प्रेम की आकर्षण… (भाग १)

Submitted by अतुल असवले on 12 August, 2018 - 03:20

प्रेम की आकर्षण…

जुलै महिन्यात ला पहिला आठवडा संध्याकाळी 6 ची वेळ पाउसाल्याचे दिवस होते ट्राफिक खूप जॅम झालं होतं.बस स्टॉप वर प्रवाश्यांची गर्दी वाढत होती त्यामुळे नेहेमी कॉलेज सुटल्या नंतर 5:45 ची बस पकडून घरी जाणारी प्रिया अजूनही बस स्टॉप वरच ताटकळत उभी होती.
दुसरीकडे अमोलच कॉलेज सुटायची वेळ झाली , कॉलेज सुटलं अमोल बस स्टॉप वर जायला निघाला तस अमोल च कॉलेज बस स्टॉप पासून फक्त 10 मिनिट अंतरावर तो बस स्टॉप वर पहोचताच बघतो तर काय गर्दी ने बस स्टॉप संपूर्ण भरलेला होता आणि बस पण लेट “बापरे आता काय करणार ” अस म्हणून तो बसच्या लाइन मध्ये उभा राहिला.
बस ची वाट बघत असताना अमोल ची नजर बस स्टॉप च्या बाजूला बसलेल्या भिकारया कडे गेली तो संपूर्ण भिजलेला होता थंडी ने तो कुडकुडत होता. तेवड्यात तो भिकारी अमोल जवळ आला त्याने अमोल कडे पाहिले आणि आपला हात अमोल कडे केला. अमोल कधी कोणत्या भिकारया ला पैसे देत नव्हता कारण त्याला अस वाटायचं की ही लोक काम का करत नाहीत. पण ह्या वेळी मात्र अमोल ने काहीच विचार न करता आपल्या खिशात हात घातला आणि 5 रुपये काढून त्याच्या हात वर ठेवले त्या वर भिकारी च्या चेऱ्यावर हलके से हसू आले आणि म्हणाला “बाळा देव तुझं कल्याण करो”.
हे ऐकून अमोल ला ही बरं वाटलं आणि तो बसची वाट बघू लागला तेवड्यात त्याची नजर दुसऱ्या रांगेत ऊभी असलेल्या मुली कडे गेली म्हणजेच प्रिया कडे. तिला बघतच अमोल चा मेंदू आणि ह्रुदय अस्वस्थ झाले त्याला काही सुचत नव्हतं करणं ती दिसायला फारच सुदंर होती .अमोल तिच्याकडे बघतच राहिला ते म्हणतात ना “love at first sight” तस काही स झालं त्याच.
तेवड्यात बस अली प्रिया बस मध्ये चढली अमोल पण रांगे मध्ये जात होता पण तो बस मध्ये चढणार तेवड्यात बस फुल झाली अमोल खालीच राहील बस गेली पण अमोल च मन मात्र अस्वस्थ करून गेली.अमोल दुसऱ्या बस ने घरी आला पण त्याचा मनात तिच्या बदल चे विचार काय थांबत नव्हते.अमोल ने विचार केला की उद्या कॉलेज मधून लवकर निघायच आणि तिला बघायच.
दुसरा दिवस उगवला अमोल नेहेमी पेक्षा लवकरच उठला तयार झाला आणि कॉलेज ला जायला निघाला जाताने त्याने आज देवा समोर हात जोडले कधी परीक्षा च्या वेळी देवा समोर हात न जोडणारा अमोल हात जोडून म्हणाला “देवा आज पण ती दिसु दे” अस म्हणून तो निघाला.कॉलेज ला जाताने पण त्याच्या मनात तिचाच विचार होता त्याचे डोळे बस च्या खिडकीतून तिलाच शोधत होते “कुठे दिसते का??”. कॉलेज ला पोहचल्यावर पण तो संध्याकाळ कधी होतीय ह्याची वाट बघत होता 5 ला लेक्चर सुटल. शेवटचं लेक्चर बंक करून तो बस स्टॉप कडे निघाला . कॉलेज पासून बस स्टॉपचे 10 मिनिटाचे अंतर त्याने अवघ्या 5 मिनिटात गठल.
बस स्टॉप वर जाऊन तो बाजूला उभा राहिला आणि तिची वाट बघत बसला.तेवड्यात त्याची नजर त्या भिकारया कडे गेली जो काल त्याला भेटला होता भिकारया च लक्ष नव्हतं पण अमोल स्वतःहून त्या जवळ गेला आणि त्याला म्हणाला “राम राम काका” आणि त्याला पैसे दिले भिकारी पण चकित झाला अशी वागणूक त्याला कधी भेटली नव्हती भिकारया ने त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला “देव तुज्या सर्व इच्छा पूर्ण करो”. अमोल ला ही ऐकून प्रसन्न वाटलं तेवड्यात त्याची नजर प्रिया वर पडली तिला बघताच हा पुन्हा अस्वस्थ झाला ती त्याचा बाजूने गेली आणि रांगेत उभी राहिली ह्याने पण वेळ वाया न घालवतो तिच्या मागे जाऊन उभा राहिला.प्रिया ला त्याची काहीच कल्पना नव्हती पण अमोल मात्र तिला सर्वस्व मानून बसला होता.
थोड्याच वेळात बस अली दोघेही बस मध्ये चढले प्रिया जाऊन ladies सीट वर बसली आता अमोल चा प्लॅन फ्लॉप झाला त्याला वाटलं तिच्या बाजूला बसायला भेटेल पण काय करणार म तो 2 सीट मागे जाऊन बसला कंडक्टर तिकीट तिकीट करत पुढे येत होता अमोल ने विचार केला आता ही तिकीट घेईल तेव्हा त्याला तिच्या स्टॉप चे नाव समजेल.कंडक्टर तिच्या जवळ आला “तिकीट तिकीट” अस विचारलं अमोल कान लावून बसला होता तिच्या स्टॉप च नाव ऐकायला पण तिने पर्स मध्ये हात टाकला आणि पास दाखवला अमोल चा हिते ही पोपट झाला आता कंडक्टर अमोल कडे आला तिकीट अस विचारता अमोल ने पास दाखवायला खिशात हात घातला म त्याला सुचलं जर त्याचा स्टॉप तिच्या स्टॉप च्या आधी असेल तर त्याला कस समजणार ती कुठे रहाते म त्याने दुसऱ्या खिशात हात घातला आणि 20 रुपये ची नोट काढली आणि कंडक्टर ला म्हणाला “काका एक शेवटचं स्टॉप च तिकीट द्या’.तिकीट हातात घट्ट धरून तो वाट बघू लागला तिचा स्टॉप कधी येतो आणि थोड्याच वेळात तिचा स्टॉप आला अमोल च्या स्टॉप च्या 2 स्टॉप अलीकडे ती रहात होती ती उतरली अमोल तिच्याकडेच पहात होता बस निघाली आता अमोल ने हातातल तिकीट कडे बगत हसला आणि मानतच म्हणाला “15 रुपये वाया गेले. ही तर जवळच राहाते”. पण अमोल आज मात्र फार खुश होता त्याला जे हव होत ते त्याला मिळाल होत.अमोल घरी आला जाम खुशीत होता आईने बघताच विचारलं “काय म आज चिरंजीव जास्तच खुशीत दिसतायत”.अमोल लाजत “काही नाही ग आई” अस म्हणून आतल्या खोलीत गेला.
अमोल आता रोज रात्री सकाळ कधी होते आणि सकाळी सांध्याकाल कधी होते ह्याची वाट बघू लागला.
अस करत 2 दिवस झाले अमोल रोज शेवटचं लेक्चर बंक करून तिला भेटण्यासाठी येत होता न चुकता भिकारया ला पैसे देत होता.
एक दिवस आला अमोल ने तिच्याशी बोलण्याचे ठरवले नेहेमी प्रमाणे तो बस स्टॉप वर गेला परत भिकारी काका ला हाक मारून पैसे दिले नेहेमी प्रमाणे त्यांनी त्याला आशीर्वाद दिला. प्रिया तिच्या नेहेमी च्या वेळी बस स्टॉप वर पोहोचली हा हळूच बाजूला जाऊन उभा राहिला आणि मोठा श्वास घेऊन “हाय मी अमोल” अस बोला. तिने आश्चर्यने बघितल “हिते कोण माज्या ओळखीचे आले” असा मनातच विचार केला आणि अमोल कडे बघितले तर ती थोडी घाबरली कारण ती त्याला ओळखत नव्हती. ती काहीच नाही बोली अमोल पण गप्प झाला आपल्या पहिल्या वाक्याच उत्तर म्हणून ती काहीतरी बोलेल तेवड्यात बस अली ते दोघे बस मध्ये चढले नेहेमी प्रमाणे ती ladies सीट वर बसली अमोल च मन मात्र अस्वस्थ होत कारण ति काहीच बोली नव्हती . प्रिया चा स्टॉप आला ती उतरली मात्र आज उतरताने तिने हळूच अमोल कडे बघून गोड अशी हसली.अमोल ला हे बघून खूप आनंद झाला एवढा की तिच्या विचारात तो 2 स्टॉप फुडे निघून गेला.त्याला हे कळताच तो स्वतावर हसू लागला.आज ही तो घरी आल्यावर रूम मध्ये गेला आणि त्याने तिला पत्र लिहायचे ठरवलं.

—- अतुल लक्ष्मण असवले

Next part will be out soon stay tunned….

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Submitted by च्रप्स on 12 August, 2018 - 21:15
पुढील भागाच्या प्रतिक्षेत. >>+१