शेंगदाणा पोळी

Submitted by आरू on 8 August, 2018 - 03:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आजपर्यंत बरेच पदार्थ बनवलेत पण कधीच प्रमाण ठरवून नाही बनवले. म्हणजे हे एक वाटी, हे एक चमचा अशी गरज पडली नाही, पण इथे पा.कृ. टाकायची म्हणजे प्रमाण आलं( डोक्याला शॉट नुसता) Lol

सारणासाठी साहित्य-
शेंगदाणे:- दोन वाटी
गूळ:- एक ते दीड वाटी
इलायची पावडर:-(ऑप्शनल) आवश्कतेनुसार
तेल/तूप:- पोळ्या भाजण्यासाठी
पुरणपोळी, चपाती बरेचजणांनी बनवली असेल(खाता सगळ्यांनाच येते त्यात काय) तर पुरणपोळीसाठी जशी कणीक लागते अगदी तशीच कणीक मळून घ्यायची साधारण दोन-अडीच वाट्या( हे काम आपापल्या अंदाजाने करा ब्वा थोडी जास्तंच घ्या उरलीच कणीक तर चपाती करायची Wink )

क्रमवार पाककृती: 

१. शेंगदाणे निवडून घ्यायचे.(खराब झालेले शेंगदाणे आणि कधी कधी खडे असतात ते काढून टाकायचे.)
२. आता निवडले शेंगदाणे छान भाजून घ्यायचे.( न करपवता)
३. शेंगदाणे थंड झाले की त्याची सालं/फोलपाटे जे काही असेल ते हाताने चोळून काढून टाकायची.
४. आता त्याचा मिक्सरमधून बारीक कूट करून एका भांड्यात काढून ठेवायचा आणि गूळ मिक्सरमधून फिरवून घ्यायचा( त्याआधी गूळाचे छोटे छोटे खडे करून घ्या म्हणजे मिक्सरमध्ये सहज फिरला जाईल.)
५. शेंगदाण्याचा कूट आणि गूळ एकजीव करा. आता त्यात वेलची घालून मिक्स करा.
६. कणकेचा चपातीला लागेल एवढा गोळा घेऊन त्याची वाटी करा( पु.पो.साठी बनवतो तशी) त्यात कूट-गूळ मिश्रण भरून त्याच्या कडा बंद करा.(पूर्ण पु.पो.ची प्रोसेस.) आता पोळपाटावर हा गोळा ठेवून लाटण्याने हलकेच लाटायची पोळी.
आता भाजायची कशी ते पण सांगायचं का? अवघड आहे....
७. मध्यम आचेवर तवा तापत ठेवायचा, त्यावर तेल/तूप लावून (पोळी तव्याला चिकटत नाही) त्यावर पोळी दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची.

वाढणी/प्रमाण: 
करणार्याच्या हातावर आहे.... तरीही ६-७ होतील अंदाजे.
अधिक टिपा: 

१. ही पोळी गरमागरम खाऊ नये. (छान लागते तरीही) थंड होण्याची वाट बघावी थोडा वेळ.
२.या पोळ्या बरेच दिवस टिकतात, त्यामुळे जास्त प्रमाणात करू शकता.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Wow पण मी गुळाची पावडर आणेन म्हणते कारण गूळ मी गेल्याच महिन्यात मिक्सर मध्ये फिरवलेला. त्याची पावडर न होता तो गूळ पातळ होऊन मिक्सर च्या भांड्याला चिकटून बसला.

मला रेसिपी आवडली. लवकर करण्यात येईल. बाळाला टिफिन ला द्यायला.

माझी फेवरेट डिश. Happy एकदा गरमगरम खायचा प्रयत्न केला होता. जिभेला फोड आलेले. Lol
आता थोडी कळ काढायला शिकलेय पोळ्या थंड होईपर्यंत.

मस्त पाकृ!
अनिश्का, अशावेळी गुळ बारीक किसला तरी काम होते. गुळाच्या पावडरला गुळाईतका खमंगपणा नसतो असा माझा अनुभव.

अनिश्काताई धन्स Happy ....गूळ पातळ झाला तरी काही फरक पडत नाही मुळात कूटापेक्षा गूळाचं प्रमाण कमी आहे त्यामुळे दोन्ही एकत्र करता त्याची कंटस्टंसी बरोबर होते.

मी चिन्मयी धन्स Happy जीभेला नाही पण शेंगदाणे गरम असताना सोलून हाताला फोड आलेला Lol

शाली सर धन्स Happy बरोबर आहे गूळाची चव पावडरला नाही येणार. आणि गुळाचे पण प्रकार आहेत नं? काळा, पांढरा लाल. बहुतेक लाल गुळाला लगेच पाणी सुटतं म्हणून पातळ होतो.
पवनपरी, वॉटरमार्क असा टाकलाय की जणू कुणी पोळ्या पळवूनच नेणारे तुमच्या Lol Light 1>>> हो तर आता दोन्ही पोळ्या लॉक केल्या आहेत आता चोराची काय बिशाद Lol खरं म्हणजे एका अॅपवरून केलंय ते काम टेक्स्ट साईज कमी होत नव्हती त्याला मी काय करणार... Lol

जुई, पंडित दादा, किल्लीताई धन्स Happy
जुई हो सांग तू आईला बनवायला बनवली तर फोटोही टाक. Happy
किल्लीताई तुही बनवून बघ बरं का Happy

छान रेसिपी. आमच्याकडे पण बर्‍याचदा होते!
गुळ किसून घ्यायचा आणि शक्यतो लाल गुळ घ्यावा पिवळ्यापेक्षा म्हणजे जास्त खमंग लागते!

गरम पोळी खाताना चटका शेंगदाण्या पेक्षा गुळामुळे जास्त बसतो!

धन्स कृष्णा सर Happy आम्हीही लाल गूळंच घेतो आणि उष्णतेने गूळ वितळतो तो थंड व्हायला वेळ लागतो.

मस्त आहे कृती. करुन पहाणार. Happy गुळाच्या पोळ्यांपेक्षा सोप्या आहेत का करय्यला ?>>>धन्स अनघाताई Happy मला तरी सोप्या वाटतात... तुम्ही करून सांगा सोप्या अवघड जो अनुभव येईल तो.

अरे वा चांगला वाटतोय प्रकार ! Happy मी नव्हती ऐकली कधी .. अल्मोस्ट गूळपोळीसारखीच वाटतेय .. तशीच होते का ? कडक/पण तरी खुसखुशीत ?
गूळ मिक्सर मध्ये फिरवलेला. त्याची पावडर न होता तो गूळ पातळ होऊन मिक्सर च्या भांड्याला चिकटून बसला>>> हो ना माझा पण सेम अनुभव Sad
गुळाची नाटक फारच सांभाळावी लागतात ..
किती दिवस टिकेल हि पोळी ? ५/६ दिवस टिकत असेल तर प्रवासात न्यायला बरी पडेल ..

शाली चालेल. गूळ चिरायची आयडिया चांगलीय. थँक्स....

पवनपरी गुळाची कनसिस्टंसी कमी असते हे मी मिस केलेलं. थँक्स दोघांना पण...

Submitted by anjali_kool on 8 August, 2018 - 15:00>>> धन्स अंजलीताई Happy हो छान कडक खुसखुशीत होते आणि आठवडाभर टिकतंच असेल( आमच्याकडे शिल्लक राहत नाही इतके दिवस) आणि गूळ चिरून, कीसून कसाही चालेल. मी केलेला पातळ झाला होता पण त्याने काहीही फरक पडला नाही.

पाप लागेल तुला मुली.
मला खाऊ घाल ना.
किती तोंपासु दिसतायत या पोळ्या>>> दक्षिणाताई Lol पाप Lol जमलं तर नक्की खाऊ घालीन तोपर्यंत तुम्ही ट्राय करा Happy

मस्त आहे कृती. करुन पहाणार>>>>> मीही.>>> धन्स देवकी ताई नक्की करून पाहा Happy

पवनपरी गुळाची कनसिस्टंसी कमी असते हे मी मिस केलेलं. थँक्स दोघांना पण...>>> Happy

फुरसुंगीला एका धाबा कम हॉटेलात शेंगा-पोळी या नावाने खाल्ली होती ती हीच असावी.
फार हेवी होते राव ! दाणे - गूळ सगळेच भक्कम आयटेम आहेत.
फोटोत खरच छान दिसताहेत पोळ्या .... नुसते पाहूनही समाधान वाटले!

मस्तच!
नुसते भाजलेले शेंगदाणे आणि गूळ हा माझा लहानपणापासूनचा अत्यंत आवडता खाऊ आहे. आता अशी पोळी करून बघायला पाहिजे.

मस्त दिसतेय शेंगदाणा पोळी. मी लहानपणी खाल्लेली आहे आणि आता नक्की करुन बघणार.

आमच्या ओळखीतले एकजण मूळ बेळगावचे होते. ते जेव्हा कधी गावी जायचे तेव्हा शेंगदाणा पोळी आणि शेंगदाण्याच्या करंज्या आठवणीने भेट म्हणून आणायचे. लहानपणीची फार गोड आठवण आहे ही. Happy
शेंगदाण्याच्या करंज्यांची चव अजूनही आठवतेय मला. त्याचीही पाकृ माहिती असेल तर दे गं. Happy

धन्स निधीताई Happy मी कधी शेंगदाण्या करंज्या बनवल्या नाहीत, आईला विचारून बनवेन आणि छान जमल्या तर देईन पा.कृ. Happy