तुमचा पहिला ई-मेल पत्ता कोणता होता?

Submitted by किल्ली on 12 June, 2018 - 06:59

लहानपणी social media हा प्रकार बोकाळला नव्हता. तेव्हा असं असायचं की, फॅन्सी ई-मेल आयडी बनवण्याची क्रेझ होती. स्टार,इंडिया,कूल,डूड,अँजेल अशी नाव त्यात असायची. (हा भाग वेगळा की आजकाल काही लोकं अशा विचित्र आणि कूल(?) नावांनी थोपुवर फेक प्रोफाइल बनवतात !) . इयत्ता ५ वी मध्ये असताना माझाही टोपण नाव घालून ई-मेल पत्ता तयार केला होता! तेव्हा मला IE आणि MSPaint एवढाच वापरता येत होतं. आमच्या मातोश्री कोबोल आणि फोक्सप्रो शिकत होत्या म्हणून मला तिच्या कॉम्पुटर क्लास मध्ये जाऊन ही लुडबुड करता येत असे.

मात्र मोठेपणी (पदविकेचं पहिलं वर्ष )समजलं की ई-मेल पत्ता हा अगदी प्रोफेशनल असला पाहिजे आणि तो कोणालाही संपर्कांसाठी देताना embarrassing वाटू नये. मग नवीन आणि छान आयडी काढवा म्हटलं तर हाय रे किस्मत! माझं नाव आणि आडनाव सुमारे ३५ मुलीनी आधीच घेऊन ठेवलं होतं! मग आधी आडनाव मग नाव, पुढे अंक, असं काहीतरी करून बरा दिसणारा आयडी बनवला.आजतागायत तोच ई-मेल पत्ता वापरत आहे. पण नंतर नोकरी करायला लागल्यावर समजलं की हा पर्सनल असतो, कंपनी आपल्याला वापरण्यासाठी नवीन ई-पत्ता देते. पहिल्या कंपनीत मात्र मला माझं नाव unique आहे हा आनंद मिळवता आला. आता नावापुढे अंक नव्हता, सरळसोट ई-मेल पत्ता होता. कंपनी बदलली आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न !! माझ्या नावाच्या ६ मुली इथे असल्यामुळे मध्ये middle name चं पहिलं अक्षर घालावं लागलं आणि माझा ई पत्ता पुन्हा विचित्र बनला!
आणखी एक किस्सा असा की, मी शेजारच्या काकूंना ई-मेल आयडी काढून दिला. पासवर्ड सेट केला आणि कसं लॉग इन करायचं ते सांगितलं. नंतर त्यांना कोणीतरी ई-मेल आयडी मागितला तर त्यांनी पासवर्ड सुद्धा दिला. तो द्यायचा असतो असं वाटलं त्यांना!

तर तात्पर्य असं की, तुमच्याकडे अशा ई-मेल आयडी चे किस्से असतीलच. तुमचा पहिला ई-मेल आयडी (पासवर्ड नको Lol ) इथे share करा आणि नावाच्या आणि आयडीच्या पण धमाल गोष्टी येऊ द्या!

माझा पहिला आयडी: kul.kittu९@rediffmail.com
(ह्या आयडी वरून कृपया कोणी judgmental mode मध्ये जाऊ नये. दिवा घ्या! )

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

माझा पहिला मेल आयडी प्रोफेशनल दृष्टिकोन ठेऊन बनवला होता. तो ज्या मोबाईल नंबरशी संलग्न होता तो नंबर फॉरवर्ड झाला आणी मी त्या अकाऊंटचा पासवर्डही विसरलो. आता रिकवर होणं शक्य नाही.. फेसबुकच्या नोटीफिकेशन्स साचून आता त्या मेल अकाऊंटचा भूतबंगला झाला असणार ! Proud

फेसबुकच्या नोटीफिकेशन साचून आता त्या मेल अकाऊंटचा भूतबंगला झाला असणार ! >> > माझ्याही एका आयडी बरोबर घडलंय असं. पण ९० दिवसांनी नाही वापरला तर disable होतो बहुतेक असं ऐकलंय! सो गेला तुमचा आयडी आता!

माझा नवरा मुंबईहून हैद्राबादला परत ये णार होता. मी आधीच सहा महिने शिफ्ट झालेले तर त्याने याहू मेल वरून माझय रीडिफ मेल वर मेल्स फॉरवर्ड केलेल्या. का? तर हैद्राबादेतून अ‍ॅक्सेस करता येतील म्हणोन मग मी त्या हे लॉजि क माहीत नसल्याने डिलीट केल्या तर उखडला आता त्याचेच याहू अकौंट नाही का अ‍ॅक्सेस करता येणार हैद्राबादेतून हे मी सांगायचा प्रयत्न केला पण संयमित चर्चा झाली फक्त.

त्याचेच याहू अकौंट नाही का अ‍ॅक्सेस करता येणार हैद्राबादेतून हे मी सांगायचा प्रयत्न केला पण संयमित चर्चा झाली फक्त. >>> संयमित चर्चा ह्या वाक्यात खूप काही दडलंय Lol

माझा पहिला जो मेल आय डी होता तोच आजही आहे. फक्त नाव, कुठेही अंक नाही किंवा काही नाही. त्यावेळी फारसे प्रस्थ नव्हते मेलचे त्यामुळे मिळाला.

Lol भन्नाट
माझा अगदी पहिला ईमेल आयडी व्यवस्थित होता. आडनावनाव@याहू. कॉम
पण त्यानंतर मला काय हुक्की आली माहिती नाही त्यानंतर माझा एक इमेल अतिशय भारी होता honeyonly4u@...com Rofl
जिमेल वर मग मात्र व्यवस्थित काढला जो अजून पर्यंत वापरते आहे.

माझा एक शाळू मित्र होता, तो दिसायला वगैरे छान होता... आणि त्याला (अति) आत्मविश्वास होता. त्याचा ईमेल आयडी होता handsomeguy555 Uhoh आता आठवलं तरी हसू येतं खूप.

कसे माहित नाही पण कंपनीतील ID बरोबर जुळणारा ई-मेल बनवले होते याहू, गुगल आणि हॉटमेल वर. अँड्रॉइड मुळे आणि एकूणच वापरायला सोपे वाटत असल्यामुळे सध्या गुगल वापरतो, पण एकंदरीत नंतर ई-मेल आय डी बनविणाऱ्यांनी . - _असे वापरून जे आय डी बनवलेत त्यांचे बरेच ई-मेल येत असतात; त्यात बरेचदा महत्वाची माहिती असते; मी अशा ई-मेल डिलिट करून टाकतो कारण त्याचा मला वैयक्तिक काहीच उपयोग नसतो.

@ दक्षिणा: honeyonly4u@...com Lol handsomeguy555 Lol
agadeech lol ahet IDs..:D Proud

@नरेन : कंपनीतील ID बरोबर जुळणारा ई-मेल बनवले होते :>>> सद्बुद्धी... दुसरा काय ! Happy

माझा पहीला इमेल आयडी "usa.net" वर उघडला होता!
नेट कॅफेवर जाउन एकदोन दिवसाआड चेक करायचो इमेल्स..... मराठी भाषेत आहे म्हणून "epatra.com" वर पण उघडलेले एक अकाउंट!
नंतर बरेच वर्षे इमानेइतबारे रेडीफ वापरले आणि आता मात्र जीमेल एक जीमेल!

मी आजतागायत फक्त दोन ईमेल आयडी काढलेत. दोन्ही जीमेलवरच.

पहिला ईमेल आयडी असाच उत्सुकता म्हणून काढला होता. नाव, आडनावाला फुकटचे अंक वगैरे न चिकटवता आयडी बनवायची माझी आपली जिद्द. कारण माझ्या डोक्यात अंक मुळीच लक्षात राहत नाहीत. पण सरळसोट नाव, आडनाव पुढे जिमेल डाॅट काॅम वाला आयडी आधीच कोणी घेतला होता. पुढे माझ्या कल्पक डोक्याने एवढे बदल केले की विचारू नका. ईमेल आयडीमध्ये नाव आणि आडनावाचं एवढं काही वाटोळं केलं होतं, की मला वाटतं जुई नाव धारण करणार्या पहिल्या महिला आणि आमचे मूळपुरूष , या दोन्ही व्यक्तींनी कपाळावर हात मारून घेतला असावा. कारण जुई नावाचं काहीतरी सुयांप्रमाणे 'जुया' की काय केलं होतं आणि आडनावाचा माझ्याहस्ते झालेला अपभ्रंश तर एकदमच विचित्र होता. याचा परिणाम हा झाला, की ज्या ज्या व्यक्तीला ईमेलायडी सांगायचे, ती ती व्यक्ती माझ्यावर प्रथमतः फिस्सकन हसून घ्यायची. आणि मला उगाचच ओशाळवाणा चेहरा करत माझे नाव, आडनाव वापरून सरळ ईमेल आयडी कसा मिळाला नाही ही चित्तरकहाणी सांगावी लागायची.

मग पुढे जसा शाळेत आयसीटी विषयामुळे ईमेल आयडीचा सर्व शिक्षकांशी, मित्रमैत्रिणींशी संबंध यायला लागला, तेव्हा मी नवीन ईमेल आयडी बनवला. माझी एक मैत्रिण मला नेहमी सगळ्यांसमोर 'जुया' अशीच हाक मारते. (तिला माझ्या जुन्या ईमेल आयडीबद्दल आधीच कळलं असावं, हा माझा संशय आहे. Wink ) नाहीतरी माझं हे सुयांसारखं टोपणनाव फेमस झालं होतं. मग पुढे नव्या ईमेलायडीत मी 'जुया' हेच नाव घेतलं, पण आडनावात मात्र काहीच अपभ्रंश केला नाही. हाच ईमेल आयडी मी आता वापरतेय. पण या नव्या ईमेल आयडीवरूनही हसण्याचे प्रसंग होताहेत, हे पाहून बदलावासा वाटतोय खरंतर, बघू. Happy

हॉटमेल .. त्याकाळी एकच ईमेल असायचा.. ईपत्र पण होता , पण काळाच्या ओघात गेला.. आता जिमेल एके जिमेल.. पण कचरा ईमेल येणार असतील तर अजून हॉटमेलच देतो.

स्वरूप, "usa.net" , "epatra.com">>> अगदी अगदी! मी टू!!
हे वरचे टाईमपास इमेल आयडी सोडले तर जे याहू व जीमेलवर आयडी काढले ते मी अजुन वापरते. याहू फार क्वचित कुठेतरी व्हेरिफिकेशनला दिला असतो म्हणून. नाहीतर तिथे स्पॅम एन्सायक्लोपिडीया झालाय. जीमेल मात्र अजुनही तोच वापरते.
बाकी फनी इमेल अ‍ॅड्रेसेस आठवले काही. कॉलेजात ५-६ जणींचा एक ग्रुप होता. त्या सगळ्यांनी प्रत्येकीच्या नावाचे इनिशियल्स घेऊन इमेल आयडीज बनवले होते. आपल्या नावाचे इनिशियल पहिले आणि मग पुढे इतर आगगाडी. rjtdm@..com, tdmrj@..com असं.. अशक्या कन्फ्युजिंग प्रकार होता तो! आणि ते दिवस फॉर्वर्डेड इमेल्सचे. एकच इमेल ह्या सर्व इनिशियल्स कडून यायह्ची! तोच स्पॅम इमेल्सचा उदय होता माझ्यासाठी!! Lol

vsnl.net.in ->Hotmail -> rediffmail -> yahoo -> gmail.
Gmail मिळायला वशिला लागायचा. एकदा कोणासाठी वशिला लावला की मग महिनाभर पुण्यसंचय करावा लागे. Lol

माझा पहिला ईमेल आयडी आता आठवत नाही पण पासवर्ड १२३४५६ होता बरेच वर्ष्य. Lol
आत्ता काही दिवसांपुर्वी भाच्ची सांन्गत होती. आमच्या टिचर ने आम्हाला ईमेल आयडी काढायला सांगितला. आता मला पण आयडी आहे.
तिला म्हटल दे मला मी तुला ईमेल करत जाईन. तर लगेच तिने मला आयडी सांगितला आणि लगेच प्रॉम्ट्ली तिने मला तिचा पासवर्ड पण सांगितला. Happy

माझा पहिला हॉटमेल. नंतर याहू आणि मग जीमेल. याहू आणि जीमेल वापरतो सध्या पण हॉटमेलचा गेला बिचारा. Sad
मी तो नंतर रिकव्हर करायचा बराच प्रयत्न केला पण नाही झाला. इपत्र वर काढला होता बहुतेक पण तो वापरला नाही कधी.
तेव्हाच्या काळी आम्ही एमआयआरसी वर चॅट करायचो. तिथे कोणी मागितलाच तर देण्यासाठी डॉन_डॉन की असा काहीतरी याहू आयडी काढला होता. Happy तोही गेला कधीच.

मला पहिला ईमेल मिळाला तेंव्हा फक्त एका रशियन काँप्यूटर वर कॉलेजातल्या कॉलेजात मेसेज पाठवता यायचे. बर मेसेज कुणाला पाठवणार तर तुमच्या सरांना किंवा इतर काही मोजक्या विद्यार्थ्याना कारण फारच थोड्या लोकांना काँप्यूटर वापरायची परवानगी होती. त्यामुळे तुमचे युजरनेम हाच ईमेल . कारण @ च्या पुढे काही नसायचं कारण आमचा काँप्यूटर दुसर्‍या कुठल्या काँप्यूटरला जोडलाच नव्हता. म्हणजे xyz@domain.com असा प्रकारच नव्हता. फक्त xyz हाच पत्ता. माझा पहिला ईमेल "ajay" (thats it)

ईमेल साठी आणखी एक पद्धत होती. त्याचं नाव x.400 तेंव्हा ईमेल पत्ता असा असायचा
G=john; S=smith; O=a bank ltd; P=abl; A=snomail; C=aq
त्यामुळे x.400 इमेल असणारे फक्त x.400 इमेल वाल्यांनाच ईमेल पाठवू शकायचे. माझा दुसरा ईमेल असाच काहीतरी होता
G=ajay; S=gallewale; O=Motorola; OU1=MIEL;C=india

ही बरीच पूर्वीची गोष्ट आहे, एकदा मला ३६ लाख रुपये जिंकले असा मेल आला होता. मी खुश होऊन दादाला फोन केला आणि सांगितला. आता आपण घर घेऊ शकतो वगैरे Lol दादा जिथे होता तिथून मला शोधत आला आणि ते मेल्स कसे खोटे असतात, स्पॅम म्हणजे काय असं बरंचसं ज्ञान दिलं होतं. आता खरोखर जरी अशा पद्धतीचा मेल आला तर विश्वास बसणार नाही!!

mirc काय आठवण काढलीयस यार पराग!
मुंबई, पुणे, बेंगलोर अश्या चाट रुम असायच्या तिथे..... धम्माल मजा करायचो Happy
कॉलेजच्या जवळ एक ५ रुपये/तास वाले नेटकॅफे होते.... तिकडे पडीक असायचो कॉलेज सुटल्यावर.... नंबर लावायला लागायचा..... वेटींग असायचे तिथे!
चॅटींगवाली युझरनेम्स पण एकसे एक भारी असायची!
मज्जाच मज्जा!

अर्रे वाह वाह "usa.net" बघून आनंद जाहला Lol
मीपण पहिल्यांदा तिथेच गेलेले. नंतर rediff आणि indiatimes. मग ऑफिशियल कम्युनिकेशनसाठी हॉटमेल.

याहू आणि जीमेल बरेच उशिरा काढले त्यामानाने.

पण सगळे आयडी नाव, आडनावचेच काहीतरी कॉम्बिनेशन असलेले आहेत.

पहिला मेल usa.net वरच काढला होता, जोपर्यंत ते पैसे घेत नव्हते तोपर्यंत वापरला, नंतर याहू आणि हॉटमेल, त्यांनतर जसे जीमेल सुरु झाले तसे बाकीचे आयडी मागेच पडले. बाकीचे अस्तित्त्वात आहेत पण वापरात नाहीत.. सुदैवाने कुठलाच आयडी घेताना त्यात नंबर वापरायला लागला नाही.
आणि एकदम सुटसुटीत आयडी मिळाला.. सध्याचा कंपनी मधला आयडीच तेव्हढा वाकडातिकडा आहे.. hikulkar. फक्त आठच अक्षरे वापरुन ऑटोमेटिक जनरेट होतो त्यामुळे असले काहीतरी झाले आहे. आत्ता असं लक्षात येतय की चार आयडी काढले पण चारही वेगळे आहेत, नाव आडनावाचे जुगाड असले तरीही..

पहिला काढला तो याहूवर होता.

एम आर लोकांना दिला की जाहिरातीचा भडिमार होतो हे ठाऊक होण्याआधीच तो दिला गेला. त्यावर भयंकर स्पॅम येते, अन मी तो गेल्या कित्येक वर्षांत चेकलेला नाही. मग हापिशल कामासाठी गूगलवर काढला तो आजतागायत वापरतो आहे. डॉ.आडनांव@जीमेल.कॉम असा तो सिंपल आयडी आहे.

टाईमपास/प्रोफेशनल साईटस् वर मेम्बरशिप्स साठी sitename_username@whateverisavailable.com असे आयडीज आहेत.

रच्यकने : ईमेल मधल्या @ ला "अ‍ॅट द रेट ऑफ" म्हणणार्‍यांची भयंकर कीव येते. #mildlyinfuriating

आमच्या बिल्डिंगमध्ये एकदा एका नवपदवीधराच्या बाबांनी मला घरी बोलावून आपल्या पुत्रास नोकरीसाठी अर्ज इ. साठी मार्गदर्शन कर म्हणून सांगितले. सुरुवातीच्या थोड्या गप्पा-टप्पा झाल्यावर मी त्याला सांगितले की तुझा बायोडेटा मला मेल कर म्हणजे त्या क्षेत्रातल्या माझ्या माहितीतल्या लोकांना मी तो पाठवून ठेवतो. आणि नंतर ई-पत्त्याची देवाणघेवाण केली. त्याने नोकरीच्या बायोडेटामध्ये लिहिलेला ई-पत्ता बघून मी दचकलोच - kingofheartzonly4u@अबक.com Lol

Pages