मायबोलीकरांचे २०१८ च्या दिवाळी अंकांमधील साहित्य

Submitted by वाचनप्रेमी on 30 October, 2018 - 00:52

आपले बरेच मायबोलीकर वर्षभर उत्तमोत्तम लिखाण करत असतात. शिवाय विविध दिवाळी अंकांमध्येसुद्धा त्यांचं साहित्य प्रकाशित होत असते. ओळखीच्या, आवडत्या आणि दर्जेदार लिहीणार्या मायबोलीकरांचे दिवाळी अंकांमधील लेखन वाचायची उत्सुकता आहे. या वेळेस कुणाकुणाचे साहित्य कोणकोणत्या दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध झाले आहे बरे !! ते कमेंटीमध्ये येऊ द्या.
=============
विनिता.झक्कास यांनी सुचवल्याप्रमाणे मूळ लेखात दिवाळी अंक - लेखक पेष्टवीत आहे :
-------
मुशाफिरी : पूनम, आनंदयात्री, अनया, आतिवास, अस्चिग, अ‍ॅस्ट्रोनॉट विनय, फूल, शाली
पासवर्ड : अ‍ॅस्ट्रोनॉट विनय, निनाद, वावे, इंद्रधनुष्य (फोटोफीचर)
पुण्यभूषण : पराग
Submitted by ललिता-प्रीति
———-
आवाज दिवाळी अंकातले मायबोलीकर - मोहना, बोबो (निलेश मालवणकर ), ऍस्ट्रोनॉट विनय, onlynit26 (नितीन राणे )
———-
सारांश' व 'क्रांती अग्रणी पर्व ' च्या दिवाळी अंकात माझ्या कथा आहेत Happy - विनिता माने - पिसाळ
———-
यावेळी माझं साहित्य खालील दिवाळी अंकांत प्रकाशित झालंय :
१) धनंजयमध्ये गूढकथा
२) हंसमध्ये दीर्घकथा,
३) पासवर्डमध्ये बालकथा
४) मुशाफिरीत प्रवासवर्णन
५) अधिष्ठानमध्ये विज्ञानलेख
६) पाटकरांच्या आवाजमध्ये विनोदी कथा
७) मेनका प्रकाशनाच्या जत्रामध्ये विनोदी कथा
८) नवलकथामध्ये विज्ञानकथा
९) कोमसापच्या झपुर्झा मधे दोन क्षणिका
अजून दोनतीन ठिकाणी पाठवल्या होत्या, घेतल्या की नाही अजून कळालं नाही.
Submitted by अॅस्ट्रोनाट विनय (विनय खंडागळे )

सुभाषित दिवाळी अंकात माझी एक विनोदी कथा आलेली आहे
Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 8 November, 2018 - 19:03

————
सर्वांचं अभिनंदन.
माझ्या कथा खालील दिवाळी अंकात आहेत.
१. आवाज (विनोदी)
२. श्री. व सौ.
३. सामना
४. प्रसाद
५. मेहता ग्रंथ जगत
६. कथाश्री
७. अनुराधा
८. कुबेर
९. अभिरुची
१०.माझा मराठीचा बोल
११. फ्रान्स महाराष्ट्र मंडळ (ललित)
१२. बिगुल (लेख)
क्रमांक ९ ते १२ भारताबाहेर किंवा आंतरजालीय आहेत.
Submitted by मोहना (मोहना प्रभुदेसाई जोगळेकर )
————-
माझे लेखन ‘लोकसत्ता’ व ‘ऋतुरंग’ दिवाळी अंकांमध्ये प्रकाशित झाले आहे.
Submitted by झुलेलाल (दिनेश गुणे)
————
दिवाळी अंकांत झळकलेल्या मायबोलीकर लेखकांचे अभिनंदन.
यावर्षी माझ्या कथा खालील दिवाळी अंकांमध्ये आहेत.
1. हंस - यात माझ्या पाच लघुतर कथा वाचता येतील.
2. धनंजय - विज्ञान कम रहस्यकथा
3. आवाज
याव्यतिरिक्त आणखी दोन-तीन दिवाळी अंकांना कथा पाठवल्या होत्या. त्या छापून येणार आहेत का, हे कळायचं बाकी आहे.
Submitted by बोबो निलेश (निलेश मालवणकर )
———-
माझ्या कथा खालील दिवाळी अंकात प्रसिद्ध होतील.
1) धनंजय
2) मेनका
3) नवल
4) कथाश्री
5) दक्षता
6) माझी सहेली
7) पलाश
नक्की वाचा आणि अभिप्राय द्या
Submitted by Rajashree Barve
=============
भवताल' च्या ह्या वर्षीच्या अंकात मायबोलीकर वरदा ह्यांचा इनामगाववर लेख आहे.
Submitted by स्वप्ना_राज on 2 November, 2018 - 16:15
————————
नवल मध्ये अश्चिग - आशिष महाबळचीही कथा आहे.
Submitted by साधना on 8 November, 2018 - 12:39

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोहना मॅडम - तुम्ही माझ्याकडून स्फूर्ती घेतली हे वाचून मी धन्य जाहलो Lol

अरे वा! छान धागा आहे.
सर्व लेखकांचे अभिनंदन!!
भारी वाटले आपल्या माबोचा दिवाळीअंकांमध्ये एवढा मोठा सहभाग आहे हे पाहून.

अभिनंदन सर्व लेखकांचे!

मी दिवाळी अंक वाचत नाही. त्यामुळे तुमचा त्या त्या मासिकांशी जो काही करार झाला असेल त्याची मुदत संपल्यानंतर शक्य असेल तर इथे त्या कथा द्या. मला वाचायला आवडेल.

अरे वा! खरंच मायबोली छा गयी है! Happy
माझा लेख ललिता-प्रीति यांनी उल्लेख केला आहे त्याप्रमाणे ' पासवर्ड' दिवाळी अंकात येणार आहे Happy अभिनंदनाबद्दल धन्यवाद!
ज्यांचं साहित्य दिवाळी अंकांतून प्रसिद्ध होत आहे त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन Happy

वा वा सर्वांचे खूप खूप अभिनंदन __/\__

वाचनप्रेमी....मूळ लेखात दिवाळी अंक - लेखक अपडेट कराल का? म्हणजे शोधाशोध करावी लागणार नाही.

सर्व माबोकर लेखकांचे अभिनंदन!

माझे सुद्धा फारसे दिवाळी अंक वाचणे होत नाही. (हैद्राबादेत असल्याने ऑनलाईन मागवावे लागतात, त्यामुळे घरच्यांच्या आवडीचे दोनेक मागवतो.)
शक्य तेव्हा माबोवर कथा प्रकाशित केल्यास बरे होईल.

अरे वा! छान धागा आहे.
सर्व लेखकांचे अभिनंदन!!
भारी वाटले आपल्या माबोचा दिवाळीअंकांमध्ये एवढा मोठा सहभाग आहे हे पाहून.

अरे वा! छान धागा आहे.
सर्व लेखकांचे अभिनंदन!!
भारी वाटले आपल्या माबोचा दिवाळीअंकांमध्ये एवढा मोठा सहभाग आहे हे पाहून.+111111111

राजश्री बर्वे, नवल मधील तुमची कथा वाचली, आवडली.

अ. विनोद, नवल व नवलकथा वेगवेगळे आहेत? नवल मध्ये तुमची कथा दिसली नाही.

नवल मध्ये अश्चिग - आशिष महाबळचीही कथा आहे.

टोटल रिस्पेक्ट! वरच्या यादीतील सर्वांचे अभिनंदन! यावेळेस यातील जमतील तितके वाचायचा प्लॅन आहे. कधीतरी एखाद्या अंका करता लेख वगैरे देताना काय मेहनत घ्यावी लागली होती ते लक्षात असल्याने इतक्या अंकांकरता कथा वगैरे लिहीणार्‍यांच्या प्रयत्नांची कल्पना येते.

मी पण दिवाळी अंक वाचत नाही, पण ईतके सारे माबोकर दिवाळी अंकासाठी लिहीतात हे वाचुन भारी वाटले

सर्व लेखकांचे अभिनंदन

Pages