पाटील v/s पाटील - भाग ५

Submitted by अज्ञातवासी on 21 May, 2018 - 09:22

पाटील v/s पाटील - भाग ४
https://www.maayboli.com/node/66141

तो आला...
त्याच्या स्वागताला सगळे उभे होते, अंबा पाटलीनच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. अण्णानी गावातला सगळ्यात मोठा डी जे बोलावला होता. लोक गुलाल उधळत होते. सुवासिनी आरत्या ओवाळत होत्या,आणि...
...आणि मोहनराव पुष्पहार स्वीकारत मधून जात होते...आणि तेवढ्यात...
... खड्यातला रस्ता शोधता शोधता, गाडी खड्यात आदळली, आणि....
....मोहन जागा झाला.
"व्यास, झोपू द्या ना मला."
"सॉरी सर."
आता हे व्यास म्हणजे काय प्रकरण सविस्तर सांगतो. व्यास हे आपले युक्रेनच्या पाटलांचे भारतातील खानदानी चाकर. पाटलांच्या भारतातल्या पडक्या घरापासून ते स्टीलचे अजस्त्र उद्योग हेच सांभाळतात. माणूस मोठा गुणाचा. जास्त हुशार नाही, पण मोठा विश्वासू. हो, मात्र जेव्हा वेळ येईल, व्यास बरोबर आपला हिसका दाखवतात. येईलच पुढे....
"सर, पाटीलवाडी आली."
मोहन आळस देत गाडीतून उतरला.
"व्यास, आपल्या राहण्याचा बंदोबस्त काय?"
"सर, आपल्या सल्ल्याप्रमाणे एक बंगला विकत घेतलाय. बंगल्यात आपल्या राहणीमानाचा आब राहतील अशा सगळ्या अत्याधुनिक व्यवस्था आहेत."
"प्लीज एक्स्प्लेन, व्यास."
"सर. हा बंगला ६००० चौरस फुटांचा आहे. एवढीच खाली पार्किंग आहे. तुमच्या १८ गाड्या तिथे मावतील. वर २ मजले आहेत. तुमच्या किचन मध्ये २ फ्रिज ठेवलेत, फॉर युवर डायट. वर एक मोठा टीव्ही आहे. आणि पोलिस विभागाच्या खास परवानगीने त्यावर पाटील वाडीच्या सर्व सार्वजनिक सीसीटीवी कॅमेऱ्यांचा अक्सेस आहे. आपला स्टाफ १२ लोकांचा आहे, तुम्हाला जे हवय ते तुम्हाला पुरवल जाईल, याची खात्री बाळगा."
मोहन अवाक होऊन बघतच राहिला.
"पण, ७२ तासात हा बंगला तुम्हाला मिळाला कसा?"
"सर हा बंगला माजी आमदार हुकुमराव पाटील यांचा आहे. पाटील साहेब फार धोरणी. बंगला विकणार नाही, असं ठासून सांगितलं. मग त्यांची जुनी फाईल ओपन केली, वरून दबाव आला, आणि त्यांना बंगला विकावा लागला. आता त्यांनी याचा बोभाटा करू नये म्हणून त्यांना कुटुंबा बरोबर तिर्थटनासाठी बँकॉक येथे पाटील स्टीलच्या खर्चाने पाठविण्यात आलं आहे. "
"ओके."
"अजून काही सर,"
"काही नाही..."
"ठीक आहे सर, आपण आराम करा. मी बाजूच्या खोलीत आहे."
मोहनने नुसता हात हलवला.
त्याला आजीने सांगितलेला शब्द आणि शब्द आठवत होता.
'अंबा, तुला युक्रेन ला फरफटत नाही घेऊन गेलो, तर नावाचा मोहन पाटील नाही...'मोहन स्वतःशीच विचार करत होता.
सूर्य मावळतीकडे झुकला होता.
"सर, तुम्ही असे निवांत बसलात तर मिशन कधीच पूर्ण होणार नाही." मोहनचा ड्रायव्हर म्हणाला.
"असं?"
"हो."
"याला उलटा करा रे," मोहनने अंगरक्षकांना सांगितले.
"नको, नको सर."
ड्रायव्हर उलटा लटकत होता.
"ऐक, नीट ऐक, मी मालक नोकर भेदभाव मानत नाही. पण मालकाला काही आयडिया सुचत नसताना आणि तुझ्याही डोक्यात काही आयडिया नसताना असं बोलणं बरं नाही दिसत."
मोहन विचार करत होता, आणि ड्रायव्हर उलटा लटकत होता.
त्याच्यासमोर अण्णा पाटलाची सगळी माहिती होती, आणि अंबाची सुद्धा.
पण डोक्यात काहीही युक्ती येत नव्हती.
"पेपर आणा रे."मोहनने पेपर मागवला.
पेपर वाचता वाचता मोहनची नजर एका जाहिरातीवर गेली.
आणि मोहन मोठ्याने हसला.
"बोला खंडेराव महाराज की जय....."
पाटील वाडीतील 'अंबा' वाड्यावर सकाळी मोहन हजर होता. (वाचकांना नम्र विनंति. विस्तारभयास्तव यापुढे मोहन 'अंबा' वर होता, असा उल्लेख होईल. यात लेखकाला कुठलाही द्विअर्थी विनोद अपेक्षित नाही.)
..मोहनने वाड्यावर नजर टाकली...
"व्यास या वाड्याशी नावामुळेच दुश्मनी होतेय...."
...आणि पुढच्या क्षणी व्यास मध्ये गेलेत.
आणि पंधरा मिनिटात, वाड्यातून व्यासमागे कमीत कमी ५० लोक बाहेर पडले...
मोहनचा पहिला डाव यशस्वी झाला होता....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अधांतरी, भुत्यभाऊ मनापासून धन्यवाद...
अनघा,पलक नक्की लक्षात ठेवेन... थॅन्क्स
मेघा धन्यवाद. तुझा प्रतिसाद आता मला हक्काचा वाटायला लागलाय.
द्वादशांगुला, वैजयंती धन्यवाद. वैजंती, तुम्ही प्रेरणा बरोबर ओळखली.

नवा भाग पोस्ट केला आहे.