पुण्यात काय कुठं

Submitted by राव पाटील on 18 July, 2018 - 01:35

इतर काही धाग्यांवर बेडेकर, पुरेपूर कोल्हापूर, वैशाली वगैरे बद्दल वाचून प्रश्न पडला की पुण्यात काय आणि कुठे खावं?
साधारण पुढील पदार्थ मला पुण्यात खायचे/ अनुभवायचे आहेत:
मिसळ
भेळ
मासे
मटण
चिकन
चायनीज
खान्देशी
कॉकटेलं

उगाच एखाद्या वाईट ठिकाणी खाऊन कायमचं त्या पदार्थासाठी नाक मुरडून बसायचे नाहीये म्हणून मायबोलीकरांच्या सूचनेनुसार अनुभूती घेण्याचे ठरविले आहे!

Group content visibility: 
Use group defaults

आमच्या वैशाली प्रोग्रॅम मध्ये कॉफी बरोबर मग लोकांच्या ब्रेड बटर च्या पण ऑर्डर्स येतात. एक जण मागवतो मग दुसरा अरे मला पण एक सांग म्हणतो, असे करत करत ऑर्डर चढत जाते.

संध्याकाळी गेलो की मात्र फ्रेश लाईम सोडा घेतला पाहिजे.

संध्याकाळी गेलो की मात्र फ्रेश लाईम सोडा घेतला पाहिजे. >>>> हो हो. फ्रेश लाईम सोडा राहिलाच. त्याचप्रमाणे संध्याकाळी मागवायच्या पदार्थात कटलेट्स आणि साबुदाणा वडा पण राहिला.

वैशाली आणि रुपाली ही फर्गसनच्या मुलांमुळे फेमस झालेली हॉटेलं आहेत. डेक्कनच्या चौकात सनराईज होतं. देव आनंदचं एक होतं डेक्कन थिएटरच्या मागे. नाज कँपातलं. यातलं वैशाली सोडून बाकीची हॉटेलं आता नाहीत. वाडीयाच्या समोरचं मधुबन आणि डिलाईट आता ओळख हरवून बसलं आहे. येरवडा भागात सुरूवातीला फेमस झालेल्या सरगम ला आता त्या भागातल्या राजकारण्यांच्या वावरामुळे उतरती कळा लागली आहे.

कल्याणी नगरला जी हॉटेलं आहेत ती जास्त करून पब्स संस्कृतीवाल्यांना मानवणारी आहेत. कोरेगाव पार्कातही तेच. तिथे संजीव कपूरचं एक रेस्तराँ आहे. आम्ही गेलो तेव्हां साडेसातशे रूपये नॉन व्हेज आणि पाचशे रूपये व्हेज. अनलिमिटेड अशी स्कीम होती. आता रेट काहीच्या काही असतील.

सिंहगड रोडला गोयल गंगा मधे शोरबा नावाचे हॉटेल आहे. फॅमिलीसहीत मस्त आहे. विशेषतं वर बार्बेक्यु सेक्शन भन्नाट. २२० पदार्थ आहेत. साडेसातशे रूपये प्रत्येकी. कितीही खा. ( हे सर्व पदार्थ खाऊन दाखवणा-याला बक्षीस द्यावं लागेल) .

देव आनंदचं एक होतं डेक्कन थिएटरच्या मागे. >>> लकी. ते देव आनंदचे नव्हते. तो तेथे पूर्वी जात असे.

पुण्यात गेल्या काही वर्षात मिळू लागलेल्या पदार्थांपैकी - विष्णूजी की रसोई मधले आवडले होते. तसेच लिटल इटली चा रविवारचा बफे - जो इटालियन पेक्षा मेडीटेरेनियन जास्त असतो, पण मस्त असतो.

- कोथरूड मधे परांजपे शाळेजवळ मिळणारे पेरू आइसक्रीम
- डेक्कन ला वाडेश्वर जवळ मिळणारे चॉ़कोलेट आइसक्रीम टाइप काहीतरी
- फासोज चे रॅप्स
- एक स्थानिक पिझा - फेमस आहे. कोथरूड स्टॅण्डच्या मागे दुकान होते/आहे. नाव नेमके आठवत नाही. पण तो मला डॉमिनोज किंवा पिझा हट च्या पेक्षा आवड्ला होता
- गंधर्व मधले कटलेट. नेहमीच आवडले आहे.

- इतक्यात आवडलेले रेस्टॉ म्हणजे बाणेर मधले त्रिकाया - चव चांगली आहे, अगदी दाटीवाटी नसते. तेथे गेलात तर एक तो कश्मिरी का जाफरानी काहीतरी नाव असलेला पुलाव आहे तो मस्त आहे.
- पुण्यात अनेक रेस्टॉ मधे मिळणारे लेमन-कोरिएण्डर सूप भन्नाट असते.
- कयानी ची श्रूजबेरी बिस्किटे. जगातील सर्वात उत्तम बिस्कीट.
- नळ स्टॉप जवळच्या त्या बेकरीतील चॉकेलेट बॉल्स शेप्ड केक्स. आजतागायत जगात कोठेही तसे मिळालेले नाहीत Happy
- शास्त्री रोड वर काका हलवाईच्या समोर एक कोकण स्टाइल दुकान ५-६ वर्षांपूर्वी निघाले होते. अजून आहे का माहीत नाही. कोकण स्टाइल पण फ्लेवर्ड श्रीखंड मिळायचे त्यांच्याकडे. मस्त असे.

यातले त्रिकाया सोडले तर बर्‍याचश्या ठिकाणी गटगलाच गेलो आहे त्यामुळे त्याही आठवणी आहेत Happy

लकी. ते देव आनंदचे नव्हते. तो तेथे पूर्वी जात असे >> लकी बंद झाल्यावर सगळ्या मित्रकंपनी मध्ये एक हळहळ व्यक्त झाली होती. मग गुडलक अजून चालू आहे म्हणून तेवढेच एक सूख असे म्हणालो होतो.

कयानीच्या श्रूजबेरी बिस्कीटांबरोबर त्यांचा केक पण मस्त असतो.

लकी. ते देव आनंदचे नव्हते. तो तेथे पूर्वी जात असे >> हो. देव आनंद तिथे जायचा म्हणून त्याचे. त्याचे फोटो लावलेले होते.

कोकण स्टाइल पण फ्लेवर्ड श्रीखंड मिळायचे त्यांच्याकडे. >> फारएण्ड अजिंठा नाव होतं बहुधा त्या दुकानाचं

@फ़ा... दक्षिणा.. बरोबर.. अजिंठा च ते.
अजुनही फ़्लेवर्ड श्रीखंड मिळतात इथे चव ही तीच आहे.
इथली मिसळ आणि वडापाव मस्त आहे.

नळ स्टॉप जवळच्या त्या बेकरीतील चॉकेलेट बॉल्स शेप्ड केक्स. आजतागायत जगात कोठेही तसे मिळालेले नाहीत >>>

पेस्ट्री कॉर्नरचे रम बॉल्स ना?? (तोंपासू!! प्रचंड आवडायचे!)

मला भेळ गणेशची तीदेखील कर्नाटकच्या समोरच्या इथल्या दुकानातलीच आवडते. ते काका, त्यांचा मुलगा तिथे असतात. काका भेळ करणार, मुलगा रगडा पॅटिस. पार हातगाडीवर भेळ विकायचे तेव्हापासून आम्ही ती भेळ खात आलोय! आता आई मला गणेश भेळेची व पापुची पाकिटं पाठवते. जीव तृप्त होतो!
लक्ष्मी रोड तुबा करताना पुष्करिणी भेळ पण मस्ट असायची. ती वेगळीच चव होती. ते बुटके काका कांदा काय भन्नाट चिरायचे! भेळ येईस्तोवर ते पहायचे. आणि मग शेजारच्या दुकानातील टांगलेल्या साड्या टाळत उभं राहून भेळ खायची.

प्रभा मामाच्या घराच्या अगदी समोर होते. मामाकडे गेले की कायम प्रभाचा ब.वडा व्हायचा. प्रचंड आवडतो मला.
कर्वे पुतळ्याजवळच्या शीतल मधला श्रीखंडवडा.. आपलं दही वडा.

आमच्या लहानपणी अभिषेक नॉन व्हेजच होते. (नंतर ते अलिकडचे व्हेज सुरू झाले) तिथले बटर चिकन .. !!

कर्वे रोडच्या चायनिजरूमधले चायनिज.

दर्शन मधील सर्व! पण मोस्टली बेक्ड बीन्स ऑन टोस्ट..स्प्रिंग रोल्स.. आईस्क्रीम्स वगैरे.

माझी पुण्याची खादाडी नॉस्टॅल्जियाशी निगडीत आहे. आता बरंच नवं चांगले खायला मिळते पण हेच वरचे आठवते कायम.

पेस्ट्रीज आणि केक्स.

पूर्वी कयानीच्या केक साठी धडपड असायची. नंतर माँजेनिज. आता मात्र ड्ब्ल्यूएस च्या शाखा सर्वत्र दिसतात. त्यांचे केक्स सध्या टॉपला आहेत. भन्नाट आहेत.

ब्ल्यू डायमंड हॉटेलचे बेकरी प्रॉडक्ट्स सुद्धा मस्त होते. बेकर्स बास्केट नाव होतं बहुतेक. आता नाहीत दिसत.

हॉटेल अ‍ॅम्बिएन्स चं रेस्तरां. जेवण सुंदर आहे. थाळी घेतली तर त्त्या दिवशीचे स्पेशल पदार्थ तीत असतात. आणि जेवणानंतर डेझर्ट्स. ते ही भन्नाट. फर्गसन रस्त्यापासून थोडं आत आहे. मॉडेल कॉलनीच्या अलिकडे. शीतल हॉटेलच्या समोरच्या लेनने जाऊन मॉडेल कॉलनीकडे वळायचं.

फर्गसन रस्त्याच्या शेवटी (चौकाच्या अलिकडे) एक इराणी बेकरी आहे. तिथला बन आणि चहा.

<<<पुण्यात काहीही चांगलं मिळत नाही, असं धरूनच चाला. पुण्याला खाद्यसंस्कृती नाही. ...................पुण्यातलं काही कौतुकानं खावंसं वाटेल! >>>
असे लोकांना वाटणे साहाजिकच आहे.
अहो, पुणे हे एक अत्यंत महान नगर आहे, येथील माणसे,चालीरिती , भाषा सर्व काही एव्हढ्या प्रचंड उच्च दर्जाचे आहे. बाहेरच्यांना त्याची कल्पनाच करवत नाही. सर्वसाधारण माणसांना कसे समजणार?
जसे एखादे अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पेंटिंग बघून एखादा दर्दी तासन् तास ते बघत बसतो नि बाकीच्यांना ते काहीतरीच वाटते तसे!

म्हणून पुण्याला नावे ठेवताट ते.
पण पुणेकरांना त्याचे काही नाही. खुश्शाल चेष्टा करा. त्यांची विनोद बुद्धि अत्यंत प्रगत आहे, सहनशीलता खूप आहे त्यांना.

म्हात्रे ब्रीज ते राजाराम पूल डीपी रोडवरचं मल्टी स्पाईस आणि क्लब हेरीटेज ही दोन्ही रेस्तराँज बेस्ट आहेत. बाहेरचं जेवण म्हटलं की इथेच ९५% होतं. मल्टी स्पाईस शाकाहारी आहे. क्लब ला दोन्ही. पिणा-यांची सोय आहे. दोन्हीकडे पब्लिक डिसंट असतं. महालक्ष्मी लॉनच्या अलिकडे डॉग हाऊस जवळ एक नवीन झालेलं आहे. कुणी गेलंय का तिकडे ?

तुळशीबागेतलं अगत्य अजून चालू आहे का ?

सगळं इथे एकाच पानावर नको. एकतर सध्या आहेत तसे भौगोलिक विभागाप्रमाणे वेगळे धागे करा नाहीतर खाण्याच्या प्रकारानुसार. सगळे एकाच ठीकाणी असले तर नंतर शोधायला अवघड जाते.

Pages