विमलाबाई गरवारे प्रशाला

Submitted by चीकू on 17 July, 2011 - 13:11

विमलीज ग्रूप - इथे पोस्टी टाका...म्हणजे वाहून जाणार नाहीत बहुतेक Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गाडगीळ सरांचा खरंच खूप दरारा होता. आम्ही पापभीरु अ तुकडी विद्यार्थिनी असलो तरी आमच्या ग्रुप मधे गाडगीळ सरांच्या अंगठीच्या हाताने बुक्की वगैरे मारण्याच्या शिक्षेच्या हॉरर कथा डिस्कस व्हायच्या !!
सरांना श्रद्धांजली!!

होय, अंगठीच्या हाताने बुक्की, बरोबर, आठवले खरे! आम्हाला ते शिकवायला कधीच नव्हते, पण दोन वर्षे गणपतीच्या दिंडीत मात्र मी होतो.

मैदेवी, तुम्ही दहावी किती साली झालात?

होय, कालच कळले

माझेही आवडते सर

एन सी सी चे प्रमुख होते

श्रद्धांजली

ओह वाईट बातमी Sad
सर कायम हसतमुख असायचे , गप्पा मारत शिकवायचे !

ज्येष्ठ इतिहास शिक्षक ना.वा. अत्रे यांचे निधन
पुणे, दि. २६ - महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतील (पूर्वीचे जिमखाना भावे स्कूल) इतिहास विषयाचे निवृत्त शिक्षक ना.वा. अत्रे यांचे आज निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. १९८६ साली ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर परिसरात ते राहात होते.

शिस्तप्रिय असलेले अत्रे सर छत्रपती शिवाजी महाराजांचा कथा भान हरपून सांगत असत, त्यामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये प्रिय होते.
अप्पा अत्रे या नावाने ते सुपरिचित होते. लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले अत्रे सर अगदीअलिकडेपर्यंत नियमितपणे प्रभात शाखेत जात होते.

नमस्कार मंडळी

नुकतेच आपल्या शाळेचे नूतनीकरणाचे काम पुर्ण झाले. त्यानंतरची काही प्रकाशचित्रे. मी देखील आतून बघीतली नाहीये शाळा अजून, पण सुंदर कायापालट झालाय.

१.
WhatsApp Image 2021-08-19 at 11.56.54 PM.jpeg

२.

WhatsApp Image 2021-08-19 at 11.56.54 PM (1).jpeg

३.

WhatsApp Image 2021-08-19 at 11.58.41 PM.jpeg

४.

WhatsApp Image 2021-08-19 at 11.58.59 PM.jpeg

५.
WhatsApp Image 2021-08-20 at 12.00.09 AM.jpeg

मस्त दिसत आहे शाळा.... धन्यवाद हर्पेन....
शंकरपाळी मैदानातील बास्केट बॉलच्या बास्केट काढुन टाकलेल्या आहेत वाटते...
मधे शाळेत जाणे झाले होते ( ३-४ वर्षापुर्वी) तेव्हा शाळेची अवस्था पाहुन वाईट वाटले होते.. अनेक वर्गाची दारे तुटली होती, फळे फुटले होते... आता फोटो पाहुन मस्त वाटले.

शंकरपाळी मैदानातील बास्केट बॉलच्या बास्केट काढुन टाकलेल्या आहेत वाटते... >>>

भारी निरिक्षण. तू म्हटल्यावर मी नीट पाहीले. Happy

छान केलाय व्हिडिओ! मुला मुलींची स्वच्छतागृहं पण नविन आणि अद्यायवत केल्याचे बघून बरं वाटलं. अर्थात ती तशी मेन्टेन करायला हवीत !

वॉव, काय मस्तं रिनोव्हेशन आणि फोटोज , एकदम करण जोहरच्या SOTY मधल्या सेंट टेरेसा सारखे आलेत फोटोज Proud

अरे वा सुंदर . धन्यवाद हर्पेन. काय छान रंग काढला आहे. परत परत बघे न फोटो. आता चित्रफीत बघते.

Pages