What does a woman want?

Submitted by अननस on 2 November, 2018 - 15:01

What does a woman want? या प्रश्नाचे उत्तर माझ्या कडे नाही, किंबहुना असते तर लग्नानंतर वेगळे नवरा बायकोने वेगळे राहण्याची वेळ आली नसती. या प्रश्नाचे नक्की उत्तर कोणाकडे आहे की नाही माहीत नाही पण चार शिकल्या सावरलेल्या व्यक्तींमध्ये चर्चा व्हावी या उद्देशाने हे लिहिण्याचे प्रयोजन.

दिल्ली सारख्या राजधानीच्या शहरात निर्भयावरील अत्याचारासारखी अतिशय दुःखद, आणि संतापजनक घटना घडते. त्यानंतर वार्तापत्र, न्यूज चॅनेल्स, कॉलेज, कंपनी इत्यादी ठिकाणी स्त्रियांच्या सुरक्षितते विषयी चर्चा रंगायला लागते. या बहुसंख्य चर्चांचा निष्कर्ष 'आजची स्त्री सुरक्षित नाही' असाच असतो. वस्तुतः या चर्चांमध्ये भाग घेणाऱ्या बहुसंख्य स्त्रिया आय टी कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या करत असतात. अनेकांना संध्याकाळी विशिष्ट वेळेनंतर ऑफिस मध्ये काम करण्यास नियमानुसार बंदी असते, अनेकांसाठी स्वतःची कार असते, इतरांना ऑफिस मध्ये जाण्यासाठी कंपनीची बस असते, अशा बसची जागा मोबाइल वर पाहता येते, चालक-वाहक यांची सगळी माहिती कंपनी कडे असते, या सधन घरातील स्त्रियांच्या सोसायटीमध्ये सेक्युरिटी गार्डस असतात, सोसायटी मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या गाडी नंबर, मोबाईल नंबर येण्या-जाण्याची वेळ याची नोंद ठेवली जाते, अनेकांच्या ऑफिस मध्ये सी सी टीव्ही कॅमेरे बसवलेले असतात, ऑफिस मध्ये ओळखपत्र असणाऱ्यानाच परवानगी असते, कंपनीमध्ये लैंगिक दुजाभाव अथवा अनैतिक आचरण केल्यास तक्रार करण्याची व्यवस्था असते, सर्वांकडे मोबाईल फोन असतात, अनेकांच्या मोबाइल फोन वर एक बटण दाबताच क्षणी जवळच्या पोलिस कार्यालयाला संपर्क करण्याची व्यवस्था असते..... हे सगळे असूनही ही स्त्री 'असुरक्षितच असते'. मग अशा असुरक्षित स्त्रियांसाठी स्वसंरक्षणासाठी कराटे, ज्युडो अशाप्रकारे स्वसंरक्षण आणि आक्रमकाला जेरबंद करण्यासाठी शारीरिक आक्रमणाचे खास धडे देण्याचे वर्ग घेतले जातात. बस मध्ये वगैरे येणाऱ्या प्रत्येक पुरुषाकडे पाहून, हा नराधम माझ्या जवळ आला तर मी काय काय करीन या 'युद्धाचा आराखाडा' पाहताक्षणी मनात तयार होत असतो कि काय असे वाटते.

दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने म्हणा रात्री ९ वाजे पर्यंत फळं, फुलं, भाज्या विकणाऱ्या ताई, मावशी सहसा असुरक्षित स्त्रियांच्या वर्गाला जाताना मला दिसत नाहीत. थंडीत सकाळी ६:३० वाजता पोळ्या करायला येणारी किंवा रात्री ८:३० वाजता पावसाळ्याच्या दिवसात घरी स्वयंपाक करून एकटी घरी चालत जाणारी विशी-तिशीतली ताई किंवा मावशी कधी स्त्री सुरक्षिततेच्या चर्चेत पडलेली मला दिसत नाही.

आजची स्त्री सुरक्षित कशी करता येईल यासाठी थोडा विचार करत होतो आणि थोडा इंटरनेट वर माहिती पाहिली.. त्यातली काही माहिती लक्षात घेण्या सारखी आहे. दिल्ली सारख्या शहरात वर्षाला कमीत कमी ६५-७० लाख स्त्रिया बस ने प्रवास करत असतील, निर्भयासारखी घटना कितीही तिरस्करणीय असली तरीही ६५-७० लाख स्त्रियांमधली एक दुर्दैवी स्त्री अशी असते सुदैवाने ३-४ वर्षात अशी घटना घडली नाही तर साधारणपणे १.९५-२.६ कोटी स्त्रियांपैकी एखादीच स्त्री अशी दुर्दैवी असते हा एक विचार मनाला थोडा निववून गेला.

अशीच अजून एक घटना नमूद करावीशी वाटते. काही वर्षांपूर्वी एका संगणक क्षेत्रात काम करणाऱ्या मुलीवर गाडी चालकाने बलात्कार करून तिचा खून केला. कितीही दुःखद आणि संतापजनक घटना असली तरीही पुण्यात रोज १०,००० मुली कॅब ने प्रवास करतात असे धरले (५० लाख लोकसंख्या असेल तर त्याच्या ०.२%) आणि सुदैवाने ४ वर्षातून एकदाच अशी घटना घडत असेल तर साधारणपणे १ कोटी मुलींपैकी एखादीच अशी दुर्दैवी असते. हा ही विचार मनाला दिलासा देऊन गेला.

अजून थोडी माहिती शोधली ती इथे लिहावीशी वाटली. त्यातले विशेष लक्ष वेधून घेतले ते सौदी अरेबिया सारख्या देशाने जेथे स्त्रियांवर सर्व प्रकारची सामाजिक आणि कायदयाची बंधने आहेत. भारतात १८ वर्षा खालील मुलीचे लग्न करणे हा कायदयाने गुन्हा आहे तर सौदी अरेबिया मध्ये, बाल विवाहाला देखील कायद्याने परवानगी आहे. फक्त कुटुंबाच्या ओळखीतून या देशात लग्न होतात. शरिया कायद्या नुसार या देशातील स्त्रियांना घराबाहेर पडताना हिजाब (बुरखा) घेणे बंधनकारक आहे. घराबाहेरील बहुसंख्य गोष्टींमध्ये सहभाग घेण्यासाठी घरातील कमीतकमी एका पुरुषाची परवानगी किंवा त्याने बरोबर असणे आवश्यक आहे, २००८ मध्ये काही बदल करण्यात आले आणि शिक्षण आणि आरोग्य इत्यादी बाबीत पुरुष व्यक्ती बरोबर नसली तरी चालेल असा नियम करण्यात आला. अशा देशात स्त्रियांचे जीवन दुःखाने भरलेले असेल असा विचार आला आणि अजून काही माहिती समोर आली ती लिहीत आहे...

१) स्त्रियांचे प्रथम विवाहाचे सरासरी वय -
भारत -२२.२ वर्षे (१८ वर्षांखालील मुलीचे लग्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे)
सौदी अरेबिया - २५ वर्षे (बालविवाहाला कायद्याने परवानगी आहे )
म्हणजे, 'मुलगी एकदा लग्नाच्या वयाची झाली कि तिचे लग्न लावून द्यायचे', असा विचार सौदी अरेबिया मध्ये करत नाहीत असं दिसते...

२) स्त्रियांचे साक्षरतेचं प्रमाण
भारत - ५९.३%
सौदी अरेबिया - ९१. १ %
कदाचित इस्लामची घट्ट पकड असलेल्या सौदी अरेबिया मध्ये भारता पेक्षा जास्त असलेले स्त्री साक्षरतेचे प्रमाण सौदी अरेबिया च्या आर्थिक सुबत्तेमुळे असेल.

३) स्तन कर्करोगाने होणारे स्त्री मृत्यू (प्रती १००,००० स्त्रियां मध्ये )
सौदी अरेबिया - १०.९
भारत - १०.४
फ्रान्स - १८.२
इंग्लंड - २०.६
अमेरिका - १६.७

४) जन्माच्या वेळी होणाऱ्या मातांच्या मृत्यू चे प्रमाण - (प्रति १००,००० अर्भकांच्या जन्मा मागे)
भारत - २००
जपान - ५
सौदी अरेबिया - २४
अमेरिका - २१
कदाचित या बाबतीतही सौदी अरेबिया भारतापेक्षा स्त्रियांसाठी अधिक सुरक्षित आहे तो आर्थिक सुबत्तेमुळे असेल. हे प्रमाण अमेरिकेपेक्षा अगदी थोडेसेच जास्त आहे.

५) सरासरी मुलींची शैक्षणिक वर्षे (१५-४४ या वयोगटातील)
भारत - ५.७
चीन - ८.५
जपान - १३.४
सौदी अरेबिया - ८.५
इंग्लंड - १३. १
अमेरिका - १३.३
या वरून असे दिसते कि सौदी अरेबिया मध्ये १५-४४ वयोगटातील स्त्रियांची शैक्षणिक वर्षे पाश्चात्य देशांपेक्षा कमी असली तरीही चीन एवढीच आहेत आणि भारतापेक्षा जास्त आहेत.

६) महाविद्यालयीन पदवी घेणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण (टक्केवारी सर्व स्त्री आणि पुरुष मिळून पदवीधरांपैकी )
भारत - ५०%
सौदी अरेबिया- ५७.४%
इंग्लंड -५७%
अमेरिका- ५७.४%
चीन -५२.४%
जपान - ४५.९%
या आकडेवारी वरून असे दिसते कि पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये स्त्रियांचे प्रमाण पुरुष विद्यार्थ्यांपेक्षा अधिक आहे आणि ते इंग्लंड, अमेरिके मधील पदवी घेणाऱ्या स्त्रियांएवढेच आहे.

७) स्त्रियांच्या होणाऱ्या हत्या (प्रती १००,००० स्त्रियांमध्ये )
भारत -४.४
सौदी अरेबिया -१.९
अमेरिका -२.६
इंग्लंड - ०.२
स्त्री हत्यांच्या बाबतीत इंग्लंड एवढा नसला तरीही सौदी अरेबिया स्त्रियांसाठी भारत आणि अमेरिकेच्या तुलनेत अधिक सुरक्षित आहे.

७) स्त्रियांच्या आत्महत्येचे प्रमाण - (प्रती १००,००० स्त्रियां मध्ये )
भारत - १४.३
जपान - ९.५
सौदी अरेबिया - १.६
इंग्लंड - २.९
अमेरिका - ४.२
जपान, भारत, इंग्लंड, अमेरिका या देशांच्या तुलनेत सौदी अरेबिया मधील स्त्रिया कमी आत्महत्येकडे झुकतात. कदाचित मानसिक स्वास्थ्याची अधिक काळजी सौदी अरेबिया मध्ये घेतली जाते का?

८) सरासरी स्त्रियांचे आयुष्यमान
सौदी अरेबिया - ७६ वर्षे
भारत - ६९.९ वर्षे
कदाचित हे सुद्धा सौदी अरेबिया मधील आर्थिक सुबत्तेमुळे असेल.

९) कुमारी मातांचे प्रमाण (१५-१९ वयोगटातील १००० स्त्रियांमध्ये होणारे जन्म )
भारत - ७९
पाकिस्तान - ३०
सौदी अरेबिया - १८
इंग्लंड - ३०
अमेरिका - ३३
कुमारी मातांच्या प्रमाणातही सौदी अरेबिया, भारत, पाकिस्तान (जो भारताहून कमी कुमारी माता असलेला आहे), इंग्लंड, अमेरिका, याद देशांपेक्षा अधिक प्रगत असल्याचे दिसते.

१०) प्रति स्त्री असलेली मुले
भारत - २.२
सौदी अरेबिया - २.५
अमेरिका - १.९
इंग्लंड - १. ८७
या बाबतीत मात्र सौदी अरेबिया अनेक देशांच्या खाली आहे. प्रति स्त्री असलेली मुले आणि प्रसूतीच्या वेळी होणारे माता मृत्यूंचे प्रमाण पाहता, गर्भवती स्त्रियांची चांगली काळजी सौदी अरेबिया मध्ये घेतली जाते असे दिसते.

या माहितीवरून असे दिसते कि सर्वात पुरातन आणि स्त्रियांना अत्यंत कमी स्वातंत्र्य असणाऱ्या इस्लामिक शरिया नियमांना धरून राहणाऱ्या सौदी अरेबिया सारख्या देशात अनेक बाबतीत स्त्रियांची स्थिती भारता पेक्षा किंवा इतर काही विकसित देशांच्या तुलनेत चांगली नाही तर सामान तर नक्कीच आहे. याचा ही विचार झाला पाहिजे कि स्त्रीस्वातंत्र्याच्या बाबतीत आघाडीवर असणाऱ्या इंग्लंड, अमेरिकेसारख्या देशात स्त्रियांच्या आत्महत्येचे प्रमाण सौदी अरेबिया पेक्षा जास्त का आहे? या स्वातंत्र्याबरोबर नकळत स्त्रियांना इतर काही समस्यांना तोंड द्यावे लागते का? याचा अर्थ शरिया सारखे नियम भारतात असावे असा निश्चितच नाही. अर्थात यामध्ये काहीच निकशांशी निगडीत माहिती आहे इतर काही बाबतीत सौदी अरेबिया मध्ये स्त्रियांची स्थिती हालाखीची असेलही. परंतु काही गोष्टी अधोरेखित कराव्या असं वाटते. ते म्हणजे खूप धर्मनिष्ठ समाजामध्ये ही स्त्रियांची परिस्थिती चांगली असू शकते. पाश्चात्य संस्कृती म्हणजे स्त्रियांचा स्वर्ग आणि इस्लामिक किंवा अरब संस्कृती म्हणजे स्त्रियांचा नरक ही धारणा काही बाबतीत खरी असली तरीही अनेक बाबतीत पूर्वग्रहदूषित आहे. कदाचित आर्थिक सुबत्ता, राजकीय स्थैर्य, कौटुंबिक आधार, समाजाची नीतीमत्ता आणि दृष्टिकोन या सारख्या गोष्टी स्त्रियांच्या परिस्थितीवर जास्त मोठ्या प्रमाणावर परिणाम करत असाव्यात असं दिसते.

आपण जेव्हा भारतातील किंवा महाराष्ट्रातील स्त्रियांची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करतो ( जो केला जायलाच हवा), त्यावेळी या सर्व गोष्टींचा विचार व्हायला हवा. फक्त धर्म धारणांना सुळावर चढवून किंवा स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी अधिकाधिक कडक आणि जाचक कायदे करून स्त्रियांची स्थिती सुधारणार नाही आणि धर्म धारणा जोपासूनही स्त्रियांची परिस्थिती सुधारू शकते.

संदर्भ -
१) www. gapminder.org/data/ - इतर सर्व माहिती साठी
२) www.wikipedia.org - स्त्री साक्षरतेसंदर्भातील माहिती साठी
३) https://stats.oecd.org/Index.aspx?QueryId=79587# - पदवीधर महिलांच्या टक्केवारी साठी

वरील संदर्भांमध्ये माहिती कोठून मिळाली आहे हे तपासायचा प्रयत्न केला. बहुसंख्य आकडे युनेस्को, वर्ल्ड बँक, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनिझेशन, ओईसीडी या संस्थांकडून आले असल्याचे समजले. यांच्या पुढे जाऊन मिळालेले आकडे अजून खोलात जाऊन तपासले नाहीत परंतु तसे करावेसे वाटल्यास अवश्य करावे.

अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते कि सध्याच्या समाजात पाश्चात्य धारणांना धरून स्त्रीमुक्तीचा वैचारिक प्रवाह एवढा जोराने वाहत आहे कि त्याला काही प्रमाणात पडताळून पाहणारा हा लेख मायबोली सारख्या वेब साईट्स सोडता इतर प्रसिद्धी माध्यमांनी छापला नसता. त्यामुळे मायबोलीचे आणि मायबोलीकरांचे आभार.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

या सर्व लेखाला आणि प्रतिक्रियांना धरून अजून एक मुद्दा मांडावासा वाटतो. मी वर लेखात लिहिल्या प्रमाणे -

१) भारतात स्त्रियांच्या प्रथम लग्नाचे सरासरी वय - २२.२ वर्षे (१८ वर्षांखालील मुलींच्या लग्नाला कायद्याने बंदी आहे)
२) सौदी अरेबिया मध्ये स्त्रियांच्या प्रथम लग्नाचे सरासरी वय - २५ वर्षे (बाल विवाहाला कायद्याने संमती आहे)
३) भारतातील कुमारी मातांचे प्रमाण - १००० मध्ये ७९ (१५-१९ वयोगटातील)
४) सौदी अरेबिया मधील कुमारी मातांचे प्रमाण - १००० मध्ये १८ (१५-१९ वयपगटातील)

यावर अजून थोडी माहिती लिहिणे योग्य वाटते. सर्व साधारणपणे भारतीय समाजामध्ये कोणताही पुरुष अविवाहित आणि लहान वयाच्या स्त्री कडे आकर्षित होत असेल तर ते जास्त समाज मान्य असते. उदाहरण द्यायचे झाले तर एक ३५ वर्षांचा पुरुष १६ वर्षाच्या मधल्या महाविद्यालयीन तरुणीकडे आकर्षित होणे, तोच पुरुष ३५ वर्षाच्या किंवा ४० वर्षाच्या दुसऱ्या स्त्री कडे आकर्षित होणे (मग कदाचित ती विधवा, अविवाहित किंवा घटस्फोटित असली तरीही ) या पेक्षा जास्त समाजमान्य मानले जाते. अशा सामाजिक परिस्थिती मध्ये, भारतात बालविवाहाला संमती दिल्यास (जी सौदी अरेबिया मध्ये आहे), स्त्रियांचे सरासरी लग्नाचे वय अजून कमी होईल, कदाचित १५-१६ वर्षे पर्यंत पण कमी होईल आणि १५-१९ या वयातील मातांचे प्रमाण अजून वाढेल. अशा परिस्थितीत, स्त्रियांसाठी त्याहून जास्त अल्पवयीन किंवा कुमार वयीन मुलींसाठी भारतीय समाज सौदी अरेबियन समाजापेक्षा अधिक सुरक्षित किंवा जास्त नैतिक आहे असे लोकांना का वाटते?

अशा परिस्थितीत, स्त्रियांसाठी त्याहून जास्त अल्पवयीन किंवा कुमार वयीन मुलींसाठी भारतीय समाज सौदी अरेबियन समाजापेक्षा अधिक सुरक्षित किंवा जास्त नैतिक आहे असे लोकांना का वाटते?>>>

लोकांचे काय घेऊन बसलात? ते उलट सुलट बोलणारच. सौदी स्त्रियांसाठी सुरक्षित आहेच. पिंजऱ्यात सगळेच सुरक्षितच असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आई, बहीण, मावश्या, काक्या, माम्या, असलीच तर बायको न मुलींसकट सौदी गाठा व तिथेच कायमचे राहा. जिथे स्त्रिया इतक्या सुरक्षित तिथले पुरुष तर किती आनंदी असतील. इथले पुरुष आपापल्या स्त्रिया असुरक्षित असल्याच्या दडपणाखाली असतात, तिथे तेही दडपण नाही.

लोकांचे काय घेऊन बसलात? ते उलट सुलट बोलणारच. सौदी स्त्रियांसाठी सुरक्षित आहेच. पिंजऱ्यात सगळेच सुरक्षितच असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आई, बहीण, मावश्या, काक्या, माम्या, असलीच तर बायको न मुलींसकट सौदी गाठा व तिथेच कायमचे राहा. जिथे स्त्रिया इतक्या सुरक्षित तिथले पुरुष तर किती आनंदी असतील. इथले पुरुष आपापल्या स्त्रिया असुरक्षित असल्याच्या दडपणाखाली असतात, तिथे तेही दडपण नाही.>>>+१

सौदीतले शेख भारतात येऊन १५ वर्षे अथवा त्याहून कमी वयाच्या मुलींना चक्क विकत घेऊन त्यांच्याशी निकाह पढवून त्यांना सौदीत घेऊन जातात.

https://www.youtube.com/watch?v=qrrdf9DlQAY

सौदीतल्या श्रीमंत अरबांना आर्थिक श्रीमंतीच्या जोरावर भारतासारख्या गरीब देशातल्या मुलींची पिळवणूक करणे सोयीचे आणि सोपे असते. त्याचप्रमाणे त्यांना स्वदेशीय महिलांपेक्षा भारतीय महिला / मुलींची जास्त आवड असते. हा मुद्दा विचारात घेतल्यास सौदीमध्ये तिथल्या महिला सुरक्षित का राहतात याचे रहस्य उलगडू शकेल.

<दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने म्हणा रात्री ९ वाजे पर्यंत फळं, फुलं, भाज्या विकणाऱ्या ताई, मावशी सहसा असुरक्षित स्त्रियांच्या वर्गाला जाताना मला दिसत नाहीत. थंडीत सकाळी ६:३० वाजता पोळ्या करायला येणारी किंवा रात्री ८:३० वाजता पावसाळ्याच्या दिवसात घरी स्वयंपाक करून एकटी घरी चालत जाणारी विशी-तिशीतली ताई किंवा मावशी कधी स्त्री सुरक्षिततेच्या चर्चेत पडलेली मला दिसत नाही.>

अननस, तुम्ही खरेच या बायकांना विचारले आहे का? प्रचंड भिती असते या वर्गातल्या महिलांतसुद्धा.
बाकी लेख आजिबात आवडला नाही. या विषयावर ज्या संवेदनशीलतेने आणि अभ्यासपुर्वक लिहायला हवे होते तसा वाटला नाही.

आज ही माहिती वाचनात आली.
For a rape conviction to actually be handed down, UAE, Saudi Arabia, Sudan, Qatar and Mauritania laws mandate either a confession from the rapist or a witness account from four adult males. One must pause here and imagine the circumstances of which a woman is being raped and four adult male are witnessing this crime. In all cases, with neither of those things readily available, along with laws that make extramarital sex illegal, women reporting rape are likely to find themselves as the subject of criminal investigation and often, actually, sentenced. The result is the victims often don’t report rape, fearing they will be tried for adultery. In the UAE in many cases, foreign women who are in a tourism vacation in Dubai, not knowing of these laws ended up being arrested after they went to the police to report they had been raped. In Saudi Arabia a victim known as ‘Girl of Qatif‘ was gang-raped by seven men. At her 2006 Trial, she was sentenced to 90 lashes for being alone in a car with a man to whom she was not married. The rape was not established in the trial and it could not be proved. There were no witnesses and the men had recanted confessions they made during interrogation, and the verdict cannot be appealed.
All women in the kingdom are considered to have a male “wali” – an official guardian, typically a father, brother, uncle or husband.The system makes it “nearly impossible” for victims of domestic violence or sexual abuse to obtain legal redress because the police often insist that women and girls obtain their guardian's authorisation to file a complaint - even when the complaint is against the guardian

बलात्काराचा आरोप सिद्ध होण्यासाठी आरोपीला गुन्हा कबूल असायला हवा किंवा बलात्काराच्या गुन्ह्याला चार प्रौढ पुरुष साक्षीदार हवेत.
एका प्रकरणात सात जणांकडून सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार करणार्‍या एका महिलेला ९० फटक्यांची शिक्षा दिली गेली. का ? तर ती एका परपुरुषासोबत होती.

प्रत्येक महिलेला एक पुरुष पालक असायला हवा आणि बलात्काराची तक्रार नोंदवण्यासाठी या पुरुष पालकाची परवानगी हवी. आता हा पालकच बलात्कारी असेल तर मिळालीच परवानगी.

भरत, तुम्ही लिहिलेल्या गोष्टी मान्यच आहेत. मी वर एका प्रतिक्रियेमध्ये हे मान्यच केले आहे की हे एक क्षेत्र असे आहे की ज्यामध्ये स्त्रियांसाठी सौदी अरेबिया हा चांगला देश नाही.

तरीही मला हा एक प्रश्न उपस्थित करावासा वाटतो आणि तो म्हणजे, बलात्कार या स्त्री समस्या आहेत हे मान्यच आहे पण तेवढी एकच फक्त स्त्रियांची समस्या आहे का? स्त्री शिक्षण, स्त्रियांच्या आत्महत्या, कुमारी माता, स्त्री भृणु हत्या, माता मृत्यू, कौटुंबिक मालमत्तेवर असणारा स्त्रियांचा अधिकार या स्त्रियांच्या समस्या नाहीत का? बलात्कारांच्या बाबतीत स्त्रियांच्या बाबतीत अन्याय असणारा सौदी अरेबिया मी लिहिलेल्या इतर सर्व समस्यांच्या बाबतींमध्ये भारतापेक्षा स्त्रियांसाठी अधिक सुरक्षित आहे आणि काही बाबतीत अमेरिकेपेक्षा सुद्धा.

दुसरा मुद्दा असा कि सौदी अरेबिया मध्ये बलात्कार झाल्याचे सिद्ध झाल्यास गुन्हेगाराला जाहीर शिरच्छेदाची शिक्षा दिली जाऊ शकते (ज्याची अनेक स्त्रीवादी भारतात पण मागणी करत आहेत) जर भारतात इतक्या कठोर शिक्षा ठेवल्या तर भारातातही न्यायाधीश एखाद्या निरपराध व्यक्तीचा शिरच्छेद होऊ नये यासाठी इतक्या पुराव्यांची मागणी करतील.

बिपीन चंद्र, तुम्ही लिहिले आहेत तशा प्रकारचे गुन्हे होतात हे मान्यच आहे. परंतु सौदी अरेबिया ची लोकसंख्या ३.३ कोटी धरली तर अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांची संख्या १% पेक्षा कमी असेल. त्यामुळे यावरून स्त्रियांच्या सुरक्षिततेविषयी निष्कर्ष काढता येत नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे, भारतात अशा प्रकारे अल्पवयीन स्त्रिया विकल्या जातात यामध्ये सौदी अरेबियातील शेख जितके गुन्हेगार आहेत तेवढें भारतातील लोक पण गुन्हेगार आहेत.

पुम्बा, असंवेदनाशील लेखनाविषयी दिलगीर आहे. परंतु एखादा विचार किंवा गोष्ट एखाद्या व्यक्तीची संवेदना किंवा भावना दुखावणारी आहे याचा अर्थ ती खोटी किंवा अयोग्य आहे असे मुळीच नाही. मी वरती एका प्रतिक्रियेमध्ये लिहिल्या प्रमाणे अल्प उत्पन्न गटातील स्त्रियांना अनेक समस्या असतील ज्या प्रसारमाध्यमांमध्ये चर्चील्या जात नाहीत. मग

>>लेखकाला स्त्रियांच्या समस्यांविषयी किती समजते हा मुद्दा थोडा बाजूला ठेवू. प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्तींच्या मते स्त्रियांना काय हवं आहे? प्रतिक्रिया देणाऱ्यांच्या मते स्त्रियांसाठी सुरक्षित समाज कोणता? भारतातल्या समाजात काय बदल केले पाहिजेत?

या वर लिखाण झाले तर त्याचा संगळ्यांनाच फायदा होईल.

,{मी वर एका प्रतिक्रियेमध्ये हे मान्यच केले आहे की हे एक क्षेत्र असे आहे की ज्यामध्ये स्त्रियांसाठी सौदी अरेबिया हा चांगला देश नाही.}
असं लिहिलेली प्रतिक्रिया शोधतोय.

तुम्ही लिहिलेल्या अन्य बाबी आररोग्य, शिक्षण ,पायाभूत सुविधा, इ.त मोडतात. या बाबींत इथल्या आणि तिथल्या स्त्रिया़ंंच्या स्थितीची तुलना करताना दोहोंकडच्या पुरुषांच्या स्थितीचीही तुलना करायला हवी.

<<बलात्कारांच्या बाबतीत स्त्रियांच्या बाबतीत अन्याय असणारा सौदी अरेबिया मी लिहिलेल्या इतर सर्व समस्यांच्या बाबतींमध्ये भारतापेक्षा स्त्रियांसाठी अधिक सुरक्षित आहे आणि काही बाबतीत अमेरिकेपेक्षा सुद्धा. >>

--------- जर बहुतांश गुन्ह्यांच्या नोंदीच होत नसतील (तो डेटा उपलब्द नाही आहे), ज्या काही अत्यंत तुरळक प्रमाणात नोंदी होत आहे त्या खुप अपुर्‍या माहितीच्या आधारावर निष्कर्ष काढणे योग्य नाही. Sad

मला हा एक प्रश्न उपस्थित करावासा वाटतो आणि तो म्हणजे, बलात्कार या स्त्री समस्या आहेत हे मान्यच आहे पण तेवढी एकच फक्त स्त्रियांची समस्या आहे का? स्त्री शिक्षण, स्त्रियांच्या आत्महत्या, कुमारी माता, स्त्री भृणु हत्या, माता मृत्यू, कौटुंबिक मालमत्तेवर असणारा स्त्रियांचा अधिकार या स्त्रियांच्या समस्या नाहीत का?

सगळ्या समस्या co- exist करू शकत नाही का?
जेव्हा कोणी X बद्दलच का बोलता ही एकच समस्या आहे का? अ,ब,क सुद्धा समस्या आहेतच की, त्या बद्दल का नाही बोलत? असे विचारते तेव्हा त्यांना X बद्दल बोलणे गैरसोयीचे असते. विशेषतः देशो देशातील स्त्रियांची परिस्थिती वगैरे रेटिंग काढताना यातल्या कुठल्या एकाच निकषांच्या रेटिंग वर निष्कर्ष काढू नये.

दुसरी गोष्ट, हे निकष संस्कृती सापेक्ष असतात,
उदा, अमेरिकेतील स्त्रीवर बलात्कार झाल्यास तिची रिऍक्शन, आणि भारतातिय उपखंडातील स्त्रीची रिऍक्शन, त्यांना बसणार मानसिक धक्का, सामाजिक ट्राउमा, यात जमीन अस्मानाचा फरक असेल .
"या उलट मुलीला लिहिता वाचता येत नाही "याला मिळणारी रिऍक्शन वेगवेगळी असेल.
आत्ता एक गुन्हेगारी सिरीज पाहतो आहे, ज्यात साधारण 70% भागात तरी बलात्कार झालेल्या स्त्रिया (जर त्या, त्या गुन्ह्यात मारल्या गेल्या नसतील तर, त्यांचा खून झाला असेल तर त्यांचे आई वडील, कुटुंबीय ही माहिती देतात )कॅमेरा समोर येऊन ,आपल्या खऱ्या नावाने आपबीती ऐकवतात, भारतात याची आपण कल्पना तरी करू शकतो का? आपल्याकडे victim चे नाव प्रसिद्ध केले तरी नोटीस मिळते.

तेव्हा what women want, याचे उत्तर संस्कृती प्रमाणे बदलेल, सगळीकडे सेम 10 गोष्टी असतील, पण प्रधान्यक्रम संस्कृतीप्रमाणे बदलतील,

काहीही करा, पण बलात्काराबद्दल बोलू नका
१. बसेसमधून एवढ्या लाखो स्त्रिया प्रवास करतात. निर्भया एखादीच असते. आयटीसेक्टरमध्ये हजारोंनी स्त्रिया काम करतात. त्या गाजलेल्या केससारखी एखादीच असते. बाकीच्या सगळ्या स्त्रिया अगदी सुरक्षित असतात.
२. सौदी अरेबियाला आपण मागास समजतो. पण तिथे बघा, स्त्रियांना बलात्काराचा त्रास इथल्यापेक्षा किती कमी आहे.
३. बलात्कार बलात्कार काय करताय? शिक्षण, आरोग्य, समान हक्क यांचं बघा.
कळलं? की पुन्हा सांगू?

सिमबा, भरत, उदय तुमचा मुद्दा लावून धरायचा उत्साह आणि अफाट पेशन्स वाखाणण्यासारखा आहे. सगळ्या पोस्ट्स ना पाठिंबा. Happy

सौदी अरेबियावरच का आहे हा लेख?
आपण नेहमीसारखे पाकिस्तानशी का नाही तुलना करत आहोत?

मला पर्सनली जिथे बायकांना बुरख्यात वा घुंघटमध्ये राहायची सक्ती केली जाते ते प्रांतप्रदेश आवडत नाहीत. हे एक फार मोठे ईंडिकेशन आहे जे स्त्री ही केवळ पुरुषांच्या उपभोगाची वस्तू असून समाजरचनेत तिचे स्थान दुय्यम आहे हे दर्शवते.

{{{ थंडीत सकाळी ६:३० वाजता पोळ्या करायला येणारी किंवा रात्री ८:३० वाजता पावसाळ्याच्या दिवसात घरी स्वयंपाक करून एकटी घरी चालत जाणारी विशी-तिशीतली ताई किंवा मावशी कधी स्त्री सुरक्षिततेच्या चर्चेत पडलेली मला दिसत नाही. }}}

कुठल्याही अन्याय अत्याचाराला बळी पडण्याचे प्रसंग हे शक्यतो ताकदीने दुर्बल / कमजोर अशा गटावर घडतात. कमजोर असणे हे स्त्रीबाबत गृहित धरले गेले आहे. त्यातही एकटी स्त्री अधिकच दुर्बल असे हे समीकरण आहे. कामवाल्या महिलांबाबत - रोजचे आठ दहा किलोमीटर जलद चालणे, धुणी भांडी, झाडू फरशी अशी कष्टाची कामे यामुळे शरीर काटक, चपळ व सुदृढ असते. त्रास देणार्‍यास दोन फटके मारायची तयारी असते. शिवाय या महिला शक्यतो घोळक्याने कामावर जातात येतात त्यामुळे सुरक्षित राहतात.

सुरक्षिततेची चिंता करत बसली तर तिच्या पोटाचं काय होईल?
कामवाल्या बाया फारच तंदुरुस्त , दणकट असतात, दारुड्या बेकार नवऱ्याचा मार खाऊनही दणकट होतात.

स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक वार्डात स्त्री कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत एक निधी उभा करावा. त्या निधीमध्ये सर्व राजकीय पक्ष, धार्मिक संस्था, व्यापारी यांच्या कडून अर्थ साहाय्य घ्यावे. असे अर्थ साहाय्य देणे हे कायद्याने बंधनकारक असावं.

बलात्कार झाला आहे अशा स्त्रीला किंवा इतर शोषित स्त्रियांना या निधीतून नुकसान भरपाई दिली जावी. यामुळे दोषीला शिक्षा कायद्याप्रमाणे होईल, परंतु त्याआधी पीडित स्त्रीला समाजाकडून आवश्यक साहाय्य मिळेल. एखाद्या वार्ड मध्ये अशी नुकसान भरपाई दिली जात नसेल तर पीडित स्त्रीला इतर वॉर्डमध्ये त्याची मागणी करण्याचा अधिकार असावा. या सूचनेचा विचार व्हावा.

इतर शोषित स्त्रियांना या निधीतून नुकसान भरपाई दिली जावी. यामुळे दोषीला शिक्षा कायद्याप्रमाणे होईल,
>>>>>>
हे वाक्य चुकून टाईप झालंय का?

https://homeandpolitical.assam.gov.in/portlets/assistance-to-victims-exg...

असा फन्ड अलरेडी असावा
, चटकन केलेल्या गुगल सर्च मध्ये एक आसाम चे नाव आले ते वरती लिहीले आहे.
ऍसिड हल्ला पीडितांसाठी सरकारची स्कीम आहे ,

अशा प्रकारच्या योजना असतील तर उत्तमच आहे फक्त याची जबाबदारी सर्व करदात्या वर्गावर न देता, त्या विशिष्ठ वार्ड मध्ये असावी. जर त्या वार्ड मध्ये काही गुन्हे नाही घडले तर पीडित स्त्री च्या पुनर्वसनासाठी जमा केलेली रक्कम त्या वार्ड मधील राजकीय पक्ष, धार्मिक संस्था, व्यापारी यांना वर्षा अखेर परत मिळावी. यातून कळत नकळत हा संदेश मिळतो की अशा अत्याचारांसाठी आणि ते रोखण्यासाठी फक्त सरकार, पोलीस, गुन्हेगार, पीडित व्यक्ती नाही तर प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे.

यावर अजून थोडे विस्ताराने लिहायचे झाले तर समजा मी एक दागिन्यांचा व्यापारी आहे आणि मलाही माहीत आहे की जर आपल्या वार्ड मध्ये कोणत्याही स्त्री वर अत्याचार आला नाही तर मला सरकार कडे असलेले. ₹१०००० वर्षा अखेर परत मिळणार आहेत तर मी अधिक जोमाने असे गुन्हे होऊ नये यासाठी प्रयत्न करेन.तसेच झालेल्या गुन्ह्यात तपासात अधिक मदत करेन.

Jan2018 मध्ये पैसे द्या dec 2018 मध्ये परत घ्या
Jan 2019 मध्ये पैसे द्या dec 2019 मध्ये परत घाय,

एकूण किती पैसे जमले याचा हिशेब ठेवा
या अवधीत किती बलात्कार झाले त्याची आकडेवारी ठेवा
मग प्रो रेटा बेसिस वर किती परत मिळावे याचे कलक्युलेशन करा,

लोकांना उद्योग नाही असे वाटते का हो तुम्हाला?

साधारणपणे १.९५-२.६ कोटी स्त्रियांपैकी एखादीच स्त्री अशी दुर्दैवी असते हा एक विचार मनाला थोडा निववून गेला. > म्हणजे निर्भया आणि अजून 100 जणी सोडून बाकी कुणाला त्रास झालाच नाही असं म्हणायचं आहे का?
मी फक्त 6 वर्षाची होते तेव्हा मला sexually harass करण्यात आले होते.
आल्ले मोठ्ठे आकडेवारी दाखवणारे

Pages