तुझे डोळे

Submitted by कौस्तुभ आपटे on 9 June, 2018 - 11:48

----तुझे डोळे-----

सागर पिंजुन रत्न बिलोरी असतील आणले
अन जीवनाचे सार ओतुनी भरले चांदणे
घडवूनी क्षणभर देव असावा अचंबित ज्यांपूढे
तुझे डोळे ...तुझे डोळे ... हे असे ...तुझे डोळे ॥धृ॥

मुग्धता कधी सुमनांची,
चारुता कधी चंद्राचि,
नयनातुन ती सांडते.
गुढता गहन कोड्याची,
कल्पना नव्या कवीतेची,
नजरेतुन ती मांडते.

या तुझ्या लोचनी, खोल गेलो किती,
तरीही त्रुप्ती मना ना मिळे.
बाळ तान्हे कुणी, मधुरसे हासुनी,
जैसे लळा लावते गोजीरे
गोजीरे.. तुझे डोळे ..तुझे डोळे ... हे असे ॥१॥

स्वप्न हे कितीक स्वप्नांचे,
अंजने आणिक सुरम्यांचे,
विरघळावे तुझ्या लोचनी.
साकडे तुला अश्रुंचे
ढळू नको कधी दुखा:ने
मरण यावे तुझ्या पापणीत

अंबरीचा वसा, निखळल्या तारका,
जणू ह्या चक्षुंतुनी साचले.
तव नेत्रांची सुधा, जी मिळे तो सोहळा,
म्हणुनी झुरती किती बापुडे
बापुडे...तुझे डोळे ..तुझे डोळे ... हे असे ॥२॥

गीत- कौस्तुभ

https://www.youtube.com/watch?v=SC920jcJQx4
हे गाणे मी नुकतेच youtube वर प्रकाशीत केले आहे. वरील लींक वर ते ऐकता येईल.ह्याचे गीत आणि संगीत माझे असून मझा मित्र निखिल श्रीधर ने ते गायले आहे. तरी आवडल्यास किंवा काही सुचना असल्यास जरुर कळवा. धन्यावाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users