एका ड्यू आयडीचे मनोगत ! - ऋन्मेष

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अपलोड on 11 June, 2018 - 04:12

जवळपास ४ वर्षे होत आली ......

माझ्या ऋन्मेऽऽष या आयडीला !

गेले तीन महिने हळू हळू करत हळू हळू ईथे येण्याचा वेळ कमी होत गेला. धाग्यांचा रतीब केव्हाच आटला, पण प्रतिसाद द्यायला आणि मुख्यत्वे त्यातून पुढे होणारी चर्चा, वाद यांचा पाठपुरावा करायलाही हवे तेव्हा वेळ मिळणे अवघड झाले तेव्हा ऋन्मेऽऽषला कायमचे थांबवून आपल्या वर्जिनल आयडीने जे काही थोडेबहुत शक्य होईल तसे वावरावे असे ठरवले आहे.

ऋन्मेषचा पासवर्ड विस्मरणात टाकला आहे. त्याबद्दल केलेल्या विचारपूशीला आता ईथूनच उत्तरे दिली जातील. म्हटलं तर फक्त नाव बदलले आहे, म्हटले तर काही संदर्भ बदलले आहेत. ईच्छा तर खूप होतेय की या तीनचार वर्षांतील प्रवास कागदावर उतरवून काढावा. पण ईतके प्रवासवर्णन लिहावे ईतका वेळ हाताशी मिळणे अवघड झालेय. पण तरीही थोडक्यात आणि एका स्वतंत्र धाग्यात मनोगत लिहायचा मोह आवरत नाहीयेच. काय करणार, शेवटी मी ऋन्मेषच आहे Happy

जेव्हा मी ऑर्कुटच्या निमित्ताने सोशलसाईटवर अवतरलो तेव्हा ऋन्मेषपेक्षाही छोटा होतो. साधी गर्लफ्रेंडही नव्हती. ती ऑर्कुटवरच मिळाली. पण त्या आधी मी एक शॉर्टटेंपर, शीघ्रकोपी, थोडासा हट्टी आणि थोडासा चिडका व्यक्तीमत्व होतो. जेव्हा ऑर्कुटवर कॉलेजच्या सळसळत्या उत्साहात बागडायचो तेव्हा अगदी तसाच वागायचो. ठोश्याला ठोसा, एखादा डोक्यात गेला की त्याला अद्दल घडवायला मग काय पण.. वाद, भांडण, ऑनलाईन शाब्दिक मारामारया. अर्थात माझ्यामते मी अन्यायाविरुद्ध भांडणारा रॉबीनहूड होतो. पुढे कधीतरी याच विचारांनी एका समूहाच्या संचालकांविरुद्ध बंडखोरी केली आणि समूहातून बॅन झालो. तेव्हा पहिल्यांदा ड्यूआयडी काढले, आणि पुन्हा आत प्रवेश मिळवला. बरेच दंगेधोपे झाले, आत्मा शांत झाला. मजाही आली, पण दुसर्‍याला त्रास देताना आपल्यालाही त्रास होतो हे जाणवले. हा त्रास टाळणे आपल्याच हातात असते हे समजले. सोशलसाईटवर आपले उपद्रवमूल्य फार आहे हा माज हळूहळू मीच स्वहस्ते गाळून टाकला. आणि आपले मनोरंजनमूल्य जपायला सुरुवात केली. याच बदलाच्या काळात माझे एक फेक प्रोफाईल फार फेमस आणि बरेच जणांचे लाडके झाले. पुढे तो मीच आहे हे समजूनही त्या प्रेमात काही फरक पडला नाही. वाल्या आणि वाल्मिकी दोन्ही कमीजास्त प्रमाणात आपल्याच आत असतात. कोणाला गोंजारायचे हे आपल्यालाच ठरवायचे असते हे मला समजले. आणि माझ्यापुरते मी ते ठरवायला सुरुवात केली.

पुढे कॉलेज झाले. जॉबला लागलो. गर्लफ्रेंडशीच लग्नही झाले. ऑर्कुट केव्हाच आटोपले होते. पण ऑर्कुटसमूहांवर काढलेले धागे आणि त्यात केलेली धमालमस्ती फार मिस करत होतो. मायबोली पाहिली आणि ईथे पुन्हा तीच धमाल त्याच रुपात करायचा मोह झाला आणि ऋन्मेषचा जन्म झाला.

अर्थात हे रूप माझेच होते. म्हटलं तर फक्त एक नाव बदलले होते, दुसरे रिलेशनशिप स्टेटस. तसेच त्याला अनुसरून वय पाच सहा वर्षे कमी केले होते ईतकेच. बाकी सारे संदर्भ तेच, आवडीनिवडी त्याच, आचारविचार अगदी ओरीजिनलच. शाळाकॉलेजचे किस्से माझ्याच शाळाकॉलेजचे होते. ऑफिसचे किस्सेही माझ्याच ऑफिसचे होते. गर्लफ्रेंड म्हटले की आताची बायको आणि आधीची गर्लफ्रेंडच डोळ्यासमोर यायची, शेजारचा पिंट्याही आपला खासच आहे. सई-स्वप्निल आणि आपला शाहरूख तर अगदी लहानपणापासून आवडीचा. कोकणातले गाव असो, मुंबईतली घरे असो. राजकारणावरची मते असोत, वा नास्तिक वृत्ती असो. दारूला विरोध असो, वा मांसाहाराला समर्थन असो. ईंग्रजी भाषेचे अज्ञान असो वा स्वत:वरचे प्रचंड प्रेम असो Happy यात कुठलाही मुखवटा नसल्याने कुठेही वेगळ्या रुपात वावरतोय असे कधीच वाटले नाही, वा कुठे बेअरींग सुटत तर नाही ना याची काळजी घ्यावी लागली नाही.

पण सोशलसाईटने मला एक फार मोठी गोष्ट शिकवली, जी मायबोलीने आणखी पुढे नेली. ते म्हणजे संयम आणि समजूतदारपणा.
कोणाशीही वाद घालताना संयम आणि पातळी सोडू नये हे ऑर्कुटकाळातच शिकलो होतो. मायबोलीवर एक पाऊल पुढे जात, समोरची व्यक्ती आपल्याशी भांडते म्हणून ती व्यक्तीच वाईट असते असे जरूरी नाही असा विचार करू लागलो. काळ्यापांढरय़ा गुणदोषांसह प्रत्येक व्यक्तीला माझे निकष न लावता स्वतंत्रपणे स्विकारू लागलो आणि त्यानंतर कोणाबद्दलही रागलोभद्वेषमत्सर वगैरे काही उरले नाही. सोशलसाईटवरची हीच शिकवण प्रत्यक्ष आयुष्यात घेऊन गेलो. आणि आयुष्य आणखी सुखी समाधानी झाले. स्वत:तील या बदलासाठी जसे ऑर्कुटवरील फेक प्रोफाईल्सनी मला मदत केली तसेच मायबोलीवरील ऋन्मेष या ड्यूआयडीनेही मदत केली. याबद्दल मी ऋन्मेष आणि त्याला सांभाळून घेतलेल्या सर्वांचा, तसेच मायबोली संकेतस्थळाचाही आभारी आहे _/\_

ता.क. - ऋन्मेष तर ईथून थांबेल ते त्या बिचार्‍याला गरजेचा वेळ देऊ शकत नाही म्हणून, पण तोच पाच सहा वर्षांनी मोठा होत आता भन्नाट भास्कर या ओरीजिनल (कोई शक?) आयडीने जमेल तितका आपला प्रपंच सांभाळत वावरेल. काय करणार, मायबोलीचे व्यसन सहजी सुटत नाही Happy

धन्यवाद,
आपलाच भन्नाट
आडनाव नका विचारू, त्याने जात कळते !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कधीतरी टिंब टिंब टाकले असतील हो...
हे म्हणजे शाहरूखने एका चित्रपटात क् क् क् किरण काय केले सारे मिमिक्रीवाले तेच करत बोर करतात..

गरज आणि मला? तुझ्या उत्तरांची?
धागा फॉलो करत नाही, वर आला फीडमध्ये म्हणून ओपन केला.
>>>>

या पोस्टला उत्तर सुद्धा विकांतालाच Happy

टिंब टिंब टाकत मी पण बोलते हो पण मी ऋ नाही Proud

अरे ऋन्म्या त्या ४ वर्शाच्या मुलीच्या धाग्यावर पण तू प्रतिसाद दिलेयेस Lol अवघडेस Lol
किती त्या स्वतःच स्वतःशी गपा

आणि नसतील कशावरुन? Biggrin >>>>
नसले तरी मी त्यांची जबाबदारी घ्यायला तयार आहे.
यापुढे ज्या ड्यू आयडीचा खरा मालक माबोच्या गुप्तहेरांना जोपर्यंत शोधता येणार नाही तोपर्यंत मी त्याला माझे नाव द्यायला तयार आहे !

अरे ऋन्म्या त्या ४ वर्शाच्या मुलीच्या धाग्यावर पण तू प्रतिसाद दिलेयेस Lol अवघडेस Lol
किती त्या स्वतःच स्वतःशी गपा
>>>>

मी ते भन्नाट भास्करच्या वतीने दिलेत. म्हणजे माझ्याच मालकाच्या वतीने.

इथे पण स्वतःच म्हणे शैली आवडली Rofl
>>>

त्याला ऋन्मेषचा टेक्निकल नाईलाज होता.
ऋन्मेषला त्या धाग्यावर चर्चा करायची होती. पण जर ऋ ने तिथे मूळ लेखाला चांगले लिहिलेय न म्हणता ईतर चर्चा केली असती तर लोकांना वाटले असते या ऋन्मेषला लिखाणाबद्दल दोन शब्द बोलायलाही जड झालेत. कारण तेव्हा तो मीच हे मी डिक्लेअर केले नव्हते.

पण एखाद्याचे एकाहून जास्त आयडीज असतील तर नेमका काय फरक पडतो? ऋन्मेष, आपला अभिषेक, भभा या तीन व्यक्ति एकच असतील किंवा भिन्न, वाचक म्हणून कंटेंट कसाय यावरच मुल्यमापन व्हायला हवं असं वाटतं.

मै तुम्हारे सामने एक बाप की हैसियत से नही , एक पुलिस अफसर के हैसियत से खडा हू..

आणि

मै तुम्हारे सामने प्यांट पहन के नही, लुंगी पहन के खडा हूं

दोन्ही बरोबर वाटतंय.

नसले तरी मी त्यांची जबाबदारी घ्यायला तयार आहे.
यापुढे ज्या ड्यू आयडीचा खरा मालक माबोच्या गुप्तहेरांना जोपर्यंत शोधता येणार नाही तोपर्यंत मी त्याला माझे नाव द्यायला तयार आहे !>>>>>>>> भन्नाटदादा तुस्सी ग्रेट हो Happy

असले झोल करून तुम्ही तुमच्या चाहत्यांना दुखावत आहात असे तुम्हाला वाटते का?
>>>>>>

चाहतेच का, मला तर जगातल्या कुठल्याही प्राणीमात्राला दुखवायची ईच्छा नाही. मी माझे आयुष्य माझ्या पद्धतीने कोणाच्या अध्यातमध्यात न पडता आनंदाने जगतो.

इथे मल्टिपल पर्सनॅलिटीशी गल्लत करू नये.
>>>>

तसेच मल्टिपल पर्सनॅलिटी आणि मल्टिपल आयडी यांचीही गल्लत करू नये.

मी माझे आयुष्य माझ्या पद्धतीने कोणाच्या अध्यातमध्यात न पडता आनंदाने जगतो.>>>+७८६
पण फक्त माबोवरील धाग्यांच्या अध्यातमध्यात करतो ! Lol

>> सोशलसाईटवर आपले उपद्रवमूल्य फार आहे हा माज हळूहळू मीच स्वहस्ते गाळून टाकला.

सुंभ जळाला पण पीळ* गेलेला नाही (pun intended) Proud

SPDI >>> आता हे काय आहे? एवढे ईग्ग्लिश मला जमत असते तर मायबोलीवर कश्याला अalo असतो. सोप्या भाषेत (मराठीत) सांगा ना प्लीज

Pages