तुमचा पहिला ई-मेल पत्ता कोणता होता?

Submitted by किल्ली on 12 June, 2018 - 06:59

लहानपणी social media हा प्रकार बोकाळला नव्हता. तेव्हा असं असायचं की, फॅन्सी ई-मेल आयडी बनवण्याची क्रेझ होती. स्टार,इंडिया,कूल,डूड,अँजेल अशी नाव त्यात असायची. (हा भाग वेगळा की आजकाल काही लोकं अशा विचित्र आणि कूल(?) नावांनी थोपुवर फेक प्रोफाइल बनवतात !) . इयत्ता ५ वी मध्ये असताना माझाही टोपण नाव घालून ई-मेल पत्ता तयार केला होता! तेव्हा मला IE आणि MSPaint एवढाच वापरता येत होतं. आमच्या मातोश्री कोबोल आणि फोक्सप्रो शिकत होत्या म्हणून मला तिच्या कॉम्पुटर क्लास मध्ये जाऊन ही लुडबुड करता येत असे.

मात्र मोठेपणी (पदविकेचं पहिलं वर्ष )समजलं की ई-मेल पत्ता हा अगदी प्रोफेशनल असला पाहिजे आणि तो कोणालाही संपर्कांसाठी देताना embarrassing वाटू नये. मग नवीन आणि छान आयडी काढवा म्हटलं तर हाय रे किस्मत! माझं नाव आणि आडनाव सुमारे ३५ मुलीनी आधीच घेऊन ठेवलं होतं! मग आधी आडनाव मग नाव, पुढे अंक, असं काहीतरी करून बरा दिसणारा आयडी बनवला.आजतागायत तोच ई-मेल पत्ता वापरत आहे. पण नंतर नोकरी करायला लागल्यावर समजलं की हा पर्सनल असतो, कंपनी आपल्याला वापरण्यासाठी नवीन ई-पत्ता देते. पहिल्या कंपनीत मात्र मला माझं नाव unique आहे हा आनंद मिळवता आला. आता नावापुढे अंक नव्हता, सरळसोट ई-मेल पत्ता होता. कंपनी बदलली आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न !! माझ्या नावाच्या ६ मुली इथे असल्यामुळे मध्ये middle name चं पहिलं अक्षर घालावं लागलं आणि माझा ई पत्ता पुन्हा विचित्र बनला!
आणखी एक किस्सा असा की, मी शेजारच्या काकूंना ई-मेल आयडी काढून दिला. पासवर्ड सेट केला आणि कसं लॉग इन करायचं ते सांगितलं. नंतर त्यांना कोणीतरी ई-मेल आयडी मागितला तर त्यांनी पासवर्ड सुद्धा दिला. तो द्यायचा असतो असं वाटलं त्यांना!

तर तात्पर्य असं की, तुमच्याकडे अशा ई-मेल आयडी चे किस्से असतीलच. तुमचा पहिला ई-मेल आयडी (पासवर्ड नको Lol ) इथे share करा आणि नावाच्या आणि आयडीच्या पण धमाल गोष्टी येऊ द्या!

माझा पहिला आयडी: kul.kittu९@rediffmail.com
(ह्या आयडी वरून कृपया कोणी judgmental mode मध्ये जाऊ नये. दिवा घ्या! )

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

>>पहिला प्रश्न यायचा
ASL please....

हाहाहा दक्षिणा!...... क्या याद दिलाया!
पुढे बोलायचे की नाही/कितपत बोलायचे हे त्या उत्तरावर ठरायचे Wink

साधारण नव्वदिच्या सुरुवातीला इंटर्नेटचा वापर घराघरात पोचत होता. तोवर युनिक्स वर युयुसीपी वगैरे वापरुन लॅन्/वॅन वर मेसेजींग करायचो. ९४-९५ च्या दरम्यान इंटरनेट (डायलप) सेवेला जोर धरु लागल्यावर प्रोडिजे.नेट, कांप्युसर्व.नेट इ. सेवा सुरु करा अशी मनधरणी केली जाउ लागली. मेलमधुन त्यांच्या सेट्प ३.४ डिस्क्स किंवा सीडीज यायच्या. त्यांची सब्स्क्रिप्शन घेतल्यावर प्रोडिजे.नेट किंवा कांप्युसर्व.नेट असा इमेल आय्डी आपोआप मिळायचा. माझा तो पहिला पब्लिक डोमेन मधला इमेल आय्डी. त्यानंतर एओल हि सुरु झालं. त्यानंतर टेलिफोन कंपन्यांनीहि (बेलसाउथ, एम्सिआय इ.) हि सेवा सुरु केली आणि त्यांचाहि इमेल आय्डी (बेल्साउथ.नेट, एम्सीआय.नेट) मिळु लागाला. पुढे ज्या कंपनीतुन पगार मिळायचा, त्यांच्याकडुन इमेल आय्डीहि मिळायचा, आणि त्या व्यतिरिक्त ज्या क्लायंट्कडे काम करत असु, त्यांच्याकडुनहि इमेल आय्डी मिळायचा. कंपन्यांनी दिलेला आय्डी कामाव्यतिरिक्त इतर ठिकाणी शेअर करणं आवडत नव्हतं आणि सुमारे त्याच वेळेला भाटियाने हॉट्मेल लाँच केली. सद्या तोच प्रायमरी इमेल आय्डी आहे. पुढे याहु, जीमेल इन्विटेशन आल्याने सुरु केले; ते हि वापरात आहेत पण विशिष्ट कामाकरता...

आय्डी निवडण्यात कधीच अतरंगीपणा केला नाहि; फक्त गेम सर्वर्स्/पोर्टल हा अपवाद. तिथे आय्डी कियेटिव असणं गरजेचं असतं... Happy

पहिला प्रश्न यायचा
ASL please....

>>>
हे काही कळालं नाही...

माझ्या मित्राने त्याचं नाव_त्याच्या गर्लफ्रेंडचनाव्__१४३_आयलव्ह्यूमोस्ट. याहू.कॉम हा पत्ता घेतला होता...

नंतर त्याचं ब्रेक अप झालं तरी मनोभावे हाच पत्ता द्यायचा सगळीकडे... अगदी विप्रो मधे पण हाच ईमेल दिलेला त्याने Lol

दुसरी गर्लफ्रेण्ड मिळाली तेंव्हा बदलला

अर्थात त्या दुसर्या गर्लफ्रेण्ड ने "माझ्या नावाचा आयडी नाही काढला कधी" वगैरे बरंच पिडलेलं त्याला Proud

पहिला id vsnl चा होता. काय होता तेही आता आठवत नाही. कशाला वापरला का तेही आठवत नाही Happy

hotmail, yahoo, indiatimes, rediffmail, usa.net सुरू झाल्या झाल्या accounts उघडल्याने मस्त पैकी एकदम professional वाटनारे firstName.lastName@... असे आयडि मिळाले. जनरल इथे तिथे द्यायला थोडीशी अक्षरांची जोडतोड करून याहू वर एक आयडि बनवला नि तो एव्हधा वापरला गेला कि gmail आले तेंव्हा पटकन तोच घेतला. firstName.lastName@ करायची आठवण येईतो तो घेतला गेला Sad

९५ मधे एक forwarding service होती जी email redirect करू शकत होती तिथे एक firstName.lastName@innocent.com id मिळाला होता, त्यांच्याकडे दिलेल्या email id वर मग सगळे FWD होत असे.

मस्त धागा.. जुन्या आठवणी जाग्या झाल्या

पहिला आयडी याहू होता बहुतेक. नाव.आडनाव@याहू.. नो अतरंगी युजरनेम. साधा कारभार.
पण ते सायबर कॅफेत जाऊन फार मज्जा यायची. तेव्हा ऑनलाईन ग्रीटींग्स खुप पाठवता यायची. पेज लोड व्हायला पण वेळ लागायचा. निळी पट्टी पुढे सरकून एकदा ते पान उघडलं की काय भारी वाटायचं. Proud याहू मेसेंजरवर चॅट पण भारी प्रकार. 'अमुकतमुक इज टायपिंग' ची एक्साईटमेंट वाटायची फारच.
नंतर हॉटमेल आयडी होता काही दिवस. आता परमनंट जीमेल.

ASL please....

>>>
हे काही कळालं नाही... एज, सेक्स, लोकेशन

kingofheartzonly4u << Lol
चाट चा आयडी आहे. .. ASL विचारुन इरीटेट करणार्या Lol

चॅट रूम भारी असायच्या. याहूच्या. कन्ट्र्रीवाइज , भारतातल्य्या शहरावाइज. एशियन चॅटर्स सभ्य असायचे. तर अमेरिकन उद्धट. मी इंडोनेशियन चॅटर्स ची नेह्मी चॅट करत असे. त्यांची हिन्दू नावे पाहून गंमत वाटे . मात्र ते असत मुस्लिम. त्यात एक सोस्रोबाहू होता. म्हणजे सहस्त्रबाहू. त्याचा अर्थ अर्जुन आहे हेही त्याला माहीत होते. एक 'पुत्री' नावाची मुलगी होती. पुत्रीचा अर्थ मात्र राजकन्या. अतिशय सभ्य, नम्र आणि खेळ्कर लोक होते. २००० च्या आसपास. याहू चॅट , एम आय आर सी. , आणि हिरव्या पाकळ्या असलेले कोणते ते पोर्टल. एका अफ्गाण चॅटरला कॉल दिला . ASL झाले Happy India म्हटल्यावर तो तिकडून उद्गारला. ohh Gandhi's country. ? खरेच गांधींचा अभिमान वाटला. गांधी हीच भारताची ओळख आहे बाहेर....

मी गावभर सांगत फिरायचे ..
माझ्या परदेशालातल्या लोकांशी मैत्री आहे म्हणून.
खरे तर एकदाच एका अमेरिकन बरोबर बोलण्याचा अनुभव घेऊन नाद सोडला होता

फॅन्सी आयडी घ्यायची परंपरा याहु चॅटरुम्समुळे होती. त्यात खरे नाव कळू द्यायचे नाही त्यामुळे तशी परंपराच होती की फॅन्सीच नाव पाहिजे.

माझा पहिला आयडी याहू का रेडिफ कशावर तरी होता. जीमेल आल्यापासून दोन्हीकडे ढुंकून पाहिले नाही. आता ते दोन्ही आय्डी आठवतही नाहीत. जीमेल नविन असल्याने व्यवस्थित नावआडनाव विनाडॉट विनाअंक आयडी मिळाला. तेव्हापासून तोच आहे.

जीमेल नविन असल्याने व्यवस्थित नावआडनाव विनाडॉट विनाअंक आयडी मिळाला. >>> हेला, एकदा तुम्ही नावआडनाव@जीमेल.कॉम घेतला की नाव.आडनाव@जीमेल.कॉम, नाव.आड.नाव@जीमेल.कॉम, नाव.आडनाव$$$@जीमेल.कॉम असे सगळे आयडी आपोआप तुमचेच होतात.
$$$ सगळे नंबरचे आयडी अस्तित्वात नसले तरी नवीन आयडी घेणार्‍याला ते सहसा मिळत नाहीत.

छान धागा.
घमाचु

मला कॉलेजच्या पहिल्याच वर्षाला ईण्टरनेट वगैरेचे ज्ञान असणारया मित्राने मेल आयडी काढून दिलेला. त्यात माझ्या नावाचे दोन अक्षरी संक्षिप्त रुप आणि सोबत Cool व Sexy असे दोन ईंग्रजी शब्द होते. तो आयडी बराच काळ मिरवला. मग कॅम्पस ईंटरव्यूसाठी आयडी द्यायची वेळ आली, ते सुद्धा अचानक, तेव्हा तोंड लपवायला जागा नव्हती. थॅन्क्स टू धिरुभाई अंबानी. मेरा सपना सबका अपना. पटकन एक नवा मेल आयडी बनवला. जो आजही झिंदाबाद आहे.

कॉलेजमधे असताना युनिक्सवर लॉग-इन, पासवर्ड वापरावं लागायचं. तेव्हा मी आणि माझ्या प्रॅक्टिकल पार्टनरने मिळून दोघींची नावं, बर्थ डेट, वगैरे एकत्र करून बराच खल करून आमच्या मते एक भारी लॉग-इन आणि पासवर्ड तयार केला होता. तो आता आठवतही नाही. Lol

पुढे ईमेल, लॉग-इन वगैरे आल्यावर घरात मी भाव खायचे... ह्यॅ, हे लॉग-इन बिगिन आम्ही कॉलेजातच कोळून प्यायलो आहे, वगैरे Biggrin

माझा पहिलावहिला ईमेल आयडी इंडियाटाईम्स साईटवरचा होता. नावआडनाव@इंडियाटाईम्सडॉट्कॉम. त्या आयडीवर फक्त एक भाऊ आणि नवरा ईमेल पाठवायचे. साल २००३ Proud

याहू ईमेल त्याहून भारी आहे हे कळल्यावर तिथे आयडी काढला. तसाच, नावआडनाव@याहू.को.इन

रीडिफ चॅटवर माझा आयडी 'वन-वे-ट्रॅफिक' असा होता Lol म्हणजे मी सगळ्यांशी बोलू शकते; पण मी खरी कोण आहे हे ओळखून कुणीच माझ्याशी बोलू शकणार नाही असा काहीतरी उदात्त विचार केला होता. Lol
पण रिडीफ चॅट मला नंतर नंतर बोअर झालं. तिथे सगळे माझ्यापेक्षा खूप लहान होते Proud

जीमेल आयडीसाठी इन्व्हिटेशन लागायचं तेव्हा आम्रिकेत शिकणार्‍या आणखी एका भावाने त्याचं इन्व्हिटेशन पाठवलं. तोवर इंटरनेटवर फसवेगिरी खूप होते, तुमची खरी आयडेंटिटी अनोळखी लोकांना कळू देऊ नका, वगैरे ज्ञानवर्धन झालेलं होतं. त्यामुळे जीमेलला माझी इनिशियल्स (पी ए सी) वापरून पहिला आयडी काढला. पण तोवर ईमेल आयडीत डॉट वापरता यायला लागला होता. मला पण तो वापरायचाच होता. माझ्या इनिशिअल्सवरून मला घरात सगळे चिडवायचे पॅकपॅकपॅकपॅक Biggrin जीमेल आयडीत मी तोच इफेक्ट आणला. आजही माबोला तोच आयडी अटॅच्ड आहे.

माझे आडनावच विचित्र म्हनजे एकमेव आहे. फक्त आमच्याच गावात त्या आडनावाचे लोक आहेत . त्यामुळे नावआडनावचा आय डी पटकन मिलतो. गोची होते ती पास वर्ड आठव्त नाही. प्रत्येक वेळी फर्गॉट पसवर्डचे पाय धरायला लागतात . त्यातही हिन्ट प्रश्न आठवत नाही. तो मिळाला तर त्याचे उत्तर आठवत नाहीए. मग पुन्हा नवा इमेल आयडी काढून नव्याने रजिस्टर. बरेच इमेल आयडी काढलेत वेगवेगळ्या कारणासाठी. त्यांची नावे पण लक्शात नाहीत. बरे एखाद्या पोर्टलवर आयडी पासवर्ड आठवत नसल्याने नव्याने रजिस्टर करायला जावे तर ' धिस इमेल इज ऑलरेडी रजिस्टर्ड ' असे भसकन अंगावर येऊन आपलाच जोडा आप्ल्याच टाळक्यात हाणला जातो. माबोचा चा माझा पहिला प्रिय आयडी केवळ पासवर्ड न आठवल्याने डिफंक्ट झाला.
याहू.कॉम या नावात एक ग्रेस असायची आपणअएखाद्या आंतरराष्ट्र्रीय नेटवर्कचा भाग असल्याचा फील यायचा. मोठ्या कुर्र्यात एमेल आयडी सांगितला जायचा. पण भारतात सर्व्हर आल्यावर को.इन नावाचे आयडी यायला लागले ते अजिबात आवडायचे नाहीत . काहीतरी कम अस्सल, गावठी ,देशी वाटायचे :).
बरे एकच आयडी ठेवावा तर ढिगानी नोटिफिकेशन्स , आणि स्पॅम्स. त्यात महत्वाच्या मेल्स शोधणे म्हनजे उकिरडा फुंकण्याचाच प्रकार आहे. ऑफिसच्या मेल आयडींचा तर वेगळाच तमाशा....

हे नावात डॉट, डॅश , अंडर्स्कोअर, वगैरे ठेवू नये असे मला वाटते कारण दुसर्‍याच्या नावात जर ते असेल तर लक्शात ठेवायला अवघड पडते.

माझे आडनावच विचित्र म्हनजे एकमेव आहे. फक्त आमच्याच गावात त्या आडनावाचे लोक आहेत >>>
माझं सासरचं आडनावही असच आहे..(गावाचं नाव + कर ) मी ते occasionally वापरते पण.. सवय झाली नाही अजून Proud

फेसबुकसाठी इमेल काढायला लागला होता तो नवय्राने काढून फेसबुक शुरू करून दिले. मग फोन करून सर्वांना कळवले माझे फेसबुक चालू केलय आणि पासवडही दिला सर्वांना पाहता येईल म्हणून. मग 'ह्यां'नी पासवड बदलला. एक गोष्ट काही कायम ठेवत नाहीत सारखी धरसोड.
इमेल मात्र पाहात नाही.

हम वो जमाने के है जिस वक्त जो चाहे वो username available था.>> नशीबवान आहात!
इथे मला हाक मारली तर १० मुली धावत येतात Lol
मग जगात ई-मेल पत्ता मिलणे अगदीच दुरापास्त !

पहिला मेल आय डि जाउ द्या लोक हो..माझ्या पहिल्या कॉर्पोरेट मेल आय डि ची वेगळीच व्यथा आहे. Wink तेव्हा अस्मादिक आय बी एम मध्ये होते. आय बी ए मधे, आय टी ला माझ्या आडनावाशी काय दुश्मनी झाली कुणास ठावुक पण prasann.harankhedkar@ibm.com च्या ऐवजी parasann.marankhedkar@ibm.com असा मेल आय डि त्यांनी जन्मास घातला, आणि पुढे तिथे चाकरी करे पर्यन्त तोच आय डि होता Lol

अगदी मनापासून पटली तुमची व्यथा !
खरे तर IT (आमच्याकडे IS म्हणतात ) वाल्यांनी घातलेले घोळ हा स्वतंत्र धागा विषय होईल. वेळेवर ऍक्सेस न देणे , तक्रारींचं तिकीट आपोआप बंद करणे आणि अगणित प्रश्न विचारणे वगैरे वगैरे . Lol

Pages