पुण्यात काय कुठं

Submitted by राव पाटील on 18 July, 2018 - 01:35

इतर काही धाग्यांवर बेडेकर, पुरेपूर कोल्हापूर, वैशाली वगैरे बद्दल वाचून प्रश्न पडला की पुण्यात काय आणि कुठे खावं?
साधारण पुढील पदार्थ मला पुण्यात खायचे/ अनुभवायचे आहेत:
मिसळ
भेळ
मासे
मटण
चिकन
चायनीज
खान्देशी
कॉकटेलं

उगाच एखाद्या वाईट ठिकाणी खाऊन कायमचं त्या पदार्थासाठी नाक मुरडून बसायचे नाहीये म्हणून मायबोलीकरांच्या सूचनेनुसार अनुभूती घेण्याचे ठरविले आहे!

Group content visibility: 
Use group defaults

भेळ- गणेश भेळ, पुष्करणी, कल्याण भेळ.
बाकी पदार्थांबद्दल काही कल्पना नाही.

फक्त स्वत:चे अनुभव लिहायचे का इथे? (कारण पुण्यात कुठे काय चांगले खायला मिळते यावर एक व्हाट्सप फोरवर्ड पण आले होते काही दिवसांपूर्वी)

मला पुण्यातील भेळ, पाणीपुरी असे चाट अजिबात आवडत नाहीत त्यासाठी ठाणे तलावपाळी गाठावी. कृष्णा dining हॉल madhe भंकस जेवण. बेडेकर मिसळ मला पण आवडली नव्हती पण त्यांच्या दुकानातले चिरोटे, लाडू असे आयटम खायला मजा आली. वडा-पाव पण पुण्यात बोर मिळतो, मुंबईत कोणत्याही स्टेशनवर त्यापेक्षा टेस्टी मिळेल Happy पाटणकर खाऊवाले हे मस्त दुकान आहे Happy

पुण्यात संधी आहेत, हवा मानवणारी आहे आणि सेफ शहर आहे म्हणून पुण्याबाहेरून येणारे लोक प्रचंड संख्येने आहेत. ते इथेच शिकतात, नोकरी मिळवतात, घर घेतात, संसार थाटतात... थोडक्यात 'सेटल' होतात. पण 'पीअर प्रेशर'मुळे या पैकी कोणीच कधीच पुण्याचं कौतुक करत नाही. शिवाय, नॉस्टॅलजिया हा भाग आहेच, 'आमच्या गावी हे कस्लं भारी मिळतं, पुण्यातलं कस्ल बेकार आहे हे' असं वाटणंही साहजिकच आहे. त्यात काहीही चूक नाही.
तस्मात, पुण्यात काहीही चांगलं मिळत नाही, असं धरूनच चाला. पुण्याला खाद्यसंस्कृती नाही. पुण्यात प्रेक्षणीय स्थळं नाहीत. पुण्यात काहीही नाही, फक्त हाईप आहे सगळा. त्यामुळे इडली-डोसा, भेळ-मिसळ, चिकन-मटण-फिश, कोल्हापूरी, खानदेशी, चायनीज असं इथे काहीच चांगलं मिळत नाही हे सांगणारे लोकच येतील इथे. वैशाली हे हॉटेल कसं बेकार आहे- अशा आशयाचाही बाफ आहे इथे. तोही वाचा. त्यानंतर मला नाही वाटत तुम्हाला पुण्यातलं काही कौतुकानं खावंसं वाटेल! Proud

पुण्यात संधी आहेत, हवा मानवणारी आहे आणि सेफ शहर आहे म्हणून पुण्याबाहेरून येणारे लोक प्रचंड संख्येने आहेत. ते इथेच शिकतात, नोकरी मिळवतात, घर घेतात, संसार थाटतात... थोडक्यात 'सेटल' होतात. पण 'पीअर प्रेशर'मुळे या पैकी कोणीच कधीच पुण्याचं कौतुक करत नाही.
>>>

मला खरेच असे नाही वाटत. लोकं खेड्यापाड्यातून नाशिक/औरंगाबाद/नागपूर/कोल्हापूर तसेच मुंबई-ठाण्यातसुद्धा सेटल होतात. अहो एव्हडेच कशाला एकदा भिलवडीला आठवडी बाजारात दोन बायका रस्ता ओलांडायला लागल्या आणि त्याचवेळी एक बाइकवाला सुसाट वेगात त्यांना कट मारून गेला. तर एक बाई दुसरीला म्हणाली 'काय ट्रॉपिक ह्यो शिटीत'.
या इतर शहरांबद्दल तितके ऐकायला येत नाही जेव्हडे पुण्याबद्दल येते. तेव्हा पुण्याला'च' लोक नावे ठेवतात यामागे काहितरी वेगळे कारण असण्याची शक्यताही असेल की

पूनम > +१.
माझी एक मैत्रीण नवर्‍याची बदली झाल्यामुळे कोल्हापूर ला जाणार होती तीन वर्ष. पण तिकडची शाळा आणि एकुणच इतर शैक्षणिक सोयी तिला मुळीच आवडल्या नाहीत त्यामुळे मुलाला घेऊन एका वर्षात पुण्यात आली परत. (मला व्यक्तीशः कोल्हापुर्चा अनुभव खुप छान आहे; त्यामुळे २ , ४ दिवस जायला फार आवडतं. ) मूळचे बार्शी चे रहीवासी असलेले एक परिचित मुंबई , पुणे आणि सोलापूर यात पुण्याला प्रधान्य देऊन इकडे आले आहेत कायमचे.

तेव्हा पुण्याला'च' लोक नावे ठेवतात > सरदारजीं वर चेच जोक जास्त प्रसारित होतात त्याप्रमाणेच आहे हे.

पूनम अगदी अगदी..
मी मूळ पुण्याची नाही.. माझ्या गावच्या आठवणींचे उमाळे मलाही अधुनमधून येतात..
पण म्हणून ज्या गावाने मला रोजीरोटी दिली त्या गावाला ऊठसूठ नावं ठेऊ नयेत असं मला वाटतं.. आणि तरीही सारखीच सगळ्यात खोट दिसत असेल तर मी या गावात राहू नये..
माझं जे कोणतं भारी गाव आहे तिथं निघून जावं..

मग सरदारजी सोडून देतात तसे तुम्ही पण सोडून द्या. मनाला का लावून घेता. > मनाला अज्जिबात लावून घेत नाही. Happy

अजिबात नाही!!!
रोजीरोटी मुंबईत कमावली असती तर गर्दी, गचाळपणा, घाण, दमट हवा, मूर्ख माणसं याला कचकचून नावं ठेवली नसती का तुम्ही? मी तरी ठेवली असती. मुंबईकर असुनही.
तशीच अमेरिकेत सध्या ज्या भागात रहातो तिकडे कुठल्याही सोशल सेटिंग मध्ये (देशी, विदेशी, हापिस, इतर) जागांचे भाव ह्यावर चर्चा आणि ज्या इंडस्ट्री मध्ये काम करतो त्या इंडस्ट्रीला शिव्या घातल्या नाही तर एक वेळ जात नाही.
तद्वत नावं ठेवायला कशाचं बंधन नाही.

माझ्या वैयक्तिक अनुभवातून आलेल्या निवडी (कंसात माझा अनुभव)

मिसळ: प्रत्येक हॉटेलची वेगळी तऱ्हा. जिथे फरसाण, मोड आलेली मटकी, बारीक कांदा इत्यादी असते तिथली मिसळ मला आवडते. काही ठिकाणी पोहे, सांबर, बारीक शेव, शिवाय अजून काय काय वाटले ते टाकून देतात. अजिबात आवडत नाही. त्यामुळे आधी विचारून मगच मिसळ खातो. (अनेक ठिकाणी खाल्ली आहे)

भेळ: कल्पना भेळ, सारंग चौक, सहकारनगर (या व्यतिरिक्त कल्याण भेळ तसेच अन्य काही ठिकाणी भेळ खाल्ली आहे)

मासे: महेश लंच होम कॅम्प (थोडे महागडे आहे पण सीफूड साठी बेस्ट. मी महेश, समुद्र, मल्हार इथे सी-फूड खाल्लेय)

मटण/चिकन:
१. हॉटेल कावेरी. चांदणी चौक तसेच अन्य दोन तीन ठिकाणी शाखा आहेत. मसाला खूप कमी वापरतात म्हणून मला आवडते. इतरांना आवडेलच असे नाही. पण प्रचंड तिखट असते. तिखट सहन न होणाऱ्यांनी अळणी मागवावे.

२. कोल्हापुरी थाट, भापकर पंपाजवळ. इथे मटन तर चांगले असतेच शिवाय प्लेटमध्ये येणारा राईस एक नंबर. गेलात तर चुकवू नका.

३. शेतकरी नॉनव्हेज. यांची सिंहगड रोड आणि अजून एक कुठेतरी शाखा आहे.
(तिरंगा, पुरेपूर कोल्हापूर, अस्सल कोल्हापुरी, कोल्हापूर दरबार इत्यादी ट्राय केलेत)

पण 'पीअर प्रेशर'मुळे या पैकी कोणीच कधीच पुण्याचं कौतुक करत नाही. >> ?? हे काही झेपलं नाही.
उलट पीअर प्रेशरमुळे मी पुण्यातल्या वैशाली आणि तत्सम ठिकाणांना इतकी वर्षे नावं ठेवली नव्हती. आता इतरांनाही तसंच वाटतंय म्हटल्यावर नावं ठेवायला धीर आला. Lol
आणि जे आवडतं तेही सांगतोच की. पुणं आवडतंच की अनेक कारणांसाठी.

त्या लांबलचक मेल मधल्या ९५% गोष्टी मी खाल्ल्याच नाहीत असा मला शोध लागलाय.
वैशाली चांगले आहे पण ते नॉस्टॅल्जिआ मुळे जास्त असावे.मला स्टेशन डीपीरोड चे मधुबन नॉस्टॅल्जिआ मुळे असेच आवडते.
वाडेश्वर, सुभद्रा चे सगळे पदार्थ आवडतात.रिलॅक्स, गिरीजा, सुरभी ची पावभाजी आवडते.

मी खुद्द कोल्हापूरची असूनही मला पुण्यात कर्वे नगर मध्ये मिळणारी मनिषाची भेळ आणि सारसबागेत मिळणारी संतोषची भेळ जास्त आवडते.

रिलॅक्स, गिरीजा, सुरभी ची पावभाजी आवडते.+ १. गणराजमधलं टोमॅटो ऑमलेट. मथुरामधली सीताफळ रबडी आवडली होती. पूना बोर्डिंग हाऊसची थाळी आवडते.
सारंग सोसायटीत गाडीवर कट डोसा मिळायचा तोही छान असायचा. आता आहे की नाही ते माहीत नाही.

मिश्रा पेढा/प्रदीप स्वीट चा मलई मैसूरपाक उर्फ मैसूरपा. प्रदीप स्वीट चा सँडविच ढोकळा.रामदेव बाबा ढाबा चे नवरतन दाल बाफले.(बाटी पेक्षा खायला सोपे पडते.)

दुर्गा ची कॉफी चांगली असते म्हणे ! खरं का ? (साधारण ८ वर्षांपूर्वी ची गोष्ट )
कुठे आहे हे ? कोणत्यातरी कॉलेज जवळ MIT असेल का ?

Pages