एयर फ्रायर दाल बाटी : स्वातंत्र्यदिन स्पेशल

Submitted by आ.रा.रा. on 15 August, 2018 - 06:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बट्ट्यांसाठी

कणिक : सुमारे ५-६ पोळ्यांसाठी घेतो तितकी.
रवा : ३-४ चहाचे चमचे शीग लावून
हळद, मीठ, ओवा, तेलाचे मोहन.

(संपादन २ : कणकेत रवा मिक्स करायचा कारण बट्टीसाठी नॉर्मली जरा जाडसर दळलेली कणिक वापरतात.)

दाल :
घट्ट तुरीचे वरण, मिरची लसूण हिंग घालून.

क्रमवार पाककृती: 

कृती फक्त बट्टी/बाटीची देतोय.

१५ ऑगस्टच्या निमित्ताने थोडा सुट्टी मूड होता, अन काकूचं सुरु होतं आज्जी कशी नागपंचमीला कानवले करायची, कशी तवा ठेवायची नाही वगैरे. म्हटलं चल आज दाल बाटी खाऊ.

निखार्‍यातली करायला फार उस्तवार पुरेल म्हणून शॉर्टकट एयरफ्रायरमधे करायची ठरवली, अन अक्षरशः ३० मिनिटांत तयार झाली पण.

तर कृती :

वरचे सगळे जिन्नस हे असे घट्ट भिजवून घेणे. घट्टपणाचा अंदाज फोटोत येतोय का पहा. मोहन थोडं जास्त घालावे. ओलसर केल्यास मजा जाईल.


बट्टी साठी सुमारे दीड पोळी ची लाटी होईल इतका गोळा घेऊन हाताने मोदकाची पारी करतो तसा वळवायचा. आत तेल लावायचं, अन मोदक स्वतःवर बंद करायचा. परत त्याला दाबून तेल लावून पोकळ मोदक करायचा, पुन्हा बंद करायचा, हे असं ३-४ वेळा केलं, की बट्टीला आतून पुड बनतात, अन भाजल्यावर खुसखुशित होते.

एयरफ्रायर २०० डिग्री से. ला प्रीहीट अन त्यानंतर १५ मिनिटे. (संपादन १ : डिग्री कोणती (फॅरनहाईट की सेल्सिअस तो जरा झोल आहे. योग्य शोध घेऊन जमल्यास पुन्हा एडिटेन. सध्या अमितव म्हणताहेत ते योग्य असेल असे वाटते आहे म्हणून बदलले.)


या १५ मिनिटांत वरण करून होते. बट्टीवर आपल्या बेताने हवं तितकं कमी/जास्त तूप टाकून - माझ्या बेताने १ चमचाभरच घातलंय. नॉर्मली बट्टी निखार्‍यातून काढली की तुपात बुडवून काढतात.
तेव्हा तब्येतीत बट्टी चुरून, त्यावर घट्ट वरण घालून..

एंजॉय!

हॅपी इंडिपेंडन्स डे!

वाढणी/प्रमाण: 
५ बट्ट्या केल्या, दोघांत २-२ खाऊन ५वी कुस्करून साखरतुपासोबत संपली.
अधिक टिपा: 

इतक्या पट्कन अन मस्त बट्ट्या होतील असं वाटलं नव्हतं.

कणीक मळण्यापासून बट्ट्या शेकण्यापर्यंत संपूर्ण काम मी केले आहे. वरण व भाजी सौ. सौ.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक पदार्थ, ए.फ्रा.साठी माझे प्रयोग.
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

छान दिसतेय बाटी. बाटी वळताना आतून पोकळ ठेवायची ही ट्रिक मारवाडी मैत्रिणीच्या आईने सांगितलेली.

मी तूप पातळ करून घेते व त्यात बाटी बुडवून चटकन बाहेर काढते. खूप थोडे तूप आतवर जाते व चवही चांगली येते.

मस्त आयडिया! बाट्या फोटोत पण खुसखुशीत दिसतायत! मला कोणीही 'परमहंस' भेटला नसल्याने कधी चांगली म्हणावी अशी दाल बाटी खाल्लेली नाही. त्यामुळे दाल बाटी हा प्रकार घरी करण्याचा उत्साह असा नाही.

मस्त आयडिया! बाट्या फोटोत पण खुसखुशीत दिसतायत! मला कोणीही 'परमहंस' भेटला नसल्याने कधी चांगली म्हणावी अशी दाल बाटी खाल्लेली नाही. त्यामुळे दाल बाटी हा प्रकार घरी करण्याचा उत्साह असा नाही.

खूप सारं तूप घालून दालबाटी... अहाहा!!!
मस्त दिसतंय सगळं प्रकरण. आता जवळपास राजस्थानी रेस्टॉरंट शोधणं भाग आहे Happy

मस्तच, अगदी तोपासू
यावेळी मी नक्की try करणार

थोडेसे अवांतर.
तुमची पोटॅटो वेगिस गेल्या महिन्यात बनविली होती मी ग्रील न कनवेक्षण मोड वर, मस्त झाली होती. ☺️

एअर फ्रायर नसेल तर कशी करणार?>>> ओव्हन मध्ये होतात

https://www.maayboli.com/node/43986

मस्त दिसताहेत बाट्या.

बट्टी साठी सुमारे दीड पोळी ची लाटी होईल इतका गोळा घेऊन हाताने मोदकाची पारी करतो तसा वळवायचा. आत तेल लावायचं, अन मोदक स्वतःवर बंद करायचा. परत त्याला दाबून तेल लावून पोकळ मोदक करायचा, पुन्हा बंद करायचा, हे असं ३-४ वेळा केलं, की बट्टीला आतून पुड बनतात, अन भाजल्यावर खुसखुशित होते. >>>> ही टिप मस्त आहे. करून बघणेत येइल.

आ.रा.रा. , दालबाटी दोन्ही एकदम मस्त दिसतंय. बाट्या खुसखुशीत झाल्या असाव्यात असं फोटोवरुनही वाटतंय. खूप छान!
हा प्रकार काही फारसा आवडीचा नाही, त्यामुळे माझं लक्ष शेजारच्या वाटीतल्या भरल्या वांग्याकडेच जास्त जातं आहे. यमी दिसतेय ती भाजी!

तोंपासु. कधा खाल्ली नाहीय पण फोटू बघून खावीशी वाटायला लागलीय. एअर फ्रायर नसेल तर कशी करणार? << +१
गॅस वर भाजुन? बेक करुन की तेलात तळुन?

बाट्या मस्त दिसत आहेत.
>> बट्टीला आतून पुड बनतात
"पुड बनतात" असा वाक्यप्रयोग पहिल्यांदाच ऐकला. म्हणजे काय?

तोंपासु. कधा खाल्ली नाहीय पण फोटू बघून खावीशी वाटायला लागलीय. >>> कर्वे रस्त्याला डहानुकर कॉलनीत रेणुका'ज थाटबाट हे भोजनालय राजस्थानी थाळीसाठी प्रसिद्ध आहे. तिथे दालबाटी मिळते. खूप प्रसिद्ध असल्याचे जाणवले. पण मला तरी नाही आवडली चव. गोड जास्त. लोक मात्र आवडीने खात होते. त्यात मराठी कुटुंबे लक्षणीय होती.

Pages