मायबोलीचे उत्तम वाचक

Submitted by थॅनोस आपटे on 28 September, 2018 - 06:26

मायबोली पहिल्यासारखी राहिली नाही हे वाक्य निरनिराळ्या प्रकारे, वेगवेगळ्या शब्दात डोळ्यांना ऐकू येऊ लागले आहे. पहिल्यासारखी नाही म्हणजे लेख येत नाहीत असे असावे. खरे तर अनेक जण लिहीत आहेत. खूप जण उत्तम लिहीत आहेत. मात्र त्यांना प्रोत्साहनाची गरज आहे. मायबोलीवर काही वाचक नवोदीतांचे लिखाण मनापासून वाचून त्यांचा उत्साह वाढवताना दिसतात. काही जण तर जवळपास प्रत्येक नव्या धाग्याला हजेरी लावतात. अर्थातच त्यांचा व्याप सांभाळून. काही जणांचे प्रतिसाद तर ज्ञाबवर्धक असतात. लेखकाला उत्तम दिशादर्शन करणारे असतात.

अशा वाचकांची नोंद घ्यावी या हेतूने हा धागा आहे. इथे अशा सकारात्मक व उत्तम वाचकांचा उल्लेख करूयात.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हायझेनबर्ग Lol Lol

लवकर बरे व्हा म्हणजे 'जे चालू आहे ते खरे आहे की तापातले हल्युसिनेशन' हे नक्की काय ते कळेल.

मुंगेरीलाल, चिमण, धुंद रवी आता इथे लिहीत नाहीत याचं थोडं वाईट वाटतंच.पण त्यांना अजून चांगले प्लॅटफॉर्म मिळाले आहेत/असतील. त्यामुळे गुड फॉर देम. +१११११

मी खुप लेख वाचायचे आधी , काही लेखक खुप छान लिहायचे, पण आता वेळ मिळत नाही.

>> मुंगेरीलाल, चिमण, धुंद रवी आता इथे लिहीत नाहीत याचं थोडं वाईट वाटतंच. पण त्यांना अजून चांगले प्लॅटफॉर्म मिळाले आहेत/असतील.
माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी मधे वेळेअभावी फारसा लिहीत नाही. त्यामुळेच मी इतर कुठल्याही प्लॅटफॉर्म वर लिहीलं नाही. तरी वेळ मिळाला की अधून मधून लिहीतो. असो. माझी अजून आठवण आहे यामुळे खूप छान वाटलं. Happy

बाकी माझ्या लेखांवर नियमित प्रतिसाद देणारे आहेत पण मी त्यांची नावं सांगत नाही कारण एखाद्याचं नाव विसरायची भीति आहे. Happy

Pages