चटपटीत कमळ काकडी (चिप्स आणि मसाला क. का )

Submitted by मनिम्याऊ on 20 October, 2018 - 07:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कमळ काकडया ४-६
१ लहान कान्दा
हिरव्या मिरच्या - २
आलं-लसूण पेस्ट
टोमॅटो १ (छान पिकलेला) पेस्ट करून
आमचूर पावडर
जिरे १ लहान चमचा
हिंग १ लहान चमचा
हळद १ लहान चमचा
मीठ - चवीनुसार
धणेपूड - १ लहान चमचा
तेल - तळणासाठी
कोथिंबीर - सजावटीसाठी

क्रमवार पाककृती: 

मागे माबो वर लिहिलेल्या कमळफुलाची चटणी या माझ्या पा.कृ. ला मिळालेल्या प्रतिसादांसाठी खूप खूप धन्यवाद.
https://www.maayboli.com/node/67167

तिथेच कबूल केल्याप्रमाणे कमळाच्या पा कृ चा हा दुसरा प्रकार इथे देत आहे. ही रेसिपीसुद्धा मध्यभारतातील 'बालाघाट' या भागाची एक खासियत आहे. बालाघाट हा तलावांचा प्रदेश. वैनगंगा नदीच्या वरच्या खोऱ्यात वसलेला हा प्रदेश प्राचीन दंडकारण्याचा एक भाग होता. भरपूर पाऊस आणि घनदाट जंगले असलेल्या या भागात पूर्वापार प्रामुख्याने देवगढच्या (म. प्र.) गोंड राजांची सत्ता होती तर पूर्व भाग राजगोंड वंशाच्या 'गढा - मण्डला' साम्राज्यात येत असे. कमळाच्या फुलांची भरपूर उपलब्धता असल्याने येथे आदिवासीच्या कुटीपासून ते शाही मुदपाकखान्यापर्यंत सर्वत्र या फुलाला स्थान होते.

तर मुख्य मुद्दा ही पाकृ. करायला एकदम सोप्पी, भरपूर पोषणमूल्ये असलेली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अत्यंत चवदार.

पेश है चटपटीत कमळ काकडी

कमळ काकड्या स्वच्छ धुवून घ्याव्या. या खोल चिखलामधून काढाव्या लागत असल्याने ही स्टेप अतिशय महत्वाची आहे. या साठी आपण रबरी नळी ज्याप्रमाणे नळाला लावतो तश्याच प्रकारे एक एक कमलकाकडी नळाच्या वाहत्या पाण्याखाली धरून साफ करून घ्यावी. आता त्यांच्या सालं काढून पातळ चकत्या करून घ्याव्या.

कढईत तळणासाठी तेल तापवून घ्यावे. ते कडकडीत गरम झाले की चकत्या लालसर रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्याव्या. मीठ - चाट मसाला भुरभुरून घ्या. (गरम गरम मटकावयाला क.का. चिप्स तयार आहेत. )

आता चिप्स उरलेच असतील तर पुढे.

कांदा - मिरची भरड वाटून घ्या. टोमॅटोची पेस्ट करून घ्या.

एका फ्राईन्ग पॅन मध्ये तेल गरम करा. जिरे तडतडलं की आलं-लसूण पेस्ट घालून छान परतून घ्या. आता कांदा मिरचीचे वाटण घालून २ मिनिटे हलवा आणि तय्यार टोमॅटो पेस्ट घाला. यामध्ये हिंग, हळद, मीठ आणि आमचूर पावडर घालून मिश्रणाला तेल सुटेपर्यंत खमंग परतून घ्या.
तेल सुटले कि क.का. चिप्स उर्फ तळलेल्या चकत्या घालून मसाल्यात व्यवस्थित माखून घ्या. आता पॅनमध्ये किंचित पाणी घालून एक वाफ येऊ द्या.

कोथिंबीरीने सजवून गरमागरम भाताबरोबर सर्व्ह करा.

वाढणी/प्रमाण: 
2
अधिक टिपा: 

क.का. चिप्स उपवासाला चालतात.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Use group defaults

कमल काकड्या
lotus-stem2-250x250.jpgIMG_20181003_192202.jpg

क का चिप्स
IMG_20181003_194614.jpg

तयार चटपटीत कमल काकडी
IMG_20181003_200237.jpg

Mast recipe. Kashi dhuvaychi te nit sangitala. Sal kadhaychi ka? Deth kadhaych ka? Mala pahilya photo sarkhi kamal kakdi disali hoti. Tyala bahutek mool pan hota.

बाजारात मिळते. मला hyper city मध्ये मिळाली. सहसा सिंधी लोकं बऱ्यापैकी खातात तर कुठे सिंधी लोकसंख्या असेल तिथल्या भाजीविक्रेता नक्की ठेवेल.

सगळ्यांचे मनापासून आभार .
<<कुठे सिंधी लोकसंख्या असेल तिथल्या भाजीविक्रेता नक्की ठेवेल>> +1
हो. सिन्धि लोक भरपूर खातात क का.

बिग बास्केट वर मिळते कमल काकडी. मी नेहमी बघते पण त्याचं काय करतात माहीत नव्हतं. आता कधीतरी ऑर्डर करून बघते.