विमलाबाई गरवारे प्रशाला

Submitted by चीकू on 17 July, 2011 - 13:11

विमलीज ग्रूप - इथे पोस्टी टाका...म्हणजे वाहून जाणार नाहीत बहुतेक Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'दरोडा' वृत्तांत--- माहीती चा स्त्रोत- भाऊ
गाडगीळ सर शाळेचे 'भांडार' चालवत होते.आणि मला वाटते की कॅन्टीन पण तेच चालवत होते.
काही मुलांनी ठरवले की कॅन्टीन वर दरोडा घालायचा. ती १०-१५ मुले मधल्या सुट्टीत एकदम कॅन्टीन मधे घुसली. तोंडावर रुमाल बांधून Happy आणि त्यांनी जवळच्या पिशव्यांमधे सगळे ब्.वडे, सामोसे वगैरे गोळा केले आणि चिल्लर पण पळवली. हा अनपेक्शीत हल्ला ५ मिनीटांत झाला त्या मुळे त्या कॅन्टीन चालवणार्‍या मुलांना काय झाले ते पण समजेना. हल्लेखोरांनी पळवलेला 'पुरावा' म्हणजे ' वडे' , सामोसे, ई. नष्ट करण्यास बर्‍याच मुलांनी हातभार लावला Happy

वडे' , सामोसे, ई. नष्ट करण्यास बर्‍याच मुलांनी हातभार लावला >>> Lol

हो ते पोत्याबद्दलही ऐकले होते. मारल्याबद्दल. नदीचे माहीत नाही Happy

बाप रे! दरोडा !! तोंडावर रुमाल वगैरे बांधून!! कठीण आहे! आता ती रत्नं काय करतात Happy ब्यांक दरोडे वगैरे की पोलिटिशियन वगैरे झालीत? Proud

दरोडा Happy जबरी आहे!!!

दरोड्यावरून आठवलं...एक दरोडे सर म्हणून कोणी होते ना?

आपला गणपत शिपाई आठवतोय का ? शाळेच्या च बाजूला रहायचा तो. त्याच्या कडे डुप्लिकेट चाव्यांचा एक गठठा च होता. कोणाची सायकल ची किल्ली हरवली की तो नक्की कुलूप उघडून द्यायचा. मला तर त्याने खूप वेळा मदत केली होती.

संस्कृतला रमा जोशी बाई होत्या का कोणाला? मस्त शिकवायच्या....माझ्या संपूर्ण शालेय जीवनात त्यांना कधीच हसलेलं पाहिलं नाही मी Happy

एवढ्या वर्षांपुर्वी पासुन आहे ही शाळा ?>>>

पानशेतच्या पूरानंतर बर्‍याच पूरग्रस्तांची पर्यायी व्यवस्था आमच्या शाळेतपण केली होती असं ऐकून आहे. शाळेत एका भिंतीवर पुराच्यावेळी पाण्याची पातळी कुठपर्यंत होती याची निशाणीपण आहे......

आता शाळा किती जुनी असेल याचा अंदाज काढा Happy

माझ्या आधीची जनरेशन म्हणजे माझे बाबा, आत्या, काका सगळे ह्याच शाळेत होते. माझ्या बाबांना त्या वेळेस पी. वाय. जे. उर्फ जेम्स बऑन्ड शिकवायला होते. एकदा बाबा आणि त्यांच्या मित्रांनी सर आणि एक लेडी टीचर वर्गात बोलत असताना वर्गाच्या दाराला बाहेरुन कडी लावली आणि पळून गेले. Uhoh
मला बाबा नेहमी सांगायचे की तू सरांना माझे नाव सांग ..ते मला नक्की ओळखतील म्ह्णून..पण मी तर परिक्षेच्या पेपर वर माझे पूर्ण नाव लिहायला पण घाबरायचे. फक्त नाव आणि आड्नाव लिहायचे. न॑ जाणो यांनी नाव ओळखले तर काय करा..

Pages