मायबोलीचे उत्तम वाचक

Submitted by थॅनोस आपटे on 28 September, 2018 - 06:26

मायबोली पहिल्यासारखी राहिली नाही हे वाक्य निरनिराळ्या प्रकारे, वेगवेगळ्या शब्दात डोळ्यांना ऐकू येऊ लागले आहे. पहिल्यासारखी नाही म्हणजे लेख येत नाहीत असे असावे. खरे तर अनेक जण लिहीत आहेत. खूप जण उत्तम लिहीत आहेत. मात्र त्यांना प्रोत्साहनाची गरज आहे. मायबोलीवर काही वाचक नवोदीतांचे लिखाण मनापासून वाचून त्यांचा उत्साह वाढवताना दिसतात. काही जण तर जवळपास प्रत्येक नव्या धाग्याला हजेरी लावतात. अर्थातच त्यांचा व्याप सांभाळून. काही जणांचे प्रतिसाद तर ज्ञाबवर्धक असतात. लेखकाला उत्तम दिशादर्शन करणारे असतात.

अशा वाचकांची नोंद घ्यावी या हेतूने हा धागा आहे. इथे अशा सकारात्मक व उत्तम वाचकांचा उल्लेख करूयात.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

अरेच्चा!..... हा धागा विरंगुळा मध्ये उघडलाय होय..... मग बरोबर आहे!
चर्चा वगैरे काही इथे अपेक्षित नसणारच!
बाय द वे.... ते दूरदर्शन आणि ब्लॉकबस्टर सिनेमे वगैरे टिप्पणी अगदीच धाग्याच्या विषयाला धरुन आहे नाही!

स्वरूप मी माझा पासवर्ड तुम्हाला देतो. तुम्हाला हवे ते बदल करा आणि महत्वाचे म्हणजे तुमचे अगदी सुसंबद्ध प्रतिसाद असेच चालू ठेवा. तुमचे संपले की सांगा. हवे तर आम्ही दुसरा धागा उघडतो.

मी गेली 12 वर्षे मायबोलीवर नियमित येतेय. दर्जा घसरलाय वगैरे गळा कितीही काढावासा वाटला तरी त्यात काही अर्थ नाही. कारण दर्जा अजीबात घसरलेला नाही.

चांगलं लिहिणारे आजही आहेत, मी मुद्दाम नावे घेत नाहीय कारण कुणा एकाचे अनवधानाने राहिले तर मलाच वाईट वाटेल.

मायबोलीचा जुना फॉरमॅट खूप वेगळा होता. त्यात टाईम्पासाचा कप्पा वेगळा होता, स्वानुभवांचा कप्पा वेगळा होता, साहित्याचा वेगळा व फोटोंचा वेगळा. ज्याला जे वाटेल त्याने तो कप्पा उघडून आनंद लुटत बसावे.

आता हे कप्पा प्रकरण जवळजवळ बंदच झाले. जरी ग्रुप असले तरी ग्रुपमध्ये सार्वजनिक धागा काढला की तो जवळपास बहुतेकांना दिसतो. त्यामुळे जवळपास 60-70 टक्के मायबोली आपल्याला येताच दृष्टीला पडते. गप्पांच्या व टाईमपास धाग्यांवर वाहतूक जास्त असल्यामुळे ते धागे सतत वर राहतात. त्या तुलनेत ललित व इतर साहित्यविषयक धागे मागे पडतात. मग लोकांना वाटते इथे टाइमपासच चालतो. दर्जा ढासळलाय.

मागे पडलेल्या धाग्यांवर प्रतिसाद कमी येतात, कित्येकदा चांगल्या धाग्यावर प्रतिसाद म्हणून 'वा वा छान' याशिवाय जास्त काही लिहिण्याजोगे नसते. मुळात ती कलाकृती खूप सुरेख असते, न्यून काढण्यासारखे काही नसते, आपले जोडण्यासारखे काही नसते. त्यामुळे लोक वाचतात पण प्रतिसाद द्यायचा कंटाळा करतात. काही लेखक यामुळे नाउमेद होतात. प्रतिसाद कमी म्हणजे वाचक कमी असा ते अर्थ लावतात. पुढे लिहायचे टाळतात. यावर काहीतरी उपाय शोधायला हवा ज्याणेकरून नव्यांची उमेद कायम राहील.

अरेरे किती तो त्रागा!

कळा सोसत नाहीत तर आधी कळ काढू नये!
माझी पहिली प्रतिक्रिया खुप सयंत आणि सुसंगत होती पण मग तुमची तडतड बघून रहावले नाही!

असो!
तुमचे चालू दे!

साधनाजी, नेमके शब्द दिलेत तुम्ही. आभार यासाठी.
कुठल्याही धाग्यावर थोडी गंमत, थोडे अवांतर कुणी फाऊल धरणार नाही. पण मूळ धाग्यात नसलेला विषय चर्चेला घेऊन त्यावर हिरीरीने वाद घालणा-यांना कुठल्याही संकेतस्थळावर चांगले काहीच दिसणार नाही.

मला वाटते आता सर्वांनी मूळ विषयाकडे वळावे.

अनेक जण लक्षात आले. त्यांची नावे थोड्या वेळाने नव्या प्रतिसादात लिहीतो.

स्वरुप मला वाटते सुरूवात तुम्ही केली असा माझा समज आहे. प्रतिसाद स्वतःवर ओढवून तुम्ही घेतले आहेत, अन्य कुणी नाही. स्वतःची चूक कबूल करण्याऐवजी तुम्ही आरोप करत सुटला आहात. त्यासाठी चांगल्या धाग्याचे भजं झालं तरी चालेल असा तुमचा खाक्या आहे हे दिसून आले आहे. तुम्हीच संबीत पात्रा या नावाने टीव्हीवर जात असाल असे हा शेवटचा प्रतिसाद वाचून वाटले. हे जे चालू आहे त्याला त्रागा असे न म्हणता आपण बावळटात निघालो त्याबद्दलचा कांगावा म्हणावे लागेल. यावर देखील तुमचा थयथयाटी प्रतिसाद येईलच. पण अर्थातच तुम्हाला मोकळीक आहेच. फक्त झाले कि कळवा. तोपर्यंत आम्ही वाट पाहू.

चांगल्या धागा? हा?
भजे? कुणी केले? भाषा बघा एकदा स्वताची?
बाकी बावळटात निघाले/कांगावा वगैरे हाच टिपीकल त्रागा आहे!

शुभेच्छा!

छान धागा आहे. जे मांडायचे आहे ते स्पष्ट आणि मोजक्या शब्दात मांडले आहे. धागाकर्त्यातर्फे पुढाकार घेत चर्चाही घडवली जात आहे हे उल्लेखनीय. प्रतिसाद एकापेक्षा एक सरस आहेत. कुठेही चर्चेचा तोल ढलत नाहीये याबद्दल सर्वांचेच अभिनंदन. आणि पुलेशु !

- कु ऋ,
एक चांगला वाचक / प्रतिसादक

मी मायबोलीचा १२ वर्षांहून अधिक सभासद आहे. पण दर्जेदार गोष्टींपासून मी दूरच राहिलो
वाट्टेल त्या थापा मारू नका , तुम्हाला माबो वर येउन फक्त २ वर्शे आणि काही महिने झाले आहेत. म्हणे १२ वर्षे...

बरोबर. २ वर्षे नि १३० महिने.
तुमच्या सारखे दर्जेदार लिखाण करणारे लोक अजून इथे येतात! नाव बदलून का होईना. तसेच बर्‍याच जणांचे.
त्याचे काय आहे, कधी कधी एखादा आयडी बदनाम होतो. मग आय डी बदलून परत तेच लोक परत तसेच लिहितात. दर्जा कमी जास्त होण्याचा प्रश्नच कुठे? कारण जो काय दर्जा असेल तो वैयक्तिक शिव्यागाळीत हरवून जातो.

दत्तात्रय साळुंकेंचे लिखाण छान आहे. त्यावर अनेकांनी हजेरी लावलेली आहे. सायलीची कथाही आश्वासक आहे.
देतात कि प्रतिसाद लोक.. !

त्यांची नावे इथे येऊ द्यात.

उत्तम वाचक म्हणजे काय अशी विचारणा झालेली आहे. त्याबद्दलचे उत्तर हे पण अवांतर गणले जाईल. हा दोष पत्करून प्रतिसाद देण्याचा मोह आवरला नाही. आक्षेप असेल तर चार तासाच्या आत कळवावा. म्हणजे संपादीत करायला शक्य होईल.

उत्तम वाचक अशी एकच एक व्याख्या बनवणे अवघड आहे. प्रत्येकाचे निकष वेगळे असतील.
माझ्या मावशीचे सासरे अत्यंत विद्वान होते. त्यांच्या घरात दोन मोठ्या खोल्या भरून लायब्ररी होती. त्यांचे जे निकष होते ते माझ्या डोक्यावरून जात. कारण त्यांचे वाचन आपल्यासारखे नव्हते. संदर्भग्रंथ, माहितीपूर्ण, इतिहास, सामाजिक शास्त्रे पासून ते बोजड विषय त्यांच्या आवडीचे होते. फिक्शन अथवा करमणूक प्रकार ते बाहेरच्या वाचनालयातून आणून वाचत. ते विकत घेत नसत. त्यासाठी त्यांच्या वाचनालयात जागा नव्हती.

त्यांच्या मते वाचनानंतर नोट्स काढणे, त्या नोट्सची संदर्भसूची ठेवणे ही वाचनाची शिस्त होय. आपण काय वाचले त्याचे संदर्भ त्यामुळे च्टकन मिळतात (हे मला कधीही जमले नाही. कंटाळा). अशा संदर्भांच्या वह्यांना त्यांनी मोठ मोठे क्रमांक दिले होते. त्या वह्या रॅक मधे असत. अजून एका रजिस्टर मधे पुस्तके, नोंदवह्या यांचे रॅक क्रमांक, ओळ असे लिहीलेले असे. नोंदवहीच्या अनुक्रमणिकेत सुद्धा टिपणांचा क्रम नोंदवलेला असे. ही झाली त्यांची व्याख्या...

काल्पनिका किंवा आत्मकथने, कविता यांच्या बाबतीत वेगळ्या व्याख्या येतील.
कदाचित व्यवस्थित रसग्रहण करणारा उत्तम वाचक असू शकेल.

आपली आवड विकसित करू शकणारा हा सुद्धा कुणाच्या मते उत्तम वाचक असू शकेल. उदा. कॉन्स्परसी, गूढ, रहस्य, भय असे प्रकार आवडणारा मोठा वाचकवर्ग असतो. फिक्शन मधे या प्रकारात मोठ्या प्रमाणावर साहीत्य उपलब्ध असते. पण एखादी आत्मकथा आवडीने वाचण्यासाठी संयम ठेवणे, तिच्यातले सौंदर्य हेरणे हे सुद्धा चांगल्या वाचकाचे लक्षण आहे असे कुणी म्हणेल.

वेगवान कथानके वाचण्याची आवड असणा-याने एखाद्या संथ लयीतल्या जीवनाचे चित्रण त्याच लयीत असणारी कादंबरी आवडीने वाचावी , तशी आवड विकसित करावी हे सुद्धा उत्तम वाचकाचे लक्षण असेल.

परखड मत नोंदवणे हे एखाद्याच्या मते उत्तम वाचकाचे लक्षण असेल. तर सांभाळून घेऊन, चुका माफ करून प्रोत्साहन देणे हे ही असू शकेल.
मात्र मी जे वाचतो तेच चांगले असा अहं असणे हे उत्तम वाचकाचे लक्षण नाही यावर एकमत व्हायला हरकत नसेल.

रच्याकने किरणुद्दिन "तुम्ही नवीन आहात ना माबोवर? " Rofl

Submitted by पाथफाईंडर on 28 September, 2018 - 22:20 >>>> हा सुटला प्रतिसाद नजरेतून. विपू पाहिलेली दिसतेय तुम्ही Lol
खरंच मी नवीन आहे. फक्त गेल्या महीन्याच्या आधीचं काही आठवत नाही. २०१२ पर्यंतचं आठवतंय मात्र.

मायबोलीवर सध्या उत्तम वाचक एकच!
हायझेनबर्ग!!

(हलकेच घ्या ओ Lol खवचट मार्गाने पण काहीतरी मुद्द्याचे सांगू इच्छिताय हे लक्षात आले आहे. पण तो मुद्दा नक्की काय आहे याबद्दल खात्री नाही.)

मला तर आता खात्रीच वाटायला लागली आहे कि हायझेनबर्ग यांचा आय्डी हॅक/हायजॅक झाला असावा किंवा या थॅंक्सगिविंग वीकेंडला ते दलाई लामा यांना भेटुन आलेले आहेत... Proud Light 1

Lol राज, अ‍ॅमी.
दलाई लामांना भेटलो नाही (खरं तर त्यांना आयुष्यात एकदा भेटण्याची खूप ईच्छा आहे... पण आपल्या पुण्याचा घडा अजून एक अष्टमांशही भरला नाही) पण फ्ल्यू वायरस माझ्या भेटीला नक्की आले. मलाही कळत नाहीये जे चालू आहे ते खरे आहे की तापातले हल्युसिनेशन. पण जे काही आहे ते चांगले आहे असे मला वाटते. असे प्रतिसाद दिल्याने प्रसन्न वाटते. तेव्हा कोणीही 'मला लवकर बरे वाटावे' म्हणून प्रार्थना करण्याच्या फंदात पडू नका Proud

खवचट मार्गाने पण काहीतरी मुद्द्याचे सांगू इच्छिताय हे लक्षात आले आहे. पण तो मुद्दा नक्की काय आहे याबद्दल खात्री नाही. >> अरेरे Sad खूप वाईट वाटले तुम्हाला माझे प्रतिसाद खवचट वाटले हे वाटून. पण खरं सांगू का मी एकेक शब्द तोलून मापून, संयत, कोणालाही न दुखावणारा, पॉझिटिव एनर्जी पास ऑन करणारा असा लिहिण्याचा परोपरीने प्रामाणिक प्रयत्न केला. तरीही तुम्हाला असे वाटले असेल तर मनापासून माफी मागतो. मीच लिहितांना कुठेतरी कमी पडत असेन पुढच्या वेळी अजून काळजी घेईन.

हायझेनबर्ग, लोकं एखाद्याबद्दल काही वाईट ऐकू आले तर चटकन विश्वास ठेवतात पण एखाद्याच्या चांगल्या कृत्यांवर चटकन विश्वास बसणे अवघड जाते. हे हुमायुन नेचरच आहे. त्यामुळे कोणाला पटवून देण्याच्या भानगडीत न पडता पॉजिटीव्ह एनर्जी पसरवत राहा Happy

Pages