रांगोळी

Submitted by पुरंदरे शशांक on 24 May, 2018 - 00:03

रांगोळी

अंगणी रांगोळी
रेखीव सुंदर
रंगीत साजरा
नाचरा मयूर

मयूर पिसारा
दिमाख आगळा
चित्त आकर्षितो
निलिमा जांभळा

डौल मयुराचा
रेषा उमलती
मेघ पावसाळी
मनी घुमडती

रांगोळी मधुनी
खुणावे जरासा
नाचे मनमोर
उजळल्या दिशा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिशा उजळणारा
मेघ घुमडणारा

अद्वितीय मनमोर विभोर .....

सुंदर!
इकडे तुमची कविता आली आणि तिकडे आकाश भरून आलं. Happy

मस्त!