एयर फ्रायर दाल बाटी : स्वातंत्र्यदिन स्पेशल

Submitted by आ.रा.रा. on 15 August, 2018 - 06:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बट्ट्यांसाठी

कणिक : सुमारे ५-६ पोळ्यांसाठी घेतो तितकी.
रवा : ३-४ चहाचे चमचे शीग लावून
हळद, मीठ, ओवा, तेलाचे मोहन.

(संपादन २ : कणकेत रवा मिक्स करायचा कारण बट्टीसाठी नॉर्मली जरा जाडसर दळलेली कणिक वापरतात.)

दाल :
घट्ट तुरीचे वरण, मिरची लसूण हिंग घालून.

क्रमवार पाककृती: 

कृती फक्त बट्टी/बाटीची देतोय.

१५ ऑगस्टच्या निमित्ताने थोडा सुट्टी मूड होता, अन काकूचं सुरु होतं आज्जी कशी नागपंचमीला कानवले करायची, कशी तवा ठेवायची नाही वगैरे. म्हटलं चल आज दाल बाटी खाऊ.

निखार्‍यातली करायला फार उस्तवार पुरेल म्हणून शॉर्टकट एयरफ्रायरमधे करायची ठरवली, अन अक्षरशः ३० मिनिटांत तयार झाली पण.

तर कृती :

वरचे सगळे जिन्नस हे असे घट्ट भिजवून घेणे. घट्टपणाचा अंदाज फोटोत येतोय का पहा. मोहन थोडं जास्त घालावे. ओलसर केल्यास मजा जाईल.


बट्टी साठी सुमारे दीड पोळी ची लाटी होईल इतका गोळा घेऊन हाताने मोदकाची पारी करतो तसा वळवायचा. आत तेल लावायचं, अन मोदक स्वतःवर बंद करायचा. परत त्याला दाबून तेल लावून पोकळ मोदक करायचा, पुन्हा बंद करायचा, हे असं ३-४ वेळा केलं, की बट्टीला आतून पुड बनतात, अन भाजल्यावर खुसखुशित होते.

एयरफ्रायर २०० डिग्री से. ला प्रीहीट अन त्यानंतर १५ मिनिटे. (संपादन १ : डिग्री कोणती (फॅरनहाईट की सेल्सिअस तो जरा झोल आहे. योग्य शोध घेऊन जमल्यास पुन्हा एडिटेन. सध्या अमितव म्हणताहेत ते योग्य असेल असे वाटते आहे म्हणून बदलले.)


या १५ मिनिटांत वरण करून होते. बट्टीवर आपल्या बेताने हवं तितकं कमी/जास्त तूप टाकून - माझ्या बेताने १ चमचाभरच घातलंय. नॉर्मली बट्टी निखार्‍यातून काढली की तुपात बुडवून काढतात.
तेव्हा तब्येतीत बट्टी चुरून, त्यावर घट्ट वरण घालून..

एंजॉय!

हॅपी इंडिपेंडन्स डे!

वाढणी/प्रमाण: 
५ बट्ट्या केल्या, दोघांत २-२ खाऊन ५वी कुस्करून साखरतुपासोबत संपली.
अधिक टिपा: 

इतक्या पट्कन अन मस्त बट्ट्या होतील असं वाटलं नव्हतं.

कणीक मळण्यापासून बट्ट्या शेकण्यापर्यंत संपूर्ण काम मी केले आहे. वरण व भाजी सौ. सौ.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक पदार्थ, ए.फ्रा.साठी माझे प्रयोग.
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

पुडं = layers.
घडीची पोळी करतात त्याला पुडाची पोळी म्हणतात.

खतरा दिस्तेय रेस्पी.
पण मेन / लीड कलाकार दालबाटी ह्यांच्यात इंटरेस्ट कमी असल्याने त्या साइड कलाकार म्हणुन ठेवलेल्या वांग्याच्या भाजीकडेच लक्ष जातंय.
काकुंना विचारुन रेस्पी लिहा भाजीची.

वा छान!! एकमेकांना भरवले की नाही? Biggrin
तुमच्या अल्टरनेट मेथड्स आणि रेसिपीज भारी असतात.
चांगला एअरफ्रायर कितीला मिळतो ? कोणत्या कंपणीचा घ्यावा?

मुंबईत उत्तम दालबाटी, दाल बाफले>>>>>
नॉर्मली राजधानी, महाराजाभोग थाळी टाईप हॉटेलात दालबाटी मिळतेच, आधी फोन करून मेनू कन्फर्म करून जावे.
बाफले शोधावे लागतील,

लोकहो,
आपुलकीने दिलेल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद!

वर मी निखार्‍यावरच्या बट्ट्यांबद्दल लिहिले आहे. त्या अशा बनतात :

अन त्यांना अशी तुपाची आंघोळ घालतात.

हे फोटो पूर्वी ताई घरी आली तेव्हा केलेल्या निखार्‍यावरच्या बट्ट्यांचे आहेत. (सोबतचे पापड वरच्या फोटोतला लालसर दिसतोय तो नागलीचा, अन खालचे गोरे आहेत त्या बिबड्या आहेत.)

हॉटेलात मिळणारी बाटी राजस्थानी/मारवाडी पद्धतीने बहुतेकदा गोळे उकडून वा न्योकीसारखे पाण्यात उकळून मग त्याच्या फोडी तळून केलेली असते. अनेक ऑनलाईन रेसिपी कणकेत सोडाही घालायला सांगतात.
खानदेशी दालबाटी रोडग्यांसारखी गोवर्‍यांच्या निखार्‍यात भाजली जाते.

आज केल्या

खाल्ल्या
अप्रतिम.....

अतिषय सोप्या आणि अप्रतिम

खूप छान रेसेपी

आज एअर फ्रायर डे होता. बाटी बरोबर कणिक+गुळाचा फ्रुट केक पण केला एअर फ्रायर मध्ये. तो पण झकास झाला. त्याची कृती टाकीन सविस्तर नंतर

मोकिमी,
धन्स!
फोटो झब्बू दिला असता तर जास्त मज्जा आली असती.

मल्हारी कसली मज्जा करतोस आता ?
निलंबित काळातल्या पगाराचं काय होतं हे सांगितलंच नाहीस लेका तू अजून.

आरारा तुम्ही बाटिची कणिक नाही वापरली का? त्याने अजुन खुस्खशित होतात बाट्या, वहिनीकडे स्पेशली दळुन आणतात तसे गहु
आतातर बाट्याचे ओव्हन पण मिळतात गॅसवर ठेवायचे अर्थात निखार्यावर भाजलेल्या ची चव जास्त ऑन्य्हेटीक असते म्हंणा
वाफवुन तळुन केलेल्या बाट्ञा गार झाल्या तरी खुसखुशित लागतात

यम यम.
हे सर्व मला बनवता येईल याचा आत्मविश्वास नाही.
पण आई खूप मस्त बनवते बट्टया/गाकर(अर्थात ते राजस्थानी बाटी सारखे नसून पोळी चे भरपूर लेयर वाले तुपात खरपूस परतलेले एकदम जाड कुकीज सद्रुष प्रकार असतो. फोडणीच्या चिंच गूळ कढीपत्ता घातलेल्या आमटीत घालून मस्त लागतो.)

हॉटेलात मिळणारी बाटी राजस्थानी/मारवाडी पद्धतीने बहुतेकदा गोळे उकडून वा न्योकीसारखे पाण्यात उकळून मग त्याच्या फोडी तळून केलेली असते.
>>
यालाच बाफले म्हणतात, पण त्यांना बाटीच्या नावावर खपवतात Wink
वाकडला डांगे चौकात एका राजस्थानी मेस टाईप हाॅटेलात खाल्ले होते. मस्त होते. आवडलेले.
विशालनगर, पुणे मध्ये पण एका हाॅटेलात दालबाटी थाळी मिळते ती पण मस्त होती.
आता इथे मुंबईत शोधतोय.
बोरीवलीला रबडीवाला नावाच्या हाॅटेलात दालबाटी मिळालेली, पण बाटी तुपात खुपच मुरवलेली, सोडा घातलेली आणि आकाराने पेढ्याएवढी होती, त्यामुळे कुछ जम्या नही.

निगडी मध्ये रामदेव बाबा मध्ये दाल बाटी आणि पंचरतन दाल बाफले मागवले होते.बाटी साधारण क्रिकेट बॉल इतकी होती. ती आम्हाला डाळीत नीट चुरुन खाता न आल्याने डाळीत बॉल बुडवून नंतर कुरतडून खावे लागले.२ बॉल उरले ते पार्सल घेतले.त्या मानाने दाल बाफले हा प्रकार सोपेपणी खाता आला.आणि क्वांटीटी ला कमी होता.

बाकी हा धागा म्हणजे प्रचन्ड अन्याय आहे, इथे आले की तोपान्सु Happy
काय करावे काही सुचेना, दाल बाटी कोणि (?) च खिलवेना....

माझ्या मते निगडी मधलं रामदेव बाबा उगाच हाईप्ड आहे दाल बाटी साठी. अ‍ॅम्बियन्स तर नाहीच पण चवही फारशी आवडली नाही मला.

म्हणून म्हणते डाल बाफळे किंवा इतर डिश खाव्या तिथे जाऊन.
अंबियांस तर नाहीच.त्यांनी क्लेमही केलेले नाही.लो बजेट हॉटेल आहे.

आरारा तुम्ही बाटिची कणिक नाही वापरली का? त्याने अजुन खुस्खशित होतात बाट्या, वहिनीकडे स्पेशली दळुन आणतात तसे गहु
<<
प्राजक्ता,

जाड कणिक नव्हती म्हणून तर नॉर्मल कणकेत रवा मिक्स केलाय !

नंतर प्रतिसादात फोटो दिलेत त्यात ऑथेंटिक जाड कणीक प्लस निखारे आहेत. ही रेस्पी शॉर्टकट जुगाड आहे जो ऑल्मोस्ट ऑथेंटिक चवीपाशी जातोय.

छान!
खूप सोपी केली आहे. दिसते छान.

फोटो मस्त आहे!
दालबाटी राजस्थानात जाऊनही खाऊ शकले नव्हते. (प्रचंड तोंड आलेलं तेव्हा! :()
आता हे घरी करून पाहीन.

काल करून खाल्ली. पहिल्यांदाच खाल्ली त्यामुळे कशी लागली पाहिजे याचा काही मापदंड न्हवताच. मला ठीक वाटली, डेलिकसी वाटावी अशी भारी काही झाली न्हवती. बायकोने थोडी खाल्ली, पोराने सपशेल आवडली नाही करून नाकं मुरडली आणि एग खाल्लं.
200 ला 15 मिनिटात कच्ची लागली. 350 ला आणखी 10मिनिटं ठेवली. एअर फ्रायर प्रिहीट नक्की कसा करायचा माहीत नाही, आणि उघडल्यावर बाटया ठेवेपर्यंत सगळी हिट निघून गेली असेल म्हणूनही 200 कमी वाटलं असू शकेल.
धन्यवाद रेसिपी साठी. एअर फ्रायर वरची पहिली रेसिपी तुमची. Happy
फोटो उद्या कॉम्प्युटर वरून टाकेन.

अमितव,

माझा एफ्रा सुरू केला की त्यावर २ लाईट लागतात. एक पॉवर इंडिकेटर अन दुसरा टेंपरेचर. पॉवरचा कायम चालू राहतो, अन टेम्परेचरचा लाईट आतले टेंपरेचर हवे तितके आले की बंद होतो. तो बंद झाला, की ओव्हन प्रीहीट झाले असे समजावे.

प्रिहीट झाल्यानंतर १५ मिनिट बेक टाईम होता. प्रिहीट होण्यासाठी सुमारे ३ ते ५ मिनिटे अँबियंट टेम्परेचरनुसार लागतात.

माझ्या मशिनवर २०० डीग्री मॅक्सिमम रीडिंग आहे. तुमच्याकडे जास्त वॅटेजचा एफ्रा दिसतो आहे.

पदार्थ आत ठेवताना ट्रे बाहेर काढून दार बंद करावे, व शक्य तितक्या चट्कन वस्तू ठेवावी. प्रिहीट करताना नॉनस्टिक ट्रेसकट केले पाहिजे.

पदार्थाच्या क्वांटिटीवरही कुकिंग टाईम बदलतो. पदार्थाची क्वांटिटी ३ लोकांसाठी केली तर वेळ थोडा वाढणे अपेक्षित आहे.

200 ला 15 मिनिटात कच्ची लागली. 350 ला आणखी 10मिनिटं ठेवली. एअर फ्रायर प्रिहीट नक्की कसा करायचा माहीत नाही, आणि उघडल्यावर बाटया ठेवेपर्यंत सगळी हिट निघून गेली असेल म्हणूनही 200 कमी वाटलं असू शकेल. ---- degree Celsius आणि farenheit चा फरक असावा बहुतेक.

Pages