पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतात उपलब्ध असलेले घटक वापरून एकदम फुलप्रुफ व्हाईट सॉस (पास्ता साठी) ची कृती सांगणार का कृपया ? मी जुन्या माबोवर शोधले आहे पण सापडली नाही.

खाज नाही खाल्ल?? साधारण बोट्भर लांबिच (म्हणजेच बोटासारख पण थोड वकड तिकड असत) आणि गुळाच्या रंगाच असत (कारण गुळाच आवरण असत त्याला.) मला वाट्त खाज हे बेसनच बनवल जात. आणि आवरणात गुळ आणि आल असत.

आणि मालवणी खाजा कसा असतो??
मी कधि खाल्ला नाहीये........

हाय... इतकं मस्त लागतं ना.. कधी मालवणी जत्रेत गेलात की विकत घ्या आणि खा. मोगरा केतकी ने वर्णन केले आहेच...गुळाचंच असतं न गुळाचंच घ्या. मी साखरेचं एकदा खाल्लय.. एकदम बेक्कार....
कोणाला कृती माहित असेल तर सांगा. बेसनाची एवढी जाड शेव आणि तीही खुसखुशीत कशी करतात???

हे बघ दिनेश दा ने दिलेली मालवणी खाजाची रेसिपि.

Dineshvs

Tuesday, August 22, 2006 - 12:22 pm:

मालवणी खाजा किंवा शेवखंडे.

अजुनहि कोकणात जत्रेत हा पदार्थ आवर्जुन विकायला असतो. आमच्या घरी लहानपणापासुन हा पदार्थ येत असल्याने, मला मात्र तितकासा आवडत नाही. याला शेवखंडे म्हणतात हे हल्लीच ऐकले. कोकणात तरी हा शब्द वापरात नाही.
सव्वा वाटी जाडसर कणीक व सव्वा वाटी बेसन चाळुन एकत्र करावे. त्यात दोन चमचे तेलाचे मोहन घालुन पाण्याने घट्ट मळावे. जरा वेळ तसेच ठेवुन मग त्याचे कडबोळीप्रमाणे पण सरळ गाठे वळावेत. भर तेलात ते तळुन घ्यावेत. तळले कि त्याचे बोटभर लांबीचे तुकडे करावेत. पाव वाटी काळे तीळ भाजुन घ्यावेत.
दोन वाट्या चिरलेला गुळ घेऊन, पाणी न घालता त्याचा मंद आचेवर पाक करावा. त्यात अर्धा चमचा सुंठपुड घालावी. आणि मग त्यात तळलेले गाठे घालुन अलगद हाताने ढवळावे. पाक लगेच शोषला जातो. तो अगदी सुकायच्या आत, त्यावर तीळ शिवरावेत.

आणि तु विचारलेल्य बालूशाहि खाजाची यो जा टाकते अणि लिन्कते इथे Happy

अच्छा... याला मालवणी खाजा म्हणतात का?
याला आमच्याकडे "गुडीशेव" म्हणतात.... मलाही आवडते....
आमच्या गावाकडच्या यात्रेला गेलो कि हा खाउ हमखास आणतो आम्ही....
याची कॄती टाकल्याबद्द्ल धन्यवाद्...तुमचे आणी दिनेशदांचे......
लवकर बालूशाहि खाजाची कॄती टाकाना...

बेसनाच्या लाडवावर काजू वा बेदाणा चिकटवणे फ़ार कॉमन झालेय. काहीतरी वेगळेपणा म्हणून
मी काजूच्या किसात ते घोळवले. काजू मिक्सरमधे वाटले तर तेल बाहेर येते, म्हणुन मी काजू किसण्या
साठी अंजली कंपनीचा स्लाईसर वापरला.
तसेच मी वेलची बरोबरच एका किलो बेसनासाठी, अर्धा इंच दालचिनी व अर्धी लवंग साखरेबरोबर
वाटून घेतली. जरा वेगळा स्वाद आला आहे.
besan.jpg

छानच आहेत लाडु.. एक किलो बेसनाला तुप आणि साखर किती वापरली ?

आणखी एक ... या लाडवांचा रंग ईतका गडद कसा ?

केक किती दिवस टिकतो? मी केलेला कधीच १ दिवसापेक्षा जास्त दिवसांसाठी उरला नाहीये. पण यावेळी धाकट्या पुतणीची फर्माइश आहे, चाची केक ले आओ म्हणून. किती आधी बनवावा कळत नाहीये.
दुसरे कोणत्याही केकमध्ये/ ब्राउनी मध्ये जर अंड घालायचं नसेल तर बेकिंग पावडर / सोडा याचे प्रमाण किती वाढवावे? अजुन काही घालावे लागेल का?

बेसनाच्या लाडवात तुपाएवजी डालडा घातलं तर चालेल का? आणि घेतल तर प्रमाण किती असावं? म्हणजे receipe मध्ये सांगतात ते तुपाएवढ्च की कमी जास्त?
दिनेशदा मला please रवा-बेसन लाडवाची कुती सांगाल का? मिठाईच्या दुकानात मिळतात ना तसे पिवळे पिवळे? thanks in advance......

अल्पना, घरी केलेला केक ५-६ दिवस सहज टिकतो.

रवा-बेसन लाडूच्या कृती इथे आहेत, याच ग्रूपमध्ये

बेसनाच्या लाडवात तुपाएवजी डालडा घातलं तर चालेल का? >>> ई कशाला पण ? चांगलं तूप घाल की.

हो ग condrella, पण माझी काही दिवसांपुर्वीच (४ महीने) डिलिव्हरी झालीय, अजुन पर्यंत तुपाचेच पदार्थ खात होति त्यामुळे कंटाळा आलाय आता तुपाचा आणि त्यामुळे खुप सुट्लीय पण मी. आता कुठे जरा diet control करायला सुरुवात केलीय म्हणुन विचारत होति की तुपाला काही पर्याय आहे का?
psg <रवा-बेसन लाडूच्या कृती इथे आहेत, याच ग्रूपमध्ये > यापेक्षा लिंक दीली असतत तर बर झाल असत, इतके (५७) पान वाचत बसली तर पुढची दिवाळी येईल Happy Happy

diet control म्हणून चांगल्या तुपाऐवजी डालडा ? Lol

पूनम गेली असेल आता घरी. त्यापेक्षा तुम्हीच सर्च वापरुन शोधा.

thanks cindrella......
search करुन पाहीलय मी पण पुर्ण पध्द्तशीर क्रूती नाही मिळाली ..........
डालडा तुपापेक्षा जास्त fat युक्त आहे का?

खावे तर तूप खावे पण डालडा मात्र अगदीच नको Happy सॅच्युरेटेड फॅट्स बद्दल वाचलेय का कधी? ते वाचुन काढा एकदा.

दिनेशनी लिहिलेल्या रवा लाडुवर अत्ताच तुपाची कॉमेंट टाकलिय ती वाचा.

मिनोती ने लिहिल्याप्रमाणे डालडा अगदी वर्ज्य. मी चार कप बेसनासाठी दिड कप तूप आणि पावणेदोन कप पिठीसाखर वापरली. मंद आचेवर दिड तास भाजले. आमच्याकडे अश्याच रंगाचा लाडू लागतो. (बेसन भाजल्यावर त्यात मी एक टिन इव्हॅपोरेटेड दूध ओतले ) त्याने बेसनाला जाळी पडते आणि हा लाडू खाताना टाळुला चिकटत नाही.
रवा बेसन लाडवासाठी दोन कप रवा, एक कप बेसन, एक कप तूप आणि दोन कप साखर लागेल. रवा आणि बेसन वेगवेगळे भाजायचे आणि मग पाकात टाकायचे. बाजारी लाडवात रंग घालतात. आणि बुरा साखरेत ते घोळवतात. ( साखरेचा पक्का पाक करायचा. लिंबू पिळायचा नाही, मग तो पाक परातीत ओतून्,पेल्याने घोटायचा. थोड्या वेळाने, बारिक साखर तयार होते. ती बुरा साखर. पेढे, रवा बेसन लाडू घोळायला चांगली. )

धन्यवाद दिनेशदा, तुम्ही खुप छान समजावुन सांगता, तशी मी पाककलेत आता आत्ताच रस घ्यायला लागलिय त्यामुळे बर्‍याच गोष्टी अजुन अनुभवात आल्या नहीत. लग्नानंतरची पहीलीच वेळ आहे फराळ करायची. त्यात्ल्या त्यात थोड्फार खाणेबल व्हाव हीच (घरात्ल्या सगळ्यांची) ईच्छा Happy
रवा बेसन लाडवासाठी रवा बारीक घ्यायचा की जाडा?

रवा बारीकच घ्यावा लागेल. आम्हा सर्वांच्या शुभेच्छा अणि सहकार्य असेलच ( तेवढेच सहकार्य घरातील माणसेही करतीलच म्हणा )

बेसन लाडु करायला घेतलेत, बेसन थोड थोड २ वेळा(अर्धा- अर्धा किलो) भाजलय. पाऊण किलोलला जरा कमी पीठीसाखर होति आता कमी पडेल अस वाटतय. तर तुपात भाजलेले(दुध शिंपडुन) बेसन चांगल राहील ना फ्रीजच्या बाहेरपण? माझ्याक्डे फुटाण्यांची केलेली पीठीसाखर आहे ती चालेल का लाडवांसाठी?( थोडी मध्ये मध्ये रंगीत आहे, रंगीत फुटाणे होते) आधि अर्धा कीलोचेच करेन म्हण्ते लाडु बघु जम्तात का ते. oversmart पणा करुन पुर्ण १ किलो बेसन भाजल आणि आता tension आलय मला ईतक जमेल का कराय्ला आणि जमल तरी बरे होतिल का लाडु?

(बेसन भाजल्यावर त्यात मी एक टिन इव्हॅपोरेटेड दूध ओतले ) त्याने बेसनाला जाळी पडते आणि हा लाडू खाताना टाळुला चिकटत नाही.>>>>>> खरंय.. बेसनाचे भाजुन झाले कि लगेच २/३ चमचे दुधात थोडीशी हळद मिसळुन भाजलेल्या बेसनात घालावी याने लाडवाला छान रंग येतो आणि टाळुलापण चिकट्त नाहीत..

मला अर्जंटली अंड्याशिवाय केक करताना रेसेपीमध्ये काय बदल करायचे हे कोणी सांगु शकेल? तासाभरात करायचाय केक.

साखर कमी पडणार नाही. चव बघत बघत मिसळायची. साखर मिसळताना चपातीच्या पिठाप्रमाणे बेसन मळत रहायचे.\खमंग भाजलेले बेसन नक्कीच टिकेल.

Pages