रंगीबेरंगी पौष्टिक सलाड - पनीर टिक्का -झटका सलाड - स्वप्नाली

Submitted by स्वप्नाली on 22 September, 2018 - 23:55

खर तर ही रेसेपी हळू-हळू निर्माण होत गेली आज. औफीसात काल सायेबाने काल त्यांच्या बागेतल्या वेग वेगळ्या टाईपच्या मिरच्या आणून दिल्या. बाहेर मस्त रिमझीम चालू पाहून मिरची-भजी करायचा विचार होता खरेतर पण आमचे धनी सध्या डाएट आहे. त्यामूळे ह्या रेसेपीचा जम्न झाला आज. असो:

साहीत्य:
अ. पनीर टीक्का :
1. पनीर चे चौकोनी तुकडे (कीती ही घ्या , उरलेले टीक्के नुसतेच खा नंतर)
2. ग्रीक योगर्ट / घट्ट दही - 2 ते 3 चमचे
3. कसूरी मेथी - 1/2 चमचा चूरून
4. मीठ - चवी प्रमाणे
5. लाल तिखट - चवी प्रमाणे
6. लिम्बू रस - 1/2 चमचा
7. बेसन पीठ - 2 चमचे
--------------------------------------------------------
ब. ड्रेसींग
1. केन पेपर - 1 मोठी (नसेल तर कोणतीही तिखट मिरची चालेल, केन जास्त छान लागते )
2. मध - 1.5 चमचा
3. मीठ - चवी प्रमाणे
4. भाजलेल्या दाण्याचा कूट - 2 चमचे
5. लिम्बू रस - 1/2 चमचा
6. ओलीव्ह ओइल - 1 चमचा
--------------------------------------------------------
क. सलाड साठी
1. लेटस ची पाने चौंकोनी चिरून
2. 1 मोठे गाजर किसून
3. 7-8 बदाम (रोस्टेड + सॉल्टी असतील तर उत्तम)
4. पिवळे वाटाणे भीजाऊं उकडलेले - 2 चमचे
5. स्ट्रौबेरी चौंकोनी चिरून - 3 ते 4
6. ग्रीन बीन्स - 4-5 ( तव्यावर थोडेसे ओ.ओ. टाकून, त्यात किसलेले आले आणि बीन्स परतून - स्टर फ्राय सारखे)
--------------------------------------------------------
केन पेपरः
cp.jpg

क्रूती:
1. दहयात कसूरी मेथी, बेसन, मीठ, लाल तिखट, लिम्बू रस, मिक्स करून पनीर चे तूकडे टाका. चांगले हलवून झाकून ठेवा.
Tikka.JPG

2. ड्रेसींग साहीत्य मिक्सर मध्ये टाकून फिरवून घ्या.
Dressing.JPG

3. सलाड चे साहीत्य चिरून, किसून घ्या

4. त व्यावर / पनीनी मेकर .गरम करून त्यावर थोड़े से तेल टाकून पनीर चे तूकडे ग्रील करून घ्या
BeforeGrill.JPGAfterGrill.JPG

आता पनीर टीक्के हाल्फ चिरून, सलाड चे साहित्य, ड्रेसींग, पिवळे वाटाणे, बीन्स सगळे एकत्र करा. मीठ चवीप्रमाने टाका.
Salad.JPG

ड्रेसींग चटकदार होते. पनीर टीक्क्यन्मुळे मस्त चव येते.

सगळे मिक्स केलेला फोटो काढायचा राहून गेला..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच सलाड !

हे ललितलेखन मध्ये आलयं. स्पर्धेसाठी असेल तर
मायबोली गणेशोत्सवच्या ग्रुप मध्ये धागा काढा.

मस्तच लागेल. मला आवडले. फायनल फोटो पाहिजे होता.
(झटका वाचून मला हलाल-झटका मधले झटका वाटले. धागा उघडल्यावर लक्षात आले हा तर मिरचीचा झटका आहे. Lol )

मस्त दिसतंय. किसलेलं गाजर नसतं तर बरं झालं असतं असं वाटलं. त्या ऐवजी कलर्ड बेल पेपर्स चालले असते.