असे कसे हे शोषित पारतंत्र्यातील जगणे
बंधनाच्या कोंदट कारागृहात मनाला जखडून ठेवणे |
व्यक्त होऊ पाहणाऱ्या जाणिवांना थांबवणे
भावनांना आतल्या आत दाबून टाकत कुढत राहणे ||
सगळे साखळदंड तोडून टाकणार मी
कारागृहाच्या चौकटी फोडून टाकणार मी |
वायुप्रमाणे संचार करणार मी
अनंत ब्रह्मांडे पालथी घालणार मी ||
स्वातंत्र्याचे पंख लेवून स्वछंदपणे विहरायचंय
ह्या कोंडलेल्या श्वासांना मुक्त करायचंय |
स्पंदनांच्या जाणिवांना व्यक्त करायचंय
पिंजरा तोडून भरभरून जगायचंय||
नाजूक नकोत, मजबूत पंख हवेत मला
उत्तुंग भरारीसाठी स्वतःचं आकाश हवंय मला |
पारतंत्र्यात त्रस्त जीवांना सोडवायचंय मला
हो, ह्यासाठीच परी व्हायचंय मला ||
------------------------------------------------------------------------------------------------------
मला कविता करता येत नाहीत, क्लिष्ट असतील तर समजतही नाहीत.
एके दिवशी सहजच शब्दांची जुळवाजुळव केली आणि वरती जे लिहिलंय ते तयार झालं.
(मग छंद, अलंकार वगैरे तांत्रिक गोष्टी तर सोडूनच द्या! )
इथे टाकू की नको ह्या संभ्रमावस्थेत बरेच दिवस पडून होती,आज पोस्टण्याची हिम्मत केली.
ह्या कवितेची पार्श्वभूमी सांगते, म्हणजे हा काय प्रकार आहे हे स्पष्ट होईल.
झालं असं की, १४ ऑगस्टला हिंजवडी-वाकड भागामध्ये भयानक ट्रॅफिक जॅम झाला होता (असंही तो कधी नसतो म्हणा ), बस पुढे सरकतंच नव्हती , २२ किलोमीटर (हापिसातून) घरी जायला ३ तास लागले, त्या प्रवासात सुचलंय हे !!
थोडक्यात frustration बाहेर निघालंय, बाकी काही नाही.
माबोवरच पहिलं काव्यपुष्प माबोला अर्पण!
--------------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
---------------------------------------------------------------------------------------------------------
छान लिहिलंय किल्लीतै! अगदी
छान लिहिलंय किल्लीतै! अगदी सुरेख! खूप आवडलं हे काव्यपुष्प!
मस्त आहे काव्यपुष्प किल्लुताई
मस्त आहे काव्यपुष्प किल्लुताई
धन्स द्वादशांगुला, आदीसिद्धी
धन्स द्वादशांगुला, आदीसिद्धी
मस्तच ग ताई...
मस्तच ग ताई...
छानच आहे!
छानच आहे!
वा! मस्तंच गं किल्ली ताई
वा! मस्तंच गं किल्ली ताई
धन्स पवनपरी11, शाली , मेघा
धन्स पवनपरी11, शाली , मेघा.
भावना पोचल्या
भावना पोचल्या
चांगला प्रयत्न!
छान आहे !
छान आहे !
तिकडच्या पंखांचं मुळ येथेय तर..
पुढील काव्यपुष्पासाठी शुभेच्छा !
धन्स डिम्पल , आनंद.
धन्स डिम्पल , आनंद.
तिकडच्या पंखांचं मुळ येथेय तर>>> हो रे.. शत प्रतिशत
परी होऊन साखळदंड तोडून टाकणार
परी होऊन साखळदंड तोडून टाकणार कारागृहाच्या चौकटी फोडून टाकणार अशा तोडफोडीच्या गोष्टी आजवरच्या ऐकलेल्या परीकथांपेक्षा विपरित वाटल्या.
परी नाजुक असते. (म्हणजे मी पाहिलेली नाही अजुन) असं ऐकलेल्या कथांमधुन कळलंय.
बाकी कवितेची पार्श्वभूमी वाचुन परी होऊन उडुन जाता आलं असतं हे पटलं
छान आहे
छान आहे
परी नाजुक असते. (म्हणजे मी
परी नाजुक असते. (म्हणजे मी पाहिलेली नाही अजुन) असं ऐकलेल्या कथांमधुन कळलंय>>>>>> आता जग, परीच्या जाणिवा, गरजा, जीवन हे सगळ बदलल असल्यामुळॅ तिला पारम्पारिक चोकटीच्या बाहेर पडायच आहे..
सुपर परी
नाजूक नकोत, मजबूत पंख हवेत मला>>>
बाकी कवितेची पार्श्वभूमी वाचुन परी होऊन उडुन जाता आलं असतं हे पटलं>>>
धन्स सस्मित, अक्षय
धन्स सस्मित, अक्षय
छान कविता परी!
छान कविता परी!
धन्स पद्म
धन्स पद्म
मस्त
मस्त
व्वा , मस्तच !!!
व्वा , मस्तच !!!
धन्स प्रकाशपुत्र,कल्पमुख
धन्स प्रकाशपुत्र,कल्पमुख
छान
छान
धन्स अंबज्ञ
धन्स अंबज्ञ