स्पर्शिका जोशी, scam की सत्य?

Submitted by हेला on 13 July, 2018 - 11:15

मैत्रिणींनो! सावधान!!

"तुम्हाला इंजेक्शनची भीती वाटते का? मी मदत करु शकते" अशा अर्थाची मराठी आंतरजालावर अनेक दिवसांपासून एक छोटेखानी सुचवणी फिरते आहे. त्या चार ओळींच्या लेखात खास महिलांना आवाहन केले जात आहे. केवळ मायबोलीच नव्हे तर मिसळपाव संकेतस्थळावरही हा लेख आला होता. त्यात कोणीतरी डॉक्टर असल्याची बतावणी करुन महिला सदस्यांना जीमेलवर चॅटवर यायला सांगत आहे. एवढेच नव्हे तर कित्येक स्त्री सदस्यांना व्यक्तिगत मेल आयडीवर 'मी तुमचे लेख वाचले, मला खुप् आवडले, आपण चॅट करु शकतो का' अशा अर्थाचे मेल पाठवले आहेत. एकाच व्यक्तीकडून अशा प्रकारचे मेल्स आल्याची दोन्ही संस्थळावरच्या अनेक महिला सदस्यांनी कळवले आहे. हे सर्व मागच्या गेल्या सात ते आठ दिवसांत घडले आहे.

या प्रकरणात काहीतरी काळेबेरे आहे असे वाटल्याने मी व माझ्या पत्नीने याचा छडा लावायचे ठरवले. त्यातून आम्ही त्या जीमेल आयडीवर चॅटमधून संपर्क साधला. त्यातून त्या व्यक्तीने आपली ओळख नीटपणे दिली नाही. आम्ही विचारले की नक्की कशाबद्दल आहे हा लेख? तुम्ही काय मदत करता? तर त्यावर ती विचारत होती की तुमचा आधीचा इंजेक्षनचा अनुभव काय आहे, तो सांगा मग मी पुढे सांगते. म्हणजे नीटपणे काही सांगत नव्हती.

त्या व्यक्तीने स्वतः डॉक्टर असल्याचे सांगितले पण क्लिनिकचा पत्ता व मोबाइल नंबर देण्यास टाळाटाळ केली. सदर व्यक्ती "जूहू व ठाणे इथे माझे क्लिनिक आहे व माझा नवराही डॉक्टर आहे, आम्हाला एक दोन वर्षांची मुलगी आहे" अशी बतावणी करते. या व्यक्तीने आम्हाला सर्व डिटेल्स मागितले, जसे तुमचा फोटो द्या, नाव, कुठे जॉब करता, इत्यादी सर्व खोदून चौकशी केली. आम्हाला बघायचेच होते की हे प्रकरण नेमके काय आहे म्हणून आम्ही सर्व सत्य माहिती दिली. परंतु आम्ही जेव्हा साधा क्लिनिकचा पत्ता आणि मोबाईल नंबर मागितला तर आधी पुरेशी ओळख होऊ द्या एकमेकींची, मग पत्ता, फोन देते असे म्हणाली. पण आम्ही विचारले की डॉक्टरला क्लिनिकचा पत्ता द्यायला कशाला ओळख वगैरे लागते, तुम्ही पत्ता द्या, आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष भेटू. तेव्हा ती म्हणाली की "मी विकेंडला क्लिनिकला नसते, उद्या बँगलोरला कॉन्फरन्सला जायचे आहे अशी थातूरमातूर कारणे दिली. शेवटी आम्ही क्लिनिकच्या पत्त्यासाठी अडून बसल्यावर "माझी मुलगी झोपेतून उठली आहे आणि तिला झोपवून परत येते" असे म्हणून ही व्यक्ती जी ऑफलाइन झाली आहे ते गेल्या चार दिवसांपासून परत आलेली नाही. ह्या व्यक्तीने जो स्वतःचा फोटो म्हणून आम्हाला दाखवला, त्या फोटोची फेसबुक प्रोफाईलसुद्धा फेक असल्याचे आढळले आहे.

स्पर्शिका जोशी नावाची कोणीही व्यक्ती गायनॅकॉलॉजिस्ट असल्याचे आढळून आलेले नाही. त्या व्यक्तीने ठाण्यातल्या 'माहेर' क्लिनिक चा पत्ता दिला आहे तर त्या माहेर क्लिनिकशी कोणत्याही स्पर्शिका जोशींचा संबंध नाही आहे.

स्पर्शिका जोशी असे नाव घेऊन कोणी तुम्हाला चॅट वर यायचे आमंत्रण देत असेल तर कृपया सावध रहा. हा काहीतरी खूप मोठा स्कॅम आहे. ज्यात आपल्यासोबत काही चुकीचे घडल्यास कदाचित तुम्ही कोणाला सांगूही शकणार नाही. तेव्हा परत एकदा आवाहन कृपया सावध राहा, कोणत्याही मेल्स ला, चॅट इन्विटेशनला फशी पडू नका.

अ‍ॅडमीन व वेबमास्तरांना विनंती की सदर आयडी मायबोलीवरुन स्त्री आयडींना संपर्क करत आहे त्यामुळे तुमच्या पातळीवर याबाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा ही विनंती.

सदस्यांपैकी कोणी सायबर गुन्हेगारी संदर्भात मदत करु शकत असेल तर कृपया पुढाकार घेऊन या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा असे वाटते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतक्या महिला सदस्यांना मेल्स येत होते तर कोणीही मुद्दाम 'हो, मला इंजेक्शनची भीती वाटते' असे सांगून fake inquiry केली नाही का?>> विक्षिप्त माणसा, इमेल्स लिखाण आवडल आणि हॅंगआऊट वर गप्पा मारु अशी आहे. मला तर इंजेक्षन लेखाबद्दल ती कोण शोधताना कळलं आणि तेव्हाही लेख अप्रकाशित झाला असल्याने विशेष काही कळले नाही. बाकी बऱ्याच जणींनाही लेख आवडला .. हॅंगआऊट वर गप्पा मारायला आवडेल असाच इमेल आलाय.

ती व्यक्ती आणि इमेल्स संशयास्पद आहेत हे नक्कीच पण इंजेक्षन बद्दल इमेल आला वगैरे कानगोष्टीत गोष्ट बदल होतो तसे होतय.

बाय द वे मी जेव्हा इंटरनेट वर लहान होते (२००५ मध्ये) हा नव्या सदस्यांना व्यक्तीगत निरोपात साईट वर स्वागत करुन त्यांच्या मराठी शुद्धलेखनाबद्दल चुका काढून मग गमभन शुद्धीचिकीत्सक वापरा सांगणारे मेल लिहायचे. Happy
सुदैवाने अशी २-३ मेल लिहील्यावर मला हे क्रीपी आहे अशी अक्कल आली आणि बंद केलं.

प्रस्तुत आयडी sparshika@gmail.com ची गुगल प्लस प्रोफाईल हि आहे:
https://plus.google.com/u/0/109349816857938415737

इथे अबाउट वर क्लिक करा. प्रोफाईल चित्रात इंजेक्शन सिरींज दिसेल. तिथे See all photos वर क्लिक करा, पुढच्या पेजवर Profile photos वर क्लिक करा. येणाऱ्या पेजवर पुन्हा एकदा Profile photos वर क्लिक करा. यांचे पूर्वीचे प्रोफाईल फोटो दिसतील:

https://get.google.com/u/0/albumarchive/109349816857938415737/album/AF1Q...

sparshika_profilepics.jpg

यातल्या एकेक फोटोवर क्लिक करून बघा. सिरींजच्या फोटोची तारीख दिसते २६ जानेवारी २०१८. आधीचे फोटोपैकी एक २८ जानेवारी २०१३ रोजी तर दुसरा १८ मे २०१७ रोजी अपलोड केला आहे असे दिसून येईल.

अरे बा प रे! इतक्या मोठ्या प्रमाणात झालं असेल हे याची कल्पनाही नव्हती!
मलाही दोन ईमेल्स आल्या होत्या, एक इथली एक पाककृती वाचून (!) आणि एक एका दिवाळी अंकातला लेख वाचून. तेच शब्द, फक्त मायन्यात बदल. मीही केवळ 'धन्यवाद' म्हणून रीप्लाय बॅक केला, चॅट करणं आऊट ऑफ क्वेश्चनच आहे.

असो. पण माझाही हाच प्रश्न, की काय हेतू असेल? स्कॅम करणार तरी कसा? व्यक्तीगत माहिती न देण्याइतके आपण सगळेच सूज्ञ आहोत आणि प्रत्यक्ष भेटायला ही बाई तयार नाही असं दिसतं. मग या सगळ्यातून नक्की काय साध्य करायचं होतं/ आहे आणि कसं? सायबर सेलकडे तक्रार तरी कोणत्या बेसिसवर करायची? कारण वरवर पाहता, ऑफेन्सिव्ह असं काहीच नाहीये ईमेल्समध्ये.

एनीवे, या बाफकरता धन्यवाद. सध्या कोणाचं काही नुकसान झालेलं नसलं, तरी या निमित्ताने सतर्कता वाढेल.

मला पण दोन वेळा इमेल आला आहे. पण अगदी पहिल्यांदा आला तेव्हाच मला संशय आला त्यामुळे मी तो सरळ इग्नोर केला. आणि रिप्लाय वगैरे पण नाही दिला. असे संपर्कातून मायबोली वर अनेक मैत्रिणी मिळाल्यात (जीवाभावाच्या) पण या बाईंचा मेल वाचून चक्क वास आला काहीतरी. त्यामुळे उत्तर दिलंच नाही.+११११११११११११११११११११११११११११११११११
अगदी.. मीही असंच केलं (ञ)

निल्सन मला नाही वाटत तू असशील. मी व्यक्तिश: तुला ओळखत नसले तरी, तुझ्या पोस्टस वाचत असते. त्यावरून म्हणतेय, एक अंदाज माझा.

Submitted by अन्जू on 14 July, 2018 - 01:39>>>> धन्यवाद अन्जू Happy

निल्सन,
मलापण काही तो मेसेज आलेला नाही. अजूनही बर्याचजणी असतील आपल्यासारख्या त्यामुळे

< संशयाची सुई अजूनही माझ्यावर राहू शकते Wink >
>> याबद्दल नो वरीज Happy

Submitted by अॅमी on 14 July, 2018 - 05:19>>> स्मित:

मलाही नाही आलाय असा काही मेल, कदाचित जे आयडीनाव स्पष्ट स्त्री आयडी म्हणून ओळखले जातात त्यांना मेल केले असावे. >>> हम्म बरोबर

सायबर सेलकडे तक्रार तरी कोणत्या बेसिसवर करायची? कारण वरवर पाहता, ऑफेन्सिव्ह असं काहीच नाहीये ईमेल्समध्ये.>>> अगदी तक्रार असे नाही, पण त्यांच्या निदर्शनास नक्कीच आणून देऊ शकतो. कारण, हे असे वागण्यामागचे कारण स्पष्ट होत नाहीये, अन तसाच काही धोका असेल तर कदाचित तो थांबवायला मदत होऊ शकते.
हे मेल कुठल्या आयपी वरून येतायेत, लोकेशन काय आहे, हा आयपी किंवा आयडी वापरणाऱ्या व्यक्तीची खरी ओळख काय आहे, त्यांनी पूर्वी काही गैरकृत्ये केली आहेत का? , एकच व्यक्ती आहे की एखादी टोळी आहे,
असे बरेच प्रश्न आहेत, कदाचित असे काही नसेलही पण म्हणतात ना Precaution is better than cure. म्हणून मला वाटते की चान्स घेण्यापेक्षा अडमीनने सायबर सेलला निदान कळवावे की असे काही होतेय.

by VB on 14 July, 2018 - 11:56
^^^ सहमत आहे. धागा टाकण्याचा उद्देशच तो आहे.

मलाही लेख आवडल्याचा मेल आला आहे. पण पुर्वीच सावधानतेचा ईशारा फेसबूकवर वाचल्यामुळे त्या कडे दुर्लक्ष केले आहे.
म्हणून मला वाटते की चान्स घेण्यापेक्षा अडमीनने सायबर सेलला निदान कळवावे की असे काही होतेय.
वरील मताशी मी ही सहमत आहे. कारण ईथे जरी आपण दुर्लक्ष केल आणि हे काही भलतच प्रकरण असेल तर बाहेर दुसर कुणी याच बळी होऊ नये. एकदा सत्यता कळाली की बरे.
Fake online friendship अशाप्रकारचा पण गुन्हा असू शकतो. याची अधिक माहीती मिळवून काही मार्ग निघतोका ते पाहता येईल.

बहुतेक फिमेल इमेल आयडी गोळा करणे हा एक उ्द्देश असु शकतो. तुम्ही रिप्लाय केला की आयडि मिळणार. आणि injection is just to increase curiosity

हे प्रकरण वाचून शेरलाक होम्स च्या The Red Headed League ची आठवण आली . वरवर पाहता हास्यास्पद , शुल्लक व निरुपयोगी वाटणारया घटनांमागे गंभीर गुन्ह्याचे प्लॅनिंग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आज माझी मेल चेक केली पर्सनल तर मला ही आला आहे. उत्तर काही दिलेले नाही.
मला सर्व नि ष्पाप माता भगिनींना तरुणींना सांगायचे आहे कि इंजेक्षन व सुई ह्या चे स्लँग मधले अर्थ वेगळे आहेत कृपया उत्तर देउ नका व हँगाउट्चा तर प्रश्नच येत नाही. पर्सनल डेटा हॅक झाला आहे बहुतेक . संपर्क सुवि धा बंद करा.

पण पुर्वीच सावधानतेचा ईशारा फेसबूकवर वाचल्यामुळे त्या कडे दुर्लक्ष केले आहे. >>>> फेसबूकवर कुठे आहे हे सगळं?

आज चारपाच दिवसांनी माबोवर आले. हा धागा दिसला.
धागाकर्त्याचे आभार.
इमेल मलाही आलीये.
स्पर्शिका हे नाव वाचून मला उगाचच शंका आली त्यामुळे रिप्लाय करायच्या भानगडीत पडले नाही. परत इमेल आली तर बघू म्हणून सोडून दिलं.
आता हा धागा मात्र मी फॉलो करणार.
नक्की गुंडी काय आहे ते बघायचेय.

<<< इंजेक्षन व सुई ह्या चे स्लँग मधले अर्थ वेगळे आहेत >>>

शिवाय हा प्रकार इंजेक्शन फेटीश मध्ये सुद्धा येतो. याबाबत इथे अधिक लिहिणे उचित होणार नाही. हवे तर विकिपीडियावर वाचा. गुगल केल्यावर लक्षात येते कि या व्यक्तीने हीच पोस्ट अशाच एका ग्रुपवर पण टाकली आहे.

अमा, सुईचे तुमचे गेस बरोबर असू शकते.संपर्क वाढवून त्यातल्या नैराश्यात गेलेल्याना चुकीचे पदार्थ विकणे/आधी सॅम्पल फुकट देणे असेही काही असू शकेल.
स्पर्शिका, वाचत असल्यास आणि तुम्ही जेन्यूईन असल्यास स्पष्टीकरण द्या.जेन्यूईन नसल्यास असे उद्योग पुढे करणे थांबवा.

अमा, परिचित, मी अनु .... तुमच्या प्रतिसादानुसार जे आकलन होत आहे त्यानुसार प्रकरण गंभीर दिसत आहे. अजून खोलात चौकशी करावी लागेल आता.

स्पर्शिका जोशींची इमेल मलाही आली होती. इथे मायबोलीवर व्यक्तिगत निरोपही होता. इमेलला धन्यवाद लिहून चॅट वगैरे शक्य नाही असं मी सांगून टाकल्यावर मग पुढे बाई गायब झाल्या.

मलापन आला ह्या नावाने मेल..
म्हणे कॅन्सर बद्दल लिहिलेला लेख आवडला... माबोवरुन आला म्हणुन मी त्यांना रिप्लाय पन दिला जीमेल वर कि मी नाही लिहिलय अस काही तर त्यावर सॉरी पल्लवी ताई पण तुमच्याशी बोलायला आवडेल असा रिप्लाय आला..
आता परत हॅन्ग आऊट वर इन्विटेशन पाठवल म्हणुन मेल आलाय..
मी आत्ताच ब्लॉक करुन आली सदर मेल आयडीला आणि फिशिंग रिपोर्ट पन करुन आली जीमेल वर..

टिना, तू आणि मी दोघींनी मॅट्रिक्स चित्रपटाप्रमाणे एका समांतर जगात कॅन्सरचे बरेच लेख लिहीलेत जे फक्त स्पर्शिकबाईनाच वाचता येतात Happy
(अवांतरः इंजेक्शन फेटिश बद्दल गुगल केले पण आलेल्या रिझल्ट वर क्लिक करायची हिंमत नाही झाली.हा नोकर्‍यांसाठी वेबकॅम वर टेस्ट द्यायचा वगैरे घरगुती लॅपटॉप आहे.उगीच भलते संस्कार नकोत त्यावर.)

Screenshot_2018-07-14-07-10-08-628_com.google.android.gm_.png

मी अनु, डीट्टो मेल आलाय मला..
रिपोर्ट फिशिंग केलय मी..बघु काय होतं ते..

इंजेक्षन व सुई ह्या चे स्लँग मधले अर्थ वेगळे आहेत >> बाकी शोधुन शोधुन फिमेल आयडींनाच टारगेट केल गेलय यावरुन तुझी शंका खरी वाटतेय अमा.. ब्लॉक केल्यानंतर आता अजुन गीमेल प्रायवसी मधे काही फेरफार करावे लागतील का?

Pages