनाला दिलासा देऊन गेला.

अजून थोडी माहिती शोधली ती इथे लिहावीशी वाटली. त्यातले विशेष लक्ष वेधून घेतले ते सौदी अरेबिया सारख्या देशाने जेथे स्त्रियांवर सर्व प्रकारची सामाजिक आणि कायदयाची बंधने आहेत. भारतात १८ वर्षा खालील मुलीचे लग्न करणे हा कायदयाने गुन्हा आहे तर सौदी अरेबिया मध्ये, बाल विवाहाला देखील कायद्याने परवानगी आहे. फक्त कुटुंबाच्या ओळखीतून या देशात लग्न होतात. शरिया कायद्या नुसार या देशातील स्त्रियांना घराबाहेर पडताना हिजाब (बुरखा) घेणे बंधनकारक आहे. घराबाहेरील बहुसंख्य गोष्टींमध्ये सहभाग घेण्यासाठी घरातील कमीतकमी एका पुरुषाची परवानगी किंवा त्याने बरोबर असणे आवश्यक आहे, २००८ मध्ये काही बदल करण्यात आले आणि शिक्षण आणि आरोग्य इत्यादी बाबीत पुरुष व्यक्ती बरोबर नसली तरी चालेल असा नियम करण्यात आला. अशा देशात स्त्रियांचे जीवन दुःखाने भरलेले असेल असा विचार आला आणि अजून काही माहिती समोर आली ती लिहीत आहे...

१) स्त्रियांचे प्रथम विवाहाचे सरासरी वय -
भारत -२२.२ वर्षे (१८ वर्षांखालील मुलीचे लग्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे)
सौदी अरेबिया - २५ वर्षे (बालविवाहाला कायद्याने परवानगी आहे )
म्हणजे, 'मुलगी एकदा लग्नाच्या वयाची झाली कि तिचे लग्न लावून द्यायचे', असा विचार सौदी अरेबिया मध्ये करत नाहीत असं दिसते...

२) स्त्रियांचे साक्षरतेचं प्रमाण
भारत - ५९.३%
सौदी अरेबिया - ९१. १ %
कदाचित इस्लामची घट्ट पकड असलेल्या सौदी अरेबिया मध्ये भारता पेक्षा जास्त असलेले स्त्री साक्षरतेचे प्रमाण सौदी अरेबिया च्या आर्थिक सुबत्तेमुळे असेल.

३) स्तन कर्करोगाने होणारे स्त्री मृत्यू (प्रती १००,००० स्त्रियां मध्ये )
सौदी अरेबिया - १०.९
भारत - १०.४
फ्रान्स - १८.२
इंग्लंड - २०.६
अमेरिका - १६.७

४) जन्माच्या वेळी होणाऱ्या मातांच्या मृत्यू चे प्रमाण - (प्रति १००,००० अर्भकांच्या जन्मा मागे)
भारत - २००
जपान - ५
सौदी अरेबिया - २४
अमेरिका - २१
कदाचित या बाबतीतही सौदी अरेबिया भारतापेक्षा स्त्रियांसाठी अधिक सुरक्षित आहे तो आर्थिक सुबत्तेमुळे असेल. हे प्रमाण अमेरिकेपेक्षा अगदी थोडेसेच जास्त आहे.

५) सरासरी मुलींची शैक्षणिक वर्षे (१५-४४ या वयोगटातील)
भारत - ५.७
चीन - ८.५
जपान - १३.४
सौदी अरेबिया - ८.५
इंग्लंड - १३. १
अमेरिका - १३.३
या वरून असे दिसते कि सौदी अरेबिया मध्ये १५-४४ वयोगटातील स्त्रियांची शैक्षणिक वर्षे पाश्चात्य देशांपेक्षा कमी असली तरीही चीन एवढीच आहेत आणि भारतापेक्षा जास्त आहेत.

६) महाविद्यालयीन पदवी घेणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण (टक्केवारी सर्व स्त्री आणि पुरुष मिळून पदवीधरांपैकी )
भारत - ५०%
सौदी अरेबिया- ५७.४%
इंग्लंड -५७%
अमेरिका- ५७.४%
चीन -५२.४%
जपान - ४५.९%
या आकडेवारी वरून असे दिसते कि पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये स्त्रियांचे प्रमाण पुरुष विद्यार्थ्यांपेक्षा अधिक आहे आणि ते इंग्लंड, अमेरिके मधील पदवी घेणाऱ्या स्त्रियांएवढेच आहे.

७) स्त्रियांच्या होणाऱ्या हत्या (प्रती १००,००० स्त्रियांमध्ये )
भारत -४.४
सौदी अरेबिया -१.९
अमेरिका -२.६
इंग्लंड - ०.२
स्त्री हत्यांच्या बाबतीत इंग्लंड एवढा नसला तरीही सौदी अरेबिया स्त्रियांसाठी भारत आणि अमेरिकेच्या तुलनेत अधिक सुरक्षित आहे.

७) स्त्रियांच्या आत्महत्येचे प्रमाण - (प्रती १००,००० स्त्रियां मध्ये )
भारत - १४.३
जपान - ९.५
सौदी अरेबिया - १.६
इंग्लंड - २.९
अमेरिका - ४.२
जपान, भारत, इंग्लंड, अमेरिका या देशांच्या तुलनेत सौदी अरेबिया मधील स्त्रिया कमी आत्महत्येकडे झुकतात. कदाचित मानसिक स्वास्थ्याची अधिक काळजी सौदी अरेबिया मध्ये घेतली जाते का?

८) सरासरी स्त्रियांचे आयुष्यमान
सौदी अरेबिया - ७६ वर्षे
भारत - ६९.९ वर्षे
कदाचित हे सुद्धा सौदी अरेबिया मधील आर्थिक सुबत्तेमुळे असेल.

९) कुमारी मातांचे प्रमाण (१५-१९ वयोगटातील १००० स्त्रियांमध्ये होणारे जन्म )
भारत - ७९
पाकिस्तान - ३०
सौदी अरेबिया - १८
इंग्लंड - ३०
अमेरिका - ३३
कुमारी मातांच्या प्रमाणातही सौदी अरेबिया, भारत, पाकिस्तान (जो भारताहून कमी कुमारी माता असलेला आहे), इंग्लंड, अमेरिका, याद देशांपेक्षा अधिक प्रगत असल्याचे दिसते.

१०) प्रति स्त्री असलेली मुले
भारत - २.२
सौदी अरेबिया - २.५
अमेरिका - १.९
इंग्लंड - १. ८७
या बाबतीत मात्र सौदी अरेबिया अनेक देशांच्या खाली आहे. प्रति स्त्री असलेली मुले आणि प्रसूतीच्या वेळी होणारे माता मृत्यूंचे प्रमाण पाहता, गर्भवती स्त्रियांची चांगली काळजी सौदी अरेबिया मध्ये घेतली जाते असे दिसते.

या माहितीवरून असे दिसते कि सर्वात पुरातन आणि स्त्रियांना अत्यंत कमी स्वातंत्र्य असणाऱ्या इस्लामिक शरिया नियमांना धरून राहणाऱ्या सौदी अरेबिया सारख्या देशात अनेक बाबतीत स्त्रियांची स्थिती भारता पेक्षा किंवा इतर काही विकसित देशांच्या तुलनेत चांगली नाही तर सामान तर नक्कीच आहे. याचा ही विचार झाला पाहिजे कि स्त्रीस्वातंत्र्याच्या बाबतीत आघाडीवर असणाऱ्या इंग्लंड, अमेरिकेसारख्या देशात स्त्रियांच्या आत्महत्येचे प्रमाण सौदी अरेबिया पेक्षा जास्त का आहे? या स्वातंत्र्याबरोबर नकळत स्त्रियांना इतर काही समस्यांना तोंड द्यावे लागते का? याचा अर्थ शरिया सारखे नियम भारतात असावे असा निश्चितच नाही. अर्थात यामध्ये काहीच निकशांशी निगडीत माहिती आहे इतर काही बाबतीत सौदी अरेबिया मध्ये स्त्रियांची स्थिती हालाखीची असेलही. परंतु काही गोष्टी अधोरेखित कराव्या असं वाटते. ते म्हणजे खूप धर्मनिष्ठ समाजामध्ये ही स्त्रियांची परिस्थिती चांगली असू शकते. पाश्चात्य संस्कृती म्हणजे स्त्रियांचा स्वर्ग आणि इस्लामिक किंवा अरब संस्कृती म्हणजे स्त्रियांचा नरक ही धारणा काही बाबतीत खरी असली तरीही अनेक बाबतीत पूर्वग्रहदूषित आहे. कदाचित आर्थिक सुबत्ता, राजकीय स्थैर्य, कौटुंबिक आधार, समाजाची नीतीमत्ता आणि दृष्टिकोन या सारख्या गोष्टी स्त्रियांच्या परिस्थितीवर जास्त मोठ्या प्रमाणावर परिणाम करत असाव्यात असं दिसते.

आपण जेव्हा भारतातील किंवा महाराष्ट्रातील स्त्रियांची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करतो ( जो केला जायलाच हवा), त्यावेळी या सर्व गोष्टींचा विचार व्हायला हवा. फक्त धर्म धारणांना सुळावर चढवून किंवा स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी अधिकाधिक कडक आणि जाचक कायदे करून स्त्रियांची स्थिती सुधारणार नाही आणि धर्म धारणा जोपासूनही स्त्रियांची परिस्थिती सुधारू शकते.

संदर्भ -
१) www. gapminder.org/data/ - इतर सर्व माहिती साठी
२) www.wikipedia.org - स्त्री साक्षरतेसंदर्भातील माहिती साठी
३) https://stats.oecd.org/Index.aspx?QueryId=79587# - पदवीधर महिलांच्या टक्केवारी साठी

वरील संदर्भांमध्ये माहिती कोठून मिळाली आहे हे तपासायचा प्रयत्न केला. बहुसंख्य आकडे युनेस्को, वर्ल्ड बँक, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनिझेशन, ओईसीडी या संस्थांकडून आले असल्याचे समजले. यांच्या पुढे जाऊन मिळालेले आकडे अजून खोलात जाऊन तपासले नाहीत परंतु तसे करावेसे वाटल्यास अवश्य करावे.

अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते कि सध्याच्या समाजात पाश्चात्य धारणांना धरून स्त्रीमुक्तीचा वैचारिक प्रवाह एवढा जोराने वाहत आहे कि त्याला काही प्रमाणात पडताळून पाहणारा हा लेख मायबोली सारख्या वेब साईट्स सोडता इतर प्रसिद्धी माध्यमांनी छापला नसता. त्यामुळे मायबोलीचे आणि मायबोलीकरांचे आभार.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

स्त्रीस्वातंत्र म्हणजे तिला जे करायचं आहे ते करू शकण्याचे स्वातंत्र. स्त्री-पुरुष भेद भाव करण्याआधी, निव्वळ "व्यक्ती स्वातंत्र" याचा विचार करा आणि मग त्या तुलनेत पुरुष कुठे आहेत आणि स्त्रिया कुठे आहेत याची तुलना करून बघा.

<<< थंडीत सकाळी ६:३० वाजता पोळ्या करायला येणारी किंवा रात्री ८:३० वाजता पावसाळ्याच्या दिवसात घरी स्वयंपाक करून एकटी घरी चालत जाणारी विशी-तिशीतली ताई किंवा मावशी कधी स्त्री सुरक्षिततेच्या चर्चेत पडलेली मला दिसत नाही. >>>
पोटाची भूक फार भयानक असते म्हणून असे काम करावे लागते. आणि असुरक्षितता काय फक्त लैंगिक प्रकारचीच असते का? केवळ बॉस ओरडेल म्हणून घरी आजारी बाळाला ठेऊन, पावसाळ्यात विरारहून चर्चगेटला लोकलने जाणारी स्त्री सुरक्षित समजायची का, निव्वळ तिच्यावर शारिरीक बलात्कार झाला नाही म्हणून? मनासारखे जगता आले नाही की ते पारतंत्र्च, मग स्त्रीचे असो किंवा पुरुषाचे.

<<< काही वर्षांपूर्वी एका संगणक क्षेत्रात काम करणाऱ्या मुलीवर गाडी चालकाने बलात्कार करून तिचा खून केला. कितीही दुःखद आणि संतापजनक घटना असली तरीही पुण्यात रोज १०,००० मुली कॅब ने प्रवास करतात असे धरले (५० लाख लोकसंख्या असेल तर त्याच्या ०.२%) आणि सुदैवाने ४ वर्षातून एकदाच अशी घटना घडत असेल तर साधारणपणे १ कोटी मुलींपैकी एखादीच अशी दुर्दैवी असते. हा ही विचार मनाला दिलासा देऊन गेला. >>>
तुमचे मौलिक विचार वाचून धन्य झालो. आपल्याकडे हजारो भटकी कुत्री असतात. समजा तुम्हाला एखादा कुत्रा चावला तर तुम्ही ते स्टॅटिस्टिकली किती दुय्यम आहे असे म्हणाल की मुळात त्यांनी तुम्हाला चावू नये म्हणून प्रयत्न कराल?

सौदी अरेबियाशी केलेली तुलना कळली नाही.

तुम्ही सांख्यिकी विषयीचा काही कोर्स करण्याची अत्यंत गरज आहे. आणि निष्कर्ष आधी लिहून धरबंध नसल्यासारखे दावे करणे सोडण्याची ही.

असेच आणखी काही बेजबाबदार आणि हास्यास्पद पण तुमच्या डेटा वरुन काढता येऊ शकतील असे निश्कर्ष:
१. बहुसंख्य हिंदू समाजात रहाणार्‍या (म्हणजे भारतीय) स्त्रिया या बहुसंख्य मुस्लिम समाजात रहाणार्‍या स्त्रियांपेक्षा बुद्धीने कमी असतात. किंवा हिंदू लोक स्त्रियांचे खच्चीकरण करतात. त्यामुळे भारतातील बहुसंख्य हिंदूंनी धर्म बदलून मुस्लिम केला तर स्त्रियांची परिस्थिती आमूलाग्र बदलेल.
२. कुमारी माता, लैंगिक अत्याचार, शिक्षण कुठलंही मानक घ्या! भारतात बहुसंख्य हिंदू रहातात आणि ते त्या सगळ्यात मागे आहेत. पण सौदी अरेबिआ, अमेरिका, इंग्लंड, इस्त्राईल हे मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू धर्मीयांचे मोठे प्रमाण असलेले देश सगळ्यात पुढे आहेत. आपण धर्म बदल केलाच पाहिजे. कुठला करुया बरं?

दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने म्हणा रात्री ९ वाजे पर्यंत फळं, फुलं, भाज्या विकणाऱ्या ताई, मावशी सहसा असुरक्षित स्त्रियांच्या वर्गाला जाताना मला दिसत नाहीत. थंडीत सकाळी ६:३० वाजता पोळ्या करायला येणारी किंवा रात्री ८:३० वाजता पावसाळ्याच्या दिवसात घरी स्वयंपाक करून एकटी घरी चालत जाणारी विशी-तिशीतली ताई किंवा मावशी कधी स्त्री सुरक्षिततेच्या चर्चेत पडलेली मला दिसत नाही.>>> मनाप्रमाणे जगायलाही वेळ मिळत नाही तिथे चर्चा करायला कुठे वेळ मिळणार?

मुलींपैकी एखादीच अशी दुर्दैवी असते. हा ही विचार मनाला दिलासा देऊन गेला.>>> वाईट वाटले. मूळात गुन्हाच ईतका भयानक आहे कि एकदा जरी झाला तरी ते त्रासदायकच.
कोटीतली एखादी असेल तर वाईट. ती आपल्याच राज्यातली असेल तर अजून वाईट. आपल्याच शहरातली असेल तर त्याहून वाईट. जस जसे हे अंतर कमी होत जाईल तसतसे त्या गुन्हयाबद्दल राग/प्रतिक्रिया/टोचणी वाढत जाणार. दुर्दैव!

बहुसंख्य चर्चांचा निष्कर्ष 'आजची स्त्री सुरक्षित नाही' असाच असतो.>>> ‘आजची स्त्री सुरक्षित नाही कारण पुरूष चूकीचा वागतो’ असा असायला हवा.

<<<वस्तुतः या चर्चांमध्ये भाग घेणाऱ्या बहुसंख्य स्त्रिया आय टी कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या करत असतात. >>>
कदाचित या स्त्रिया स्वतःबद्द;ल बोलत नसून समाजात इतरत्र काय चालले आहे, त्यांच्यापेक्षा कमी सुरक्षेची व्यवस्था असलेल्या स्त्रियांना काय सहन करावे लागते याबद्दल बोलत असतील.

<<< विशी-तिशीतली ताई किंवा मावशी कधी स्त्री सुरक्षिततेच्या चर्चेत पडलेली मला दिसत नाही. >>>

<<< साधारणपणे १.९५-२.६ कोटी स्त्रियांपैकी एखादीच स्त्री अशी दुर्दैवी असते हा एक विचार मनाला थोडा निववून गेला. >>>

<<< साधारणपणे १ कोटी मुलींपैकी एखादीच अशी दुर्दैवी असते. हा ही विचार मनाला दिलासा देऊन गेला. >>>

<<< सौदी अरेबिया स्त्रियांसाठी भारत आणि अमेरिकेच्या तुलनेत अधिक सुरक्षित आहे. >>>

<<< स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी अधिकाधिक कडक आणि जाचक कायदे करून स्त्रियांची स्थिती सुधारणार नाही आणि धर्म धारणा जोपासूनही स्त्रियांची परिस्थिती सुधारू शकते. >>>

लेखकाला म्हणायचे आहे की इतरांना वाटतो तितका हा प्रकार गंभीर नाही स्त्रियांच्या सुरक्षिततेचा. बडे बडे देशो में ऐसी छोटी मोटी घटनाए होतीही रहती है.

In Saudi Arabia, rape cases usually target both the defendant and the victim,[4] and in some cases, the victim can be sentenced to even harsher punishment than the assailant. [3
https://en.m.wikipedia.org/wiki/Rape_in_Saudi_Arabia

https://www.hrw.org/news/2007/11/15/saudi-arabia-rape-victim-punished-sp...

"Girl gets a year in jail, 100 lashes for adultery".
https://web.archive.org/web/20110113112405/http://www.saudigazette.com.s...

(अगदी आत्ताआत्तापर्यंत) सौदी अरेबियामध्ये स्त्री चालकांनी केलेल्या अपघातांचे प्रमाण ०% आहे. त्यामुळे सौदी अरेबियातल्या सर्व स्त्रियांना अत्युच्च दर्जाचे वाहन चालवण्याचे शिक्षण मिळाले आहे, आणि त्या जगातल्या सर्वोत्तम वाहनचालक आहेत, असेही अनुमान आपण सहज काढू शकतो.

सौदीमधे आत्महत्या कमी याचे कारण फट म्हणता बायकांची हत्या केलीच जाऊ शकते. त्याला धर्माचा आधार दिला की करणारे पुण्यवानही ठरतात. मग स्टॅटिस्टिक्समधे आत्महत्यांचे प्रमाण कमी आणि स्त्रिया एकदम आनंदी व सुरक्षित.. वा वा..
बाकी भारतीय उपखंडातल्या स्त्रिया या सगळ्यात जास्त ताणमय आयुष्य जगतायत हे यानिमित्ताने अधोरेखित का नाही करावेसे वाटले?

महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या/ घेतलेल्या माणसांचे एकूण लोकसंख्येशी काय गुणोत्तर आहे याचा विचार करायची गरज पडायला हवी ना? स्त्रियांची टक्केवारी काढायच्या आधी?

>>> दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने म्हणा रात्री ९ वाजे पर्यंत फळं, फुलं, भाज्या विकणाऱ्या ताई, मावशी सहसा असुरक्षित स्त्रियांच्या वर्गाला जाताना मला दिसत नाहीत. <<<
स्त्रियांची सुरक्षितता हा मुद्दा महत्वाचा मानायची मानसिकता आपल्या आख्ख्या महान संस्कृतीत जरा कमीच. त्यात हातातोंडाची गाठ पडण्याचे वांदे असतील तर 'सहन करा, गप्प बसा!' हेच त्यांना शिकवलेले असणार. बाकी वेळ येताच याच बायका पायातली चप्पल काढून त्रास देणार्‍याला फोडून काढू शकतात.

>>थंडीत सकाळी ६:३० वाजता पोळ्या करायला येणारी किंवा रात्री ८:३० वाजता पावसाळ्याच्या दिवसात घरी स्वयंपाक करून एकटी घरी चालत जाणारी विशी-तिशीतली ताई किंवा मावशी कधी स्त्री सुरक्षिततेच्या चर्चेत पडलेली मला दिसत नाही.<<<
या बायकांना त्यांच्या कामाच्या जागी कामाच्या वेळात कामे सोडून उंडारायला इंटरनेट मिळत नाही हो. त्यामुळे तुम्हाला दिसत नाही. उतरा रस्त्यावर. बोला त्यांच्याशी. मग समजेल.

एक wa फॉरवर्ड होता
दुदैवाने जोक म्हणून आला असला तरी आपल्याकडची सत्यस्थिती आहे--
>>अभी तो अभिनेत्रियों का #MeToo शुरू हुआ है,

असली तूफान तो तब आएगा

जब काम वाली बाइयों का #MeToo आएगा। <<

_______________
परिस्थितिवश कोणी तक्रार नाही केली म्हणजे ती व्यक्ति पीड़ित/शोषित नाही असे नक्कीच नसते

What does a woman want?>. असं शीर्षक वाचुन लेख उघड्ला पण काहीच कळलम नाही कुठल्या वूमनला काय पाहिजे?
क्या केहना चाहते हो??

What does a woman want?>. असं शीर्षक वाचुन लेख उघड्ला पण काहीच कळलम नाही कुठल्या वूमनला काय पाहिजे?
क्या केहना चाहते हो?? >>>>> + १११११

What does a woman want? हे शिर्षक अन चालू घडामोडी - भारतात हा ग्रुप हे बघुनच अंदाज आलेला की ईथे काहीतरी वेगळे असणार, पण हे भलतेच निघाले

Kamvalya baayka kunashi charcha karat nahit?
Itar bayakanshi karatat .
Mazyashi mazya bayakanni Kelli she.
Who r u so that she will discuss it with u?

शबरीमला प्रकरणावर आहे हा लेख. "धार्मिक बंधने तोडून तरी स्त्रियांना काय मिळवायचे आहे. आत्महत्याच ना? त्यापेक्षा सौदीत बघा..." हे टुकार सांख्यिकी दाखवून विचारत आहेत लेखकराव.

लेखकाने माहिती गोळा करून काही मुद्दे मांडले आहेत, काहीतरी मेहनत केलेली आहे. उगाच कशाला लेखकाची वाक्ये अधोरेखित करून त्याचे bashing करता ? come on ... लेखकाच्या बौद्धिक पातळीची लेवल काढण्यापेक्षा, स्वतः काहीतरी मुद्देसूद लिहुन त्याचे मुद्दे खोडून काढा कि राव. उगा आपलं काहीतरी मापं काढत बसायची एखाद्याची.

बाकी मुळ विषयास अनुसरून :
स्त्रीमुक्ती हा विषय मला तर खुप relative वाटतो. उदाहरणार्थ
१. एखादी उच्च-शिक्षित स्त्री रोज सकाळी ऑफिसला जाते आणि कमावते हि तिच्या कुटुंबासाठी अभिमानाची गोष्ट असेल.
२. तसेच एखादी अल्प-शिक्षित स्त्री रोजंदारीवर कामाला जावून कमावते, हे तिच्या कुटुंबाला अभिमानाची गोष्ट वाटत असेल.
फरक एवढाच आहे कि समाज (म्हणजे 'आपण', ज्यात स्त्री पुरुष दोन्ही आले) त्या दोघींकडे कसे बघतो.

समाज जर पहिलीला भारी आणि दुसरीला बिचारी समजत असेल, तर समाजाला बघण्याच्या दृष्टिकोनात बदल करण्याची गरज आहे.
त्या दोघींना स्वतःबद्दल काय वाटते हे समजून घ्यायचे असेल तर दोघींचे खालील मुद्द्यांवर परीक्षण करून बघा...
१. आर्थिक स्वातंत्र्य
२. कौटुंबिक निर्णय प्रक्रियेतील स्थान
३. लैंगिक स्वातंत्र्य

हे परीक्षण करताना extreme केसेस टाळा. म्हणजे शिक्षित स्त्रीचे कुटुंब 'सुसंकृत' असेल आणि अडाणी स्त्री चे कुटुंब 'दारुडे च ' असेल अशी गृहीतके टाळून मध्यगेवर काही निर्णयाप्रत येते का ते पहा.

>>>What does a woman want?>. असं शीर्षक वाचुन लेख उघड्ला पण काहीच कळलम नाही कुठल्या वूमनला काय पाहिजे?

शीर्षक + लेख बघून मला वाटलं "आता आणखी काय हवं तुम्हाला बायांनो? भारतात कधीतरी क्वचित तुमच्यावर काही अत्याचार होतात, तर लगेच पाश्च्यात्यांच्या नादी लागून स्त्रीमुक्ती वगैरे. कशाला?"

हा लेख वाचून मला एवढेच कळले की स्त्रियांचे स्वातंत्र्य आणि सुख हे बहुतांशी त्या वावरत असणाऱ्या आजूबाजूच्या समाजातील पुरुषांच्या वागणुकीवर अवलंबून असते.

हा लेख वाचून मला एवढेच कळले की स्त्रियांचे स्वातंत्र्य आणि सुख हे बहुतांशी त्या वावरत असणाऱ्या आजूबाजूच्या समाजातील पुरुषांच्या वागणुकीवर अवलंबून असते.
Submitted by Zankar on 3 November, 2018 - 23:12

चूक. तुम्ही सुखी व्हायचं की नाही याचा निर्णय तुमच्याबाबतीत दुसरे घेऊ शकत नाहीत. तुम्ही स्वतःच घेत असता आणि जर दुसरे हा निर्णय घेत असतील तर त्यांना तसा निर्णय घेण्याचा अधिकार देण्याचा निर्णय देखील तुम्हीच घेतलेला असतो.

मंदिरात प्रवेश नाकारला म्हणून आंदोलन करायचं की स्वतःच वेगळी मंदिरं उभारुन तिथे पुरुषांना प्रवेश नाकारायचा हे ठरविणारी मानसिकताच तुम्ही सुखी समाधानी राहणार का याचा निर्णय देत असते.

वीसेक वर्षांपूर्वी एक पुरुषपात्रविरहित सिनेमा बनविला गेला आणि त्याने मोठे यश देखील (आर्थिक आणि समीक्षकीय) मिळविले हे उदाहरण पुरेसे आहे.

तुम्ही सुखी व्हायचं की नाही याचा निर्णय तुमच्याबाबतीत दुसरे घेऊ शकत नाहीत. तुम्ही स्वतःच घेत असता +१११

नानबा आणि नीधप चे काही मुद्दे चांगले आहेत. निम्न आर्थिक वर्गातील स्त्रियांच्या समस्या मला कोणत्या चर्चेत किंवा वार्तापत्रात ऐकायला किंवा वाचायला मिळाल्या नाहीत पण त्या वर्गातील स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी काही विचार किंवा काम होत असेल आणि त्याची माहिती मिळाली तर नक्की आवडेल.

सौदी अरेबिया मध्ये एकूण पदवी घेणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण कदाचित कमी असेल कारण त्या आधीच त्या लोकांना रोजगार मिळत असेल. जसे अनेक विकसित देशांमध्ये आहे (उदाहरण रशिया). जास्त स्त्रियांच्या पदवी घेण्याच्या प्रमाणावरून हे नक्की दिसते कि समाजामध्ये स्त्री शिक्षण सकारात्मक रीतिनीच घेतले जाते त्याला विशेष विरोध होत नाही.

उपाशी बोकाचे मत आणि माझे मत यामध्ये साम्य वाटले तरीही त्यात फरक आहे जो मला इथे स्पष्ट करावासा वाटतो.
१) जेव्हा निर्भया बलात्कार प्रकरणासारखे प्रसंग किंवा पुण्यातील एका मुलीवर कॅब ड्रायव्हर ने केलेल्या बलात्कार आणि खुनासारख्या घटना घडतात तेव्हा त्याच्या त्या व्यक्तीवर किंवा त्या कुटुंबावर त्याचा परिणाम होतो तो आहेच पण समाजामध्ये एक दहशतीचे वातावरण तयार होते आणि मग बलात्कारी व्यक्तींना चौकात फाशी द्या अशा प्रकारच्या 'शरिया' सारख्या कठोर शिक्षा सुचवल्या जातात. हे लक्षात घेतले पाहिजे कि समाजात निर्माण झालेली भीती किंवा राग कितीही नैसर्गिक असली तरीही हा त्या घटनेचा समाजावर असलेला मानसिक परिणाम आहे. तो समजून घेऊन दूर केला पाहिजे. मी दिलेल्या आकड्यांप्रमाणे दिल्लीत किंवा पुण्या मध्ये ३-४ वर्षात लाखो अशाही मुली असतात ज्या त्याच वाहतूक व्यवस्थेत सुरक्षित पणे प्रवास करत असतात आणि एखादीच दुर्दैवी मुलगी असते.

२) ज्या वेळी अशा किंवा इतर कोणत्या समस्यांचे निराकरण करायचे असेल त्यावेळेला त्याची वारंवारता पाहावी लागते. उदाहरण द्यायचे झाले तर दर वर्षी महाराष्ट्रात पडणारा दुष्काळ आणि २० वर्षातून एकदा होणारा भूकंप या दोन्ही समस्यांचे निराकरण आवश्यक असले तरीही वारंवारता लक्षात घेतली तरच योग्य प्रकारे निराकरण होऊ शकते. काही कोटी मध्ये एखाद्या मुलीचा बलात्कार आणि खून होत असेल तर तो कदाचित अधिक कडक आणि जाचक शिक्षा असून सुद्धा होऊ शकतो.

मानव पृथ्वीकर ने स्त्रियांवर होणाऱ्या बलात्काराचा मुद्दा मांडला आहे. ज्या काही बाबतीत सौदी अरेबिया किंवा इतर अरब देश स्त्रियांसाठी असुरक्षित असू शकतात त्यातला हा एक मुद्दा असू शकतो (आहेच असं मी म्हणत नाही). हा विचार लेख लिहिताना माझ्या डोक्यात आला होता पण मी मांडला नाही कारण,

१) बलात्कार नक्की कशाला म्हणायचे यामध्ये वेग वेगळ्या देशांमध्ये वेग वेगळ्या व्याख्या आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर भारतात एका मुलाने एखाद्या मुलीवर लग्नाचे अमिश दाखवून बलात्कार केला अशी बातमी वाचायला मिळते, तर अमेरिके मध्ये अशा अनेक मुली असतील ज्या आपल्या बॉय फ्रेंड शी लग्न होईल या आशेवर शरीर संबंध ठेवायला तयार झाल्या आणि त्यांच्या बॉय फ्रेंड ने त्यांना सोडून दिले.

२) सौदी अरेबिया हा त्या अनेक देशांपैकी एक आहे जेथे विवाह बाह्य संबंध हा कायद्याने गुन्हा आहे (तो असावा का नाही हा वेगळा मुद्दा. भारतातही हा कायद्याने गुन्हा आत्ता पर्यंत होता अजूनही विवाह बाह्य संबंध भारतातील कायद्या प्रमाणे अनैतिक मानले जातात) अशा वेळी तो खरोखर बलात्कार झाला आहे का ते सहमतीने ठेवलेले शरीर संबंध होते याची शहानिशा करावी लागते आणि थोड्या फार फरकाने अनेक देशांमध्ये ती केली जाते (जसे भारत). या बाबतीत सौदी अरेबिया मधील वहाबी शरियाच्या काय धारणा आहेत मला माहीत नाही पण त्या स्त्रियांना अन्यायकारक आहेत असं स्त्री वादी व्यक्तींचे मत असू शकते.

३) सौदी अरेबिया मधील शिक्षा क्रूर आहेत असे दिसते परंतु त्या तशाच पुरुषांसाठी पण क्रूर आहेत उदाहरणार्थ बलात्कार करणाऱ्या, दरोडा घालणाऱ्या पुरुषाचा शिरच्छेद केला जातो.

किरणुद्दीन, मुद्देसूद रीतीने सांगायचे झाले तर
१) स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि त्यावर करायची उपाय योजना यासाठी संख्याशास्त्र, इतर देशातील परिस्थिती, आर्थिक परिस्थिती असे सर्व पैलू लक्षात घ्यायला हवेत.
२) धर्म धारणांना सुळावर चढवून स्त्रिया सुरक्षित होतात हि धारणा योग्य नाही.. खूप धर्मनिष्ठ समाजातही काही बाबतीत स्त्रियांची परिस्थिती खूप चांगली असू शकते आणि धर्म निरपेक्ष समाजामध्ये सुद्धा काही बाबतीत स्त्रियांची परिस्थिती वाईट असू शकते (उदाहरण सौदी अरेबिया मध्ये होणाऱ्या स्त्रियांच्या आत्महत्या आणि अमेरिकेत होणाऱ्या स्त्रियांच्या आत्महत्या)
३) बाह्य आचरणावर अरब जगात स्त्रियांवर अनेक बंधने असली तरीही तो समाज स्त्री शोषण करणारा आहे किंवा स्त्रियांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासा बाबतीत निष्काळजी आहे असा समज योग्य नाही (वर अनेक आकडे या बाबतीत दिले आहेत)

गणोबा चे मुद्दे पण वाचले. फक्त लैंगिक स्वातंत्र्य ही संज्ञा नीट समजली पाहिजे. लैंगिक स्वातंत्र्य म्हणजे लैंगिक सुख मिळवण्यासाठी किंमत मोजण्याचे स्वातंत्र्य. सर्व देशांमध्ये लैंगिक सुखासाठी कोणत्यान कोणत्या (आर्थिक, सामाजिक, मानसिक, कौटुंबिक, शारीरिक) प्रकारची किंमत मोजावीच लागते.

What does a woman want? या प्रश्नाचे उत्तर माझ्या कडे नाही, किंबहुना असते तर लग्नानंतर वेगळे नवरा बायकोने वेगळे राहण्याची वेळ आली नसती. या प्रश्नाचे नक्की उत्तर कोणाकडे आहे की नाही माहीत नाही पण चार शिकल्या सावरलेल्या व्यक्तींमध्ये चर्चा व्हावी या उद्देशाने हे लिहिण्याचे प्रयोजन. >>>>> हा विषय आहे. खाली जे दिलेलं आहे ते मेन कोर्स नंतरचे फिलर्स आहेत. शब्दमर्यादा भरण्यासाठी.

आपापल्या शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे इथेच अपलोड करायची आहेत किंवा कसे ? अर्हता काय आहे ?

अननस, तुम्हाला माझा मुद्दा फक्त तिथेही बलात्कार होतात एवढाच वाटला??

जीथे ज्या स्त्रीवर बलात्कार होतो तिलाच शिक्षा होते, कारण तिने परदा पाळला नाही, एकटी बाहेर गेली वगैरे आणि तिने आपल्या अन्याया विरुद्ध कुठे वाच्यता केली म्हणून शिक्षा वाढवण्यात येते.
कितिशा स्त्रिया इथे अन्याय विरुद्ध बोलायला धजावत असतील!
आणि त्यांचे स्टॅटिस्टिक्स घेऊन तुम्ही तिथल्या स्त्रियांची स्थिती भारतापेक्षा चांगली आहे म्हणून मोकळे झालात!

बाकी हेला यांनी तुमच्या लेखाचा उद्देश बरोबर ओळखला होता. तूमच्या प्रतिसादात गोल गोल फिरून तुम्ही शेवटी धर्मविरोध करू नये या मुद्द्यावर येत आहात.

तूमच्या प्रतिसादात गोल गोल फिरून तुम्ही शेवटी धर्मविरोध करू नये या मुद्द्यावर येत आहात.>> आजकाल हाच सुर बर्याच शिकलेल्या आणि नोकरी करणार्‍या स्त्रीयांच्याकडुन ऐकायला मिळतोय.

चौथ्या आणि पाचव्या परिच्छेदात मनाला दिलासा द्यायला निर्भया आनि इस्थर अनुया प्रकरणांचा दाखला दिलाय. या दोन्ही प्रकरणांत बलात्कार + खून झाले होते. निर्भया प्रकरणात तर पीडितेला जे भोगावं लागलं, ते अमानुष होतं. म्हणून ही प्रकरणे चर्चेत आली, राहिली.
पण लेखकाने गुणोत्तर काढताना या दोन केसेस व्यतिरिक्त बलात्कार झालेच नाहीत, असे गृहित धरल्यासारखे वाटतेय. अगदी रोजच्या पेपरांत बलात्काराच्या किती बातम्या येतात? बातम्यांत न आलेले आणि रिपोर्ट झालेले बलात्कार किती असतील? ज्यांचं रिपोर्टिगचं झालं नाही, असे किती? याशिवाय विनयभंगाची प्रकरणे किती? ही आकडेवारी नजरेआड करणं सोयीचंच आहे.

स्त्रियांना नक्की हवंय तरी काय? हे लेखकाने आपल्या आजूबाजूच्या/नात्यातल्या एखाद्या स्त्रीला विचारले आहे का?

>>या प्रश्नाचे उत्तर माझ्या कडे नाही, किंबहुना असते तर लग्नानंतर वेगळे नवरा बायकोने वेगळे राहण्याची वेळ आली नसती.

माझ्या मते लेखक त्यांच्या बायकोबरोबर झालेले मतभेद आणि त्यामुळे आलेल्या उद्वेगातून सगळ्या स्त्रियांना उद्देशून जनरीक स्टेटमेंटस् करत आहे.

या लेखनावर चर्चा होत आहे हे वाचून छान वाटले. भरत ने मांडलेला मुद्दा चांगला आहे, निर्भया सारख्या घटना सोडल्या तर इतर बलात्कार, विनयभंग होत असतात. त्यतील अनेकांची नोंदही होत नाही. परंतु ही गोष्ट शेवटी आपल्याला ज्या गुन्ह्यांची नोंद होते त्या धरूनच काहीही निष्कर्ष काढता येतो. दुसरे म्हणजे,या लेखात लिहिलेल्या अनेक स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या उपाय योजना असूनही खरोखर बलात्कार, विनयभंग होत असतील तर नक्की काय करायला हवं?

लेखकाला स्त्रियांच्या समस्यांविषयी किती समजते हा मुद्दा थोडा बाजूला ठेवू. प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्तींच्या मते स्त्रियांना काय हवं आहे? प्रतिक्रिया देणाऱ्यांच्या मते स्त्रियांसाठी सुरक्षित समाज कोणता? भारतातल्या समाजात काय बदल केले पाहिजेत?

स्त्रियांना बलात्कार व्हायला नको आहे. तसेच तिच्याकडे बघणे, गर्दीचा फायदा घेऊन स्पर्श करणे, छेड काढणे, फोटो/व्हिडीओ काढणे नको आहे. जर कोणी तसे करत असेल तर बघ्याची भूमिका न घेता त्याचा विरोध करणे हवे आहे.

Pages