Submitted by चीकू on 17 July, 2011 - 13:11
विमलीज ग्रूप - इथे पोस्टी टाका...म्हणजे वाहून जाणार नाहीत बहुतेक
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विमलीज ग्रूप - इथे पोस्टी टाका...म्हणजे वाहून जाणार नाहीत बहुतेक
गाडगीळ सरांचा खरंच खूप दरारा
गाडगीळ सरांचा खरंच खूप दरारा होता. आम्ही पापभीरु अ तुकडी विद्यार्थिनी असलो तरी आमच्या ग्रुप मधे गाडगीळ सरांच्या अंगठीच्या हाताने बुक्की वगैरे मारण्याच्या शिक्षेच्या हॉरर कथा डिस्कस व्हायच्या !!
सरांना श्रद्धांजली!!
होय, अंगठीच्या हाताने बुक्की,
होय, अंगठीच्या हाताने बुक्की, बरोबर, आठवले खरे! आम्हाला ते शिकवायला कधीच नव्हते, पण दोन वर्षे गणपतीच्या दिंडीत मात्र मी होतो.
मैदेवी, तुम्ही दहावी किती साली झालात?
गाडगीळ सरांचा खरंच खूप दरारा
गाडगीळ सरांचा खरंच खूप दरारा होता. >>>> कोंबडा करुन उभे करणे ही पण पेटंट शिक्षा होती !!
दोन दिवसामागची एक वाईट बातमी
दोन दिवसामागची एक वाईट बातमी आहे; अनवलीकर सर गेले
ओह अरेरे. आम्हाला भूगोल
ओह अरेरे. आम्हाला भूगोल शिकवायला होते एक वर्ष.
(No subject)
होय, कालच कळले
होय, कालच कळले
माझेही आवडते सर
एन सी सी चे प्रमुख होते
श्रद्धांजली
ओह वाईट बातमी
ओह वाईट बातमी
सर कायम हसतमुख असायचे , गप्पा मारत शिकवायचे !
ज्येष्ठ इतिहास शिक्षक ना.वा.
ज्येष्ठ इतिहास शिक्षक ना.वा. अत्रे यांचे निधन
पुणे, दि. २६ - महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतील (पूर्वीचे जिमखाना भावे स्कूल) इतिहास विषयाचे निवृत्त शिक्षक ना.वा. अत्रे यांचे आज निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. १९८६ साली ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर परिसरात ते राहात होते.
शिस्तप्रिय असलेले अत्रे सर छत्रपती शिवाजी महाराजांचा कथा भान हरपून सांगत असत, त्यामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये प्रिय होते.
अप्पा अत्रे या नावाने ते सुपरिचित होते. लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले अत्रे सर अगदीअलिकडेपर्यंत नियमितपणे प्रभात शाखेत जात होते.
अत्रे सरांना सद्गती लाभो ही
अत्रे सरांना सद्गती लाभो ही प्रार्थना
नमस्कार मंडळी
नमस्कार मंडळी
नुकतेच आपल्या शाळेचे नूतनीकरणाचे काम पुर्ण झाले. त्यानंतरची काही प्रकाशचित्रे. मी देखील आतून बघीतली नाहीये शाळा अजून, पण सुंदर कायापालट झालाय.
१.
२.
३.
४.
५.
मस्त दिसत आहे शाळा....
मस्त दिसत आहे शाळा.... धन्यवाद हर्पेन....
शंकरपाळी मैदानातील बास्केट बॉलच्या बास्केट काढुन टाकलेल्या आहेत वाटते...
मधे शाळेत जाणे झाले होते ( ३-४ वर्षापुर्वी) तेव्हा शाळेची अवस्था पाहुन वाईट वाटले होते.. अनेक वर्गाची दारे तुटली होती, फळे फुटले होते... आता फोटो पाहुन मस्त वाटले.
शंकरपाळी मैदानातील बास्केट
शंकरपाळी मैदानातील बास्केट बॉलच्या बास्केट काढुन टाकलेल्या आहेत वाटते... >>>
भारी निरिक्षण. तू म्हटल्यावर मी नीट पाहीले.
छान दिसतेय आता! आतून सगळे
छान दिसतेय आता! आतून सगळे अगदी पहिल्यासारखेच आहे.
नूतनीकरण केलेल्या इमारतीची
नूतनीकरण केलेल्या इमारतीची सफर घडवणारी लघुचित्रफित ...
https://youtu.be/AXBImaUjt_U
छान केलाय व्हिडिओ! मुला
छान केलाय व्हिडिओ! मुला मुलींची स्वच्छतागृहं पण नविन आणि अद्यायवत केल्याचे बघून बरं वाटलं. अर्थात ती तशी मेन्टेन करायला हवीत !
वॉव, काय मस्तं रिनोव्हेशन !
वॉव, काय मस्तं रिनोव्हेशन आणि फोटोज , एकदम करण जोहरच्या SOTY मधल्या सेंट टेरेसा सारखे आलेत फोटोज
अरे वा सुंदर . धन्यवाद
अरे वा सुंदर . धन्यवाद हर्पेन. काय छान रंग काढला आहे. परत परत बघे न फोटो. आता चित्रफीत बघते.
चित्र फीत पण सुरेखच आहे.
चित्र फीत पण सुरेखच आहे. आणि नॅरेशन किती शुद्ध मराठीत आहे. ऐकून सुरेख वाटले.
एकदम सुंदर दिसतीये आता शाळा.
एकदम सुंदर दिसतीये आता शाळा.
नॅरेशन = कथन
नॅरेशन = कथन
Pages