परी व्हायचंय मला

Submitted by किल्ली on 21 August, 2018 - 09:16

असे कसे हे शोषित पारतंत्र्यातील जगणे
बंधनाच्या कोंदट कारागृहात मनाला जखडून ठेवणे |
व्यक्त होऊ पाहणाऱ्या जाणिवांना थांबवणे
भावनांना आतल्या आत दाबून टाकत कुढत राहणे ||

सगळे साखळदंड तोडून टाकणार मी
कारागृहाच्या चौकटी फोडून टाकणार मी |
वायुप्रमाणे संचार करणार मी
अनंत ब्रह्मांडे पालथी घालणार मी ||

स्वातंत्र्याचे पंख लेवून स्वछंदपणे विहरायचंय
ह्या कोंडलेल्या श्वासांना मुक्त करायचंय |
स्पंदनांच्या जाणिवांना व्यक्त करायचंय
पिंजरा तोडून भरभरून जगायचंय||

नाजूक नकोत, मजबूत पंख हवेत मला
उत्तुंग भरारीसाठी स्वतःचं आकाश हवंय मला |
पारतंत्र्यात त्रस्त जीवांना सोडवायचंय मला
हो, ह्यासाठीच परी व्हायचंय मला ||

------------------------------------------------------------------------------------------------------
मला कविता करता येत नाहीत, क्लिष्ट असतील तर समजतही नाहीत.
एके दिवशी सहजच शब्दांची जुळवाजुळव केली आणि वरती जे लिहिलंय ते तयार झालं.
(मग छंद, अलंकार वगैरे तांत्रिक गोष्टी तर सोडूनच द्या! )
इथे टाकू की नको ह्या संभ्रमावस्थेत बरेच दिवस पडून होती,आज पोस्टण्याची हिम्मत केली.

ह्या कवितेची पार्श्वभूमी सांगते, म्हणजे हा काय प्रकार आहे हे स्पष्ट होईल.
झालं असं की, १४ ऑगस्टला हिंजवडी-वाकड भागामध्ये भयानक ट्रॅफिक जॅम झाला होता (असंही तो कधी नसतो म्हणा Proud ), बस पुढे सरकतंच नव्हती , २२ किलोमीटर (हापिसातून) घरी जायला ३ तास लागले, त्या प्रवासात सुचलंय हे !!
थोडक्यात frustration बाहेर निघालंय, बाकी काही नाही.

माबोवरच पहिलं काव्यपुष्प माबोला अर्पण!
--------------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
---------------------------------------------------------------------------------------------------------

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान आहे ! Happy
तिकडच्या पंखांचं मुळ येथेय तर.. Lol
पुढील काव्यपुष्पासाठी शुभेच्छा !

धन्स डिम्पल , आनंद. Happy
तिकडच्या पंखांचं मुळ येथेय तर>>> हो रे.. शत प्रतिशत

परी होऊन साखळदंड तोडून टाकणार कारागृहाच्या चौकटी फोडून टाकणार अशा तोडफोडीच्या गोष्टी आजवरच्या ऐकलेल्या परीकथांपेक्षा विपरित वाटल्या.
परी नाजुक असते. (म्हणजे मी पाहिलेली नाही अजुन) असं ऐकलेल्या कथांमधुन कळलंय.
बाकी कवितेची पार्श्वभूमी वाचुन परी होऊन उडुन जाता आलं असतं हे पटलं Happy

परी नाजुक असते. (म्हणजे मी पाहिलेली नाही अजुन) असं ऐकलेल्या कथांमधुन कळलंय>>>>>> आता जग, परीच्या जाणिवा, गरजा, जीवन हे सगळ बदलल असल्यामुळॅ तिला पारम्पारिक चोकटीच्या बाहेर पडायच आहे..
सुपर परी Happy
नाजूक नकोत, मजबूत पंख हवेत मला>>>

बाकी कवितेची पार्श्वभूमी वाचुन परी होऊन उडुन जाता आलं असतं हे पटलं>>> Proud Proud

छान