प्लास्टिक बंदी

Submitted by अविका on 19 June, 2018 - 05:08

मुंबईत २३ जूनपासून प्लास्टिकच्या पिशव्या बाळगणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असून बंदीनंतर पहिल्यांदा पिशवी आढळल्यास पाच हजार, दुसऱ्यांदा पिशवी आढळल्यास दहा हजार, तिसऱ्यांदा पिशवी आढळल्यास २५ हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय राज्य सरकारने ठरवला आहे. पण प्लास्टिक बण्द म्हणाजे नक्की काय ? फक्त प्लास्टिकच्या पिश्व्या की घरचे रोजच्या वापरातील प्लास्टिकच्या वस्तुपण उदा. पाण्याच्या बाटल्या, डबे ई.

याबद्द्ल जर कुणी निट समजावु शकेल तर बरे होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्लॅस्टिक पर्यावरणासाठी वाइट आहे याबाबत दुमत नसावे
आता दंड लावून म्हणा किंवा जनजागृती करुन म्हणा कुठल्याही कारणाने आत्ता आहे त्यापेक्षा निम्म्यावर जरी आला प्लॅस्टीकचा वापर तर उपाय यशस्वी झाला म्हणता येईल की.... फायदाच आहे आपला यात!
सारखी नकारघंटा कशाला वाजवायची?

अमितव, WA विद्यापीठातून मिळालेली माहिती बरोबर आहे. कालच्या लोकसत्तेत कशावर बंदी आहे/नाही असे दोन तक्ते आलेत, त्यात उत्पादकांकडून प्लास्टिकच्या वेष्टणात येणारे पदार्थ म्हटलंय (त्यांना उत्पादकांकडून पदार्थांसाठी वापरलेले प्लास्टिकचे वेष्टण म्हणायचं असावं.)

मैत्रेयी, माझ्या आठवणीप्रमाणे निर्णय गुढीपाडव्यापासून अंमलात येणार होता, त्याला मुदतवाढ मिळाली आहे.

<गार्बेज बिन लायनर्स कॅरीबॅग म्हणून वापरायला सुरुवात करा पाहू.>
हे पटलं नाही. मी अनेक वर्षं कापडी पिशव्या वापरतोय.

१. प्लास्टीक बंदी मुळे फ्लेक्ससम्राट बंद होतील
२. अभक्ष्य भक्षणावर आळा येईल ( आणणार कसे ?)
३. कच-याचे ढीग कमी होतील
४. प्लास्टीक गायीच्या पोटात जायचे ते बंद होईल

तोटा
१. प्लास्टीक बंदीमुळे प्लास्टीकच्या अनेक वस्तूंच्या जागी कागदी वस्तू वापरात येतील ज्यामुळे बेमुसार वृक्षतोड वाढेल. म्हणजे पर्यावरणाला धोका आहेच.

हे पटलं नाही. मी अनेक वर्षं कापडी पिशव्या वापरतोय.>>> + १

Bio-degradable गार्बेज बॅग्स ग्राहक संघात कित्येक वर्षं देत आहेत त्याच वापरते आहे.

आमच्या ऑफिसने world environment day ला आम्हाला दोन दणकट मोठ्या कापडी पिशव्या (त्यातली एक घडीची), 30 biodegradable garbage bags आणि स्वयंपाकातल्या नळात लावण्यासाठी एक बूच दिलं आहे पाण्याची बचत करण्यासाठी.

प्लास्टिकचा भस्मासूर आवरायलाच हवा आहे. कित्येक नाले हे प्लास्टिकचे नालेच दिसतात. घाण किंवा स्वच्छ अस कुठलंही पाणी दिसत नाही.

मध्ये काही महिन्यांचा अवधी मिळाल्याने जवळजवळ सगळ्या दुकानांनी छापील प्लास्टिक बॅग ऐवजी छापील कागदी पिशव्या सुरू केल्या आहेत. फार सुंदर दिसतात आणि अगदी फुसक्या नाहीत. छोट्या दुकानदारांनी होत्या तेवढ्या संपवत आणल्या. आता देत नव्हते आणि शक्यतो कुणी मागत नव्हतं. फळवाले, भाजीवाले आपल्याजवळ पिशवी नसेल तर कागदात किंवा त्या पात्तळ कापडी पिशवीत देतात.

आपणच अगदी मुठीत/खिश्यात/पर्समध्ये मावेल एवढी घडीची पिशवी ठेवणे उत्तम.

प्रयास तर करू! आणि हे स्वत:वरच उपकार होतील Happy

प्लास्टीक बंदीमुळे प्लास्टीकच्या अनेक वस्तूंच्या जागी कागदी वस्तू वापरात येतील ज्यामुळे बेमुसार वृक्षतोड वाढेल. म्हणजे पर्यावरणाला धोका आहेच.>>>> प्लास्टिकचा अतीवापर व्हायच्या आधी जे करायचो तेच करूया. स्टीलचा बाटल्या वापरूया. थर्माकोलची ताटं मी कधीच वापरली नाहीत. जास्त पाहुणे असतील तर चिपाडाची ताटं विविध प्रकारात मिळतातच. ग्राहक संघात बाहेरच्या पेक्षा स्वस्त दरात देणे सुरू झाले आहे. तीच घेवून ठेवली आहेत. कोरडं खाणं असेल तर ती एक दोन वेळा धुवून वापरण्याजोगीही आहेत म्हणे.

प्लास्टीक बंदी मुळे फ्लेक्ससम्राट बंद होतील >>> शहरं जरा बरी दिसू लागतील. जिथे तिथे कॉर्नर कॉर्नरला अगणित थोबडे लावलेले पाहून चीड यायची. उत्तम होईल ते थोबडे बघायला नाही लागले तर.

ह्या गणपती विसर्जनानंतर कचऱ्यात पडलेली थर्माकोलची मखरं दिसणार नाहीत. साधी फुलांची, पुठ्ठ्याची सजावट करा. किंवा शक्य असेल तर फोल्डिंगची लाकडी मखरं मिळतात ती घ्या. पण थर्माकोल आवरा.

वर एका पोस्टमध्ये आलेल्या तक्त्यानुसार बंदी घालताना शिक्षण, शेती, वैद्यकीय अश्या काही क्षेत्रांना काही सुटी दिलेल्या दिसत आहेत. तो तक्ता ऑथेंटिक आहे किंवा नाही हे माहीत नाही, पण असला तर निदान काही अत्यावश्यक क्षेत्रांना त्वरीत झळ पोचू नये ह्याची थोडी जाण ठेवलेली दिसते.

हा झाला एक भाग!

दुसरे म्हणजे वर दोघेतिघे प्रतिसाददाते जे म्हणाले तेच म्हणतो की कुठेतरी सुरुवात व्हायला हवी. मुळात हा निर्णय पर्यावरणाशी निगडीत आहे व चांगल्यासाठी आहे इतके तरी मान्य व्हायला हवे. भले राजकीय स्वार्थासाठी घेतला असे म्हणायचे असल्यास म्हणावे, भले निर्णय तडकाफडकी घेतला व योग्य पद्धतीने विषय हाताळला गेला नाही असे म्हणावे, पण मुळात प्लॅस्टिक बंदी / आळा हे आवश्यक आहे हेही मान्य व्हावे.

तिसरे म्हणजे प्लॅस्टिकचे पदार्थ / वस्तू बनवणार्‍या शेकडो कंपन्या, कामगार ह्यांचे आता काय होणार ह्यावरही काहीतरी ठोस कळायला हवे. उत्पादक, साठा करणारे, पुरवठा करणारे, रिटेलर्स ह्या सगळ्यांना आता एकदम मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागेल.

बर मग आता ज्या बंदी असलेल्या बस्तू घरात असतील त्याच काय करायच? विल्हेवाट कशी लावायची? >>> काही ठिकाणी गोळा करत आहेत गेले काही महिने. तिथे नेवून द्यायचं. तुमच्या एरियात चौकशी करा. आणि समजा घरात थोडंफार काही राहिलं तरी तो काही बॉंब नव्हे. सर्क्युलेशनमध्ये नाही आणलं किंवा कचऱ्यात नाही टाकलं तरी ठिकच.

प्लास्टिक बंदीला नाके मुरडणाऱ्यांनी कधीतरी मुंबईत येऊन समुद्राची भरती ओसरून ओहोटी लागल्यानंतर समुद्रकिनारी फिरावे!!!

या दोन अधिचूचना मिळाल्या.
http://www.mpcb.gov.in/images/pdf/plastic_27032018.pdf
http://www.mpcb.gov.in/images/pdf/Environment_Department_18042018.pdf
यात पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिक पिशव्या/बाटल्या परत विकत घेऊन रिसायकल करण्याबद्दल म्हटलंय.
ही राजभाषा मराठी असेल, तर तिचा दिन साजरा करायची खरोखर गरज आहे.

Atonat khush ahe

Bandi mule 1 mahina tras hoil mag savay lagun jail

<प्लास्टिक बंदीला नाके मुरडणाऱ्यांनी कधीतरी मुंबईत येऊन समुद्राची भरती ओसरून ओहोटी लागल्यानंतर समुद्रकिनारी फिरावे!!!>
ही समस्या प्लास्टिकची नसून कचर्‍याची योग्य व्यवस्था न लावण्यामुळे निर्माण झाली आहे. उद्या प्लास्टिक बंद झालं तर तिथे कागद दिसतील.
शिवाय हेच वाक्य आणखी काही महिन्यांनी (सालाबादप्रमाणे) तुमच्यावर उलटू शकेल.

नॅशनल जिओग्राफिक वर लवकरच 'प्लॅस्टिक ऑर प्लॅनेट' असा कार्यक्रम आहे तो जरूर बघावा त्याची जाहीरातसुद्धा अगदी कल्पक व जरूर बघण्यासारखी आहे!!
ह्या प्लॅस्टिक चे ठिक-ठिकाणचे ढीग व उद्दामपणे फेकलेले प्लॅस्टिक (उदा. पु.ल.देशपांडे ह्या सुंदर उद्यानातील तळ्यात फेकेलेल्या बाटल्या, हिमालयातही बघितलेला बाटल्या व पिशव्यांचा ढीग ह्यामुळे अंगावर काटा यायचा.
आपल्याच देशात प्लॅस्टिक खाण्यामुळे प्राण्यांचे कसे हाल होतात ते प्रत्यक्ष पाहण्यात आले.
ऑस्ट्रेलियात टाउन्सव्हिले येथे कासवांचे संग्रहालयात प्लॅस्टिक मुळे कसे प्राण गमवावे लागतात ह्याचे प्रात्यक्षिक पाहिले. इतरही बर्याच घटना व प्रसंग!
बाकी माझ्या (माझ्या कुवतीनुसार) केलेल्या प्लॅस्टिक विरोधाची (अजूनही) खिल्ली उडवणार्‍या माझ्या मित्रांन्ना चर्चेचा आणखी एक नवीन विष्य मिळालाय व WA वर comments चे गुर्‍हाळ सुरु झालेय!
हा नियम करणारे व त्याची प्रामणिकपणे अंमलबजावणी करणारे 'फुलो - फलो और जुग-जुग जियो' 'मेरिभी उर्वरीत उम्र उनको लगो!'

Bio-degradable गार्बेज बॅग्स ग्राहक संघात कित्येक वर्षं देत आहेत त्याच वापरते आहे.
<<
Biodegradable carry bag बनवायला काय अडचण आहे?

नोटबंदी - प्लास्टीकबंदी - आता पुढे ?××× bas kar na Bhai... Vishay kaay tu boltos kaay? Sagalikadech tujhe astitv asalech pahije asa ka khatatop >>> इंटरनेट बंद करा किंवा इथून एक्झिट घ्या एव्हढे इरीटेट होत असाल तर. कुणी मानगुटीवर बसून वाचाच असे म्हटलेय का तुम्हाला ? काहीच्या काहीच

Biodegradable carry bag बनवायला काय अडचण आहे? >>>> बरोबर आहे. पण त्या पिशव्यांचा जीव बघता त्या ओझं उचलून इकडून तिकडे नेता येण्याजोग्या मजबूत नाही वाटत plastic carry bag सारख्या. मी घरातून बाहेर सफाईवाल्याला नेवून देते तितपतच ठिक वाटतायत. लिक्विड काही जास्तवेळ टाकलं गेलं त्यात तर पटकन फाटतील degrade व्हायला लागून असं वाटतं. रोजचा कचराही तसा जड नसतो. ऑफिसने एक महिन्याच्या दिल्या आहेत त्या किंचित जाड आहेत.

त्याच मटेरिअलच्या जाडजूड पिशव्या बनवून बघतीलच वजन पेलवण्याच्या दृष्टीने. येईल बाजारात काही ना काही ecofriendly पर्याय.
सध्या श्रीखंडाचा रिकामा एकही डबा नाहिये साठवलेला. पण समजा कधी विकत आणलं श्रीखंड तर परत डबे येणार (कुणाचं काय तर कुणाचं काय! मला श्रीखंडाची चिंता पडलीय Uhoh Biggrin ). असं पॅकेजिंगचं मटेरियल साठवून वेळोवेळी देवून टाकत राहिलं पाहिजे collection centre मध्ये.

<<इंटरनेट बंद करा>> ते मि माझे बघुन घेइन काय करायचे ते.
<<इथून एक्झिट घ्या>> परत..ते मि माझे बघुन घेइन काय करायचे ते.
<<कुणी मानगुटीवर बसून वाचाच असे म्हटलेय का तुम्हाला>> मानगुटीवर बसलेले नाहि कोणि. पण विषयाला धरुन बोला ना. मधे मधे दुसर्याच्या धाग्यावर काहि पण बोलुन धागा भरकटवायचा.

व्यापा-यांचा संप होता ना आज बंदीविरोधात ? काय झाले ?
एका व्यापा-याने ताट, वाट्या, पेले असे थर्माकोल व प्लास्टीकचे सामान चार वर्षे पुरेल एव्हढे गोडाऊन मधे ठेवले होते. तीनच महीन्यांपूर्वी त्याने ही खरेदी केली होती. बंदी आल्यानंतर त्याने ते खपवायचा प्रयत्न केला. पण ग्राहक मिळेना. तरीही १/४ खपवले. मात्र खूप मोठा फटका बसल्याने रस्त्यावर आलो असे म्हणत होता. बंदीच्या आधी खरेदी केलेल्या मालावर सूट असायला हवी होती. पर्यावरणाविषयी प्रेम असले तरीही,

किराणा दुकानदारांना शेंगदाणे, वाटाणे आदी माल छोट्या प्रमाणात प्लास्टीकच्या पिशवीत ठेवता येत होता. पावसात दमट हवेपासून शेंगदाण्याला संरक्षण मिळत होते. आता हे जिन्नस कशात साठवायचे हा प्रश्न आहे. स्वच्छयमदूत दुकानांच्या बाहेर टेहळणीसाठी बसलेले आहेतच. शिबाय पोलीस सुद्धा दुकानाच्या बाहेर ग्राहकाची वाट बघत बही-या ससाण्यासारखे टपून बसलेले दिसताहेत. शहराच्या हद्दीबाहेर हे दृश्य जास्त आहे.

धनकवडी सारख्या ठिकाणी दोन तीन दुकानदारांना पाच हजार दंड झाला. ग्राहकाला माल कुठून आला असे विचारण्यात येत आहे.

सबुरीने घ्यायला हवे आहे.

मानगुटीवर बसलेले नाहि कोणि. पण विषयाला धरुन बोला ना. मधे मधे दुसर्याच्या धाग्यावर काहि पण बोलुन धागा भरकटवायचा. >> ते माझे मी बघून घेईन. तुम्ही नाही सांगायचे. तुमचा प्रतिसाद जसा काही विषयाला धरूनच आहे. माझा प्रतिसाद या धाग्याच्या विषयाला धरूनच होता. स्वतःला सांगितलेले सहन होत नसेल तर दुस-याला उपदेश करू नका.

बंदी घालताना शिक्षण, शेती, वैद्यकीय अश्या काही क्षेत्रांना त्यातून वगळले आहे,
मात्र हे वगळणे क्षेत्रांना आहे की वस्तुंना आहे ?

म्हणजे मेडिकल वेस्ट वाहून नेण्यासाठी जी बॅग असते ती बॅगे मी कॅरी बॅग म्हणून वापरली,
किंवा ज्या काळ्या पिशव्यात रोपे लावून येतात तश्या मोठ्या पिशव्या कॅरी बॅग म्हणून वापरल्या तर मला दंड होईल का?

Pages