दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सीएनएन या अमेरिकन वृत्तवाहिनीवर जगभरातील खाद्यसंस्कृतींवर कार्यक्रम करणार्‍या अँथोनी बोर्दां यांचे निधन. किचन कॉन्फिडेन्शिअयल या पुस्तकाने बोर्दां प्रथम प्रसिद्ध झाले. त्यांच्या पार्ट्स अननोन या टीव्ही सिरीजमधून त्यांनी अनेक प्रसिद्ध तसेच अनवट देश/भागांना भेट देऊन खाद्यसंस्कृती, लोक, राजकीय परिस्थिती अश्या अनेक विषयांना स्पर्शणारे अनेक भाग सादर केले.
माझ्या लाडक्या होस्ट्स व लेखकांपैकी एक Sad

>>आत्महत्या केली हे आणखी धक्कादायक.<<
दॅट अंडरस्कोर्स हौ इम्पॉर्टंट मेंटल हेल्थ इज, इन धिस टाइम ऑफ अन्सर्टनिटीज...

रेस्ट इन पीस, टोनी बोर्डेन...

लेफ्तनंत जनरल झोरावर (झोरू) चांद बक्षी यांचे 96व्या वर्षी 24मे रोजी निधन झाले. ले.ज. बक्षी हे भारतीय जनरलांमध्ये सर्वात जास्त पदकांनी विभूषित जनरल होते. 43साली बर्मा थिएटरमध्ये कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या झोरूंनी 47-48चे भारत पाक युद्ध तसेच 65चे भारत पाक युद्धात महत्वाच्या लढयांचे नेतृत्व केले. हाजीपीर पास पुन्हा ताब्यात त्यांच्या नेतृत्वाखाली आला. त्याबद्दल त्यांना महावीर चक्राने गौरविण्यात आले. पण त्यांच्या कारकिर्दीचा एक महत्वाचा मुकुटमणी हे त्यांना मिळालेले मकग्रेगर मेडल. तिबेटमध्ये 50च्या दशकात छुपी मोहीम काढून महत्वाचा इंटेल मिळवल्याबद्दल त्यांना मकग्रेगर मेडल दिले होते.
एक अत्यंत लोकप्रिय व कर्तबगार लष्करी अधिकारी अनंतात विलीन झाला.

डॉ. हंसराज हाथी उर्फ कवि कुमार आझाद ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. हसवणारा माणूस गेला, की फार चुटपूट लागून राहते. Sad त्यांचं 'सही बात है' सदैव स्मरणात राहणार. फार आनंद दिला आहे त्यांच्या कामानं.

ओह्ह्ह... "आकाशवाणी पुणे, सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत..." इतक्या वर्षांनी अजूनही हा आवाज विसरलो नाही. श्रद्धांजली Sad

सुधा नरवणे, सात पाच च्या बातम्या. मनावर कोरलं गेलेलं नाव. जेव्हा थंडीत सकाळची शाळा जरा उशिरा असायची तेव्हा ह्या बातम्या सुरु झाल्यावर घरातून बाहेर पडायचो आम्ही भावंडे. एरवी दुपारची शाळा असेल तेव्हा बातम्या पूर्ण ऐकायचो. श्रद्धांजली Sad .

कवि कुमार आझाद Sad श्रद्धांजली.

Sad मनावर ठसा उमटवणारी माणसे. सुधा नरवणेंचा खणखणीत आवाज आणी डॉ हाथींचा हसवण्यात हातखंडा. Sad दोघांना श्रद्धांजली !

दापोली कृषी विद्यापीठाच्या स्टाफ च्या मिनीबसला झालेल्या अपघातात मृत पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली Sad

दापोली कृषी विद्यापीठाच्या स्टाफ च्या मिनीबसला झालेल्या अपघातात मृत पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

_______/|\________

दापोली कृषी विद्यापीठाच्या स्टाफ च्या मिनीबसला झालेल्या अपघातात मृत पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली>>>> देव त्यांना शांती देवो आणी घरच्यांना सावरण्याचे बळ. फार भयानक घटना. Sad

Pages