प्रेम की आकर्षण...(भाग ३)

Submitted by अतुल असवले on 16 August, 2018 - 21:12

आता त्या दोघांना ही उत्सुकता होती ती भेटायची दोघांना ही झोप लागत नव्हती. प्रियाच्या ही मनात आल आपण ही अमोल ला पत्र द्यावं. अता तिने ठरवलं ती पण त्याला पत्र लहीणार पण मुली जरा ह्या बाबतीत सावधान असतात हे पत्र तिने घरी न लहीता कॉलेज मध्ये
लिहायचे ठरवले. सकाळ झाली प्रिया कॉलेज ला आली लेक्चरला न बसता ती थेट लायब्ररी मध्ये गेली सकाळची वेळ लायब्ररी मध्ये जास्त गर्दी नव्हती. प्रिया ने पत्र लिहायला सुरुवात केली.

“प्रिय अमोल”,
हाय अमोल, तुझं पत्र वाचलं छान आहे आवडलं मला. तू मला follow करत आहेस हे मला त्या दिवशी समजलं जेव्हा तू मला “हाय मी अमोल” अस बोलास. तुला मी येवडी आवडते ऐकून खूप बरं वाटलं. मला माहित आहे तुला माझ्या उत्तराची खूप उत्सुकता असेल ना?.
मला ही तू खुप आवडतोस पण त्या आधी मला तुला काहीतरी सांगायचं आहे कारण तुला ही गोस्ट समजणे आवश्यक आहे. करण जेव्हा पासून मला तुझ्या मनातलं समजलं आहे ती गोस्ट मला आतूनच खात आहे आणि मी खूप अस्वस्थ आहे.
तुला माझं म्हण पटलं नाहीतरी चालेल तू मझा विषय सोडू शकतोस.
आपण भेटून बोलायचं का????

तुझी
फुलपाखरू(नाव आवडलं मला)

प्रिया ने पत्र बॅग मध्ये ठेवलं आणि लेक्चर ला जाऊन बसली.
इकडे अमोल ही कॉलेज ला जायला निघाला निघतानि त्याला लक्षात आलं “आज तर आपली Date आहे आता पैसे??”. असल्या वेळेला एकच वेक्ती डोळ्या समोर येते ती म्हणजे आई. अमोल आई कडे गेला निरागस चेहरा करून ” आई प्रोजेक्ट साठी पैसे हवे आहेत” म काय पोरगा अभ्यासा करीता पैसे मागतोय म्हंटल्यावर आई ने लगेच पैसे काढून दिले अमोल खुश झाला “थँक्स आई” अस लाडात बोलून अमोल कॉलेज ला जायला निघाला. दिवस खूप हळू हळू पुढे सरतोय अस त्याला वाटत होतं. अखेर 5 वाजले अमोल शेवटच लेक्चर बंक करून निघाला, बस स्टॉप वर आला भिकारी काका त्याचीच वाट बाघत होते
त्याने रोज प्रमाणे भिकारायला पैसे दिले आणि प्रिया ची वाट बघु लागला. थोड्या वेळातच प्रिया आली तिच्या हातात ते पत्र होत, दोघांनी लांबूनच स्माईल दिली.प्रिया अमोल कडे येत होती जस जस त्यांचा दोघांच्या मधलं अंतर कमी होत होते अमोल च्या हृदयाचे ढोके वाढत होते. प्रिया अमोल जवळ येणार तेवढ्यातच “प्रिया” अशी हाक ऐकू आली प्रिया दचकली जागेवरच थांबली हातातलं पत्र घट्ट मुठीत पकडलं. अमोल ने ही लगेच दुसरीकडे बघत फोन कानाला लावला.
प्रिया ने मागे वळून पाहिले तर तिथे तीची मैत्रीण होती. प्रिया ला वाटलं कोणीतरी घरचे आहेत पण मैत्रिणीला बघून ती शांत झाली. त्या दोघी जाऊन बस च्या रांगेत उभ्या राहिल्या अमोल लांबूनच हे सर्व बघत होता . थोड्या वेळाने अमोल च्या लक्षात आलं तिची मैत्रीण त्याच्याच शाळेतली मैत्रीण आहे. अमोल ने विचार केला आता मैत्रिणीलाच ओळख करून दयायला सांगायचं. अमोल त्यांच्याकडे बघत होता प्रिया काही तरी हात वारे करून तिच्या मैत्रिणीला सांगत होती. प्रिया ही मध्ये मध्ये हळूच अमोल कडे बघत होती. बस आली तिघे पण बस मध्ये चढले प्रिया आणि तिची मैत्रीण एकाच ठिकाणी राहत होते त्यांचा स्टॉप आला ते उतरले अमोल एक टक लावून प्रिया कडे बघत होता ती कधी वळून पहाते पण मैत्रीण सोबत असल्याने ती तशीच निघून गेली.
प्रिया घरी आली आल्या आल्या आधी तिने पत्र लपवून ठेवलं म त्या मैत्रिणीला मनातच चार शिव्या घातल्या “***** हिला पण आजच यायचं होत का.”.
प्रिया ला जे सांगायचं होत ते आज राहूनच गेलं प्रिया ने मात्र आता मनाशी पक्का केला होत उद्या काही पण हो ती त्याला पत्र देणार. अमोल पण घरी आला आल्या आल्या आधी त्याने whatsapp वर शाळेचा ग्रुप ओपन केला कधी शाळेच्या ग्रुप वर वळून पण नाही पहाणार अमोल आता त्या ग्रुप च्या फ्रेंडलिस्ट मध्ये त्याच्या मैत्रिणीला शोधू लागला.

अखेर ती भेटली त्याने तिचा नंबर सेव केला आणि “हाय” असा मेसेज केला. थोड्यावेळाने तिने रिप्लाय दिला.
“हाय, खूप दिवसांनी आठवण आली आमची”
“होय, आज तुला बस स्टॉप वर पाहिलं म्हणून आठवण आली’
“Ok, म हाक मारायची ना मला”
“हो मरणारच होतो पण तू तुज्या फ्रेंड सोबत होतीस ना म म्हंटल उगाच डिस्टर्ब कस्याला’
“हो का, मूर्ख त्यात काय डिस्टर्ब पागल”
“ते जाऊदे.. कोण होती ग ती????”
“ओ हो, का रे आवडली का तुला???”
“नाही ग, सहजच विचारतोय”
“अरे माजी फ्रेंड आहे , आमच्या हितेच रहाते”
“Ok ,थँक्स बाय”
“अरे आईक तरी”
“हा बोल ना”
“तुला ती आवडते वगैरे का.??”
“नाही ग तस काही नाही आहे, का काय झालं,तिचा कोणी बॉयफ्रेंड आहे का??”
“बॉयफ्रेंड च नाही रे”
“म काय प्रॉब्लेम आहे”
“अरे ती बोलू शकत नाही”
“काय.????? खर बोलतेयस का तू?”
“हो अरे ती मुखी आहे , अशी मस्करी का करेल मी“

हे ऐकताच अमोल मात्र मुळातून हलला त्याचे हात थर थर कापू लागले त्याला विश्वासच बसत नव्हता त्याचा मनात प्रशनांचा गोधळ उडाला होता.त्याला काही सुचतच नव्हतं “आता काय??” हा प्रशन तो स्वतःला सारखा विचारत होता मात्र उत्तर काय सापडत नव्हत. इकडे कदाचित प्रियाला ही तेच सांगायचं असेल ती उद्याची वाट बघत बसली होती. अमोल मात्र संपूर्ण खचून गेला होता.

दुसरा दिवस उगवला अमोल कॉलेज ला निघाला पण त्याचे विचार अजून त्याच प्रशनाचे उत्तर शोधत होते.
प्रिया ही कॉलेज ला गेली आज अमोल ला काय आहे ते सरळ सांगून टाकायचं ह्या विचारात तिने पूर्ण दिवस घालवला प्रिया बस स्टॉप वर अली नेहेमी पेक्षा आज लवकरच अली आज तिला उत्सूकता होती ते त्याला भेटायची. भिकारी काका पण त्यांच्या नेहेमी च्या वेळेस बस स्टॉप वर आले दोघे ही अमोल ची आतुरतेने वाट बघत होते. एकाचा पोटाचा प्रशन होता तर एकाचा आयुष्याचा. प्रिया चे डोळे मात्र गर्दीत त्यालाच शोधत होते. पण अमोल मात्र आज शेवटच्या लेक्चर ला बसला होता कदाचित त्याला त्याच्या प्रशनाचे उत्तर भेटलं असावे. प्रिया ही थोड्या वेळाने निराश होऊन घरी गेली तिला वाटलं आज नाही तर उद्या नक्की. पण तिला काहीच कल्पना नव्हती तिच्या सौंदर्यवर प्रेम करणारा अमोल तिच्या आवाजा सारखा गायब झाला होता.
ती आजही त्याची वाट बघत बस स्टॉप वर उभी अस्ते हातातल पत्र कधी त्याला देऊन टाकते ह्या विचारात, पण अमोल ने मात्र परत कधी शेवटच लेक्चर बंकच केले नाही.
काही दिवस वाट बघून प्रियाला ही एक प्रशन पडला “नक्की हे प्रेम होते की आकर्षण.?”

कशी वाटली स्टोरी नक्की कळवा.
—-अतुल लक्ष्मण असवले

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली लिहीलीत Happy
प्रियाबद्दल वाईट वाटले. पण पुढच्या त्रासापेक्षा आत्ताच थांबलेले बरे!

छान लिहीलंय..
प्रियाबद्दल वाईट वाटले>>> +१
पुढील लेखनास शुभेच्छा ! Happy

मस्त लेख आहे.
मला वाटते जगात प्रेम हि गोष्ट अस्तित्वात नाहीये. आकर्षणाला आपण प्रेम म्हणतो. किंवा एखादी गोष्ट आपल्याला आवडते तशी एखादी व्यक्ती आवडली कि आपण त्याला प्रेम नाव देतो.अर्थात हे माझे वयक्तिक मत आहे आणि ५-६ रेलाशनशिप्स नंतर माझे असे मत झाले आहे.
असो लेख खूप छान लिहिला आहे.