एका ड्यू आयडीचे मनोगत ! - ऋन्मेष

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अपलोड on 11 June, 2018 - 04:12

जवळपास ४ वर्षे होत आली ......

माझ्या ऋन्मेऽऽष या आयडीला !

गेले तीन महिने हळू हळू करत हळू हळू ईथे येण्याचा वेळ कमी होत गेला. धाग्यांचा रतीब केव्हाच आटला, पण प्रतिसाद द्यायला आणि मुख्यत्वे त्यातून पुढे होणारी चर्चा, वाद यांचा पाठपुरावा करायलाही हवे तेव्हा वेळ मिळणे अवघड झाले तेव्हा ऋन्मेऽऽषला कायमचे थांबवून आपल्या वर्जिनल आयडीने जे काही थोडेबहुत शक्य होईल तसे वावरावे असे ठरवले आहे.

ऋन्मेषचा पासवर्ड विस्मरणात टाकला आहे. त्याबद्दल केलेल्या विचारपूशीला आता ईथूनच उत्तरे दिली जातील. म्हटलं तर फक्त नाव बदलले आहे, म्हटले तर काही संदर्भ बदलले आहेत. ईच्छा तर खूप होतेय की या तीनचार वर्षांतील प्रवास कागदावर उतरवून काढावा. पण ईतके प्रवासवर्णन लिहावे ईतका वेळ हाताशी मिळणे अवघड झालेय. पण तरीही थोडक्यात आणि एका स्वतंत्र धाग्यात मनोगत लिहायचा मोह आवरत नाहीयेच. काय करणार, शेवटी मी ऋन्मेषच आहे Happy

जेव्हा मी ऑर्कुटच्या निमित्ताने सोशलसाईटवर अवतरलो तेव्हा ऋन्मेषपेक्षाही छोटा होतो. साधी गर्लफ्रेंडही नव्हती. ती ऑर्कुटवरच मिळाली. पण त्या आधी मी एक शॉर्टटेंपर, शीघ्रकोपी, थोडासा हट्टी आणि थोडासा चिडका व्यक्तीमत्व होतो. जेव्हा ऑर्कुटवर कॉलेजच्या सळसळत्या उत्साहात बागडायचो तेव्हा अगदी तसाच वागायचो. ठोश्याला ठोसा, एखादा डोक्यात गेला की त्याला अद्दल घडवायला मग काय पण.. वाद, भांडण, ऑनलाईन शाब्दिक मारामारया. अर्थात माझ्यामते मी अन्यायाविरुद्ध भांडणारा रॉबीनहूड होतो. पुढे कधीतरी याच विचारांनी एका समूहाच्या संचालकांविरुद्ध बंडखोरी केली आणि समूहातून बॅन झालो. तेव्हा पहिल्यांदा ड्यूआयडी काढले, आणि पुन्हा आत प्रवेश मिळवला. बरेच दंगेधोपे झाले, आत्मा शांत झाला. मजाही आली, पण दुसर्‍याला त्रास देताना आपल्यालाही त्रास होतो हे जाणवले. हा त्रास टाळणे आपल्याच हातात असते हे समजले. सोशलसाईटवर आपले उपद्रवमूल्य फार आहे हा माज हळूहळू मीच स्वहस्ते गाळून टाकला. आणि आपले मनोरंजनमूल्य जपायला सुरुवात केली. याच बदलाच्या काळात माझे एक फेक प्रोफाईल फार फेमस आणि बरेच जणांचे लाडके झाले. पुढे तो मीच आहे हे समजूनही त्या प्रेमात काही फरक पडला नाही. वाल्या आणि वाल्मिकी दोन्ही कमीजास्त प्रमाणात आपल्याच आत असतात. कोणाला गोंजारायचे हे आपल्यालाच ठरवायचे असते हे मला समजले. आणि माझ्यापुरते मी ते ठरवायला सुरुवात केली.

पुढे कॉलेज झाले. जॉबला लागलो. गर्लफ्रेंडशीच लग्नही झाले. ऑर्कुट केव्हाच आटोपले होते. पण ऑर्कुटसमूहांवर काढलेले धागे आणि त्यात केलेली धमालमस्ती फार मिस करत होतो. मायबोली पाहिली आणि ईथे पुन्हा तीच धमाल त्याच रुपात करायचा मोह झाला आणि ऋन्मेषचा जन्म झाला.

अर्थात हे रूप माझेच होते. म्हटलं तर फक्त एक नाव बदलले होते, दुसरे रिलेशनशिप स्टेटस. तसेच त्याला अनुसरून वय पाच सहा वर्षे कमी केले होते ईतकेच. बाकी सारे संदर्भ तेच, आवडीनिवडी त्याच, आचारविचार अगदी ओरीजिनलच. शाळाकॉलेजचे किस्से माझ्याच शाळाकॉलेजचे होते. ऑफिसचे किस्सेही माझ्याच ऑफिसचे होते. गर्लफ्रेंड म्हटले की आताची बायको आणि आधीची गर्लफ्रेंडच डोळ्यासमोर यायची, शेजारचा पिंट्याही आपला खासच आहे. सई-स्वप्निल आणि आपला शाहरूख तर अगदी लहानपणापासून आवडीचा. कोकणातले गाव असो, मुंबईतली घरे असो. राजकारणावरची मते असोत, वा नास्तिक वृत्ती असो. दारूला विरोध असो, वा मांसाहाराला समर्थन असो. ईंग्रजी भाषेचे अज्ञान असो वा स्वत:वरचे प्रचंड प्रेम असो Happy यात कुठलाही मुखवटा नसल्याने कुठेही वेगळ्या रुपात वावरतोय असे कधीच वाटले नाही, वा कुठे बेअरींग सुटत तर नाही ना याची काळजी घ्यावी लागली नाही.

पण सोशलसाईटने मला एक फार मोठी गोष्ट शिकवली, जी मायबोलीने आणखी पुढे नेली. ते म्हणजे संयम आणि समजूतदारपणा.
कोणाशीही वाद घालताना संयम आणि पातळी सोडू नये हे ऑर्कुटकाळातच शिकलो होतो. मायबोलीवर एक पाऊल पुढे जात, समोरची व्यक्ती आपल्याशी भांडते म्हणून ती व्यक्तीच वाईट असते असे जरूरी नाही असा विचार करू लागलो. काळ्यापांढरय़ा गुणदोषांसह प्रत्येक व्यक्तीला माझे निकष न लावता स्वतंत्रपणे स्विकारू लागलो आणि त्यानंतर कोणाबद्दलही रागलोभद्वेषमत्सर वगैरे काही उरले नाही. सोशलसाईटवरची हीच शिकवण प्रत्यक्ष आयुष्यात घेऊन गेलो. आणि आयुष्य आणखी सुखी समाधानी झाले. स्वत:तील या बदलासाठी जसे ऑर्कुटवरील फेक प्रोफाईल्सनी मला मदत केली तसेच मायबोलीवरील ऋन्मेष या ड्यूआयडीनेही मदत केली. याबद्दल मी ऋन्मेष आणि त्याला सांभाळून घेतलेल्या सर्वांचा, तसेच मायबोली संकेतस्थळाचाही आभारी आहे _/\_

ता.क. - ऋन्मेष तर ईथून थांबेल ते त्या बिचार्‍याला गरजेचा वेळ देऊ शकत नाही म्हणून, पण तोच पाच सहा वर्षांनी मोठा होत आता भन्नाट भास्कर या ओरीजिनल (कोई शक?) आयडीने जमेल तितका आपला प्रपंच सांभाळत वावरेल. काय करणार, मायबोलीचे व्यसन सहजी सुटत नाही Happy

धन्यवाद,
आपलाच भन्नाट
आडनाव नका विचारू, त्याने जात कळते !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओके. म्हणजे चतुरस्त्र बहुआयामी व्यक्तीमत्व ज्याचे सारे पैलू एकाच आयडीत दाखवणे आम्हाला अशक्य होते म्हणून आमच्याकडून हे पातक घडते.
मग यावर उपाय काय?

मधुरांबे पण तुम्हीच वाटताय.
>>>>

जर एखादा आयडी कोणासोबत वैयक्तिक स्कोअर सेटल करताना दिसला तर तो समजा माझा नाही. जर मधुरांबे तसे करत नसतील तर तो माझा समजू शकता.
बाकी वर म्हटल्याप्रमाणे माबोवरील प्रत्येक बेमालक आयडीची जबाबदारी मी घ्यायला तयार आहेच.

मी ओरिजिनल आहे. भभा लाख संबंध जोडतील, पण त्यामुळं त्यांची पापं (जर काही केली तर) माझ्या नावावर जमा होतील Lol

अगदी हेच स्टेटमेन्ट उद्या ऋन्मेष ने इकडे येऊन केले तर आश्चर्य वाटून घेऊ नका लोकहो,

भभा लाख म्हणेल मीच ऋन्मेष, पण उद्या ऋन्मेष तोंड वर करून विचारायला मोकळा की मी कधी म्हंटले भभा माझाच id आहे म्हणून Lol

नव्हे ....TRP कमी होईल तेव्हा हे सुद्धा केले जाईलच

लोकप्रियता कमी झाल्यावर खुनाचा प्रयत्न होणार म्हणून कांड्या पिकवणारे नेते, आणि आभासी दुनियेत लोकप्रियतेला ओहोटी लागते की काय या शंकेने पछाडलेले id एकाच माळेचे मणी, मनोरुग्ण...

संशयाने पछाडलेल्या व्यक्तींना मानसिक त्रास होतो असे म्हणतात. भभा ने नको ते प्रतिसाद दिले. आता त्याने स्वतः जरी आमचा काही संबंध नाही असे सांगितले तरी काही एक उपयोग होणार नाही. हा संशयकल्लोळ चालूच राहणार. इथे आल्यापासून संशयी आयडींमुळे कधी माझा संबंध कुठल्या दोन स्त्रियांशी जोडला गेला, कधी आणखी कुणाशी . नंतर भभाशी आणि आता रुन्मेशशी. मला हे दोन्ही आयडी ठाऊक नाहीत.
भभा आणि माझा संबंध नाही हे सिद्ध करायला एक मिनिट पुरेल.

भभा ने लिहीले आहे की मुंबई-ठाणे सारख्या ठिकाणी असलेल्या त्याच्या घरात ४०० स्क्वे फुटाचा चौकोनी हॉल आहे. त्यात दोन पंखे आहेत. किचन सोडून तीन रूम्समधे प्रत्येकी एक पंखा आहे. किचन पण बहुतेक ३०० स्क्वे फूट आहे. संडास बाथरूम मधे पंखे आहेत. ठाण्यात एव्हढे पंखे लावण्यासारखे घर घेणारा मनुष्य श्रीमंत असतो.

माझे फक्त टू बीएचके आहे. ते घर पुण्यात आहे. मी श्रीगोंदा इथे रहायला आहे. हॉल एल आकाराचा असल्याने सेंटरला ५२" पंखा पुरेसा आहे. त्यातच डायनिंग आहे. सेपरेट रूम नाही. किचन, दोन बेडरूम्स मधे प्रत्येकी एकच पंखा आहे. संडास बाथरूम मधे प्रत्येकी एक एक्झऑस्ट फॅन आहे. तिथे सीलिंग फॅन मी लावलेला नाही. बाल्कनीत पण सीलिंग फॅन नाही. वरच्या फ्लॅटची खिडकी दिसते.

एव्हढा फरक आहे. हवं तर त्याला छताचे फोटो अपलोड करायला सांगा. मी पण करेन. तुम्ही फरकाचा सूक्ष्म अभ्यास करा. त्यावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतील. उत्तरं चुकली तर मायबोलीतून काढण्यात येईल. मग पुन्हा नर्सरीपासून सुरूवात.

उत्तरे बरोबर आली तर पश्चात्ताप म्हणून (चुकीचा संशय घेतला म्हणून) आयडी फ्रीज करून काश्याची लंगोटी नेसून काशीला जावे ही सूचना.

आयडी फ्रीज करून काश्याची लंगोटी नेसून काशीला जावे ही सूचना.>>>>
काश्याने लंगोटी दिली नाही तर? किंवा काश्या लंगोटी वापरत नसेल तर? Proud

जुना जमाना:
गोबेल्स - एकच खोटं इतक्यांदा रेटून सांगा की ते खरं वाटायला लागलं पाहिजे
जुना डुआयडी - एखादा डुआयडी काढा आणि तो आपण नाहीच हे लोकांना पटवा

नवा जमाना:
भाजप - एकाच वेळी भरपूर फेक न्युज पसरवून द्या, एखादी खोटी सिद्ध झाली तरी इतर दहा खऱ्या वाटतात
अभिषेक - एकाच वेळी भरपूर डुआयडी काढून आपापसात बोलत ठेवा, एखादा पकडला गेला तरी बाकी मोकाट सुटलेले असतात

हवं तर त्याला छताचे फोटो अपलोड करायला सांगा. मी पण करेन. तुम्ही फरकाचा सूक्ष्म अभ्यास करा. .....

एक शंका
तुम्ही आणि भन्नाट भास्कर (ऋन्मेऽऽष) यांनी अपलोड केलेले फोटो हे तुमच्याच घराचे खरे फोटो आहेत याची पडताळणी कशी करणार???

सोप्पं आहे. मग घरातल्या फ्रीजचे आणि त्याच्यावर ठेवलेल्या माठाचे फोटो अपलोड करायला सांगा.

हर्पेन, आता पाहिला का हा धागा आणि भन्नाट भास्कर स्पष्टीकरण.
तसेही तुम्ही मला ओळखताच. लबाड तर मी आहेच Happy

घरातल्या फ्रीजचे आणि त्याच्यावर ठेवलेल्या माठाचे फोटो अपलोड करायला सांगा.
>>>

काही फायदा नाही
अविश्वास दाखवणारे दाखवतातच.
ड्यू आयडीचे आयुष्य खडतर असते!

ऋ = भ भा = अभिषेक एवढं माहिती असलेलं equation आहे! बाकी ख खो अभिषेकच जाणे!

1. घरी आल्यावर जर डू आय चा खेळ खेळत असशील तर तो तुझ्या गोड परीवर अन्याय आहे!
2. ऑफिस मध्ये बसून हा खेळ खेळत असशील तर तो कंपनीवर अन्याय आहे!

<< 1. घरी आल्यावर जर डू आय चा खेळ खेळत असशील तर तो तुझ्या गोड परीवर अन्याय आहे!
2. ऑफिस मध्ये बसून हा खेळ खेळत असशील तर तो कंपनीवर अन्याय आहे! >>

---------- दोन्ही पैकी काहीही केले तरी तो मायबोलीकरान्वर अन्याय तसेच अत्याचार आहे. Happy

मी भास्कर यांचा फेक आयडी नाही. तसेच त्या दोन स्त्रियांपैकी मी कुणीही नाही. माझे नाव मधु, मधुरा असे काही नाही. कृपया मला मधुर असेच म्हणावे. शेवटी आपल्या सर्वांची मर्जी. मी डॉक्टर नाही.

Pages