स्पर्शिका जोशी, scam की सत्य?

Submitted by हेला on 13 July, 2018 - 11:15

मैत्रिणींनो! सावधान!!

"तुम्हाला इंजेक्शनची भीती वाटते का? मी मदत करु शकते" अशा अर्थाची मराठी आंतरजालावर अनेक दिवसांपासून एक छोटेखानी सुचवणी फिरते आहे. त्या चार ओळींच्या लेखात खास महिलांना आवाहन केले जात आहे. केवळ मायबोलीच नव्हे तर मिसळपाव संकेतस्थळावरही हा लेख आला होता. त्यात कोणीतरी डॉक्टर असल्याची बतावणी करुन महिला सदस्यांना जीमेलवर चॅटवर यायला सांगत आहे. एवढेच नव्हे तर कित्येक स्त्री सदस्यांना व्यक्तिगत मेल आयडीवर 'मी तुमचे लेख वाचले, मला खुप् आवडले, आपण चॅट करु शकतो का' अशा अर्थाचे मेल पाठवले आहेत. एकाच व्यक्तीकडून अशा प्रकारचे मेल्स आल्याची दोन्ही संस्थळावरच्या अनेक महिला सदस्यांनी कळवले आहे. हे सर्व मागच्या गेल्या सात ते आठ दिवसांत घडले आहे.

या प्रकरणात काहीतरी काळेबेरे आहे असे वाटल्याने मी व माझ्या पत्नीने याचा छडा लावायचे ठरवले. त्यातून आम्ही त्या जीमेल आयडीवर चॅटमधून संपर्क साधला. त्यातून त्या व्यक्तीने आपली ओळख नीटपणे दिली नाही. आम्ही विचारले की नक्की कशाबद्दल आहे हा लेख? तुम्ही काय मदत करता? तर त्यावर ती विचारत होती की तुमचा आधीचा इंजेक्षनचा अनुभव काय आहे, तो सांगा मग मी पुढे सांगते. म्हणजे नीटपणे काही सांगत नव्हती.

त्या व्यक्तीने स्वतः डॉक्टर असल्याचे सांगितले पण क्लिनिकचा पत्ता व मोबाइल नंबर देण्यास टाळाटाळ केली. सदर व्यक्ती "जूहू व ठाणे इथे माझे क्लिनिक आहे व माझा नवराही डॉक्टर आहे, आम्हाला एक दोन वर्षांची मुलगी आहे" अशी बतावणी करते. या व्यक्तीने आम्हाला सर्व डिटेल्स मागितले, जसे तुमचा फोटो द्या, नाव, कुठे जॉब करता, इत्यादी सर्व खोदून चौकशी केली. आम्हाला बघायचेच होते की हे प्रकरण नेमके काय आहे म्हणून आम्ही सर्व सत्य माहिती दिली. परंतु आम्ही जेव्हा साधा क्लिनिकचा पत्ता आणि मोबाईल नंबर मागितला तर आधी पुरेशी ओळख होऊ द्या एकमेकींची, मग पत्ता, फोन देते असे म्हणाली. पण आम्ही विचारले की डॉक्टरला क्लिनिकचा पत्ता द्यायला कशाला ओळख वगैरे लागते, तुम्ही पत्ता द्या, आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष भेटू. तेव्हा ती म्हणाली की "मी विकेंडला क्लिनिकला नसते, उद्या बँगलोरला कॉन्फरन्सला जायचे आहे अशी थातूरमातूर कारणे दिली. शेवटी आम्ही क्लिनिकच्या पत्त्यासाठी अडून बसल्यावर "माझी मुलगी झोपेतून उठली आहे आणि तिला झोपवून परत येते" असे म्हणून ही व्यक्ती जी ऑफलाइन झाली आहे ते गेल्या चार दिवसांपासून परत आलेली नाही. ह्या व्यक्तीने जो स्वतःचा फोटो म्हणून आम्हाला दाखवला, त्या फोटोची फेसबुक प्रोफाईलसुद्धा फेक असल्याचे आढळले आहे.

स्पर्शिका जोशी नावाची कोणीही व्यक्ती गायनॅकॉलॉजिस्ट असल्याचे आढळून आलेले नाही. त्या व्यक्तीने ठाण्यातल्या 'माहेर' क्लिनिक चा पत्ता दिला आहे तर त्या माहेर क्लिनिकशी कोणत्याही स्पर्शिका जोशींचा संबंध नाही आहे.

स्पर्शिका जोशी असे नाव घेऊन कोणी तुम्हाला चॅट वर यायचे आमंत्रण देत असेल तर कृपया सावध रहा. हा काहीतरी खूप मोठा स्कॅम आहे. ज्यात आपल्यासोबत काही चुकीचे घडल्यास कदाचित तुम्ही कोणाला सांगूही शकणार नाही. तेव्हा परत एकदा आवाहन कृपया सावध राहा, कोणत्याही मेल्स ला, चॅट इन्विटेशनला फशी पडू नका.

अ‍ॅडमीन व वेबमास्तरांना विनंती की सदर आयडी मायबोलीवरुन स्त्री आयडींना संपर्क करत आहे त्यामुळे तुमच्या पातळीवर याबाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा ही विनंती.

सदस्यांपैकी कोणी सायबर गुन्हेगारी संदर्भात मदत करु शकत असेल तर कृपया पुढाकार घेऊन या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा असे वाटते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलाही आला होता इमेल. मला पण (मी न लिहिलेले) कॅन्सरवरचे लेख आवडलेत असं सांगण्यात आलंय.

पण तो इंजक्शनची भिती हा जाहिरातवजा लेख न झेपलयाने मी अनुल्लेख केला इमेलचा.

असाच एक प्रकार फेसबुकवर चालू आहे. एका फीमेल आयडीकडून अनोळखी पुरुषांना फ्रेंड रिक्वेस्ट्स पाठवण्याचा सपाटा लावला गेलाय.
त्यातल्या अनेकांनी डोळे झाकून रिक्वेस्ट्स अ‍ॅक्सेप्ट केल्यात. काहींनी मात्र डोक्याचा वापर करून यापासून चार हात दूर राहणं पसंत केलंय.
याचा संबंध मायबोलीशीही आहे, असं दिसतंय.
यात काही स्कॅमच असेल असं नाही.
(जिथे पैशाचा प्रश्न येतो, त्यालाच स्कॅम म्हणावं असं आहे का?)

म्हणजे एकंदर ती व्यक्ती बावळट आहे असंच म्हणायला हवं.

एकच मजकूर इतक्या जणींना पाठवलाय; कुणी ना कुणी अलर्ट होतील हे डोक्यात आलेलं नसेल, तर इस का कुछ नहीं होनेवाला Wink

एकच मजकूर इतक्या जणींना पाठवलाय; कुणी ना कुणी अलर्ट होतील हे डोक्यात आलेलं नसेल, तर इस का कुछ नहीं होनेवाला >>> मला वाटते तिला कदाचित कुणी हा मेल एकमेकांशी डिस्कस करतील असा विचार केला नसावा.

मला वाटतं मेल च्या मेसेज शी फारसा संबंध नसेल.
मेल उघडल्यावर किंवा मेसेज ला उत्तर दिल्यावर एखादी सूक्ष्म पीएनजी डाउनलोड होऊन त्याने प्रोफाईल वर डाटा अनालिटिक्स् किंवा फिशिंग होत असू शकेल.
आता पुढच्या बाकीच्यांनी स्पर्शिका ची आलेली मेल न उघडता डिलीट केली तरी चालू शकेल.

म्हणजे एकंदर ती व्यक्ती बावळट आहे असंच म्हणायला हवं.

एकच मजकूर इतक्या जणींना पाठवलाय; कुणी ना कुणी अलर्ट होतील हे डोक्यात आलेलं नसेल, तर इस का कुछ नहीं होनेवाला Wइन्क

नवीन Sउब्मित्तेद ब्य ललिता-प्रीति ओन १६ ज़ुल्य, २०१८ - १२:५६
------
उलटपक्षी..एकाच मजकूरा मुळे हे सिस्टीम जनरेटेड अर्थात अटोमेटेड हि असु शकते.

ही इमेल मायबोली संपर्क सुविधेने पाठवली आहे. अनु, मायबोलीच्या खिडकीत फार कमी मायक्रो/ कोड चालतो. इतकं हुषार डोकं नसावं.

आता इतक्यात नाही येणार. डॉक्टर म्हणालेत तसं चारपाच वर्षांनी. तोवर ही जनरेशन म्हातारी होऊन विसरून गेलेली असेल.
पण दर ४-५ वर्षांनी येणारी स्पर्शिका तीच असेल का? की ती आयडिया वापरून वेगवेगळे लोक येत असतील?

अशा स्कॅम मध्यी हिट रेशो नगण्य असतो... पण गळाला एखादा मासा लागला तरी डॅमेज इज डन. Sad
पुढच्या वेळी धुमकेतू नाव असेल.. Proud दर ५ वर्षांनी कुठला उगवतो का?

Wइन्क

नवीन Sउब्मित्तेद ब्य ललिता-प्रीति ओन १६ ज़ुल्य, २०१८ - १२:५६

>>> हे कसं आलं?????? Biggrin

Wइन्क

नवीन Sउब्मित्तेद ब्य ललिता-प्रीति ओन १६ ज़ुल्य, २०१८ - १२:५६

>>> हे कसं आलं?????? Biggrin >>. Biggrin

हो हे कसे आले सांगा

कुठल्याही स्कॅममध्ये (जसे तुम्हाला लॉटरी लागली आहे, इंग्लंडच्या राणीने तिची इस्टेट तुमच्या नावावर केली आहे वगैरे) आपल्याला वाटते किती भंपक (आउटरेजिअस) इमेल्स आहेत, कोण फसणार याला. पण इमेल्स अश्या टोकाच्या मूर्ख/भंपक असण्यामागे कारण आहे. अश्या स्कॅममध्ये अतिशय मूर्ख वा भोळा माणूसच गळाला लागणे अपेक्षित असते. थोडाजरी व्यावहारिक शहाणपणा असेल तर मनुष्य लवकर सावध होतो. म्हणून अत्यंत भंपक अगदी पहिल्या नजरेत स्कॅम आहे असे लक्षात येईल अश्याच इमेल्स असतात. त्याला जो मासा गळाला लागेल तो आदर्श मासा असतो स्कॅमस्टर्ससाठी.

उब्मित्तेद हे कोणत्या इंग्रजी शब्दाचे देवनागरीटंकन आहे हे कोडे उलगडायचा प्रयत्न करतेय.
ही चोप्य पस्ते मध्ये झालेली गडबड असावी Happy

Sउब्मित्तेद ब्य >>> Submitted by आहे ते.

Wइन्क >> हे Wink आहे.

बहुतेक त्यांनी गुगलची भाषा मराठी निवडली आहे.

धन्यवाद हेला.
हा ID ब्लॉक केला आहे. धागे आधीच ब्लॉक केले होते.
Submitted by admin on 13 July, 2018 - 22:17
<<

इतक्या तत्परतेने स्पर्शिका जोशी यांचा आयडी ब्लॉक करणे अजिबात पटले नाही. किमान त्यांना, त्यांचा मुद्दा मांडायला थोडा वेळ द्यायची गरज होती असे मला तरी वाटते. शिवाय स्पर्शिका जोशी जर खरच स्कॅमर असतील तर असा तडकाफडकी आयडी ब्लॉक केल्याने तो सदस्य मायबोलीवरुन निघून जाईल याची शक्यता शून्य आहे.

उब्मित्तेद हे कोणत्या इंग्रजी शब्दाचे देवनागरीटंकन आहे हे कोडे उलगडायचा प्रयत्न करतेय.
ही चोप्य पस्ते मध्ये झालेली गडबड असावी Happy

नवीन Submitted by mi_anu on 16 July, 2018 - 14:22
---------------
अरेच्या खरच की...कायच्या काय टाईप झालय. Happy
क्रोम मधे असल्याने...'प्रतिसाद' च्या इथे खाली दिलेल 'फ़ॉर मॅक, क्रोम' इथुन देवनागरी टाईप करते.
मी-अनु. यांनी सही पकडे है. कॉपीपेस्ट मुळे झालय हे.

मनीषा लिमये, मस्त काम,
अजून 2 3 ids नि असेच छळले तर
होपफुली डॉक्टरीण बाई परत कोणाच्या मागे लागणार नाहीत Happy

मला पहिल्याच दिवशी शंका आली म्हणून ठरवलं की खणुयात थोड़े , बोलणें वाढवले पण गुन्हेगार इतका चालु आहे की जंग जंग पछाडूनही आवाज किंवा दर्शन द्यायला तयार नाही आणि शेवटी तर पकवलं वाटत मी त्याला की मलाच गळेपडू ठरवून मी सायबर सेल कड़े जाणार म्हटल्यावर चक्क मला ब्लॉक केलं
7 जुलैला मला या गुन्हेगाराची मेल आली त्यावर उत्तर देणे म्हणजे आपला मेल एड्रेस देणे . म्हणून मी त्याच्या विपुत लिहून आले आणि त्यावरून मला इथल्याच आदिसिध्दी चा निरोप आला की तिलाही अशीच / असाच मेल आलाय
मग तर मी या गुन्हेगाराशी बोलायचंच ठरवलं . ब्लॉक झाल्यावर परत त्याची ( गुन्हेगाराची) विपु शोधत आले तो विपु हरवलेली . मुख्य पानावर हा धागा दिसला तेव्हा कळलं की बऱ्याच जाणीना गुन्हेगाराने घोळात घ्यायाचा प्रयत्न केलेला दिसतोय .
थैंक्स कवे मला या धाग्याबद्दल/ गाइड केल्याबद्दल ( फ़ोटो टाकण्या संदर्भात)

मनिषाताई ग्रेट आहात.. Happy
मनिषा लिमये उर्फ मायबोलीवरील शेरलॉक यांचा विजय असो!>>>>>> +111111111111

Pages