आजपर्यंत बरेच पदार्थ बनवलेत पण कधीच प्रमाण ठरवून नाही बनवले. म्हणजे हे एक वाटी, हे एक चमचा अशी गरज पडली नाही, पण इथे पा.कृ. टाकायची म्हणजे प्रमाण आलं( डोक्याला शॉट नुसता)
सारणासाठी साहित्य-
शेंगदाणे:- दोन वाटी
गूळ:- एक ते दीड वाटी
इलायची पावडर:-(ऑप्शनल) आवश्कतेनुसार
तेल/तूप:- पोळ्या भाजण्यासाठी
पुरणपोळी, चपाती बरेचजणांनी बनवली असेल(खाता सगळ्यांनाच येते त्यात काय) तर पुरणपोळीसाठी जशी कणीक लागते अगदी तशीच कणीक मळून घ्यायची साधारण दोन-अडीच वाट्या( हे काम आपापल्या अंदाजाने करा ब्वा थोडी जास्तंच घ्या उरलीच कणीक तर चपाती करायची )
१. शेंगदाणे निवडून घ्यायचे.(खराब झालेले शेंगदाणे आणि कधी कधी खडे असतात ते काढून टाकायचे.)
२. आता निवडले शेंगदाणे छान भाजून घ्यायचे.( न करपवता)
३. शेंगदाणे थंड झाले की त्याची सालं/फोलपाटे जे काही असेल ते हाताने चोळून काढून टाकायची.
४. आता त्याचा मिक्सरमधून बारीक कूट करून एका भांड्यात काढून ठेवायचा आणि गूळ मिक्सरमधून फिरवून घ्यायचा( त्याआधी गूळाचे छोटे छोटे खडे करून घ्या म्हणजे मिक्सरमध्ये सहज फिरला जाईल.)
५. शेंगदाण्याचा कूट आणि गूळ एकजीव करा. आता त्यात वेलची घालून मिक्स करा.
६. कणकेचा चपातीला लागेल एवढा गोळा घेऊन त्याची वाटी करा( पु.पो.साठी बनवतो तशी) त्यात कूट-गूळ मिश्रण भरून त्याच्या कडा बंद करा.(पूर्ण पु.पो.ची प्रोसेस.) आता पोळपाटावर हा गोळा ठेवून लाटण्याने हलकेच लाटायची पोळी.
आता भाजायची कशी ते पण सांगायचं का? अवघड आहे....
७. मध्यम आचेवर तवा तापत ठेवायचा, त्यावर तेल/तूप लावून (पोळी तव्याला चिकटत नाही) त्यावर पोळी दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची.
१. ही पोळी गरमागरम खाऊ नये. (छान लागते तरीही) थंड होण्याची वाट बघावी थोडा वेळ.
२.या पोळ्या बरेच दिवस टिकतात, त्यामुळे जास्त प्रमाणात करू शकता.
वरती फोटो देता येत नाही
वरती फोटो देता येत नाही म्हणून प्रतिसादात देतेय...
Wow पण मी गुळाची पावडर आणेन
Wow पण मी गुळाची पावडर आणेन म्हणते कारण गूळ मी गेल्याच महिन्यात मिक्सर मध्ये फिरवलेला. त्याची पावडर न होता तो गूळ पातळ होऊन मिक्सर च्या भांड्याला चिकटून बसला.
मला रेसिपी आवडली. लवकर करण्यात येईल. बाळाला टिफिन ला द्यायला.
माझी फेवरेट डिश. एकदा
माझी फेवरेट डिश. एकदा गरमगरम खायचा प्रयत्न केला होता. जिभेला फोड आलेले.
आता थोडी कळ काढायला शिकलेय पोळ्या थंड होईपर्यंत.
मस्त पाकृ!
मस्त पाकृ!
अनिश्का, अशावेळी गुळ बारीक किसला तरी काम होते. गुळाच्या पावडरला गुळाईतका खमंगपणा नसतो असा माझा अनुभव.
पवनपरी, वॉटरमार्क असा टाकलाय
पवनपरी, वॉटरमार्क असा टाकलाय की जणू कुणी पोळ्या पळवूनच नेणारे तुमच्या
अनिश्काताई धन्स ....गूळ पातळ
अनिश्काताई धन्स ....गूळ पातळ झाला तरी काही फरक पडत नाही मुळात कूटापेक्षा गूळाचं प्रमाण कमी आहे त्यामुळे दोन्ही एकत्र करता त्याची कंटस्टंसी बरोबर होते.
मी चिन्मयी धन्स जीभेला नाही पण शेंगदाणे गरम असताना सोलून हाताला फोड आलेला
शाली सर धन्स बरोबर आहे गूळाची चव पावडरला नाही येणार. आणि गुळाचे पण प्रकार आहेत नं? काळा, पांढरा लाल. बहुतेक लाल गुळाला लगेच पाणी सुटतं म्हणून पातळ होतो.
पवनपरी, वॉटरमार्क असा टाकलाय की जणू कुणी पोळ्या पळवूनच नेणारे तुमच्या Lol Light 1>>> हो तर आता दोन्ही पोळ्या लॉक केल्या आहेत आता चोराची काय बिशाद खरं म्हणजे एका अॅपवरून केलंय ते काम टेक्स्ट साईज कमी होत नव्हती त्याला मी काय करणार...
बरं झालं रेसिपी टाकलीस परीतै!
बरं झालं रेसिपी टाकलीस परीतै! आईला बनवायला सांगावं लागेल!
पवनपरी, वॉटरमार्क असा टाकलाय
पवनपरी, वॉटरमार्क असा टाकलाय की जणू कुणी पोळ्या पळवूनच नेणारे तुमच्या Lol >>>
मस्त डिश आवडली
पवनपरी, वॉटरमार्क असा टाकलाय
पवनपरी, वॉटरमार्क असा टाकलाय की जणू कुणी पोळ्या पळवूनच नेणारे तुमच्या>>
वा छान परी
जुई, पंडित दादा, किल्लीताई
जुई, पंडित दादा, किल्लीताई धन्स
जुई हो सांग तू आईला बनवायला बनवली तर फोटोही टाक.
किल्लीताई तुही बनवून बघ बरं का
छान रेसिपी. आमच्याकडे पण बर्
छान रेसिपी. आमच्याकडे पण बर्याचदा होते!
गुळ किसून घ्यायचा आणि शक्यतो लाल गुळ घ्यावा पिवळ्यापेक्षा म्हणजे जास्त खमंग लागते!
गरम पोळी खाताना चटका शेंगदाण्या पेक्षा गुळामुळे जास्त बसतो!
छान रेसिपी. आमच्याकडे पण बर्
...
मस्त आहे कृती. करुन पहाणार.
मस्त आहे कृती. करुन पहाणार. गुळाच्या पोळ्यांपेक्षा सोप्या आहेत का करय्यला ?
धन्स कृष्णा सर आम्हीही लाल
धन्स कृष्णा सर आम्हीही लाल गूळंच घेतो आणि उष्णतेने गूळ वितळतो तो थंड व्हायला वेळ लागतो.
मस्त आहे कृती. करुन पहाणार. Happy गुळाच्या पोळ्यांपेक्षा सोप्या आहेत का करय्यला ?>>>धन्स अनघाताई मला तरी सोप्या वाटतात... तुम्ही करून सांगा सोप्या अवघड जो अनुभव येईल तो.
अरे वा चांगला वाटतोय प्रकार !
अरे वा चांगला वाटतोय प्रकार ! मी नव्हती ऐकली कधी .. अल्मोस्ट गूळपोळीसारखीच वाटतेय .. तशीच होते का ? कडक/पण तरी खुसखुशीत ?
गूळ मिक्सर मध्ये फिरवलेला. त्याची पावडर न होता तो गूळ पातळ होऊन मिक्सर च्या भांड्याला चिकटून बसला>>> हो ना माझा पण सेम अनुभव
गुळाची नाटक फारच सांभाळावी लागतात ..
किती दिवस टिकेल हि पोळी ? ५/६ दिवस टिकत असेल तर प्रवासात न्यायला बरी पडेल ..
पाप लागेल तुला मुली.
पाप लागेल तुला मुली.
मला खाऊ घाल ना.
किती तोंपासु दिसतायत या पोळ्या
छान दिसतेय पोळी. आमच्याकडे
छान दिसतेय पोळी. आमच्याकडे अशी तिळ्गुळाची पोळी करतात सन्क्रान्तीला.
मस्त आहे कृती. करुन पहाणार>>>
मस्त आहे कृती. करुन पहाणार>>>>> मीही.
किती तोंपासु दिसतायत या
किती तोंपासु दिसतायत या पोळ्या>> +११
शाली चालेल. गूळ चिरायची
शाली चालेल. गूळ चिरायची आयडिया चांगलीय. थँक्स....
पवनपरी गुळाची कनसिस्टंसी कमी असते हे मी मिस केलेलं. थँक्स दोघांना पण...
Submitted by anjali_kool on 8
Submitted by anjali_kool on 8 August, 2018 - 15:00>>> धन्स अंजलीताई हो छान कडक खुसखुशीत होते आणि आठवडाभर टिकतंच असेल( आमच्याकडे शिल्लक राहत नाही इतके दिवस) आणि गूळ चिरून, कीसून कसाही चालेल. मी केलेला पातळ झाला होता पण त्याने काहीही फरक पडला नाही.
पाप लागेल तुला मुली.
मला खाऊ घाल ना.
किती तोंपासु दिसतायत या पोळ्या>>> दक्षिणाताई पाप जमलं तर नक्की खाऊ घालीन तोपर्यंत तुम्ही ट्राय करा
मस्त आहे कृती. करुन पहाणार>>>>> मीही.>>> धन्स देवकी ताई नक्की करून पाहा
पवनपरी गुळाची कनसिस्टंसी कमी असते हे मी मिस केलेलं. थँक्स दोघांना पण...>>>
फुरसुंगीला एका धाबा कम
फुरसुंगीला एका धाबा कम हॉटेलात शेंगा-पोळी या नावाने खाल्ली होती ती हीच असावी.
फार हेवी होते राव ! दाणे - गूळ सगळेच भक्कम आयटेम आहेत.
फोटोत खरच छान दिसताहेत पोळ्या .... नुसते पाहूनही समाधान वाटले!
धन्स पशुपत सर सोलापूकडे खूप
धन्स पशुपत सर सोलापूकडे खूप हॉटेल्स मध्ये शेंगापोळी मिळते पण कधी खाल्ली नाही बाहेरची...
छान दिसतेय ही पाकृ. कधी
छान दिसतेय ही पाकृ. कधी खाल्ली नव्हती अशी पोळी.
करून / करवून बघायलाच हवी.
मस्तच!
मस्तच!
नुसते भाजलेले शेंगदाणे आणि गूळ हा माझा लहानपणापासूनचा अत्यंत आवडता खाऊ आहे. आता अशी पोळी करून बघायला पाहिजे.
मानव सर, विशाखाताई धन्स
मानव सर, विशाखाताई धन्स तुम्हीही करून बघा आणि सांगा
मस्त दिसतेय शेंगदाणा पोळी.
मस्त दिसतेय शेंगदाणा पोळी. मी लहानपणी खाल्लेली आहे आणि आता नक्की करुन बघणार.
आमच्या ओळखीतले एकजण मूळ बेळगावचे होते. ते जेव्हा कधी गावी जायचे तेव्हा शेंगदाणा पोळी आणि शेंगदाण्याच्या करंज्या आठवणीने भेट म्हणून आणायचे. लहानपणीची फार गोड आठवण आहे ही.
शेंगदाण्याच्या करंज्यांची चव अजूनही आठवतेय मला. त्याचीही पाकृ माहिती असेल तर दे गं.
धन्स निधीताई मी कधी
धन्स निधीताई मी कधी शेंगदाण्या करंज्या बनवल्या नाहीत, आईला विचारून बनवेन आणि छान जमल्या तर देईन पा.कृ.