अन्नदाता (शतशब्दकथा)

Submitted by किल्ली on 28 August, 2018 - 02:35

तो भुकेने व्याकुळ झाला होता. कितीतरी वेळापासून त्याच्या पोटात अन्नाचा कण गेला नव्हता. भुकेल्या अवस्थेत रस्त्यावरून जात असताना खमंग वास नाकात शिरला. तेथे एक देवमाणूस गोरगरिबांना खायला देत होता. पण नशीब कसे परीक्षा घेते पहा ना, त्या अन्नदात्याजवळ त्याच्यासारख्याच क्षुधार्थ्यान्ची गर्दी होती. गर्दीतून त्याला फक्त भांड्यांचा, चमच्यांचा खणखणाट ऐकू येत होता. खाणे वाढून घेण्यासाठी वाटली जाणारी कटोरी घेण्यासाठी सुद्धा रांग होती. वाऱ्याच्या झुळकेसरशी येणाऱ्या खमंग वासाने त्याची भूक अजूनच चाळवली जात होती. तोंडाला पाणी सुटले होते. एवढा वेळ वाट पाहण्याची तपश्चर्या फळाला आली. त्याला कटोरी मिळाली. प्रेमळ नजरेने पाहत अन्नदात्याने त्याला विचारले,
“मेडीयम?"
"सिर्फ तिखा बनाओ, प्याज और सेव अलगसे"
------------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
--------------------------------------------------------------------------------------------------------
तळटीप: कटोरी ह्या शब्दाला मराठी प्रतिशब्द द्रोण/वाटी असा वापरता आला असता हे मान्य! पण ज्याप्रमाणे तिखट पदार्थांत चिमूटभर साखर घातल्याने त्याची चव खुलते त्याप्रमाणे मराठी कथेत हिंदी शब्द इफेक्टसाठी वापरला तर चालतो Proud
(उपमेचा संदर्भ: माबो पाकृचे धागे आणि प्रतिसाद, Light 1 )
--------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद मानव पृथ्वीकर,आसा.,पवनपरी1, अदिति Happy
तुम्हाला नेहमीच चटकदार भेळ, मिसळ, पणीपुरी, रगडा पॅटीस मिळू देत Happy

तुम्हाला नेहमीच चटकदार भेळ, मिसळ, पणीपुरी, रगडा पॅटीस मिळू देत Happy

>>>> साई चौकात छान मिळते, डोसेवाल्याशेजारी Wink

खाणे वाढून घेण्यासाठी वाटली जाणारी कटोरी घेण्यासाठी सुद्धा रांग होती. ">>> हे वाचून मी ओळखली की पापु च आहे

मस्त लिहिलंय

धन्यवाद VB Happy
तुम्हाला नेहमीच चटकदार भेळ, मिसळ, पणीपुरी, रगडा पॅटीस मिळू देत Happy

Pages