मायबोली अँड्रॉईड अ‍ॅप प्रकाशीत झाले.

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

२०१७ मधे मायबोलीची मोबाईल सुलभ आवृती प्रकाशीत झाल्यापासून , मोबाईलवरून मायबोलीवर येणार्‍यांची संख्या प्रकर्षाने वाढली आहे. मायबोलीचे अ‍ॅप असावे अशी सुचना बर्‍याच मायबोलीकरांकडून येत असते. यावर बरेच दिवस काम सुरु होते.

मायबोलीचे अँड्रोईड अ‍ॅप आजपासून गुगल प्ले स्टोअर मधे सर्वांसाठी उपलब्ध आहे.

या आवृत्तीच्या पहिल्या चाचणी टप्प्यात मदत करणारे मायबोलीकर चिन्नु, टवणे सर, उपाशी बोका, चिनूक्स, नरेन., भास्कराचार्य, अमितव, फारएण्ड आणि दुसर्‍या चाचणी टप्प्यात सूचना करणारे मायबोलीकर दत्तू, राजसी , हिम्सकूल, आका, पन्तश्री, पियू, बुन्नु, स्वरुप , जिज्ञासा , वरदा, विजय दिनकर पाटील, अॅस्ट्रोनाट विनय, king_of_net, Srd , Seema२७६, चिमु ,अल्पना, Nidhii , द्वादशांगुला, सिद, अक्षय दुधाळ यांचे आभार. एकूण २५८ मायबोलिकरांनी बीटा चाचणी साठी मदत करून वेळोवेळी सूचना केल्या त्यांचे आभारी आहोत. गुगल प्ले स्टोअर मधे कोण कोण खुल्या चाचणीसाठी मदत करत आहे हे कळत नाही त्यामुळे त्यांचा वैयक्तिक उल्लेख करू शकत नाही.

तुमच्या कडे बीटा टेस्टींगसाठी ०.८ आवृत्ती अगोदरच असेल तर नविन घ्यायची गरज नाही. पण त्या अगोदरची आवृत्ती असेल तर लवकर अपग्रेड करून घ्या. अ‍ॅपच्या मेनूत सेटींग्जमधे जाऊन तुम्हाला तुमची आवृत्ती कूठली ते कळू शकेल.

तुमच्या सूचनांचे स्वागत आहे आणि अ‍ॅप मधे सुधारणा सुरूच राहतील.

तुम्हाला काही सूचना / अडचणी असतील तर इथेच कळवा म्हणजे वेळोवेळी योग्य ते बदल करता येतील.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

मस्तच!

अभिनंदन अ‍ॅडमिन टीम आणि मायबोलीकर्स!

मी डाउनलोड केले बर का. पण तुम्हाला आमचे फोटो/विडिओ कशासाठी पाहिजेत हो?. Happy
(इथे विचारता तरी येत. बाकी ठिकाणी मुकाट अ‍ॅक्सेस देउन गप्प बसाव लागत.)

@srd,
तुमच्याकडे वर्जन ०.८ असेल तर परत डाऊनलोड करायची गरज नाही.

@विक्रमसिंह
>तुम्हाला आमचे फोटो/विडिओ कशासाठी पाहिजेत हो?.
अनेक मायबोलीकर प्रवासवर्णन करताना त्यांचे फोटो इथे लेखनात देतात. ते मोबाईलवरून करता याचे म्हणून ही परवानगी हवी आहे.

अ‍ॅप आवडले असेल तर कृपया अ‍ॅप स्टोअरमधे तुम्हाला योग्य वाटेल ते रेटींग आणि अभिप्राय दिलात तर मायबोली ला मदत होईल. धन्यवाद.

संपूर्ण टीम चे अभिनंदन!

येस, आयओएस अ‍ॅप हवेच. एक पूर्व सूचना - आयओएस अ‍ॅप डेव्हलप करतांना आयफोन आणि आयपॅड वर (दोन्हीकडे) चालेल असंच अ‍ॅप सुरुवातीपासून डेव्हलप करा म्हणजे सगळ्याच डिवाईसेस ना फायदा होईल. फक्त आयफोन करता डेव्हलप केलेलं अ‍ॅप आयपॅड वर फारच भयाणरित्या चालतं; रिझोल्युशन सुद्धा क्लिअर नसतं. उदा. इन्स्टाग्राम अ‍ॅप (अर्थात त्यांचं टार्गेट आयफोनच असल्यानी आहे म्हणा...)

Text size बदलून देखील अक्षरे लहान/ मोठी दिसत नाहीयेत. सेटिंग save करायचा पर्याय मला दिसला नाही, पण बहुतेक रेडिओ बटण असल्याने त्याची आवश्यकता नसावी.

Mala jevha images takaychya aahet tevhach files na access ok vatato.
Location access denyachi ichha nahi.
Hya donhi goshtina parvangi dilyashivay app vachayla vaprta yet nahi. He jara trasdayak aahe.

मीडिया ला परवानगी समजू शकतो पण लोकेशन ला परवानगीची काय गरज आहे? या दोन्ही परवानग्या दिल्या नाही तर काहीच दिसत नाही, हे आधी बीटा टेस्टिंग ला नव्हते.

मायबोलीवर नवीन या टॅबवर गेल्यावर जाहीरात आली दोन्ही वेळा. माझ्यासाठी किंवा ग्रुपमध्ये नवीन यावर आली नाही. यात काही सेटिंग आहे का random chance?

सगळ्या सुचनांबद्दल धन्यवाद.
अ‍ॅप आवडलं तर गुगल प्ले स्टोअर मधे तारांकन करायला आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.

@ राजसी
सहसा वापरायच्या वेळेस अ‍ॅपमधून परवानगी विचारणे किचकट होते. सेटींगमधे जाऊन, अ‍ॅप शोधून करावे लागते. एका टीचकीत होत नाही. तरी पाहतो काय करता येते ते.

@ राव पाटील
कळवल्याबद्दल धन्यवाद. तुमचे निरीक्षण योग्य आहे. शोध घेतो आहे.

@ श्रद्धादिनेश
मेनू दिसतो आहे का? कि काहीच दिसत नाही? ईंटरनेट चालू आहे का? काहीतरी तुमच्या फोनवर नीट डाऊन्लोड होत नाहीये.

@नरेन.
चाचणी दरम्यान बर्‍याच सुविधा अजून सुरुच नव्हत्या. त्यामुळे या सगळ्या परवानगीची आवश्यकता नव्हती. तरी पाहतो आहे काय करता येते ते.

अभिनंदन!
मला ॲपमधे प्रतिसाद द्यायला अडचण येते आहे स्पेस दिली की अक्षरं पुढे उमटत नाहीत. आत्तासुद्धा हा प्रतिसाद सगळे शब्द सलग लिहून मग मधे स्पेस दिल्या तेव्हा योग्यप्रकारे उमटला आहे.

You need to accept all required permissions to access this content असा मेसेज येतोय अँप downlaod केल्यावर। काहीच वाचता येत नाहीये

Pages