iPad वर केलेली काही रेखाटने.

Submitted by हरिहर. on 24 May, 2018 - 22:16

घरी गणपती असताना अचानक विज गेली. तेंव्हा समईच्या सोनेरी ऊजेडात दिसलेले हे श्रींचे गोड रुप. रेखाटन मात्र ब्लॅक ॲन्ड व्हाईट केले असल्यामुळे तो अप्रतिम सोनेरी रंग काही पकडता आला नाही चित्रात.

Ganesh.jpg

एक दुपार फारच कंटाळवाणी होती. काही करायला नव्हते. समोर टिव्हीवर काही विचित्र कार्टून्स सुरु होते. त्यातली एक कॅरेक्टर iPad वर रेखाटले.

Cartoon.jpg

दिवाळीअगोदर घर रंगवले होते. टेरेसची ६x१० ची भिंत कॅन्हाससारखी दिसत होती. तिला तशी स्वच्छ काही पहावेना. म्हणून तिच्यावर काही तरी रेखाटायचे म्हणून नमुना म्हणून प्रथम iPad वर स्केच केले. नंतर त्यात हवे ते बदल करुन भिंतीवर रेखाटले.

sketching.jpg

जुन्या कॅसेटस् MP3 मध्ये कन्व्हर्ट करुन ठेवल्या त्या वेळी पं. जसराज यांच्या एका कॅसेटवर असलेले हे चित्र फारच आवडले. ते रेखाटन करुन ठेवले. पुढे पेंटींग करायचा विचार होता. पण नाही जमले.

Om Namo Bagwate.jpg

वरील सर्व रेखाटने ही iPad वरती Adobe Sketch हे ॲप वापरुन केलेली आहेत.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Khup sunder chitre.
Ekdam murkele kalakar ahat.

@Nidhi
हास्यास्पद वाटेल पण शेजारच्या विंगमधल्या फ्लॅटमधून आमच्या टेरेसची भिंत दिसे ज्यावर हे चित्र रेखाटले होते. त्यांनी ‘आमच्या घरात मुली आहेत, त्यांना हे पेंटींग दिसते. त्यामुळे ते काढून टाका’ असा खुप कांगावा केला. शेवटी भिंतीला व्हाईट वॉश मारावा लागला. हे स्केच ड्राईव्हवर होते म्हणून राहिले.
हे सांगायची गरज नव्हती पण तुमच्या एका वाक्याने ते सर्व आठवले ईतकेच. Wink

सर्व चित्रे सुंदर आहेत. आवडली.

मला ते भिंतीवरचं चित्र कळत नाहीये >>> मलाही. डावीकडील स्त्री मान वर करून पहातेय, बहुतेक!

भिंतीवरील चित्रात प्रमाणबद्धतेचा विचारच केला नाहीए. ते ओघवत्या रंग आणि रेषांचे पेंटींग होते. ज्याचे डिटेल्स या स्केचमध्ये नाहीएत. डावीकडील स्री मान वर करुन डोळे बंद करुन फुलांचा गुच्छ हुंगते आहे आणि दुसरी शृंगार करते आहे अशी कल्पना होती. ते सगळे मुळ चित्रात होते. हे फक्त 'नक्की काय करायचे आहे' हे समजण्यासाठी केले होते. लयबद्ध रेषांमुळे येथे दिले ईतकेच.

फारच छान !
ओघवत्या, लयबद्ध रेषा व त्याही iPad वर !!

भुत्याभाउ काही चुकलय का शुध्दलेखनात? कारण माझी शुध्दलेखनाची बोंब आहे अगदी. या अगोदर एकदा बदल केला आहे.

जिणे गंगौघाचे पाणी ... असे हवे >>> तसेच लिहिले आहे भुत्याभाउ फक्त ‘जिणे’वर अनुस्वार आहे. तो कोणी देतात, कोणी नाही देत ईतकेच.

Pages