अन्नदाता (शतशब्दकथा)

Submitted by किल्ली on 28 August, 2018 - 02:35

तो भुकेने व्याकुळ झाला होता. कितीतरी वेळापासून त्याच्या पोटात अन्नाचा कण गेला नव्हता. भुकेल्या अवस्थेत रस्त्यावरून जात असताना खमंग वास नाकात शिरला. तेथे एक देवमाणूस गोरगरिबांना खायला देत होता. पण नशीब कसे परीक्षा घेते पहा ना, त्या अन्नदात्याजवळ त्याच्यासारख्याच क्षुधार्थ्यान्ची गर्दी होती. गर्दीतून त्याला फक्त भांड्यांचा, चमच्यांचा खणखणाट ऐकू येत होता. खाणे वाढून घेण्यासाठी वाटली जाणारी कटोरी घेण्यासाठी सुद्धा रांग होती. वाऱ्याच्या झुळकेसरशी येणाऱ्या खमंग वासाने त्याची भूक अजूनच चाळवली जात होती. तोंडाला पाणी सुटले होते. एवढा वेळ वाट पाहण्याची तपश्चर्या फळाला आली. त्याला कटोरी मिळाली. प्रेमळ नजरेने पाहत अन्नदात्याने त्याला विचारले,
“मेडीयम?"
"सिर्फ तिखा बनाओ, प्याज और सेव अलगसे"
------------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
--------------------------------------------------------------------------------------------------------
तळटीप: कटोरी ह्या शब्दाला मराठी प्रतिशब्द द्रोण/वाटी असा वापरता आला असता हे मान्य! पण ज्याप्रमाणे तिखट पदार्थांत चिमूटभर साखर घातल्याने त्याची चव खुलते त्याप्रमाणे मराठी कथेत हिंदी शब्द इफेक्टसाठी वापरला तर चालतो Proud
(उपमेचा संदर्भ: माबो पाकृचे धागे आणि प्रतिसाद, Light 1 )
--------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहलय.
पाणीपुरी बद्दल लिहलय ना ?

मिसळ तर नाही कारण तो कटोरी मध्ये खात आहे.
कटोरीमुळे मला पाणीपुरी किंवा शेव पुरी वाटतं होतं.
भांड्यांचा, चमच्यांचा खणखणाट ऐकू येत होता <<<< यावरून वाटतं की भेळ आहे
फायनल आन्सर: भेळ.

नाही हो पाणीपुरीच आहे. ते तिखट पाणी मध्ये तो भैय्या थोड्या थोड्या वेळाने चमचा ढवळतो आणि उगाचच भांड्याच्या वरच्या टोकाला तोच चमचा अपटतो आणि पुन्हा पाणीपुरी द्यायला लागतो अंदाजे दर दहा पुऱ्यांच्या मागे त्याचा हा खेळ सुरू असतो Lol

रगडा पॅटिस सुद्धा असू शकतं.
सगळेजण या वाक्याकडे दुर्लक्ष करत आहेत
खमंग वासाने त्याची भूक अजूनच चाळवली<<<<
भेळ, रगडा पॅटीस, पाणीपुरी याला खमंग वास येतो का?
तो जर भुकेने व्याकुळ आहे तर तो पाणीपुरी पेक्षा भेळ खायला प्राधान्य देईल.

लिहिताना तरी माझ्या डोक्यात पाणीपुरीचे विचार चालु होते Happy

ते तिखट पाणी मध्ये तो भैय्या थोड्या थोड्या वेळाने चमचा ढवळतो आणि उगाचच भांड्याच्या वरच्या टोकाला तोच चमचा अपटतो आणि पुन्हा पाणीपुरी द्यायला लागतो अंदाजे दर दहा पुऱ्यांच्या मागे त्याचा हा खेळ सुरू असतो >> बरोबर

पाणीपुरीत प्याज आणि सेव अलगसे>> ठेले किवा हातगाडी वाले देतात अस, द्रोण त्यात कान्दा, शेव आणि मग पाणी ढवळून ते पुरीत भरतात
फीलीन्ग सठी रगडा, भिजवलेले हर्भरे, मसाला बटाटा अस काहीही असु शकत

कथा पुण्यातली आहे का>> Lol असु शकते, मी आहे ना पुण्यात म्हणून

@चैतन्य : भेळ ह्या अर्थाने पण सुट होतेय कथा Happy

धन्यवाद चैतन्य रासकर, द्वादशांगुला ,akki320,अक्षय दुधाळ ,माऊमैया , सस्मित Happy

तुम्हा सगळ्याना नेहमीच चटकदार भेळ, मिसळ, पणीपुरी, रगडा पॅटीस मिळू देत Happy Happy

धन्यवाद मेघा. Happy
तुला नेहमीच चटकदार भेळ, मिसळ, पणीपुरी, रगडा पॅटीस मिळू देत Happy Happy

अर्र!! असं प्याज और सेव अलगसे मी आजवर पाणीपुरीसाठी कधीच ऐकलं नाहीये.
असेल बुवा तुमच्यात. Happy
बाकी श्शक जमलीये.

असेल बुवा तुमच्यात>> आओ कभी हवेली मे Happy Proud
(पुण्यात या हो, हवेली तालुका आहे म्हणून)
बाकी श्शक जमलीये>> धन्स धन्स Happy

धन्यवाद anjali_kool Happy
तुम्हाला नेहमीच चटकदार भेळ, मिसळ, पणीपुरी, रगडा पॅटीस मिळू देत Happy

असं प्याज और सेव अलगसे मी आजवर पाणीपुरीसाठी कधीच ऐकलं नाहीये.>>>> आम्ही मागतो की नेहमी कांदा अलगसे पापु खाताना पण पुण्यात नाही तर ठाण्यात Proud

शशक छान पण पापु पेक्षा मिसळ वाटते.

धन्यवाद निल्सन Happy
तुम्हाला नेहमीच चटकदार भेळ, मिसळ, पाणीपुरी, रगडा पॅटीस मिळू देत Happy

धन्यवाद Namokar, कल्पमुख Happy
तुम्हाला नेहमीच चटकदार भेळ, मिसळ, पणीपुरी, रगडा पॅटीस मिळू देत Happy

छान आहे असं लिहिणार होतो पण तुम्ही लगेच ‘तुम्हाला नेहमीच चटकदार भेळ, मिसळ, पणीपुरी, रगडा पॅटीस मिळू देत’ असा आशिर्वाद द्याल. म्हणून काहीच लिहित नाही. Lol

धन्यवाद उमानु, तुम्हाला नेहमीच चटकदार भेळ, मिसळ, पणीपुरी, रगडा पॅटीस मिळू देत Happy
धन्यवाद शाली, स्पेशल दुआ:->
तुम्हाला नेहमीच परमहंसाची दाल बाटी मिळू देत Happy Proud

ही जमलीयं

मलाही पापु च वाटलेलं

हाहा मस्तंच, मला पण चटकन पाणीपुरीच आली डोळ्यांसमोर... Lol पण शिर्षक अन्नदाता म्हणजे पाणीपुरीवाल्या बद्दल आहे नं कथा?

Pages