पाटील v/s पाटील - भाग ४

Submitted by अज्ञातवासी on 13 May, 2018 - 12:17

पाटील v/s पाटील - भाग ३
https://www.maayboli.com/node/66110

युक्रेनमधील टॉप टेन अब्जाधीश लोकांमध्ये पाटलांच नाव
होतं. पाटील स्टील हा ब्रँड होता....
...नव्हे, पाटील हाच ब्रँड होता.
अठ्ठावीस वर्षपूर्वी वसंतराव पाटील यांनी युक्रेन मद्धे येऊन या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली होती. एका स्टील वर्कर पासून ते द स्टील मॅन हा प्रवास थक्क करणारा होता. त्यात त्यांना साथ होती त्यांच्या दोन भावांची!
कृष्णराव आणि जगन पाटील यांची.
कृष्णराव मधले, तर जगन सर्वात धाकटे. हा व्यवसाय सांभाळताना प्रत्येकाने आपल्या कामाच्या कक्षा ठरवून घेतल्या होत्या. लक्ष्मणरेषाच म्हणा ना! या लक्ष्मणरेषेपायीच अजूनपर्यंत पाटील स्टील स्टीलप्रमाणे भक्कम होतं.
पन्नाशी पार झालेल्या वसंतरावांनी, पुर्वायुष्यातील काही कारणास्तव विवाह केला नव्हता. कृष्णरावानी आपल्या नावाला जागून युक्रेनमधील ओला नावाच्या गोऱ्या युवतीशी विवाह केला होता. जगनरावांनी भारतातून आलेल्या पण युक्रेनमध्ये स्थायिक झालेल्या कीर्ती नावाच्या तेलुगू युवतीशी विवाह केला होता. त्यातून त्यांना दोन अपत्ये झाली. वेंकट आणि श्रीया. त्यापैकी वेंकट हा कंपनीतील फायनान्सचा सर्वेसर्वा होता. श्रीया ही एच आर मद्धे तज्ज्ञ होती.
...आणि प्रेक्षकहो, आपल्या सर्वांचे लाडके मोहनराव एक्सटर्नल अफेअर आणि मार्केटिंग हँडल करायचे. मोहनने आईच रूप उचललं होत. पण रुपात देशी बाज होता. अंगात पाटलाच बळ होती. काळपट सोनेरी केस, निळे डोळे, गोरटेला वर्ण, अंडाकृती चेहरा, सरळ नाक, मोठे कान, धिप्पाड शरीरयष्टी, सहा फूट उंची, आणि चेहऱ्यावर खळी....
...मात्र ह्या सगळ्या दुव्यांना साधणारी एक व्यक्ती होती घरात....
राधाबाई पाटील....मोहनची लाडकी आजी....!!!
हसरी, सुबक चेहरा, उंच आणि गोरीपान राधाबाई. राधाबाई करारी होत्या. पण विचारी होत्या. या विचारीपणामुळेच त्यांनी सगळ्या मुलांना स्वातंत्र्य दिलं होतं. सुनांना आपलं केलं होतं. नातवाना सगळ्या गोष्टीसाठी उत्तेजन दिलं होतं...
... आणि घर सांधून ठेवलं होता. बांधून ठेवलं होतं!
याच राधाबाईना सहा महिन्यांपूर्वी कॅन्सरची लागण झाली होती...
घर हादरल होतं त्यावेळी, मात्र याच राधाबाईंनी
पुन्हा सगळं सांभाळलं. आणि त्या आजाराशी झुंजही देत होत्या.
आज सगळा पाटील परिवार टेबलावर जेवणासाठी बसला होता. सगळ्यांच्या तोंडी एकच विषय होता. रलो केमिकल्सच पाटील स्टील ने केलेलं अधिग्रहण....
"मोहन, पुढच्या महिन्यातच रलो कडचे पाटील स्टीलचे शेअर ओपन मार्केट मध्ये विक्रीसाठी यायला हवेत."वसंतराव म्हणाले.
"त्याआधी रलो चा नवा एम डी कोण ते ठरवा." वेंकट म्हणाला.
"वेंकट तूच एम डी असशील. सी ई ओ पदी मला वाटत जाधव परफेक्ट असतील. मोहन तुला काय वाटत?"
"मला असं वाटत की मला अजून एक थालीपीठ हवंय...'' मोहन मान वर न करता म्हणाला.
"असं कसं रे सगळं करून रिलॅक्स राहता येतं तुला? सगळं जिंकून यायचं आणि आमच्यावर व्यवस्था लावायची जबाबदारी टाकून तू नवा खेळ खेळायला मोकळा..." श्रीया म्हणाली.
"बहिणाबाई, यातच मजा आहे हो. नव्या वाटा शोधायच्या. नव्या दिशा हुंदडयाच्या. नवी आव्हाने घ्यायची..."
"...नवी आव्हाने?... "
मोहनने चमकून बघितले.
राधाबाई बोलत होत्या...
"वसंता, हा म्हणतोय नवी आव्हाने घ्यायची, दिल नाहीस तू आव्हान?"
"आई शांत हो," वसंतराव कळकळून म्हणाले.
"वसंता आव्हान? पळून आलो आपण भारतातून..."
"आई...."
"बोलू दे, कमी दिवस उरलेत माझ्याजवळ..."
मोहन उठला, आणि आजीच्या गुडघ्याजवळ येऊन बसला.
"आजी सांग, काय झालंय?"
"मोहन, बस झालंय!" वसंतराव ओरडले.
"काका, माझी आजी लढणारी आहे... माझी आजी वाघीण आहे वाघीण... आणि या वाघिणीचा नातू अजून जिवंत आहे... तिला काहीही सल राहायला नकोय मला. कळलं? मला काहीही सल नकोय......!!!!!!"
मोहनचा हात थरथरत होता. हातातून रक्त वाहत होता...
...रागात त्याने हातातला ग्लासच्या चुरा केला होता...
राधाबाई समाधानाने हसत होत्या...
"...मग तुझ्या आव्हानच नाव आहे..."
'अंबा पाटील!!!!'

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धीरे धीरे समझ आ रहा है! सगळे भाग टाकल्यावर परत एकदा वाचावे लागतील बहुतेक ! Happy बाकी हा भागही नेहमीप्रमाणे मस्त जमलाय.