भारतात जगण्यासाठी सर्वात सुंदर शहर पुणे!

Submitted by कृष्णा on 13 August, 2018 - 09:06

नुकतीच बातमी वाचली लोकसत्तावर.

जगण्यासाठी भारतातील सर्वात सुंदर शहर पुणे!

पुणे तेथे काय उणे!!! Happy

पुण्याचे व पुणेकरांचे अभिनंदन! Happy

विशेष म्हणजे नवी मुंबई आणि मुंबई दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर! तर दिल्ली बहोत दूर थेट ६५व्या क्रमांकावर!

https://www.loksatta.com/desh-videsh-news/pune-most-livable-city-new-del...

Group content visibility: 
Use group defaults

पुणे महानगरपालिकेला सर्वाधिक कर ह्या आयटी कंपन्या, म्हणजेच गैरपुणेकर नागरिक, देतात. पेठेत राहणारे, पाट्या लावणारे आणि दुपारी झोपा काढणारे राहणारे पुणेकर किती कर भरतात?>>> कशाला देता. गैरपुणेकर मनपाला कर द्यायला ईथे आले का? तुम्हाला आमंत्रणाची अक्षत द्यायला आले होते का पुणेकर? जा आपापल्या शहरात, ती मोठी करा, त्यांचा अभिमान बाळगा. तुम्ही आलात, तुमच्यामुळे बिझनेस आला, खाद्यसंस्कृती आली, विविधतता आली. आनंदच आहे ना आम्हाला. पण ईथले होऊन रहायचे ते राहीले बाजूला, नावे ठेवायला पुढे? निदान हे शहर आपल्याला भाकरी देते त्याची तर चाड राहूद्या. ईंटरनॅशनल कंपन्या पुण्यात आल्या त्या काय मुर्ख म्हणून? त्यांना तुमची शहरे का दिसली नाहीत? तुम्ही का दाखवली नाहीत?

मी पुण्याला ट्रॅफिक साठी बरीच नावे ठेवली.
पण परवा कल्याण स्टेशन बाहेर ३ रिक्षावाल्यांनी रिव्हर्स घेताना माझ्या अंगावर रिक्षा घातल्याने, आणि एकाने कल्याण डाँबिवली या अंतराला २०० रु सांगितल्याने देजावू होऊन दाटून आले. त्याला २०० रुपये? ह्या!! असे जितल्या जमेल तितक्या तुच्छतेने म्हणून पुढे चालत जाऊन शेअर रिक्षा केली २२ रु मध्ये.लोकल ने अजून कमी झाले असते पण तिकीट कल्याण पर्यंतचे आणि रांग मोठी होती.
मुळात जिथे रस्ते अरुंद आणि लोकसंख्या जास्त ती सगळी शहरे सारखीच. आपल्या इथे आधी घरं बनतात, आणि मग घराकडे जायला रस्ते बनतात.त्यामुळे एक्स्पांशन, रुंदीकरण वगैरे ला स्कोप नसतो. हिंजवडी गावठाण चे पण तेच.रस्ता मोठा करायचा तर गाववाल्यांचे धंदे आणि घरं हटवावी लागणार, त्याला कोण परवानगी देईल्?ती बनतानाच लक्ष घातले असते तर चांगले प्लॅनिंग झाले असते.
तरी आता केपीअयटी बाहेरचे दर सोमवारी सकाळी जमणारे टॉमेटो पोती, भाज्यांचा कचरा वगैरे हिंजवडी इंडस्ट्री असोसिएशन ने साफ करायला घेतलेय असे ऐकून आहे.

शाली अहो इतकी का चीड. प्रांतवाद कसा जाणार मग जर तुम्ही इतर प्रांतातील लोकांना स्वीकारले नाही तर.

अ‍ॅडमिन, हा धागा सकाळी कुठल्यातरी ग्रुपात होता, आता डँगलिंग झालाय. कुठल्याच ग्रुपात नाहीये.

अहो च्रप्स, स्वीकारतोच आहोत. नाईलाजाने नाही, आनंदाने. या सगळे, मस्त नांदू या शहरात. पण ईथली चितळेची बाकरवडी आवर्जुन गावी नेता आईला आवडते म्हणून, आणि चितळे? नाव हो नुसतं, काय खरं नाही! म्हणता याला काय अर्थ आहे का? ऊगाच आपलं नाव ठेवायचं. ईथे यायचं, फ्लॅट वगैरे घ्यायचा, ईथेच रुजायचं, तरीही नावे ठेवायची हे काही पटत नाही बुवा. गावाचा अभिमान असावा ना, असायलाच हवा. पण दुसऱ्या गावी गेलो की त्याला नावे कशाला ठेवावी? दांभीकपणा आहे हा.

मूळ पुणेकर राहिले तरी किती आहेत आता ☺️
आणि पुण्याला नावे ठेवणारे गैरपुणेकर जे आहेत ते मराठी लोक असतात.इतर जिल्ह्यातील. वरच्या प्रतिसादातून कळतंच आहे किती लोक नावे ठेवत आहेत पुण्याला.
त्यामुळे तुमच्या मुद्द्याशी काही अंशी सहमत.
अमराठी लोकांना आवडते पुणे आणि कौतुक पण असते त्यांना.

लोकल ने अजून कमी झाले असते पण तिकीट कल्याण पर्यंतचे आणि रांग मोठी होती.....
Submitted by mi_anu on 13 August, 2018 - 23:31

> UTS on mobile हे app डाउनलोड करा आणि आपल्या मोबाईलवरूनच तिकीट काढा!
https://play.google.com/store/apps/details?id=com.cris.utsmobile

पुणेकर म्हणज कोण ? पुनवडी, भांबुर्डा गावचे गावकरी कि
नंतर कोकणातून येऊन वसवलेल्या पेठांतले पेठकर. त्यातही कसबा, शनिवार, सदाशिव, नारायण इथला पुणेकर की
पुण्यात असून नसल्यासारख्या गुरूवार, मंगळवार, सोमवार, गंजपेठ, घोरपडे पेठ इथला पुणेकर ?
खालच्या पेठांचा इतिहास तर कुणाला माहीतही नसेल.

पुण्याला पहिला क्रमांक मिळाल्यामुळे जितके पुणेकर सुखावले नसतील तितके बाकीचे दुखावलेले आहेत. पुण्यात आता मूळ पुणेकर जेमतेम ३५ % आहेत. ६५ % लोक बाहेरून आलेले आहेत. स्वतःच्या गावात धड शिक्षण मिळेल ह्याची शाश्वती नसलेले, स्वतःच्या गावात पुरेश्या पगाराचे व योग्य ते काम मिळण्याची शक्यता नसल्याने स्वत्व सोडून पुण्याकडे धावत सुटलेल्या लोकांनी पुणे बरबाद केलेले आहे. स्वतःची शहरे पुण्यासारखी करता येण्याचा वकूब किंवा कुवत तर नाहीच, पण जिथे फुकट चांगले पाणी, चांगली हवा मिळते तिथे जाऊन राडे करण्याचा आणि वर पुणेकरांनाच माणुसकी नाही म्हणण्याचा छपरी स्वभाव असतो ह्या लोकांचा! ह्या लोकांसाठी काँक्रीटची जंगले उभारली जात आहेत. त्या पु ल देशपांडेंनि एक लेख काय लिहिला पुणेकरांवर, ती जणू पत्थर की लकीर ठरली. इथे दुपारी बर्फी खायची गरजच भासत नाही तर दुकान उघडे हवे कशाला? पण आता तेही उघडे असते. त्याचे कारण काय तर ज्यांना कोणत्याही वेळी काहीही आठवते त्या नॉन पुणेकरांसाठी!

सगळी कॉलेजेस आणि हिंजवडी बंद केले तर पुणे पुन्हा पहिल्यासारहे होईल. त्यातही ऑटो हब बंद केली तर थेट १९७० सारखे हिल स्टेशनच होईल. पण मग ह्या लाखो परप्रांतियांचे संसार कसे चालणार? दिल्लीतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी इथे येऊन बापाचे पैसे उडवून तिकडे परत जाऊन लग्नात हुंडा कसा मागता येणार?

यायचं इथेच, राहायचं इथेच, कमवायचं इथेच, कुटुंब चालवायचं इथेच, शहराचे गटारही करायचे आणि वर तोंड करून शिव्याही द्यायच्या शहराला! व्वा! आणि हे बोलले की म्हणे प्रांतवाद नाहीतर आता व्हिसा लागू करणार का वगैरे!

Lol

सकाळ , संध्याकाळ परप्रांतियांना एकतर फटके दिले पाहीजेत किंवा त्या ह्यांच्या गझला वाचायला दिल्या पाहीजेत.

अर्र काय बालीश पणा आहे हा. एखाद्या लहान मुलासारखं पहिला नंबर पहिला नंबर करुन भांडताहेत.
कोण कुठली समिती नंबर वाटत सुटलीये? आणि इथले आयडी पण काही विषय असो की आलेच आपलाच हेका दाखवायला.
शाली तुमचे प्रतिसाद वाचुन तर हसायलाच आलंय.
पुण्याला पहिला क्रमांक मिळाल्यामुळे जितके पुणेकर सुखावले नसतील तितके बाकीचे दुखावलेले आहेत. >>>>> काहीही Lol

परप्रांतीयांनी पुणे बरबाद केलंय?
पण पुण्याला तर पहिला क्रमांक मिळालाय ना!
खरं काय ते नक्की ठरवा बघू.

मूळ पुणेकरांनी इथले शुद्ध पाणी, मोकळी हवा यांची निर्मिती केली. नद्या निर्माण केल्या. नंतर आलेले फुकटे त्याचा लाभ घेऊन पुण्याला नावे ठेवतात म्हणजे काय ? त्यांनी पुण्याला समुद्र खणून दाखवावा.

कोण कुठली समिती नाही हो. Union ministry for housing and urban affairs.
जागतिक निविदा मागवल्यात. जागतिक बँकेने पैसे दिलेत.
livibality index आहे. पुण्याचा स्कोर 58.11/100
नवी मुंबई 58.02 मुंबई 57.78 1 ठाणे सहावं आहे.
१११ शहरांचं सर्वेक्षण केलेलं.

मूळ पुणेकरांनी इथले शुद्ध पाणी, मोकळी हवा यांची निर्मिती केली. नद्या निर्माण केल्या. नंतर आलेले फुकटे त्याचा लाभ घेऊन पुण्याला नावे ठेवतात म्हणजे काय ? >>> अहो ते मुळातच होतं इथं. निर्मीती कसली करताय डोबलाची? आणी प्रदुषणासाठी पुणेकर- नॉन् पुणेकर तेवढेच जबाबदार आहेत, काय समजलीव?

पुणे सुंदर आहेच पण मोस्ट लिव्हेबल करता हा शब्द समर्पक वाटत नाही.

पुणे मुंबई नवी मुंबई आणि ठाणे ही चार शहरे या यादीत पहिल्या दहात आहेत या करता मला एक महाराष्ट्रीय म्हणून आनंद आहे. मराठी लोकांची सर्वसमावेशकता यात दिसून येते.

या चारही शहरात उणे काय ते नाहीच असे जरी नसले तरी ही क्रमांकवारी तुलनात्मक दृष्ट्या योग्यच आहे असे म्हणण्यास भरपूर वाव आहे.

Union ministry for housing and urban affairs.
जागतिक निविदा मागवल्यात. जागतिक बँकेने पैसे दिलेत.
livibality index आहे. पुण्याचा स्कोर 58.11/100
नवी मुंबई 58.02 मुंबई 57.78 1 ठाणे सहावं आहे.
१११ शहरांचं सर्वेक्षण केलेलं.> >>>>>>>>> बै बै बै काय तरी एकेक Lol

livable कि lovable हे नीट पहायला हवे.
Art of Living मध्येही हाच घोळ होतो नेहमी.

हे 'बै बै बै' म्हणजे गाण्यांमध्ये यार वै वै वै असतं तसं वाटतं.

यार वै वै वै>>> हे गाणं माहित नाही.
ते बै बै बै असं पुण्यातले लोक म्हणत असावेत असं मला वाटल्याने लिहिलं.

अर्र काय बालीश पणा आहे हा. एखाद्या लहान मुलासारखं पहिला नंबर पहिला नंबर करुन भांडताहेत.
कोण कुठली समिती नंबर वाटत सुटलीये? आणि इथले आयडी पण काही विषय असो की आलेच आपलाच हेका दाखवायला.
शाली तुमचे प्रतिसाद वाचुन तर हसायलाच आलंय.
पुण्याला पहिला क्रमांक मिळाल्यामुळे जितके पुणेकर सुखावले नसतील तितके बाकीचे दुखावलेले आहेत. >>>>> काहीही >>>> +११११११

हे ना सगळीकडेच असते, अगदी पुण्यातील कितीतरी जनता पुणे सोडुन दुसर्या शहरांत गेली आहेच की. मग ईतकेच पुणे चांगले आहे तर त्यांनी का बरे सोडले असवे ते शहर

असो

बाकी पुणेकर कुठेही असोत, पुणे , ईतर कुठलेही शहर वा माबो, त्यांच्या ऊध्दट, चिडखोर आणी गरज नसताना माज करण्याच्या स्वभावामुळे लगेच ओळखु येतात

आवरा!

बाकी पुणेकर कुठेही असोत, पुणे , ईतर कुठलेही शहर वा माबो, त्यांच्या ऊध्दट, चिडखोर आणी गरज नसताना माज करण्याच्या स्वभावामुळे लगेच ओळखु येतात >> नाही हो, तोल ढळू न देता, समोरच्याच्या क्षोभाची पर्वा न करता त्याच्या नाकातले केस जळतील असे पण चटकन लक्षात न येईलसे आणि आले तरी काही न करता येण्यासारखे बोलतात ते पुणेकर.

बरं, या धाग्यातून कोणकोणते उपधागे निघू शकतात त्यांची जबाबदारी कुणी घेणार आहे का तरच पुढे चर्चा करण्यात अर्थ.

Pages