पुन्हा तीच आळवणी

Submitted by पुरंदरे शशांक on 11 June, 2018 - 02:24

पुन्हा तीच आळवणी

थेंब पहिले वहिले
धरेवर कोसळले
अंकुरती आशा थोर
मनमन थरारले

रान होईल हिरवे
दाणे अमूप टपोरे
उजाडशा झोपडीत
डोळे लकाके गहिरे

सुखावेल गाईगुरां
चारा गोजिरा हिरवा
वेली रोपट्यांना येई
धुमारून तो फुटवा

भाजी भाकरी इवली
पडे ओंजळीत का रे ?
दिस येतील सुखाचे
परजेना (पर्जन्या) सांग ना रे !!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users