तुमचा पहिला ई-मेल पत्ता कोणता होता?

Submitted by किल्ली on 12 June, 2018 - 06:59

लहानपणी social media हा प्रकार बोकाळला नव्हता. तेव्हा असं असायचं की, फॅन्सी ई-मेल आयडी बनवण्याची क्रेझ होती. स्टार,इंडिया,कूल,डूड,अँजेल अशी नाव त्यात असायची. (हा भाग वेगळा की आजकाल काही लोकं अशा विचित्र आणि कूल(?) नावांनी थोपुवर फेक प्रोफाइल बनवतात !) . इयत्ता ५ वी मध्ये असताना माझाही टोपण नाव घालून ई-मेल पत्ता तयार केला होता! तेव्हा मला IE आणि MSPaint एवढाच वापरता येत होतं. आमच्या मातोश्री कोबोल आणि फोक्सप्रो शिकत होत्या म्हणून मला तिच्या कॉम्पुटर क्लास मध्ये जाऊन ही लुडबुड करता येत असे.

मात्र मोठेपणी (पदविकेचं पहिलं वर्ष )समजलं की ई-मेल पत्ता हा अगदी प्रोफेशनल असला पाहिजे आणि तो कोणालाही संपर्कांसाठी देताना embarrassing वाटू नये. मग नवीन आणि छान आयडी काढवा म्हटलं तर हाय रे किस्मत! माझं नाव आणि आडनाव सुमारे ३५ मुलीनी आधीच घेऊन ठेवलं होतं! मग आधी आडनाव मग नाव, पुढे अंक, असं काहीतरी करून बरा दिसणारा आयडी बनवला.आजतागायत तोच ई-मेल पत्ता वापरत आहे. पण नंतर नोकरी करायला लागल्यावर समजलं की हा पर्सनल असतो, कंपनी आपल्याला वापरण्यासाठी नवीन ई-पत्ता देते. पहिल्या कंपनीत मात्र मला माझं नाव unique आहे हा आनंद मिळवता आला. आता नावापुढे अंक नव्हता, सरळसोट ई-मेल पत्ता होता. कंपनी बदलली आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न !! माझ्या नावाच्या ६ मुली इथे असल्यामुळे मध्ये middle name चं पहिलं अक्षर घालावं लागलं आणि माझा ई पत्ता पुन्हा विचित्र बनला!
आणखी एक किस्सा असा की, मी शेजारच्या काकूंना ई-मेल आयडी काढून दिला. पासवर्ड सेट केला आणि कसं लॉग इन करायचं ते सांगितलं. नंतर त्यांना कोणीतरी ई-मेल आयडी मागितला तर त्यांनी पासवर्ड सुद्धा दिला. तो द्यायचा असतो असं वाटलं त्यांना!

तर तात्पर्य असं की, तुमच्याकडे अशा ई-मेल आयडी चे किस्से असतीलच. तुमचा पहिला ई-मेल आयडी (पासवर्ड नको Lol ) इथे share करा आणि नावाच्या आणि आयडीच्या पण धमाल गोष्टी येऊ द्या!

माझा पहिला आयडी: kul.kittu९@rediffmail.com
(ह्या आयडी वरून कृपया कोणी judgmental mode मध्ये जाऊ नये. दिवा घ्या! )

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

माझा पहिला इ-मेल आय डी माझे आडनाव असा आय बी एम ३७० वर होता. बिल्डिंगमधल्या बिल्डिगमधे इमेल चालू होती. इन्टरनेट, युनिक्स वगैरे जन्माला यायचे होते. केबलने सगळे काही जोडून,फोनवर चालणारे वेगळे मोडेम घेऊन मिनिटाला १२०० बिट्स दराने एकमेकांना इ-मेल पाठवणे व नंतर जरा वेळाने ज्याला पाठवला त्याला फोनवरून विचारायचे, मिळाला का? फक्त चार पाचच मॅनेजर, ज्यांच्या ऑफिसमधे टर्मिनल, मोडेम असे, इ-मेल वापरत!! नि मग इतर मोठ्या मॅनेजरांना मीटींग मधे इ-मेल चा उल्लेख करून शहाणपणा दाखवत!
पुरातन काळचे काँप्युटर म्हणून १९५९ पासून च्या काँप्युटर टेक्नॉलॉजीचे म्युझियम बनवले तर त्यातल्या कित्येक गोष्टी इथे स्वतः किंवा काही मित्रांनी वापरल्या आहेत.

<<< माझा पहिला इ-मेल आय डी माझे आडनाव असा आय बी एम ३७० वर होता. >>>
म्हणजे तुम्ही समजता तितके "पुराने खिलाडी" नाहीत. Light 1 अगदी सुरुवातीला आद्याक्षरे वापरून इमेल तयार करत असत.

<<< खरे तर IT (आमच्याकडे IS म्हणतात ) वाल्यांनी घातलेले घोळ हा स्वतंत्र धागा विषय होईल. >>>
काढा, नवीन धागा काढा.
फार कशाला, मायबोलीवरचेच उदाहरण देतो. शाहरुख खान नावाने आयडी मागितला, तर भलताच दिला भलतेच दिले त्यांनी. Uhoh

>>आणि पुढे तिथे चाकरी करे पर्यन्त तोच आय डि होता <<
इंटरेस्टिंग. सहसा नांव्/आडनांवात झालेल्या चूका ताबडतोब दुरुस्त केल्या जातात. कित्येकदा आडनांव खुप लांब असेल तर अ‍ॅब्रिवियेट/ट्रंकेट केलं जातं पण मिस्स्पेल नाहि. असो. हा किस्सा हि फार वर्षांपुर्विचा वाटतोय कारण बर्‍याच वर्षांपासुन फक्त आय्बिएम.कॉम हा डोमेन वापरला जात नाहि. कंट्रीचं नांव त्याआधी जोडलं जातं. उदा: युएस.आय्बिएम.कॉम, इन.आय्बिएम.कॉम)

>>अगदी सुरुवातीला आद्याक्षरे वापरून इमेल तयार करत असत.<<
अगदि सुरुवातीला युझर आय्डी हाच इमेल आय्डी असायचा. तोहि ८ अक्षरांचा. नंदुशेठ यांचं आडनांव युनिक आणि ८ अक्षरांत बसत असेल तर त्यांचं आडनांव हेच त्यांचा युझर/इमेल आय्डी अस्णं शक्य आहे...

मुळात आम्ही जे वापरत होतो त्याला इ मेल असे नावच आम्ही दिले नव्हते. आपआपसात काही तरी कोबॉल नि असेंब्ली भाषेत लिहून नि एका फाईलमधे पाची लोकांची नावे लिहून नि बरेच प्रोसेसिंग करून एकदाचा एखादा मेसेज इकडून तिकडे जायचा. आय डी करण्याचे नियम वगैरे काही नव्हते. हे सगळे काम आटोपल्यावर करायचे प्रयोग होते.

पुरातन काळचे काँप्युटर म्हणून १९५९ पासून च्या काँप्युटर टेक्नॉलॉजीचे म्युझियम बनवले तर त्यातल्या कित्येक गोष्टी इथे स्वतः किंवा काही मित्रांनी वापरल्या आहेत.
>>
होय होय, आणि त्या पुरातन म्युझियममध्ये मादाम तुस्सा सारखा नंद्या ४३ उर्प्फ झक्की २.० यांचा मेणाचा पुतळाही अवश्य बसवावा , तत्कालीन पुरातन ऑपरेटर म्हनून आणि त्याला तत्कालीनच असे ' झक्की १.०' हे नाव द्यावे . कसे? Proud

पुरातन काळचे काँप्युटर म्हणून १९५९ पासून च्या काँप्युटर टेक्नॉलॉजीचे म्युझियम बनवले तर त्यातल्या कित्येक गोष्टी इथे स्वतः किंवा काही मित्रांनी वापरल्या आहेत. >> नंद्या, इकडे बेएरियात कंप्युटर हिस्ट्री म्युझिअम आहे. http://www.computerhistory.org/
आवडेल तुम्हाला, या नक्की. गटग पण करु.

माझा पहिला इ मेल पत्ता sharad@ yours.com होता.
१९९६.
त्याकाळी Sprint RPG असे काही अगदीच मोजके खाजगी ISP वगळता (ज्यांची सेवा फारच भयानक होती) VSNL ISP ची मोनोपोली होती. वर्षाला ₹५000 ला Shell dial up connection मिळे फोन वर, आणि जितक्या वेळ कनेक्टेड त्यावेळचे फोन बिल वेगळे. आणि या shell connection वर फक्त DOS type interface येत असे.

Windows GUI करिता TCP/IP dial up connection असे ज्या साठी वर्षाला तब्बल ₹ १५000 मोजावे लागत ( फोन बिल वेगळे).

Shell अकाउंट चा tcp/ip प्रमाणे वापर करण्यास shellsock नावाचा एक मोफत program मिळे, ज्यावर VSNL ने नंतर बंदी घातली होती.

आज एकाची मुलाखत घेताना प्रोफाईल वरचा त्याचा ईपत्ता पाहिला, तो ''विष.पिऊ तेरा" असा होता Uhoh Lol
vish.piu१३@xyz.com

पहिला इमेल आयडी फक्त निलीमा असा होता आर्बरनेट (युनिसिस च्या प्राय्व्हेट नेटवर्क) वर मिळालेला.
मग निलिमा_व @याहु मिळाला तो अजुन आहे. नवर्याकडे फक्त नाव्@याहु असा आहे. नंतर याहु ने असे अ‍ॅड्रेस
देणे बंद केले.

माझा पहिला ईमेल नाव@हॉटमेल होता आणि पासवर्ड फक्त ५ अक्षरी होता.

सगळ्यात सोपा उपाय म्हणजे स्वतःचे डोमेन घ्या आणि पाहिजे तो ईमेल बनवा. स्पॅम थांबवण्यासाठी तो उत्तम उपाय आहे.

चांगला domain service provider सांगा. जो MX, SPF, domain-key records व्यवस्थित set करतो. नाहीतर आपलीच इमेल स्पॅम म्हणुन बाऊन्स होते.

मला ट्रान्सफर करायचा आहे domain, याच कारणामुळे.

Gandi.net मी वापरतो. अगदी उत्तम. शिवाय ते जास्त पैसे न घेता प्रायव्हेट रजिस्ट्रेशनपण देतात.
बरेच FLOSS प्रोजेक्ट Gandi.net वापरतात, Go Daddy नाही कारण गो डॅडी ने SOPA ला पाठिंबा दिला होता.

धन्यवाद उपाशी बोका!
त्यांची साईट बघितली, सही वाटतेय.
गो डॅडी महाग आहे आणि एकावेळी एकतर POP access घ्या किंवा IMAP अशी विचित्र अटही आहे त्यांची.
Gandi . Net कूल वाटतेय.

गो डॅडी महाग आहे आणि एकावेळी एकतर POP access घ्या किंवा IMAP अशी विचित्र अटही आहे त्यांची. +१११

काहीतरी भयानक होता>> Biggrin

Pages