स्पर्शिका जोशी, scam की सत्य?

Submitted by हेला on 13 July, 2018 - 11:15

मैत्रिणींनो! सावधान!!

"तुम्हाला इंजेक्शनची भीती वाटते का? मी मदत करु शकते" अशा अर्थाची मराठी आंतरजालावर अनेक दिवसांपासून एक छोटेखानी सुचवणी फिरते आहे. त्या चार ओळींच्या लेखात खास महिलांना आवाहन केले जात आहे. केवळ मायबोलीच नव्हे तर मिसळपाव संकेतस्थळावरही हा लेख आला होता. त्यात कोणीतरी डॉक्टर असल्याची बतावणी करुन महिला सदस्यांना जीमेलवर चॅटवर यायला सांगत आहे. एवढेच नव्हे तर कित्येक स्त्री सदस्यांना व्यक्तिगत मेल आयडीवर 'मी तुमचे लेख वाचले, मला खुप् आवडले, आपण चॅट करु शकतो का' अशा अर्थाचे मेल पाठवले आहेत. एकाच व्यक्तीकडून अशा प्रकारचे मेल्स आल्याची दोन्ही संस्थळावरच्या अनेक महिला सदस्यांनी कळवले आहे. हे सर्व मागच्या गेल्या सात ते आठ दिवसांत घडले आहे.

या प्रकरणात काहीतरी काळेबेरे आहे असे वाटल्याने मी व माझ्या पत्नीने याचा छडा लावायचे ठरवले. त्यातून आम्ही त्या जीमेल आयडीवर चॅटमधून संपर्क साधला. त्यातून त्या व्यक्तीने आपली ओळख नीटपणे दिली नाही. आम्ही विचारले की नक्की कशाबद्दल आहे हा लेख? तुम्ही काय मदत करता? तर त्यावर ती विचारत होती की तुमचा आधीचा इंजेक्षनचा अनुभव काय आहे, तो सांगा मग मी पुढे सांगते. म्हणजे नीटपणे काही सांगत नव्हती.

त्या व्यक्तीने स्वतः डॉक्टर असल्याचे सांगितले पण क्लिनिकचा पत्ता व मोबाइल नंबर देण्यास टाळाटाळ केली. सदर व्यक्ती "जूहू व ठाणे इथे माझे क्लिनिक आहे व माझा नवराही डॉक्टर आहे, आम्हाला एक दोन वर्षांची मुलगी आहे" अशी बतावणी करते. या व्यक्तीने आम्हाला सर्व डिटेल्स मागितले, जसे तुमचा फोटो द्या, नाव, कुठे जॉब करता, इत्यादी सर्व खोदून चौकशी केली. आम्हाला बघायचेच होते की हे प्रकरण नेमके काय आहे म्हणून आम्ही सर्व सत्य माहिती दिली. परंतु आम्ही जेव्हा साधा क्लिनिकचा पत्ता आणि मोबाईल नंबर मागितला तर आधी पुरेशी ओळख होऊ द्या एकमेकींची, मग पत्ता, फोन देते असे म्हणाली. पण आम्ही विचारले की डॉक्टरला क्लिनिकचा पत्ता द्यायला कशाला ओळख वगैरे लागते, तुम्ही पत्ता द्या, आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष भेटू. तेव्हा ती म्हणाली की "मी विकेंडला क्लिनिकला नसते, उद्या बँगलोरला कॉन्फरन्सला जायचे आहे अशी थातूरमातूर कारणे दिली. शेवटी आम्ही क्लिनिकच्या पत्त्यासाठी अडून बसल्यावर "माझी मुलगी झोपेतून उठली आहे आणि तिला झोपवून परत येते" असे म्हणून ही व्यक्ती जी ऑफलाइन झाली आहे ते गेल्या चार दिवसांपासून परत आलेली नाही. ह्या व्यक्तीने जो स्वतःचा फोटो म्हणून आम्हाला दाखवला, त्या फोटोची फेसबुक प्रोफाईलसुद्धा फेक असल्याचे आढळले आहे.

स्पर्शिका जोशी नावाची कोणीही व्यक्ती गायनॅकॉलॉजिस्ट असल्याचे आढळून आलेले नाही. त्या व्यक्तीने ठाण्यातल्या 'माहेर' क्लिनिक चा पत्ता दिला आहे तर त्या माहेर क्लिनिकशी कोणत्याही स्पर्शिका जोशींचा संबंध नाही आहे.

स्पर्शिका जोशी असे नाव घेऊन कोणी तुम्हाला चॅट वर यायचे आमंत्रण देत असेल तर कृपया सावध रहा. हा काहीतरी खूप मोठा स्कॅम आहे. ज्यात आपल्यासोबत काही चुकीचे घडल्यास कदाचित तुम्ही कोणाला सांगूही शकणार नाही. तेव्हा परत एकदा आवाहन कृपया सावध राहा, कोणत्याही मेल्स ला, चॅट इन्विटेशनला फशी पडू नका.

अ‍ॅडमीन व वेबमास्तरांना विनंती की सदर आयडी मायबोलीवरुन स्त्री आयडींना संपर्क करत आहे त्यामुळे तुमच्या पातळीवर याबाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा ही विनंती.

सदस्यांपैकी कोणी सायबर गुन्हेगारी संदर्भात मदत करु शकत असेल तर कृपया पुढाकार घेऊन या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा असे वाटते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे धागा वाचुन मला इमेल आहे का पहायला गेले. तर आहे बर मलाही इमेल. नाहीतर मला कसे वाळीत टाकल्या सारखे वाटले असते Uhoh

नमस्कार ,वर्षा ताई,

छान लिहिता तुम्ही. तुमचा
मायबोली वर "होममेड चोकोलेट्स
" हा आणि इतर लेख वाचले.

तुमच्याशी गप्पा मारायला
आवडेल मला. मी डॉक्टर
स्पर्शिका जोशी. मी मुंबई ला
असते.

मला तुम्ही hangout वर sparshika@gmail.com इथे
संपर्क करू शकता. म्हणजे आपण
बोलू.

धन्यवाद ,

डॉक्टर स्पर्शिका जोशी.

स्त्री रोग तज्ज्ञ

M.D. D.G.O.

मुंबई

भयानक प्रकरण आहे हे! Sad

सतर्क रहायला हवं, हेच खरं!

मनिषा जी, हॅट्स आॅफ!! ग्रेट काम केलंत तुम्ही! Happy

मनिषा जी फारच छान काम केलेत. माबोवरील सर्वांनी ठरवून रोज एक अस चाट करून या स्पर्षिका बाईला ( मला तर आता ही खरच बाईच आहे अशी शंका येतीये) हैराण करून सोडल पाहिजे. जर हिच क्लिनिक दोन ठिकानी आहे आणि बोलायला जराही वेळ नाही याचा अर्थ नक्कीच क्लिनिक्वर गर्दी असणार. मग प्रत्यक्षदर्शी येण्यार्‍या पेशंटलाच तिच हे संशोधन दाखवून अथवा ज्याला ईज्क्शनची गरज आहे, त्याला हे जेल लावून इंजक्शन देऊन त्यांच्याशीच का बोलत नाही. आलेले लोक सोडून बाहेर उगा कशाला शोधत बसायचे.

एक असाही अंदाज -
डॉक्टर म्हंटलं की लोक मनमोकळेपणाने बोलतात. बऱ्याच गोष्टी शेयर करतात. दोन गोष्टी आहेत -
1. विकृत व्यक्ती असेल, स्त्रियांशी गप्पा मारायला आणि नंतर त्या लैगिक विषयाकडे वळवून त्यात आनंद घेत असेल.
2. इंजेक्शन ची खरच खूप लोकांना भीती वाटते. Research केले आहे, असे औषध बनवले आहे की जे लावल्यावर इंजेक्शन फील होणार नाही. डाय बीटीज चे पेशंट्स असतात ज्यांना रोज इन्सुलिन घ्यावे लागते. मासा गळाला लागला तर मी ते लिक्विड पाठवते त्यामुळे इंजेक्शन चा त्रास होणार नाही आणि त्याची किंमत इतकी इतकी आहे. हे scam असू शकते.

( या स्टेज पर्यंत संभाषण जमले तर न्या कोणी तरी म्हणजे कळेल - मला ते लिक्विड कसे मिळू शकेल हा प्रश्न विचारला तिला तर पुढच्या गोष्टी क्लियर होतील.)

मनिषा लिमये उर्फ मायबोलीवरील शेरलॉक यांचा विजय असो!>>>>>> +111111111111

(फक्त एक फुकटचा आगावू सल्ला! : सध्या वापरात असलेला फोन जेव्हा कधी बदलावासा वाटेल तेव्हा Xiaomi चा फोन घ्या. एकच सलग लांबलचक screenshot काढायची सोय असते त्यात!)
उदाहरणार्थ पहा: Screenshot_2017-12-31-21-07-08-614_com.whatsapp.jpg
(वैयक्तिक chat असल्याने शक्य तितके resolution कमी केले आहे.)

आ.रा.रा. यांच्या म्हणण्यानुसार स्पर्शिका जोशी नावाच्या डॉक्टर खरोखर अस्तित्वात आहेत. त्यांना ही माहिती दिली गेली आहे का की त्यांच्या नावाने फेक प्रोफाईल तयार करून हे सगळे प्रकार चालले आहेत?

मी या बाईशी संवाद साधला पण थोड्या वेळाने गडबड वाटू लागली. आणि आज इथे हा धागा वाचला आणि त्या ID ला ब्लॉक केलं.
माझं झालेलं बोलणं पुढीलप्रमाणे, देवनागरीमध्ये नसल्याने वाचायला कष्ट पडतील, पण हा विकृत ID च वाटत आहे.
Sparshika Joshi
hi ahat ka
Shweta V
Hello Doctor
Sparshika Joshi
namaskar
sorry me disturb kela ka tumhala?
bola na
Shweta V
tumhala majhyashi kasha sandarbhat bolaycha hota?
Sparshika Joshi
me khup marathi sahitya wachte ani awadle ki nakki kalawte
mhanje lihinaryala pan bare watte
me mumbai chi ahe maze thane ani bandra la dawakhane ahet ani tuzi sorry tumchi olakh?
mumbai chya ka apan?
Shweta V
tujhi is ok
mi punyamadhye aste
Sparshika Joshi
mag nokri karte ka? ani way kai?
mazi mavshi punyat rahte tyamule tila bhetaila barech wela yete me tikde
Shweta V
ho nokari karte
Sparshika Joshi
ani way kai?
Shweta V
ka?
Sparshika Joshi
khup mast lihite tu
Shweta V
dhanywaad
Sparshika Joshi
me mazya team barobar research pan karte ani nuktach ek purn zala yashaswi pane
tula aikaila awdel ka tyabaddal?
Shweta V
ho nakkich
Sparshika Joshi
me ek gel banawla ahe je injection tochnyapurvi lawle tar injection chi jaga badhir hote ani injection tochun ghetana tras hot nahi
me mazya dawakhanyat waparte ani side effects naslyana saglyana khup awadle
Shweta V
abhinandan
Sparshika Joshi
tula mahit aselach na ki doctor kade jaiche mhanje injection tochun ghyaychi tayari thewailach lagte, tthe adhevedhe gheun nahi chalat
Shweta V
ho
Sparshika Joshi
tuza kai anubhav ahe injections baddal?
Shweta V
mala injection chi ajibat bhiti vatat nahi
Sparshika Joshi
are wa khup chhan
pan mala sang doctor kuthe injection tochnar yachi kalpana aste ka tula nehmi?
Shweta V
ho mhanje dr tasa sangtat
Sparshika Joshi
kai mhantat doctor tyabaddal?
Shweta V
ka? mala kharach injection chi bhiti nahi
Sparshika Joshi
pan khup muli mhantat ki mage ghyayche mhanje mag dress dhilla kara, zopa ani mag doctor chi waat paha , yat waitag yeto
tula kai watte ya baddal?
Shweta V
nahi mala asa kahi vatat nahi
Sparshika Joshi
mag tu kase ghetes injection? kai tayari kartes?
Shweta V
tayari mhanje? Its such a small thing
Sparshika Joshi
mhanje saadi madhye jast wel jato ani punjabi dress madye patkan gheta yete ase watte ka tula? ki kase? mag kai kartes ghetana?
Shweta V
Aapan far prashn vicharat aahat asa vattay mala, Injection ghena hi majhyasathi far mothi gosht nahiye
Sparshika Joshi
ok

श्वेता, bravo,
ही व्यक्ती नक्की काहीतरी झोल करायच्या पाठी आहे.

आता हे पैशाचा स्कॅम न वाटता काहीतरी रोल प्ले वगैरे प्रकार वाटतो आहे.
बायकानो, सांभाळून.स्पर्शिका जोशी खरोखर इंजेक्शन चा
पेन इफेक्ट कमी करणाऱ्या औषध महागात विकणाऱ्या डॉ असतील तर आम्हाला ते विकत नकोय म्हणून काम होईल.पण स्कॅम असेल तर निव्वळ त्या बाईला/बुवाला जाळ्यात फसवायचे म्हणून उगीच धोके पत्करू नयेत असे वाटते.

कदाचित आधी adult चॅट, नंतर कदाचित त्या चॅट चा वापर करून ब्लॅकमेलिंग वगैरे प्रकार असू शकतो

श्वेता, हे conversation पुढे जाऊन कदाचित खूप ugly झालं असतं. म्हणजे मुद्दाम खोदून खोदून प्रश्न विचारून भलतीकडेच ( किंवा त्यांना हवा तिकडे) विषय नेण्याचा प्रकार दिसतोय हा. I don't think it's a lady talking.

आ.रा.रा. यांच्या म्हणण्यानुसार स्पर्शिका जोशी नावाच्या डॉक्टर खरोखर अस्तित्वात आहेत.
<<
ते गूगल ग्यान आहे, बीजे मधून पास झालेल्या एमडी मेडिसिन आहेत असे सापडले होते. आता या स्पर्शिकेची इंजेक्शनफोटोवाली प्रोफाईल देखिल अपडेट होऊन एमडी मेडीसिन दिसते आहे.

महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या साईटवर स्पर्शिका <(NEE) जोशी> नावाची कुणीही व्यक्ती असल्याचे मला तरी दिसले नाही. त्यामुळे त्या दिशेने पुढे काही करायचा विचार सोडला.

https://www.maharashtramedicalcouncil.in/frmRmpList.aspx येथे डॉ. नाव सर्च क्रायटेरिया घ्या. "Spar" स्ट्रिंगने देखिल ७ नावे येतात त्यात स्पर्शिका नाही. जोशी बरेच आहेत, पण त्यातही स्पर्शिका सापडली नाही.

<<< महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या साईटवर स्पर्शिका <(NEE) जोशी> नावाची कुणीही व्यक्ती असल्याचे मला तरी दिसले नाही. >>>
हे मी कधीपासून सांगतोय, पण कुणी लक्षातच घेत नाही. Uhoh

परत एकदा, स्पर्शिका जोशी या व्यक्तिमत्वाला इंजेक्शन ची भीती वाटणार्या पुरुषांची व लहान मुलांची काळजी का वाटत नाही हा मोठा प्रश्न आहे. ☺️☺️☺️☺️

Maher hospital chya Dr. Madhuri sakhardande Yana kalavnyat ale ahe yababat. She is my gynac

श्वेता व्यास यांच्याशी या व्यक्तीच्या झालेल्या संभाषणातून माझा अंदाज अगदी बरोबर खरा ठरतोय याची खात्रीच झाली. हा पुरुष आहे आणि याला "इंजेक्शन फेटीश" हा मानसिक विकार जडलेला आहे. याबाबत इथे जास्त बोलणार नव्हतो पण चर्चा उगीचच लांबत चालली आहे म्हणून आता बोलतो. "इंजेक्शन फेटीश" ग्रस्त व्यक्तीस (पुरुष) स्त्रिला इंजेक्शन टोचलेले (शक्यतो पार्श्वभागावर) पाहून अथवा तशी कल्पना करून लैंगिक उद्दीपन मिळते. याबाबत विकिपीडिया वर विस्तृत लेख पण आहे. या व्यक्तीचा हाच मेसेज गुगल केला असता तो एका फिटीश फोरमवर सुद्धा आढळला. तेंव्हाच मला शंका आली होती. अर्थात उद्देश केवळ तेवढाच असेल असे नाही. डॉक्टर आ.रा.रा. यांनी म्हटल्यानुसार पूर्वी याहू रूम्स मधून हे प्रकार चालत. त्यातून ड्रग्स विक्रीचे अवैध धंदे पण होत. याहूने नंतर चाट रूम्स बंद केल्याचे हेसुद्धा एक कारण बोलले जाते. आजकाल फेसबुकवर तर लैंगिक समाधान मिळण्यासाठी अशा असंख्य खोट्या फिमेल प्रोफाईल बनवून खऱ्या स्त्रियांशी जवळीक साधण्याचे प्रमाण खूप आहे व हे सर्वश्रुत आहे. या व्यक्तीने मायबोली व तत्सम इतर फोरमवर असणाऱ्या स्त्रिया/मुलींच्या प्रोफाईल बऱ्याचअंशी खऱ्या असतात याचा अंदाज घेऊन इथे हे उद्योग सुरु केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जितके शोधावे तितके खोल जात आहे हे प्रकरण,
या बाईंचा ,याच नावाने यु ट्यूब चॅनेल पण आहे,
वर चॅट स्क्रीन शॉट मध्ये जो dp आहे तोच dp तिकडे वापरला आहे

Uhoh
ज्यांना इमेल आला आहे त्यांनी स्पेसिफिकली या आयडीला ब्लॉक करावं. आपण सगळेच गुगल फार वापरतो आणि त्यांच्याकडे आपला खासगी, आर्थिक डेटा आहे, असतो. उगाच या एका कारणापायी (इग्नोर मारणे, धन्स वगैरे म्हणून सोडून देणे इ.) तो विवक्षित आयडी तुमचा आयडी हॅक करून/वॉच ठेवून नसते उद्योग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तस्मात, त्यास ब्लॉकचा नारळ देऊन सन्मानीत करावे...

योकु +१

ज्यांनी जरा सविस्तर चॅट केलंय, त्यांनी तर ब्लॉक कराच.

ज्यांनी जरा सविस्तर चॅट केलंय, त्यांनी तर ब्लॉक कराच.>>>>>

अहो तिला हॅन्गटसवर ब्लाॅक केल्यावर पण ती मेल पाठवते आणि "तु मला ब्लाॅक केलस का विचारते"....

जीमेल वर आयडी ब्लॉक कसा करायचा? मला पण आली आहे मेल. मी 'report spam' केला आहे. आणखीन काही करावं लागतं का?

जीमेल वर मेल मायबोली पोर्टल थ्रु आली असेल आणि रिपोर्ट स्पॅम केलं तर मायबोली डोमेन वरच्या मेल पक्षि नोटिफाय@मायबोली बॅन होईल फक्त.

जीमेल वर आयडी ब्लॉक कसा करायचा? >>>

ते ईमेल ओपन करा, वरच्या उजव्या कोपर्‍यात रिप्लायचे विविध ऑप्शन्स असतात, त्यातल्या ड्रॉप-डाऊन लिस्टमध्ये `ब्लॉक स्पर्शिका जोशी' असा एक ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.

ज्यांना अशा इमेल्स अथवा मेसेज आले असतील त्यांनी घरातील व्यक्तींशी सल्लामसलत करुन सायबर सेल ला कळवणे गरजेचे आहे असे वाटते. ह्यामागे असलेल्या व्यक्तिला योग्य शिक्षा किंवा उपचार मिळणे आवश्यक दिसते.

हा पुरुष आहे आणि याला "इंजेक्शन फेटीश" हा मानसिक विकार जडलेला आहे.

... बघा, आता खरे बाहेर आले की नाही? हे असे काही असते हे जन्मात कधी कळले नसते. तुम्ही सांगितले नसते तर कधीच कळले नसते. किती दिवस झाले विचार करतोय की यामागे नक्की काय असेल.

माझ्या धागा काढण्याचा उद्देश सफल झाला हे पाहुन बरे वाटले. श्वेता यांच्या चॅट ने तर बर्‍याच गोष्टी क्लिअर झाल्या. आता एक निश्चित कारण मिळाल्याने जनजागृती करणे अधिक सोपे होईल. हा दुहेरी स्कॅम असू शकतो. एक तर विकृती शमवणे व ब्लॅकमेल करणेसुद्धा.

पूर्वीपेक्षा आता कैकपटीने पुरुष - स्त्रिया आंतरजालावर येत आहेत व त्यात सगळ्याच प्रकारचे, बुद्धिमत्ता आणि चातुर्यच्या वेगवेगळ्या पातळ्या असलेले लोक आहेत. फसू शकतील अशांची संख्या वाढली आहे. त्यांना जागृत करणे आवश्यक आहे.

सर्व प्रतिसाददात्या सदस्यांचे आभार व रिस्क घेऊन चॅट केलेल्या मायभगिनींचे खूप कौतुक.

धन्यवाद!

Pages