मायबोलीचे उत्तम वाचक

Submitted by थॅनोस आपटे on 28 September, 2018 - 06:26

मायबोली पहिल्यासारखी राहिली नाही हे वाक्य निरनिराळ्या प्रकारे, वेगवेगळ्या शब्दात डोळ्यांना ऐकू येऊ लागले आहे. पहिल्यासारखी नाही म्हणजे लेख येत नाहीत असे असावे. खरे तर अनेक जण लिहीत आहेत. खूप जण उत्तम लिहीत आहेत. मात्र त्यांना प्रोत्साहनाची गरज आहे. मायबोलीवर काही वाचक नवोदीतांचे लिखाण मनापासून वाचून त्यांचा उत्साह वाढवताना दिसतात. काही जण तर जवळपास प्रत्येक नव्या धाग्याला हजेरी लावतात. अर्थातच त्यांचा व्याप सांभाळून. काही जणांचे प्रतिसाद तर ज्ञाबवर्धक असतात. लेखकाला उत्तम दिशादर्शन करणारे असतात.

अशा वाचकांची नोंद घ्यावी या हेतूने हा धागा आहे. इथे अशा सकारात्मक व उत्तम वाचकांचा उल्लेख करूयात.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मी मायबोलीचा १२ वर्षांहून अधिक सभासद आहे. पण दर्जेदार गोष्टींपासून मी दूरच राहिलो. मी फक्त टिंगल, टवाळी, चेष्टा मस्करी करायला इथे येतो. नाहीतरी कुठलीहि चर्चा सुरू झाल्यावर लोक वैयक्तिक शेर्‍यांवरच घसरतात, अक्कल काढतात - मग कशाला दर्जा वगैरेच्या गोष्टी करायच्या!

स्वरुप +१

मी आले तेंव्हाच जुनी मायबोली राहिली नव्हती ( हे मी नक्की म्हणेन कारण काही काळाने मी जुन्या मायबोली मधली रत्न खणून काढुन वाचली) आणि आता तर आणखी वाईट झालाय दर्जा.

नंदिनी, कवठीचाफा, विशाल कुलकर्णी, दाद, बेफिकीर,तुमचा अभिषेक, भुंगा, निशदे, बागेश्री, निंबुडा हे लोकं मी आले तेंव्हा सक्रिय होते, त्यांचं लिखाण किती तरी दर्जेदार होतं. मी यायच्या आधी लिहिणारे अनेक आयडी मी आले तेंव्हा लिहायचे बंद झालेले तरी या लिस्ट्मधली लोकं माझी वाचनभुक भागवायचे.

आता यातले सगळेच मायबोलीवर लिहिणं बंद झालेत. अशोक मामांच्या कमेंट्सही वाचण्यासारख्या असायच्या

आता येउन जाऊन ३-४ आयडी आहेत ज्यांचे लिखाण वाचावेसे वाटते बाकी सगळा माझ्या साठी कचरा आहे ( सॉरी टू से)

अरे काय तुम्ही, आमच्या वेळी असं नव्हतं म्हणत रडत बसता.
नवीन लोकांना थोडा वेळ द्या, हळूहळू चांगल लिखाण येईल नक्कीच.

नवीन लोकांना थोडा वेळ द्या, हळूहळू चांगल लिखाण येईल नक्कीच.>>.
ह्या ह्या..
लेंडक टाकताहेत काहीजण, आणि तरी पण दर्जा नाही घसरला असं कसं म्हणायचं..

मंदार जोशी मूळ नावे होता तेव्हा आवर्जून प्रतिसाद देत असे. अनेकांनशी भांडण होऊनही त्याने लिखाणावर कधी आकस धरला नाही. आता असेल तर ज्या कुठल्या आयडीने असेल तो अॅड करा यादीत.

पूर्वी लेखक याद्या बनत त्यातून काही लोक वगळण्यात येत. वाद, इग्नोरास्त्र, वर्तुळ इ. पार्श्वभूमी असे. हे चालतेच.

आनंद,राहुल, आणि मी Proud

नवीन Submitted by mr.pandit on 28 September, 2018 - 16:00 >>> Rofl

मेरिच गिनो, व्हिजे कोण
वाचलं नाही हे नाव यापूर्वी

मंदार जोशी मूळ नावे होता तेव्हा आवर्जून प्रतिसाद देत असे. अनेकांनशी भांडण होऊनही त्याने लिखाणावर कधी आकस धरला नाही. आता असेल तर ज्या कुठल्या आयडीने असेल तो अॅड करा यादीत.
Submitted by किरणुद्दीन on 29 September, 2018 - 07:30
>>
रच्याकने किरणुद्दिन "तुम्ही नवीन आहात ना माबोवर? " Rofl

काही प्रतिसाद वाचून वाईट वाटले. सूचक भाषेत सांगून झाले ते काही लोकांना समजत नाहीये का ?

मागच्या प्रतिसादात जे म्हटले आहे ते रिपीट करत नाही. बाकीच्यांनीही नव्यांना वेळ द्यावा असे म्हटलेले आहे. आता जुने लिहीत नसतील तर काय करायचे ? ज्यांना इतिहासात रमून आता नव्यांना कचरा म्हणायचे आहे त्यांनी त्यांच्या रत्नांचे पाय धरून मायबोलीवर त्यांनी लिहावे म्हणून गयावया करावी म्हणजे त्यांना प्रतिसाद देता येतील. त्यांचे प्रतिसाद अलिकडच्या लिखाणात दिसले तरच या धाग्यावर त्यांचे नाव येईल. अन्यथा नाही. पूर्वी काय होत होते म्हणून गळे काढल्याने अजिबात इथे नाव येण्याची शक्यता नाही. कुणी गळ्यावर तलवार ठेवून प्रतिसाद द्याच अशी सक्तीही नाही केलेली. याउप्पर अशा महानुभावांनी इथे पायधूळ न झाडली तर उत्तम होईल.

मायबोली आत्ता जशी आहे तशा स्थितीत जे वाचक आपला वेळेचा पदरमोड करत आहेत त्यांचे नाव इथे नक्कीच येईल. कदाचित काहींचे चटकन येणार नाही. धाग्याचा उद्देश अजिबात कुणाला वाईट वाटावे असा नाहीये. त्यामुळे ज्यांना जुन्या काळाचे कढ येत आहेत त्यांनी नवा धागा काढावा अथवा असे अनेक धागे आहेत ते उकरून वर काढावे. त्याला अजिबात आक्षेप असणार नाही.

संकेतस्थळांवर अनेक जण हौशी म्हणून लिखाण करतात. ते तुलनेने आवडते. काहींना नाही आवडत. यातले जे उत्तम असतात ते बाहेरच्या जगातही प्रस्थापित होतात. हौशी म्हणून लिहीणारे कालांतराने व्यस्त झाल्याने अथवा बाहेरच्या जगात त्यांचे लिखाण तुलनेने न स्विकारल्याने लिहीण्याचे बंद होतात. प्रत्येकाला मोठा अवकाश हवाच असतो. ते मर्यादीत वर्तुळातून गेल्याने त्यांची जागा नवे भरून काढत असतात. हे चक्र चालूच राहते.

मंदार चोळकर हा ऑर्कुटच्या काळात कवितांच्या लिंक्स द्यायचा म्हणून आम्ही हैराण व्हायचो. सुरूवातीच्या त्याच्या कविता काहीही असत. पण त्याला सूर सापडला आणि तो टिकून राहील्याने तो आज टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीत स्थिरावला आहे. त्याची जागा अनेक दमदार नव्या कवींनी घेतली आहे. हा अनुभव असल्याने नवोदितांना प्रोत्साहन देणे शक्य नसेल तर किमान त्यांचा उपमर्द होऊ नये ही विनंती.

मेरिच गिनो, व्हिजे कोण
वाचलं नाही हे नाव यापूर्वी >> माफ करा व्हीबी. दुरूस्तीबद्दल आभार.

बात निकली ही है ... तर एक नमूद करावसं वाटलं.
कोणत्याही लिखाणावर "नकारात्मक प्रतिक्रीया देताना" आणि "ती घेताना", वैयक्तिक शेरेबाजी टाळली तर चर्चा उपयुक्त ठरते. मुद्द्यांवर बोलले पाहिजे , लिखाणावर मते आली पाहिजेत .. लेखकावर नाहीत !
सद्ध्या इथे वैयक्तीक शेरेबाजी फारशी होताना दिसत नाही. ते उत्तम लक्षण आहे.

अवांतर टाळा. अन्यथा चांगला धागा भरकटेल आणि वाद सुरू होतील.

पशुपत तुमचेही नाव इथे यायला हवे.

पूर्वीच्या - पण अजूनही आठवणीत असलेल्या - माबोकरांन्ना सन्मानाने परत बोलावण्यासाठी (माबोवापसी!) मायबोली 'या चिमण्यांनो....परत फिरा रे...!!' च्या धर्तीवर काही भावनिक आवाहन वगैरे असे काही प्रयत्न करू शकेल का अशी नम्र (विनंयपूर्वक() सूचना केली तर चालेल कां? शेवटी ते आपलेच आहेत, ज्येष्ठ आहेत...!!

यक्ष... तुमचा विचार उत्तम आहे. तो विषयाशी संबंधित आहे कि नाही हे आपण सूज्ञ असल्याने सांगण्याची गरज नसेल.

मुळात दर्जेदार दर्जेदार म्हणजे नक्की काय? प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या असू शकतात. तुम्ही स्टँडरडिझाशन करू शकत नाही. आपल्या इथे नकटी वाटणारी व्यक्ती जपान मध्ये अति सुन्दर वाटू शकते.
नुसतं अलंकारिक भाषेत लिहिले म्हणजे दर्जेदार का.
कशाच्या बेसिस वर नवीन लिखाणाला कचरा म्हटले जातेय?

चाफा, विशाल , कौतुक , बेफि, मामी, केदार, प्रकाश कर्णिक यांच्यासारख्या थरारकथा आता येत नाहीत हे सत्य आहे, मुळात थरारकथाच येत नाहीत.

पण याचा अर्थ असा कुठे आहे की सध्याचे लिखाण म्हणजे कचरा? लेख उत्तम असतात आजही. आणि शशक तर मला खूप आवडतात.

खरे तर अनेक जण लिहीत आहेत. खूप जण उत्तम लिहीत आहेत. मात्र त्यांना प्रोत्साहनाची गरज आहे. >>>

सगळ्यांनी ह्यांची नावे सांगा म्हणजे त्यांना प्रोत्साहन मिळायला मदत होईल.

हर्पेनजी, तुम्हीही असता सगळीकडे. तुमचे नाव राहून गेले होते.
धाग्याचा विषय कोण चांगले वाचक आहे हाच आहे. त्यामुळे इथे कुणाचे नाव लिहीलेले नाही. (कुणाला द्यायचे असेल तर ना नाही).

हर्पेनजी, तुम्हीही असता सगळीकडे. तुमचे नाव राहून गेले होते. सहमत, यांचे प्रतिसाद सुद्धा वाचण्यासारखे असतात.

एक गोष्ट नमूद कराविशी वाटते. एरव्ही मायबोलीवर एकूणात तासभर वेळ दिला जातो. या धाग्याच्या निमित्ताने जरा जास्त वेळ जात आहे. त्यामुळे आवर्जून अथवा सहजगत्या प्रतिसाद देणारे किती वेळ काढत असतील याची जाणीव झाली.
तो उनका हक तो बनता ही है..

अरे देवा माझे नाव यावे म्हणून नव्हते लिहिले आणि

आता 'तुम्हीही असता सगळीकडे' वाचून तर माबोवर घालवायचा वेळ कमी करायला हवा की काय असे वाटून गेले Happy

दर्जा हा कालातीत असतो

कालानुरुप लिहावेच पण फक्त कालानुरूप आहे म्हणून सुमार लेखनाने वाहवा ची अपेक्षा ठेवू नये

चुकत चुकत शिकणारे, प्रगल्भ होत जाणारे आणि हट्टाने सुमार रतीब टाकत रहाणारे यातला फरक ओळखता येणे हा खरतर चांगल्या वाचकाचा निकष असायला हवा!

बाकी अलंकारिक म्हणजे चांगले, दर्जेदार असा निदान माझा तरी समज नाहीये.... मी माझ्या प्रतिक्रियेत उल्लेख केलेले लेखक उलट खुप सहज सोप्पे तरीही चटकन भावणारे, गुंतवणारे लिखाण करायचे
वरची नावे ही चटकन आठवलेली आहेत (खरतर नीट आठवून लिहायला बसलो तर यादी खुप मोठी आहे... पण असो तो या धाग्याचा विषय नाही!)

चांगल वाचक असतील ते असतील पण आपण चांगले धागालेखक/धागाकर्ता आहोत की नाही हे एकदा स्वताशीच पडताळून पाहावे.
विरोधी विचारांच्या प्रतिसादकांना "तुम्ही इथे पायधूळ नाही झाडली तरी चालेल" वगैरे म्हणणे म्हणजे चर्चेची/वादसवांदाची दारे बंद करुन घेण्यासारखेच आहे
मी म्हणेल ती पूर्वदिशा असा आवेश उपयोगाचा नाही

असो!
दर्जेदार लेखकांना आणि चोखंदळ वाचकांना शुभेच्छा!!!

धाग्याचा विषय, विरोधी विचार आणि उपमर्द यातला फरक ओळखता आला तरी आपण सुजाण वाचक आणि प्रतिसादक होऊ शकतो... तसेही ओढून घ्यायची आवश्यकता नव्हती. आपल्याला स्वतःला आपले प्रतिसाद धाग्याच्या विषयाला धरून आहेत याची खात्री पटली की बस्स. बाकी आपली मर्जी.

( हा धागा चर्चेसाठी उघडलेला आहे या नवीन माहितीबद्दल आपले शतशः आभार)

विरोधी विचारांच्या प्रतिसादकांना "तुम्ही इथे पायधूळ नाही झाडली तरी चालेल" वगैरे म्हणणे म्हणजे चर्चेची/वादसवांदाची दारे बंद करुन घेण्यासारखेच आहे
मी म्हणेल ती पूर्वदिशा असा आवेश उपयोगाचा नाही
>>> एकदम बरोबर. बऱ्याचवेळा लेखक/लेखिके ऐवजी इतर सदस्यच अशा टिपणी करताना दिसतात.

मानव पृथ्वीकर, अकारण टिप्पणी आहे असे वाटत असल्यास आणि धाग्याच्या विषयात कुणालाच रस नसल्यास मी धाग्याचा विषय बदलून मुक्त चर्चा असा करू इच्छितो. आपले काय मत आहे याबाबत ?
जे लोक विनाकारण वाद निर्माण करू पाहताहेत त्यांना या धाग्यात नेमके काय खटकले ? सुमार लिखाणाला प्रतिसाद द्या असे आवाहन कुठे आढळले हे कुणीतरी सांगून उपकृत करावे. धाग्याचा विषय न वाचता मागच्या प्रतिसादावरून पुढे वाहवत जायचे आणि धागा भकटवायला मदत करायची यामुळे काय साध्य होणार आहे ? इथे लेखकांबद्दल चर्चा कुणी आरंभली ? नवे सगळेच कचरा आहेत हे विधान योग्य आहे का ?

असा विचार ज्यांना अनावश्यक वाटतो अशा महानुभवांनी पायधूळ न झाडणे इष्ट यात चुकीचे काय ? आणि हा धागा चर्चेसाठी उघडलाय अशीच सर्वांची समजूत असेल तर चालू द्या तुमचे.

मेरिच गिनो: "विरोधी विचारांच्या प्रतिसादकांना "तुम्ही इथे पायधूळ नाही झाडली तरी चालेल" वगैरे म्हणणे"
याचा रोख आधी मला कळला नाही. हे लेख, कथा वगैरे धाग्यात वेळोवेळी दिसून येणाऱ्या अशा कॉमेंट्सबद्दल आहे हे वाटले, आणि त्यामुळे वाचकांचाही हिरमोड होतो असे माझे मत, त्यानुसार मी ती प्रतिक्रिया दिली.

आता लक्षात आले की ते तुमच्या इथल्याच पोस्ट संदर्भात असावे. तुम्ही त्या पोस्ट मध्ये ज्या संदर्भात लिहीलंय ते मलातरी खटकले नाही.

Pages