प्लास्टिक बंदी

Submitted by अविका on 19 June, 2018 - 05:08

मुंबईत २३ जूनपासून प्लास्टिकच्या पिशव्या बाळगणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असून बंदीनंतर पहिल्यांदा पिशवी आढळल्यास पाच हजार, दुसऱ्यांदा पिशवी आढळल्यास दहा हजार, तिसऱ्यांदा पिशवी आढळल्यास २५ हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय राज्य सरकारने ठरवला आहे. पण प्लास्टिक बण्द म्हणाजे नक्की काय ? फक्त प्लास्टिकच्या पिश्व्या की घरचे रोजच्या वापरातील प्लास्टिकच्या वस्तुपण उदा. पाण्याच्या बाटल्या, डबे ई.

याबद्द्ल जर कुणी निट समजावु शकेल तर बरे होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>अरे हो. खिक् @ केटी वाले. हस्ताक्षर जुळलं बघा तुमचं!

जुळले का छान छान!
पुढील शेरलॉकगिरी कळवत रहा!

खरंय.
इथे प्लास्टीक बंदी योग्य का आहे किंवा नाही यावर शास्त्रीय / तर्कशुद्ध माहिती अपेक्षित होती. या ही विषयात राजकारण आणले गेले. चर्चाच संपली. कळतच नाही अशा वेळेला काय करावं ते.

कुणाला दिले आहेत अधिकार? निळा युनिफॉर्म कुणाचा आहे? पोलीस?
Submitted by आ.रा.रा. on 27 June, 2018 - 23:35

http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-plastic-ban-day-2-action-554519
http://abpmajha.abplive.in/videos/abp-majha-whatsapp-bulletin-for-24-jun...
https://www.youtube.com/watch?time_continue=4&v=vui9Z-yCX38
https://www.youtube.com/watch?v=Sf4IuBQiDJs

राज्यात सर्वत्र प्लास्टिक बंदी लागू झाली असून प्रशासनाकडून याची कठोर अंमलबजावणीही करण्यात येत आहे. मात्र, यामुळे छोट्या किराणा दुकानदारांची मोठी अडचण झाली असून माल सुरक्षितरित्या बांधून कसा द्यायचा याच्या विवंचनेत ते आहेत. त्यांची ही अडचण लक्षात घेता, पाव किलोपासून पुढील वजनाच्या किराणा मालासाठी प्लास्टिक पॅकिंगसाठी सशर्त परवानागी देण्यात आली आहे. त्यामुळे किराणा दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बुधवारी याची घोषणा केली. उद्यापासून ही बंदी उठवण्यात येणार आहे.
प्लास्टिक बंदीमुळे छोटे दुकानदार असलेल्या किराणा दुकानदारांना किराणा माल ग्राहकांना देताना अडचण निर्माण झाली होती. याबाबत रामदास कदम यांच्याकडे छोट्या दुकानदारांच्या संघटनांनी आपले प्रश्न मांडले. त्यानंतर त्यांना मालाच्या पॅकिंगसाठी सशर्त परवानगी देण्यात आली. त्यानुसार, किराणा माल प्लास्टिक पिशव्यांमधून सुट्या पद्धतीने न देता मालाची पॅकिंग करुनच दुकानदारांना आपला किराणा माल विकावा लागणार आहे.

या पॅकिंगवर प्लास्टिकचे मायक्रॉन, पॅकिंगची तारीख यांसारख्या गोष्टी छापाव्या लागणार आहेत. तसेच दुध पिशव्यांप्रमाणे हे प्लास्टिंकचे पॅकिंग ग्राहकांकडून पुन्हा मागवून घेऊन त्याचा पुनर्वापर कसा करणार याची माहितीही दुकानदारांना द्यावी लागणार आहे. या सर्व गोष्टींचे दुकानदारांच्या प्रतिनिधींनी लेखी आश्वासन दिल्यानंतरच त्यांनी ही परवानगी देण्यात आल्याचे कदम यांनी स्पष्ट केले आहे.

सर्व प्रकारच्या किराणा मालासाठी ही बंदी उठवण्यात आली असून इतर खाद्यपदार्थ विकणाऱ्या दुकानदारांसाठी मात्र ही प्लास्टिक बंदी कायम राहणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांनाही प्लास्टिक पिशव्या वापरण्यास बंदी कायम असणार आहे.
ग्राहकाकडून पिशव्या परत करण्याची जबाबदारी दुकानदारांसाठी असणार असून या पिशव्या परत करताना त्यांना ५० पैशांपासून सूट देण्याची जबाबदारीही दुकानदारांवरच राहणार आहे. यापूर्वी मोठ्या उत्पादकांना सूट दिली होती ती आता सर्व किराणा दुकानदारांसाठी देण्यात आली आहे.

प्लास्टिकबंदीबद्दलचा नवा नियम आला. बघ, तुला नोटाबंदीची आठवण येतेय का? Wink

प्लास्टीकबंदीचा शिवसेनेना घेतलेला हा निर्णय चांगलाच होता. पण त्यातून गैरप्रकार होत असतील तर त्या प्रकारांचे समर्थन कधीही होणार नाही. शिवसेनेने माघार घेऊ नये ही इच्छा आहे.

शिवसेनेने किराणा मालावरची बंदी मागे घेतली असे जे प्रसिद्ध झाले आहे तसे नाही ते. पावसाळा असेपर्यंत पाव किलोच्या वरील मालाचे पॅकिंग प्लास्टीकच्या पुड्यात चालणार आहे. पण त्यावर प्लास्टीक किती ग्रामचे आहे हे लिहीलेले असले पाहीजे. तसेच दुकानदार ते ग्राहकांकडून परत घेणार आहे या अटीवर आहे. तो ते कसे परत घेणार आणि रिसायकल कसे करणार हे त्याला सांगता आले पाहीजे. उत्पादकांना सुद्धा रिसायकल करण्याच्या अटीवर परवानगी दिली आहे.

प्लास्टीक पिशव्यांचा उल्लेख नाहीच त्यात.

राजकारण बाजूला ठेवले तर जनतेपर्यंत योग्य माहिती कशी जाईल हे पाहीले पाहीजे. प्लास्टीक पिशव्यांना वगळल्याचा उल्लेख नाही. तशा बातम्या असल्याने नाहक दंडाचा भुर्दंड पडण्याची शक्यता आहे.

लोकस्त्तेच्या अग्रलेखातून
" तसे ते असते तर प्लास्टिकच्या बाटल्यांवर बंदी घातली गेली असती. त्या बंदीत नाहीत. कारण ज्येष्ठ सेना नेत्याच्या चिरंजीवाचे उद्योग. सदर सेनानेतापुत्राचा प्लास्टिकच्या बाटल्या बनवण्याचा कारखानाच आहे. तेव्हा या बाटल्यांमुळे पर्यावरणास काहीही धोका नाही, असे आपण आता मानायचे."

अर्ध्या लिटरच्या पाण्याच्या बाटल्यांवर बंदी नाही आणि एक लिटरच्या बाटलीवर आहे हे कसे चुकीचे आहे असे वर कुणीतरी सांगितलेले आहे. आता काय खरे मानायचे ? सरसकट प्लास्टीक बाटल्या की अर्ध्या लिटरच्या वगळलेल्या आहेत फक्त ? तसे असेल तर त्यामागे कारण असेल काही. कदाचित मुलांना शाळेत नेण्यासाठी वगैरे. अर्थात ते सेना नेतेच जास्त चांगले सांगू शकतील. सर्वसामान्यांना याबाबतीत माहिती असण्याचे कारण नाही.

मानायचे कशाला? अधिकृत नियम शोधायचे की.

अन अर्धा लिटर डिस्पोजेबल बाटलीत मुलांना शाळेत न्यायला पाणी देतात? बाप्रे!

Pages