विजेचा मनमानी वापर

Submitted by साद on 8 May, 2018 - 02:59

एखादा सुटीचा दिवस असतो. योगायोगाने त्या दिवशी आपली आवडती क्रिकेट म्याच टीव्हीवर चालू असते. ती अगदी रंगात आलेली असते आणि आपण ती एन्जॉय करत असतो आणि अचानक ते प्रक्षेपण बंद पडते. कारण? अर्थातच विजेचे भारनियमन. मग आपली प्रचण्ड चिडचिड होते आणि नकळत आपल्या तोंडून “आय* त्या वीज ***च्या”, असे उद्गार बाहेर पडतात.

अशा प्रकारे रंगाचा बेरंग करणारे आणि आपल्या कामाचे वेळापत्रकही बिघडवून टाकणारे भारनियमन आपल्याला उन्हाळ्यात छळते. मेट्रो आणि मोठ्या शहरांत याची झळ फार नाही बसत. पण बाकी गावांत विजेच्या नावाने शंख होत असतो. विजेच्या अपुर्या उत्पादनाबाबत आपण सरकारच्या नावाने बोंब मारून मोकळे होतो. पण उपलब्ध विजेचा वापर आपण काळजीपूर्वक व काटकसरीने करतो का?

अंघोळीसाठी (अगदी उन्हाळ्यात पण) बरेच गरम पाणी तापवण्याच्या नादात आपण बाथरूममधील गिझर हे घरातील सर्वाधिक वीज वापरणारे उपकरण आहे हे विसरून जातो. काही घरांत तसेच कार्यालयांत विजेचा मनमानी वापर चालू असतो. दिवसा सर्व पडदे लावून घ्यायचे, अंधार करायचा आणि मग ट्यूबलाईटी जळत ठेवायच्या. हा सगळा उफराटा प्रकार आहे. आपल्या खोलीतून बाहेर पडताना दिवे व पंखे खुशाल चालू ठेवणे, फरश्या पाण्याने धुतल्यावर त्या वाळण्यासाठी फुलस्पीडमध्ये पंखे लावणे, ४० C तापमान असताना ड्रायरने कपडे वाळवणे.... ही सर्व विजेच्या उधळपट्टीची लक्षणे आहेत.

आता रात्री बाहेर पडून बघा काय दिसते ते. कितीतरी ऑफिसेसच्या पाट्या रात्रभर neon signs मध्ये झळकत असतात. हॉस्पिटल व अत्यावश्यक सेवांच्या बाबतीत हे योग्य आहे. पण, जे उद्योग रात्री कायम बंद असत्तात त्यांनी अशी वीज जाळावी काय?
‘एसी’ चा वापर पण खूप काळजीपूर्वक व्हायला पाहिजे. काही घरांत तो २४ तास चालू असतो. अहो निदान पहाटे तरी बंद करा ना राव. अजून ती उत्सवांची डोळे दिपवणारी रोषनाई तर काय वर्णावी? अन ते रस्त्यावरचे सार्वजनिक दिवे सकाळी ८ पर्यंत चालू दिसले की पण फार राग येतो.

वीज उत्पादन ही खर्चिक बाब आहे. वाढती लोकसंख्या आणि औद्योगिकरण यामुळे विजेची मागणी कायम वाढतीच राहते. सोलरचा वापर आपल्याकडे तसा कमीच आहे. वीजनिर्मितीचे नियोजन हा तज्ञांचा विषय आहे. पण नागरिक म्हणून विजेचा काळजीपूर्वक वापर ही तर आपलीच जबाबदारी आहे. आधीच उन्हाळ्याने लाही लाही होत असते आणि त्यात कुठे विजेची नासाडी होताना दिसली की मग डोके अगदी सटकते बघा.

बस्स, सर्वांना वीज जपून वापरायचे आवाहन करतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रगती अमर्याद प्रदूषण करूनच होते असं काही आहे का?
हो, प्रत्येक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्षात वापर करताना त्याच्या break even point चाही विचार केला जातो. प्रदूषण सारखे विषय अशावेळी दुय्यम ठरवले जातात. खास करून विकसीत असे दुटप्पी धोरण राबवताना आढळतात.

नॉर्थ अमेरिका , ऑस्टेलिया सोडले तर बहुतेक विकसित देश प्रदुषणा बाबत दुटप्पी धोरण वापरत नाहीत. उदा नॉर्वे मध्ये २०२५ नंतर पेट्रोल / डिझेल च्या नवीन गाड्या विकु शकत नाही. (नॉर्वे मध्ये सध्या २०% गाड्या पेट्रोल / डिझेल वापरत नाहीत) . फ्रान्स मध्ये २०२७ नंतर स्पेन आणि बाकी काही युरोपियन देश असे करत २०४० मध्ये युके मधुन पेट्रोल / डिझेल च्या नवीन गाड्या बंद होणार आहेत.
ह्या सगळ्या देशानी सगळे देश नवीन गाड्या/ विज ह्या साठी जास्तित जास्त रिन्युएबल वीज वापरण्याचे धोरण निश्चित केले आहे. नॉर्वे ( सध्या सुमार ९९% रिन्युएबल वीज निर्माण करते) आणि युके मध्ये त्यासाठी तयारी चालु असलेले मी पाहिले आहे. बाकीच्या विकसित देशात पण काही तरी करत असतिलच.
गाड्या आणि विजेसाठी जर कोळसा/ पेट्रोल /डिझेल वाप्रले नाही तर प्रदुषण नाहिसे होईल.

Last two comments are on the track I wanted the discussion to come to.

दरम्यान, रश्मी यांच्या प्रतिसादाबद्दल.

लाईट सारखे बंद करणे. माझ्या घरात पूर्वी बसवलेल्या सीएफएल ट्यूब पैकी सर्वात जास्त वेळा 'उडणारी' ट्यूब बाथरूम मग जिने, पोर्च, अशा सिक्वेन्समधली होती. याच्याबद्दल ज्ञान मिळवताना लक्षात आले, की या ट्यूबचे लाईफ किती वेळा ऑन-ऑफ केले त्यावरही असते. प्रत्येक दिव्यावर तो किती तास जळेल ते लिहिलेले असते. पण किती वेळा ऑन ऑफ झाले त्यानुसार तो दिवा लवकर 'उडतो'. (माझ्या मायक्रोस्कोपच्या लाईटचे लाईफ ऑन-ऑफ वर व तासांवर सांगितलेले असते. मोबाईल इ. च्या बॅटरीज चार्जिंग सायकलवर चालतात) आता, ती ट्यूब रिप्लेस करण्याचा खर्च वि. ऑन-ऑफ न करता चालू ठेवण्याचा खर्च याचा ही हिशोब करून पाहिला पाहिजे.

मागे एका वाहत्या चर्चेत मी एलीडी/सीएफेल वि. नेहेमीचे इन्कॅडेसन्ट बल्ब / ट्यूब नळी याबद्दल भांडण केले होते. मी 'दिवा' वापरतो, तेव्हा दिव्याची किम्मत प्लस इंधनाची किम्मत असा हिशोब व्हायला हवा. जसे डिझेल कार अन पेट्रोल कार. पेट्रोल गाडी स्वस्त मिळते, पण प्रत्येक वेळी पेट्रोलचा खर्च येतो.

मी पहिल्या प्रतिसादात म्हट्लो, तसे 'एनर्जी' उर्जा उर्फ अन्न, इंधन, जे जळाऊ लाकडापासून फॉसिल फ्युएल, वीज, अ‍ॅटॉमिक एनर्जी पर्यंत काहीही असू शकते, ते मिळवणे अन खर्च करणे यातच आपली सगळी जिंदगी जाते. अन्न माझ्या शरिराला जिवंत ठेवते, त्याचे चलनवलन घडवते. बाह्य उर्जा माझ्या शरीराचे रक्षण करते, मला इकडून तिकडे नेते, माझी 'संस्कृती' उर्फ सिव्हिलायझेशन चालवते अन असेच बरेच काही.

तेव्हा "वाचवायचा" हिशोब करताना माझी कमवायची ऐपत अन खर्च करायची ताकत याचा करायचा. थोडी बचत पुढच्या पिढीसाठी करायची. कमाईचे - अर्थात ऊर्जा स्रोतांचे - नवे मार्गही शोधायचे.

What else Does life mean?

सिग्नलला गाडी काही सेकंद बंद करून वाचवलेल्या इंधनापेक्षा जास्त इंधन गाडी परत चालू करण्यात खर्च होते. जुने टिव्ही, RO मशिन सारख्या इलेक्ट्रिक वस्तू चालू होताना अधिक वीज वापरतात, त्यामुळे अशा वस्तू सारख्या चालू बंद केल्याने उलट अधिक वीज खर्च होते. अर्धवट माहितीवर वीज/इंधन बचत तर अजिबात करू नये.

इथे कोणी वीज विषयातील तज्ञ असल्यास एक विनंती :

विजेची निर्मिती, वहन, भारनियमन, अचानक वीज खंडित होण्याची कारणे इ. वर अभ्यासपूर्ण लेख लिहिल्यास मी आभारी होईन .

डॉ. तुमचे प्रतीसाद नेहेमी अभ्यासू आणी परखड असतात. तसेच तुमची माहिती देण्याची पद्धत पण समजण्यास सोपी असते.

पण बर्‍याच ठिकाणी काय होते की मिळतेय ना वीज ( म्हणजे शहरी भागात ) मग वापरा कितीही असा लोकांचा समज असतो, पण तेच आपण ग्रामिण भागाकडे सरकलो की लोड शेडींग ने त्रस्त झालेला सामान्य माणुस दिसतो. शहरी भागाला, रेल्वे, एअरपोर्ट, मॉल, विवीध उद्योगधंदे, शैक्षणीक व इतर कारभार यासाठी जणू २४ तास वीजपुरवठा असतो. खरे तर या ठिकाणी थोडा वेळ भार नियमन ( ठरवुन ) केले पाहीजे. ( एअरपोर्ट, रेल्वे, हॉस्पिटल व अत्यावश्यक सेवा सोडुन )

ग्रामिण भाग मुख्यतः शेतीवर अवलंबुन असतो. एक तर पाऊस नाही, आणी त्यातुन शेतीला पाणी द्यावे तर वीज गायब ( लोड शेडिंगने ) मग शेतकरी वा इतर लोक काम धंदे करणार कधी? ( हे सर्व तुम्हा सर्वांना महीत आहे, मी काही नवीन लिहीत नाहीये, पण उल्लेख करावासा वाटला )

तुम्ही वर लिहील्याप्रमाणे लोक ट्युब ऐवजी एल ई डी बल्ब वापरायला लगलेत, आमच्या घरी पण ते आहे. पण आपणच आपल्याला सवय लावुन घेतली तर ते जास्त सोपे होईल असे मला म्हणायचे आहे. एक दिवस लाईट ( अन ते ही भर उन्हाळ्यात ) नसतील तर मोठा गहजब उडतो. पण आताच २ ते ३ महिन्यापूर्वीच एक बातमी बघीतली की मावळ तालुक्यात ( ताम्हिणी/ वरंधा घाटापुढे ) काही वस्त्यांवर गेली कित्येक वर्षे वीज नव्हती. तिथे वीज पोहोचवणे ( डोंगराळ दुर्दम्य भाग ) फार कठिण होते. पण वीज कर्मचार्‍यांनी खांब अक्षरशः खांद्यांवर वाहुन नेले आणी तिथे वीज पोहोचवली. तिथल्या लोकांचा आनंद पहाण्यालायक होता.

एकीकडे बरेचसे वीज कर्मचारी लाच घेऊन कामे करतात ( इललिगल वायर टाकणे वगैरेला मदत ) तर दुसरीकडे हे चांगले उदाहरण . म्हणून वाटले की जेवढे होईल तेवढी आपण बचत करावी. मी वाचले नव्हते पण आता तुम्ही लक्षात आणुन दिले आहे तर बल्बवर तारीख चेक करेन .

लोडशेडींग करण्यापेक्षा वीज निर्मिती वाढवा,वीजगळती थांबवा, चुकीची वीज बिले पाठवणे बंद करा. माझ्या ओळखीतील ९९ % लोकांना वीजबिल बघता येत नाही. दर महिन्याला २-३ वीज ग्राहकांचे वीजबिल मी दुरुस्त करून देतो. असे लाखो रुपये विजमंडळ ग्राहकांकडून लुटत असते. एक तर नवीन वीज प्रकल्प उभारण्याची इच्छा नाही, आणि वीजग्राहकाकडून सौर ऊर्जा खरेदी करताना अटी सर्व वीजमंडळाला सोयीस्कर अशा ठेवायच्या. आणि वर वीज बचतीचे सल्लेही द्यायचे.

सौर उर्जेवरुन आठवले. लोकसत्तेमधले ते कात्रण मी जपुन ठेवले आहे. पण नेहेमीच्या भुलक्कड सवयीमुळे ते कात्रण मी माझ्या आईकडे ठेवले आहे की इकडे माझ्याकडे आहे हेच आठवत नाही. त्यात एका सौर पेटीचा ( सौर कुकर ) उल्लेख व माहिती होती, व एका गृहिणीची मुलाखत होती. तिने ही सौर पेटी ( तळमजल्याला घर ) सकाळी ११ वाजता बाहेर ठेवुन त्यातील कप्प्याप्रमाणे जिनसा ठेवल्या. सुरुवातीला तिला अंदाज नाही आला. भाजायला ठेवलेले शेंगदाणे अर्धे कच्चे, तर कधी करपलेले मिळाले. तर कधी भात सुद्धा शिजेना. मग तिने घड्याळ लावुन चिकाटी ठेऊन रोज प्रयोग करायला सुरुवात केली. व त्यात तिला यश आले. गॅस पेक्षा सौर उर्जेला वेळ लागतो हे खरे आहे, पण जे जिन्नस ( उदा. शेंगदाणे, रवा भाजणे ) रोज इमर्जन्सी म्हणून लागत नाहीत, ते सावकाश भाजुन गॅस वाचवला. खर्चही कमी होता.

खरे तर ज्यांची स्वतंत्र घरे आहेत, त्यांना याचा फायदाच आहे. गच्ची, टेरेस बाल्कनी, तळमजल्या जवळचे अंगण इत्यादी चा फायदा घ्यायलाच हवा.

मयेकर, शहरी भागाच्या मानाने ग्रामिण भागात लोड शेडिंग जास्त आहे, आता ते कमी झाले आहे.

नवी मुंबईत 10 वर्षांपूर्वीपर्यंत सकाळी 2 तास व संध्याकाळी2 तास लोड शेडिंग होते. नंतर त्यांनी पुणे की कसलासा पॅटर्न अवलंबला व लोड शेडिंग संपले. ह्या पॅटर्न बद्दल तेव्हा पेपरमध्ये आले होते, नक्की काय ते माहीत नाही. गेले 10 वर्षे तरी लोड शेडिंग नाही.

आमचे गाव शेती प्रधान नाही, शेतीसाठी फारशी वीज वापरली जात नाही. तिथे आठवड्यातून एकदा पूर्ण दिवस वीज नसायची. ते आता बंद झाले. दिवसातून वीज अधून मधून जात असायची व तासा दोन तासात परतायची हे आजही चालू आहे.

काल इंग्रजी पेपरात वाचले की भारत व चीन कोळश्यापासून विजेचे उत्पादन वाढवत चालले आहेत. त्यामुळे कार्बन उत्सर्जनात वाढच होत राहणार.
असो…..

परदेशात तुम्ही वीज कोणत्यावेळी वापरता त्याप्रमाणे रेट ठरतो. पीक टाईमला जास्त, रात्री कमी. पुढारलेली राज्ये थर्मल इलेक्ट्रिसिटी कमितकमी कशी तयार करता येईल याकडे लक्ष देतात.
वीज लागणारी उपकरणे लोकं रात्री लावतात. तसेही कपडे, डिशवॉशर लावायला दिवसा वेळही नसतो. रात्री एसी लावला तरी बिल कमी येतं.
भारतात आता तरी ते वास्तूशास्त्र नामक भाकड प्रकार बंद करुन घरात डायरेक्ट सूर्यप्रकाश कमी येईल जेणे करुन घर तापणार नाही अशी घरे बांधतात का?

अमितव, घरात सूर्यप्रकाश यावा अशा प्रकारे घराची रचना सांगणारे शास्त्र "भाकड" नाही. किंबहुना घरात दिवसा डायरेक्ट/इनडायरेक्ट सूर्यप्रकाश यावाच! तो नसेल तर वीजबिल वाढणार नाही का? फक्त कोणत्या दिशेने आणि कोणत्या प्रहरी यावा याचे नियोजन असले पाहिजे. ते तर मॉडर्न आर्किटेक्चर देखिल पाहतेच!
पीक अवर बिलिंगची कल्पना चांगली आहे. पण ती लोकांना आवडणार नाही.

वास्तुशास्त्रात घरात सूर्यप्रकाश येईल याचा विचार करतात? मी वाचलेल्या अनेक लेखांत कधी याबद्दल लिहिलेले आठवत नाही. पाण्याचे, अग्नीचे, देव्हार्‍याचे स्थान (दिशा) अशा गोष्टींचा विचार दिसलाय. आणि यामुळे लोकांच्या आरोग्यावरच नव्हे तर परस्परसंबंधांवर आणि आर्थिक स्थितीवर बरावाईट परिणाम होतो असेही सांगितले जाते. हे भाकड नाही?

घरात दिवसा डायरेक्ट/इनडायरेक्ट सूर्यप्रकाश यावाच! >>>>>> + 111
याचे इतरही अनेक फायदे आहेत.

पीक अवर बिलिंगची कल्पना चांगली आहे. पण ती लोकांना आवडणार नाही. >> खरे आहे.
पण भारतात औद्योगिक मिटर साठी पीक अवर बिलिंग आहे. महाराष्ट्रात औद्योगिक वापरासाठी पीक अवर ला १.५० रुपये जास्त आणि पहाटे १.५० रुपये कमी चार्ज आहे. शेतकर्याना पण स्वस्तात वीज फक्त पहाटे मिळते.
जर पुर्ण दिवस मागणी एकच राहिली तर विज निर्मितीचा खर्च कमी येतो.

घरात दिवसा डायरेक्ट/इनडायरेक्ट सूर्यप्रकाश यावाच! >>> इनडायरेक्ट नक्की यावा त्यामुळे विजेवर चालणारे दिवे लावायला लागणार नाहीत. डायरेक्ट न आला तर बरं म्हणजे घर तापणार नाही आणि एसी कमी लागेल. सूर्यपकाशाने किडे मारायचे असतील तर इतर पर्याय वापरता येतील.
पीक आवर बिलिंगची सक्ती अजिबात करु नये. ज्यांना हवं त्यांना तो पर्याय उपलब्ध असावा.

भरत, आपल्याकडे घर दक्षिणमुखी असावे असे म्हणतात. मी हा एक व्हिडिओ पहात होते तेव्हा मला कळलं की उत्तर गोलार्धात दक्षिणेकडे घराचा दरवाजा असण्यात काय विज्ञान/तर्कशास्त्र आहे. It makes sense to me. व्हिडिओची लिंक -
https://youtu.be/ly8orBNiNQM

अमितव, डायरेक्ट/ इनडायरेक्ट सूर्यप्रकाश हा कोणत्या दिशेने आणि कोणत्या प्रहरी येतो यावर आहे. व्हिडिओ नक्की बघ.. छान आहे. शिवाय घर तापू/थंड पडू नये यासाठी insulation लागते. आणि यात सूर्यप्रकाशापेक्षा अधिक वाटा building material चा असतो.

मला एक प्रश्न आहे. मुंबईत असंख कन्स्टरक्षन साइट्स आहेत. तिथे रात्रीचे भरपूर दिवे लावून ठेवलेले असतात. माझ्या खोलीची एक भिंत काचांचीच खिडकी आहे. त्यावर जरी पडदे लावले. तरी व उन्हाळ्यात ती खिडकी उघडी टाकली की
आजू बाजूच्या सर्व साईटस चे दिवे जे रात्र भर चालू असतात ते अगदी डोळ्यात खुपतात. एका इमारतीत पी थ्री किंवा लॉबी लेव्हल जिथे प्ले एरीआ, भरलेला स्विमिन्ग पूल व टेनिस कोर्ट आहे तिथे अहोरात्र मोठे दिवे असतात कोणी ही ह्या इमारतीत राहात नाही. झोपले की हे दिवे आय लेव्हललाच येतात व खोलीत पूर्ण अंधार असा होतच नाही. आता अपघात होउ नये म्हणून रात्रीचा दिवा असणे बरोबर आहे. पण जरूरी पेक्षा जास्त दिवे सायटींवर चालू असतात. एक बिझनेस पार्क आहे तिथे पण दिवाळी असतेच. ह्या मुळे झोपेवर पण परीणाम होतो. वीज आहे म्हणू न वापरणे चालू आहे असे मनात येते.

दुसरे पंखे जे लिफ्ट मध्ये सतत भर भरत असतात. ते आपन बाहेर पडताना बंद केले तर वीज वाचव णे सेकंड री पण
त्या तील बारक्या मोटरला क्षण भर आराम मिळतो व तिचे वेर टेअर कमी होते अग्दी दोन तीन मजली इमारतीच्या लिफ्ट मध्ये पन पंखे अहोरात्र चालू असतात. तर विचार करा प्र्त्येक टावर त्याच्या प्रत्येकी तीन लिफ्ट . मुंबईचे पावर कंझं प्शन बघून दडपण येते. मी तेलंग णात पाणी वी ज दुर्भि क्ष्य असलेल्या जागी राहून आल्याने इथे सतत उपलब्ध असलेले पाणी व वीज बघून फार मस्त वाटत असे.

या धाग्यावर थोडे अवांतर आहे पण मी माझ्या आधीच्या पोस्ट मध्ये पाण्याच्या वापराविषयी लिहिले होते. त्या संदर्भात हा लेख आत्ता वाचला - यात नासाच्या ग्रेस मिशन या १४ वर्षे (२००२-२०१६) चाललेल्या प्रकल्पाचे निष्कर्ष मांडले आहेत. त्या नुसार नजिकच्या भविष्यात भारताकडे दक्षिण आशियातून मोठ्या प्रमाणावर जल निर्वासित येण्याची शक्यता आहे.
लिंक - https://sandrp.in/2018/05/17/nasas-grace-mission-india-on-perilous-path-...

आम्ही इथे ४० च्या ट्यूब ऐवजी १५ चा एलईडी वापरल्याबद्दल स्वतःचीच लाल करून घेतोय आणि तिथे जगात काय चाललंय बघा

https://grist.org/article/bitcoins-energy-use-got-studied-and-you-libert...

जिकडे बघावं तिकडे विजेचा महासागर उचंबळतोय.
पेनी वाईज पाउंड फुलीश आर वी??

लोकमत, दिवाळी २०१७च्या अंकातील ‘शेतात जेव्हा वीज पिकते’ हा सौरऊर्जा निर्मितीबद्दलचा लेख वाचनीय आहे.

सहकारी तत्वावर सौर ऊर्जा निर्माण करणारे ‘धुंडी’ हे गुजरात मधील गाव यासाठी प्रसिद्ध आहे. याबाबतीत ते जगातील पाहिले गाव ठरले आहे.

सहमत. पण घरी याबद्दल सारखं ओरडलं की आपणच कटकटे ठरतो. आणि पाहुणे! त्यांच्या बद्दल तर बोलायलाच नको. खुश्शाल दिवेपंखे चालू ठेवून रात्री झोपतात, खोलीतून उठून दुसर्‍या खोलीत जातात, गीझर बंद करायला विसरतात..... काय बोलणार!:रागः:

माझं घर आमच्या कॉलनीतलं एकमेव परफेक्ट दक्षिणमुखी आहे. साऊथ व साउथवेस्ट. भयंकर तापत होतं नवं बांधलं तेव्हा. आज संपूर्ण घरा भोवती झाडं अन वेलींचं असं आवरण आहे, की लोडशेडिंगच्या नानाची टांग म्हणत मी मस्त झोपू शकतो.

रच्याकने.

एमेसीबी की महावितरण का काय ते भुक्कड लोक्स मला "रिग्रेट टु इन्फॉर्म यु दॅट यु "मे" एक्स्पिर्यन्स पॉवर आउटेज फ्रॉम १०.५० टु १७.३० ऑन अमुक तमुक डेट" असले मेसेजेस पाठवून ६-६ तास निर्लज्ज लॉडशेडिंग करतात, पण माझा इन्व्हरटर तितका वेळ टिकू शकतो, थॅक्स टु ट्रीज ;_)

Pages